HomeMoreOnline Census Self enumeration guide

Online Census Self enumeration guide

Online Census Self enumeration guide

Census Online Form

जनगणना स्वतःची माहिती ऑनलाईन कशी भरावी? | सोपी पद्धत

🏠 आता तुमची ‘जनगणना’ तुमच्या हातांत! 📱

प्रगणक घरी येण्याची वाट कशाला पाहायची? भारत सरकारने आता ‘Self-Enumeration’ (स्व-गणना) सुविधा सुरू केली आहे. फक्त 15 मिनिटांत आपल्या कुटुंबाची नोंदणी स्वतः करा! माहिती अतिशय सोपी आहे व सहज पूर्ण करता येते.


⚠️ सर्वात महत्त्वाचे:

जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त तुमचा SE ID दाखवा. तुम्हाला पुन्हा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत! गैरहजेरीत ताळमेळ ठेवल्यास काम पूर्ण होऊ शकते.

📅 लक्षात ठेवा: 1 May ते 15 May या कालावधीतच ही लिंक सुरू राहील.
⏰ वेळ: सकाळी 6 ते रात्री 12
📂 कागदपत्रे तयार ठेवा: रेशन कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक


Online Census Self enumeration guide

Census Online Form

जनगणना स्वतःची माहिती ऑनलाईन कशी भरावी? | सोपी पद्धत

Self-Enumeration (स्व-गणना) युजर गाईड

स्व-गणना ही एक ऑनलाइन प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही कुटुंब व स्वतःची माहिती स्वतः भरू शकतात.
कालावधी: 1 मे 2026 ते 15 मे 2026


https://se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन
राज्य निवडा → मोबाईल नंबर व कॅप्चा टाका → लॉगिन करा
आपला जिल्हा, तालुका, गाव/शहर अचूक भरा


भाषा निवडा → मोबाईलवर आलेला OTP टाका → पुढील प्रक्रिया सुरू
एका कुटुंबासाठी एक मोबाईल नंबर वापरता येईल


सकाळी 6:00 ते रात्री 12:00


  • घराची स्थिती
  • पिण्याच्या पाण्याची सोय
  • शौचालय सुविधा
  • कुटुंबातील सदस्य संख्या
  • उपलब्ध वस्तू (TV, इंटरनेट, वाहन)

सर्व माहिती यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक ‘स्व-गणना ओळख क्रमांक’ (SE ID) प्राप्त होईल. हा ओळख क्रमांक जपुन ठेवा. स्क्रिन शॉट काढून ठेवता येईल


प्रगणक आल्यावर SE ID दाखवा
पुन्हा माहिती सांगण्याची गरज नाही


Online Census Self enumeration guide

Census Online Form

जनगणना स्वतःची माहिती ऑनलाईन कशी भरावी? | सोपी पद्धत

महत्त्वाच्या तारखा:

  • स्व-गणना: 1 मे ते 15 मे
  • घरांची यादी: 16 मे ते 14 जून

प्रक्रिया (Steps):

  1. पोर्टलवर लॉगिन करा https://se.census.gov.in  (वेळ: सकाळी 06:00 ते रात्री 12:00)
  2. कुटुंबाची नोंदणी करा–  कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदवा.
  3. भाषा निवडा व OTP टाका – तुमची सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  4. स्थान माहिती भरा–  आपला जिल्हा, तालुका, गाव/शहर व स्थानिक माहिती अचूक भरा
  5. नकाशावर लोकेशन मार्क करा
  6. प्रश्नावली भरा ( खाली प्रश्नावली माहीतीस्तव दिली आहे)
  7. Preview तपासा
  8. Final Submit करा (Final Submit – बदल शक्य नाही)
  9. प्रगणक पडताळणी करतील

साधारण खालील आशयाच्या प्रनांच्या उत्तरांच्या स्वरुपात आपली माहिती भरावी लागेल

1) घराची माहिती:

१. इमारतीचा क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाने दिलेला).

२. जनगणना घर क्रमांक.

३. घराच्या जमिनीसाठी (Floor) वापरलेले मुख्य साहित्य.

४. घराच्या भिंतींसाठी वापरलेले मुख्य साहित्य.

५. घराच्या छतासाठी वापरलेले मुख्य साहित्य.

६. जनगणना घराचा वापर (उदा. निवासी, दुकान, ऑफिस इ.).

७. घराची स्थिती (चांगली, राहण्यायोग्य किंवा मोडकळीस आलेली).

2) कुटुंबाची माहिती:

८. कुटुंब क्रमांक.

९. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या.

१०. कुटुंब प्रमुखाचे नाव.

११. कुटुंब प्रमुखाचे लिंग (पुरुष/स्त्री/तृतीयपंथी).

१२. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर प्रवर्गातील आहे का?

१३. घराच्या मालकी हक्काची स्थिती (स्वतःचे, भाड्याचे किंवा इतर).

१४. कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या खोल्यांची संख्या.

१५. कुटुंबात राहणाऱ्या विवाहित दांपत्यांची संख्या.

3) मूलभूत सोयी-सुविधा:

१६. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत.

१७. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता (घरात आहे की घराबाहेर).

१८. प्रकाशाचा (विजेचा) मुख्य स्त्रोत.

१९. शौचालयाची उपलब्धता.

२०. शौचालयाचा प्रकार.

२१. सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था (ड्रेनेज).

२२. स्नानगृहाची (Bathing facility) उपलब्धता.

२३. स्वयंपाकघर आणि एलपीजी (LPG) / पीएनजी (PNG) कनेक्शनची उपलब्धता.

२४. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन.

२५. रेडिओ / ट्रान्झिस्टर.

२६. टेलिव्हिजन (टीव्ही).

२७. इंटरनेटची उपलब्धता.

२८. लॅपटॉप / संगणक.

२९. टेलिफोन / मोबाईल फोन / स्मार्टफोन.

३०. सायकल / स्कूटर / मोटारसायकल / मोपेड.

३१. कार / जीप / व्हॅन.

३२. कुटुंबात मुख्यत्वे वापरले जाणारे धान्य (उदा. गहू, तांदूळ, ज्वारी इ.).

३३. मोबाईल क्रमांक (केवळ जनगणनेशी संबंधित संवादासाठी).



📂 कागदपत्रे सोबत ठेवा

  • रेशन कार्ड
  • 7/12 उतारा
  • उत्पन्न दाखला
  • जात दाखला
  • बँक पासबुक

टिप- प्रत्यक्ष माहिती भरतांना काही प्रश्नवेगळे असु शकतात व शब्द रचनाही वेगळी असेल दिलेली माहिती ही पुर्व तयारीसाठी असुन यात बदल आहे अंतिम अधिकार हा शासनाच असेल कमी अधिक प्रमाणात माहिती नागरीकांपर्यन्त पोहचवणे / जनजागृती करणे हाच उददेश आहे.

अधिकृत पोर्टलवर भरलेली माहीतीच ग्राह्य धरली जाईल

खालील लिंक वर क्लिक करुन आपली व कुटुंबाची माहिती भरण्यास सुरवात करा

https://se.census.gov.in 

(वेळ: सकाळी 06:00 ते रात्री 12:00)

Online Census Self enumeration guide

Census Online Form

जनगणना स्वतःची माहिती ऑनलाईन कशी भरावी? | सोपी पद्धत


अधिक वाचा –

HSC 2021 Geography Question Paper and Answers

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Previous articleHSC Online Result 2026
Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page