व्दितीयक आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा
Secondary Economic Activities Differentiate between
बारावी भूगोल प्रकरण 5 वे
व्दितीयक आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा
Secondary Economic Activities Differentiate between

1) वजनाने हलक्या होणाऱ्य पक्क्या मालाचे ऊदयोग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग
2) प्राथमिक व्यवसाय आणि व्दितीयक व्यवसाय
3) अवजड उदयोग आणि हलके उदयोग
4) लघु उदयोग आणि मध्यम उदयोग
5) संयुक्त क्षेत्रातील उदयोग आणि सहाकरी क्षेत्रातील उदयोग
6) सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग आणि खाजगी क्षेत्रातील उदयोग
1) वजनाने हलक्या होणाऱ्य पक्क्याचे मालाचे उदयोग आणि वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग
वजनाने हलक्या होणाऱ्य पक्क्या मालाचे उदयोग | वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग |
1) ज्या उदयोगात कच्च्या मालावर पक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या पक्क्या मालाचे वजन कमी होत असते त्यास वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग म्हणतात. | 1) ज्या उदयोगात कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या पक्क्या मालाचे वजन वाढत असते अशा उदयोगास वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग म्हणतात. |
2) या उदयोगातील कच्चा माल हा वजन घटीत कच्चा माल असतो. | 2) या उदयोगातील कच्चा माल शुध्द स्वरुपाचा असतो. |
3) या प्रकारातच्या उदयोगात धातू उदयोग येतात | 3) या प्रकारच्या श्रेणी अन्न प्रक्रिया उदयोग येतात. |
4) असे उदयोग कच्च्या मालाच्या क्षेत्रात उभारले जातात. | 4) हे उदयोग कच्च्या मालाच्या स्वरुपावर उभारले जातात. |
5) या उदयोगातील पक्कामाल टिकावू असतो, तो नाशंवत नसतो. | 5) या उदयोगातील बहूतांश पक्का माल नाशवंत असतो. |
2) प्राथमिक व्यवसाय आणि व्दितीयक व्यवसाय
प्राथमिक व्यवसाय | द्वितीयक व्यवसाय |
1) जे व्यवसाय निसर्गाशी संमधीत असतात अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. यात निसर्गात मिळणारे घटक वापरले जातात. | 1) प्राथमिक व्यवसायातुन प्राप्त उत्पादनावर प्रक्रिया करुन त्यापासून पक्क्या मालात रुपांतर केले जाते अशा व्यवसायास व्दितीय व्यवसाय म्हणतात. |
2) प्राथमिक व्यवसाय हे मानव प्राचीन काळापासून करत आलेला आहे. उदा. शिकार, फळे व कंदमुळे गोळा करणे. | 2) व्दितीयक व्यवसाय आधुनिक काळात विकसीत झालेली प्रक्रिया आहे. उदा. अन्न पक्रिया उदयोग |
3) प्राथमिक व्यवसाय हे द्वितीयक व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल पुरवतात. | 3) द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याची उपयोगीता जास्त असते व ते तुलनेने टिकावू असतात. |
4) यातून मिळणाऱ्या कच्च्या मालाचे बाजार मूल्य तुलनेने कमी व उदरनिर्वाहासाठी याचा वापर होतो. | 4) यातून मिळणाऱ्या कच्च्या मालाचे बाजार मूल्य तुलनेने जास्त असते ते ग्राहकोपयोगी व व्यवसायीक दृष्ट्रीकोन त्यात असतो. |
5) उदा. शेती, पशुपालन, मासेमारी खाणकाम इ. | 5) उदा. लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग इ. |
6) ज्या देशात प्राथमीक व्यवसायाचे प्रमाण जास्त असते असे देश आर्थिक दुष्ट्रया मागासलेले असतात | 6) व्दितीय व्यवसाचे प्रमाण असलेले देशात आर्थिक दुष्ट्रया विकसीत असतात. |
3) अवजड उदयोग आणि हलके उदयोग
अवजड उदयोग | हलके उदयोग |
