HomeMorePrimary Economic Activities Distinguish between

Primary Economic Activities Distinguish between

Primary Economic Activities Distinguish between

प्राथमिक आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा


Primary Economic Activities Distinguish between

प्राथमिक आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा

Explain how the differences will be Content questions

1) विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड आणि समशीतोष्ण वनातील लाकुडतोड

2) मळयाची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती

3) खाणकाम आणि मासेमारी

4) सखोल शेती व मळयाची शेती.

5) उदयान शेती व मंडई बागायती शेती

6) सुचिपर्णी वने व उष्ण कटीबंधीय वने


विषुववृत्तीय वनातील लाकूडतोडसमशीतोष्ण वनातील लाकूडतोड
1) सर्वसाधारणपणे विषुववृत्ताच्या 0 अंश  ते 10 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान या वनांचे प्रदेश आढळतात.1) समशीतोष्ण वने ही 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्त दरम्यान आढळतात.
2) ही वने घनदाट आहेत. विविध प्रकारची वृक्ष, वेली एकाच ठिकाणी आढळतात2) ही वने फारशी घनदाट नसतात. एकाच प्रकारचे विस्तृत वृक्ष आढळून येतात.
3) या वनातील लाकूड कठीण असते. त्यामुळे मागणी कमी असते. यामुळे या व्यवसायाचा विकास मर्यादित झाला आहे. 3)वृक्षांची समानता वृक्षांची मुबलकता व लाकडांचा मऊपणा यामुळे मागणी जास्त आहे
4) तोडलेल्या लाकडासाठी वाहतुकीच्या सुविधा फारशा विकसीत नाहीत. वाहतूकीस  अडचणी आहेत4) हिवाळयात लाकूडतोड करुन बर्फाच्छादित जमिनीवर लाकडाचे ओंडके जमिनीवरील बर्फावरून घसरत नद्यांच्या गोठलेल्या पात्रात सहज व सुलभतेणे आणले जातात. जेव्हा उन्हाळ्यात गोठलेल्या नद्या वितळतात. तेव्हा नद्यावर पसरलेले ओंडके प्रवाहाच्या दिशेने पुढे ढकलले जातात. ही वाहतूक स्वस्त आहे.
5) विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड करणे कष्टाचे आणि खर्चाचे झालेले आहे.5) झाडांचे वर्गीकरण करणे व लाकूडतोड करणे तुलनेने सहज करता येते.
7) व्यापारी तत्त्वावर लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला नाही. ॲमेझॉन व कांगो नदीचे खोरे व आफ्रिकेच्या पश्चिम किनारा इ. प्रदेशात विषुवृत्तीय वने आढळतात.7) या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय व्यापारी तत्वावर विकसित झालेला दिसून येतो. उत्तर अमेरिका, कॅनडा, रशिया इ. प्रदेशात हा व्यवसाय व्यापारी तत्वावर चालतो. 

मळ्याची शेतीविस्तृत व्यापारी शेती
1) या प्रकारची शेती उष्णकटिबंधात केली जाते.1) या प्रकारची शेती समशीतोष्ण कटिबंधात 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्त च्या दरम्यान केले जाते.
2)या प्रकारच्या शेतीत चहा, कॉफी, कोको, केळी इत्यादीचे उत्पन्न घेतले जाते.2) या प्रकारच्या शेतीत गहू हे प्रमुख पीक घेतले जाते.
3)कुशल व अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनिक तत्त्वावर पिकांचे उत्पादन घेतले जाते.   3) याशिवाय मका, तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते.
4) शेतीबरोबर कोणताही जोड व्यवसाय केला जात नाही. 4) शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात. म्हणून या शेतीस यांत्रिक शेती असेही म्हणतात.
5) भारत, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड, म्यानमार, ब्राझील इत्यादी देशात या प्रकारची शेती केली जाते.5) संयुक्त संस्थानातील रशियातील स्टेप अर्जेंटिनातील पंपास, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स, आफ्रिकेतील व्हेल्ड व न्यूझीलंडमध्ये कॅटबरी या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते.   
Primary Economic Activities Distinguish between

  • 3) खाणकाम आणि मासेमारी
खाणकाममासेमारी
1) खाणकाम हा व्यवसाय भूमी व जल या दोन्ही ठिकाणी करता येतो1) मासेमारी व्यवसाय हा फक्त जल विभागातील करता येतो.
2) या व्यवसायावर अक्षवृत्तांची परिणाम होत नाही.2) मासेमारी व्यवसायावर अक्षवृत्त वितरणाचा परिणाम होतो.
3) देशाच्या औद्योगिक विकासासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे.   3) वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे.
4) खाणकाम व्यवसायावर खनिज साठे यांचे वितरण, मजुरांची उपलब्धता, खनिज शुद्धीकरण यंत्रणा इत्यादी घटक परिणाम करतात.4) मासेमारी व्यवसायावर भूखंडमंच, समुद्रप्रवाह, आधुनिक बोटी व जाळी इत्यादी घटक परिणाम करतात.
5) उदा: भारतातील छोट्या नागपूरचे पठार, बॉम्बे हाय इत्यादी  5) उदा: डॉगर बँक, जॉर्जेस बँक इत्यादी.

सखोल शेतीमळयाची शेती
1) या शेती प्रकारात शेतजमिनीचा आकार लहान असतो.1) शेताचा आकार मोठा असतो.
2) अन्नधान्य उत्पादनास प्राधान्य असते.2) एक पिक पध्दतीने पिकांचे उत्पादन घेतले जाते.
 3) या शेतीप्रकारात तांदूळ हे प्रमुख पिक आहे.3) या शेती प्रकारात चहा कॉफी, रबर, कोको मसाल्याचे पदार्थ अशा प्रकारचे पिकांची उत्पादने घेतले जाते.
4) या शेतीसाठी मानवी श्रम व प्राण्यांचा वापर होतो.4) स्थानिक मजुरांमार्फत शेतीची कामे केली जातात.
5) चीन, भारत, जपान, कोरिया श्रीलंका पूर्व आशिया खंडातील देशांत या प्रकाराची शेती आढळते.5) मलेशीया, भारत, श्रीलंका, कॅरेबीयन बेटे, ब्राझील इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हियतनाम या सारख्या देशात हा शेती प्रकार आढळतो.

उदयान शेतीमंडई बागायती शेती.
1) शेतीचा हा आधुनिक प्रकार आहे1) हा आधुनिक शेती प्रकार आहे.
2) या शेती प्रकारात फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इ. उत्पादने व्यापारी उद्देशाने घेतली जातात.2) भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मास मासे ठ. उत्पादने घेतली जातात.
3) मानवी श्रम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या उदयान शेतीत होत असतो.3) मानवी श्रमाबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
4) उष्ण कटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात उदयान शेती केली जाते.4) औदयोगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागाला लागुन असलेल्या एका रात्रीच्या प्रवासाइतक्या दूर अंतरापर्यन्तच्या  प्रदेशात मंडई बागायती शेती होते.


Primary Economic Activities Distinguish between


सुचिपर्णी वनेउष्ण कटीबंधीय सदाहरीत वने
1) ही वने उष्ण कटीबंधीय प्रदेशात आहेत.1) ही वने समशितोष्ण कटीबंधीय प्रदेशात आहे.
2) या वनातील लाकुड कठीण व जड असते2) या वनातील लाकूड मऊ व हलके असते.
3) ही वने घनदाट असतात व एकाची ठिकाणी अनेक प्रजातींचे वृक्ष व वेली आढळतात3) या वनात एकाच प्रजातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात
4) या वनातील लाकडाचा मागणी कमी आहे.4) या वनांतील लाकडाचा मागणी जास्त आहे.
लाकुडतोड.

1) Logging of equatorial forests and logging of temperate forests
2) Malaya farming and extensive commercial farming
3) Mining and fishing
4) Intensive farming and Malaya farming.
5) Udayan Agriculture and Mandai Horticulture
6) Deciduous forests and tropical forests


अधिक वाचा

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया

वस्तूनिष्ठ प्रश्ने

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Уникальные возможности для покупки серверов HP
    сервера hp купить [url=https://kupit-server-hp.ru/]сервера hp купить[/url] .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page