1) ज्या उदयोगांमध्ये इतर उदयोगांना लागणारे मुलभूत साहीत्य तयार केले जात असते अशा उद्योगांना अवजड उदयोग असे म्हणतात. उदा. लोहपोलाद उदयोग | 1) ज्या उदयोगातील माल थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो असे उदयोग म्हणजे हलके उदयोग होय. उदा. औषधी उदयोग |
2) या उदयोगाला मोठया प्रमाणात भांडवलाची गरज असते. | 2) हलक्या उदयोगांना भांडवलाची गरज कमी असते. |
3) जास्त भांडवलामुळे असे उदयोग सावर्जनिक मालकीचे असतात. | 3) हलके उदयोग खाजगी मालकीचे असतात. |
4) या उदयोगात धातू उदयोग, रसायन उदयोग, सिमेंट उदयोग, संरक्षण साहित्य निर्मिती उदयोग या प्रकारचे उदयोग येतात. | 4) या प्रकारात इलेक्टॉनिक्स वस्तू, सायकली, औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे, घरगुती उपकरणे तयार होत असतात. |
4) मोठे उदयोग आणि मध्यम उदयोग
मोठे उदयोग | मध्यम उदयोग |
1) भारतात रु 10 कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उदयोगात केली जाते असे उद्योग मोठे उदयोग या वर्गात मोडतात. | 1) मध्यम उदयोगातील गुतंवणूक 5 कोटींपेक्षा जास्त परंतु 10 कोंटीपेक्षा कमी असते असे उदयोग मध्यम उदयोग या वर्गात मोडतात. |
2) या श्रेणीत लोहपोलाद उदयोग, ऊर्जा उदयोग, वस्त्र उदयोग या प्रकारच्या उदयोगांचा समावेश होतो. | 2) या श्रेणीत सायकल बनवविणे, दूरदर्शन संच, रेडिओ बनविणे इ. प्रकारच्या उदयोगांचा समावेश होतो. |
3) या उद्योगांमध्ये इतर उद्योगांना लागणारे साहीत्य देखिल तयार होत असते उदा. लोहपोलाद | 3) या श्रेणीतील उदयोगात ग्राहकोपयोगी उत्पादने निर्मिती होत असते. उदा. औषधी, कागद निर्मिती |
4) या श्रेणीतील बरेच उदेयाग सार्वजिनीक श्रेतात मोडतात. | 4) या श्रेणीतील सर्व उदयोग खाजगी श्रेणीत मोडतात. |
5) संयुक्त क्षेत्रातील उदयोग आणि सहकारी क्षेत्रातील उदयोग
संयुक्त क्षेत्रातील उदयोग | सहकारी क्षेत्रातील उदयोग |
1) दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खागजी संस्था यांनी संयुक्तरीत्या चालवलेल्या उद्योगांचा या समावेश होतो | 1) हे उदयोग अनेक लोकांच्या गटाने मीळून उभारलेल्या रकमेव्दारे सहकारी तत्वावर चालवले जातात. |
2) या उदयोगातील गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर असतो. | 2) श्रेणीतील उदयोगात नफा व तोटा विभागला जातो. |
3) या प्रकारात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) सारखे उदयोग आहेत. | 3) या प्रकारात दुग्धोत्पादन, सारख उदयोग सारखे उदयोग येतात. उदा. (AMUL) |
6) सार्वजिनक क्षेत्रातील उदयोग आणि खाजगी क्षेत्रातील उदयोग
सार्वजिनक क्षेत्रातील उदयोग | खाजगी क्षेत्रातील उदयोग |
1) सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी केंद्र व किंवा राज्य शासनाची असते. | 1) खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकीही वैयक्तिकरीत्या खाजगी, भागीदारीतील किंवा स्वतंत्र्य स्वरुपात असते. |
2) यातील सर्व गुतंवणुक शासनाची असते. | 2) या व्यवसायात सर्व गुंतवणुक वैयक्तिक, भागीदारीत किंवा खाजगी असते. |
3) शासनाची गुंतवणुक असल्याने फायदा, तोटा हा शासकीय असतो. | 3) भांडवली गुंतवणुक ज्याने केलेली असते, त्यांचाच नफा व तोटा असतो. |
4) यातील सर्व यंत्रना, विपणन क्रिया या शासकीय स्तरावरुन चालतात. | 4) यातील सर्व जबाबदाऱ्या हो मुळ भांडवलदार, मालक यांच्या कडून चालतात, त्यासांठी त्यांनी त्यांची स्वतंत्र यंत्रणा तयार करतात. |


HSC जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप