बारावी भूगोल प्राथमिक आर्थिक क्रिया वस्तुनिष्ठ प्रश्न
Primary Economic Activities objective Quetions
योग्य पर्याय निवडा Primary Economic Activities objective Quetions
1) उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे
अ) समशीतोष्ण सूचिपर्णी वनी वने
ब) समशीतोष्ण पानझडी वने
क) उष्णकटिबंधीय पानझडी वने
ड) विषुववृत्तीय सदाहरित वने
उत्तर – क) उष्णकटिबंधीय पानझडी वने
2) मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती
अ) दंतुर किनारे, उथळ समुद्र,उष्ण हवामान, प्लवंकांची वाढ.
ब) उथळ समुद्र, उष्ण –थंडसागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकांची वाढ,थंड हवामान
क) भूखंड मंच, प्लवंकांची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान.
ड) भूखंड मंच,दंतुर किनारे,प्लवंकांची वाढ, थंड हवामान.
उत्तर – ब) उथळ समुद्र, उष्ण – थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकांची वाढ, थंड हवामान
3) अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय
अ) लाकूडतोड
ब) मासेमारी
क) खाणकाम
ड) शेती
उत्तर – क) खाणकाम
4) विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये
अ) एक पिक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन.
ब) एक पिक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध, धान्य उत्पादन.
क) एक पिक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त थायलँड, उद्यान शेती.
ड) एक पिक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन.
उत्तर – ब) एक पिक पद्धती, यंत्राचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन.
5) अफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील शिकार करणारी जमात
अ) बुशमेन
ब) बोरा
क) एस्किमो
ड) जरावा
उत्तर- अ) बुशमेन
6) हा प्राथमिक व्यवसाय नाही.
अ) लाकूडतोड
ब) खाणकाम
क) वाहतूक
ड) शेती
उत्तर- क) वाहतूक
7) या पैकी कोणत्या जंगलातील लाकूड टणक असते.
अ) सूचीपर्णी वने
ब) उष्ण कटीबंधीय पानझडी
क) मोसमी वने
ड) उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने
उत्तर- ड) उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने
8) खालील पैकी कोणत्या प्रदेशात पशुपालन फारसे विकसीत नाही.
अ) ऑस्ट्रेलिया
ब) विषववृत्तीय प्रदेश
क) उत्तर अमेरिका
ड) दक्षिण अमेरिका
उत्तर- ब) विषववृत्तीय प्रदेश
9) मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे असलेले देश-
अ) भारत व श्रीलंका
ब) जपान व चीन
क) अफ्रिकेतील देश
ड) रशिया व युक्रेन
उत्तर- ब) जपान व चीन
10) तांदूळ हे मुख्य पिक असलेला शेती प्रकार
अ) सखोल उदरनिर्वाह शेती
ब) मळयाची शेती
क) स्थलांतरित शेती
ड) विस्तृत व्यापारी शेती
उत्तर- अ) सखोल उदरनिर्वाह शेती
11) पर्यावरर्णीय द्ष्टया हानिकारक शेती
अ) मंडई शेती
ब) स्थलांतरीत शेती
क) उदयान शेती
ड) मळयाची शेती
उत्तर- ब) स्थलांतरीत शेती
12) शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असलेला खंड
अ) युरोप
ब) अमेरिका
क) ऑस्ट्रेलिया
ड) आफ्रिका
उत्तर- ड) आफ्रिका
चुकीचा घटक ओळखा.
1) शेतीचा प्रकार
अ) सखोल शेती
ब) पडीक शेती
क) मळ्याची शेती
ड) मंडई शेती
उत्तर- ब) पडीक शेती
2) खनिजांमुळे दाट लोकवस्ती असणारे देश प्रदेश
अ) झांबियातील कंटगा
ब) पश्चिम युरोप
क) मांचूरिया
ड) गंगा नदी सुपिक खोरे
उत्तर- ड) गंगा नदी सुपिक खोरे
3) वनक्षेत्राचा उपयोग
अ) वन उत्पादने
ब) जल विद्युत प्रकल्प
क) कागद निर्मिती
ड) फर्निचर निर्मिती
उत्तर- ब) जल विद्युत प्रकल्प
4) अंदमान निकोबार जंगलातील शिकार करणाऱ्या जमाती.
अ) पिग्मी
ब) सेंटीनल
क) जरावा
ड) ओंग
उत्तर- अ) पिग्मी
5) उष्ण कटीबंधीच वनांचे वैशिष्ट-
अ) वनस्पतीचे दाट अच्छादन
ब) दमट व रोगट हवामान
क) सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण जास्त
ड) एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात
उत्तर- ड) एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात
6) मासेमारी उपयुक्त घटक-
अ) खोल समुद्र
ब) थंड व उष्ण सागरी प्रवाहांचा संगम
क) मुबलक प्लवक
ड) उथळ भूखंड मंच
उत्तर- अ) खोल समुद्र
7) मळयाची व्यापारी धान्य शेती
अ) भांडवलाधिषष्ठीत शेती प्रकार
ब) एक पीक शेती पध्दती
क) फळे-फुलांचे उत्पादन
ड) हेक्टरी कमी उत्पादन मात्र एकुण उत्पादन जास्त
उत्तर- क) फळे-फुलांचे उत्पादन
8) मळ्याच्या शेतीतील प्रमुख पिक
अ) रबर
ब) तांदुळ
क) कोको
ड) काॅफी
उत्तर- ब) तांदुळ
9) पशुपालनात विकसीत प्रदेश
अ) ऑस्ट्रेलिया
क) दक्षिण अमेरिका
ड) उत्तर अमेरिका
उत्तर- ब) विषववृत्तीय प्रदेश
10) खाणकाम व्यवसायावर परिणाम करणारा मानवी घटक
अ) भूगर्भ रचना
ब) भांडवल
क) तंत्रज्ञान
ड) बाजारपेठ
उत्तर- अ) भूगर्भ रचना
अचूक सहसंबध ओळखा
1)
A : भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे
R : छोट्या नागपूर पठारावर लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
2)
A : कॅनडा मध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे
R : विषुवृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3)
A : डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे
R : येथे विस्तृत समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे प्लवकांची निर्मिती
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
4)
A : खाणकाम व्यवसायातुन उदयोगंधदयांना कच्चा माल मिळतो
R : विदयुत उपकरणे, इमारत बांधकाम इ. वस्तुनिर्मीतीसाठी खनिजांचा वापर होतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
5)
A : मोसमी वनांचे प्रमाण कमी होत आहे.
R : मोसमी वनांच्या तळाशी अनेक वेली, झाडे झुडपे वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही
6)
A : विषववृत्तीय वनात व्यापारी पशुपालन विकसीत झालेले नाही.
R : विषवृत्तीय वनांचे लाकूड वजनाला हलके व मऊ आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.
7)
A : मासेमारी हा व्दितीय आर्थिक क्रियेतील व्यवसाय आहे.
R : मासेमारी प्राचीन काळापासुन चालत आलेली क्रिया आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ब) केवळ R बरोबर आहे.
8)
A : शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे.
R : शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
साखळी पुर्ण करा.
अ | ब | क |
1) शिकार | 1) सुचीपर्णी वने | 1) मध |
2) फळे व कंदमुळे गोळा करणे | 2) प्लवक | 2) विषववृत्तीय जंगले |
3) लाकुडतोड | 3) निकृष्ट चारा | 3) बोरा |
4) मासेमारी | 4) पिग्मी | 4) उथळ समुद्रबुड जमीन |
5) पशुपालन | 5) डिंक | 5) मोसमी वने |
उत्तर-
अ | ब | क |
1) शिकार | 4) पिग्मी | 3) बोरा |
2) फळे व कंदमुळे गोळा करणे | 5) डिंक | 1) मध |
3) लाकुडतोड | 1) सुचीपर्णी वने | 5) मोसमी वने |
4) मासेमारी | 2) प्लवक | 4) उथळ समुद्रबुड जमीन |
5) पशुपालन | 3) निकृष्ट चारा | 2) विषववृत्तीय जंगले |
2)
अ | ब | क |
1) सखोल उदरनिर्वाह शेती | 1) डाँगरबॅक | 1) शेत आकर लहान |
2) पंपाज गवताळ प्रदेश | 2) किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | 2) प्रतिकूल परिस्थिती |
3) मत्सक्षेत्र | 3) तांदुळ | 3) बॉम्बे हाय |
4) फळे, कंदमुळे गोळा करणे | 4) घनदाट वने | 4) ईशान्य अंटलांटिक महासागर |
5) खाणकाम | 5) व्यापारी पशुपालन | 5) द. अमेरिका |
उत्तर-
अ | ब | क |
1) सखोल उदरनिर्वाह शेती | 3) तांदुळ | 1) शेत आकर लहान |
2) पंपाज गवताळ प्रदेश | 5) व्यापारी पशुपालन | 5) द. अमेरिका |
3) मत्सक्षेत्र | 1) डाँगरबॅक | 4) ईशान्य अंटलांटिक महासागर |
4) फळे, कंदमुळे गोळा करणे | 4) घनदाट वने | 2) प्रतिकूल परिस्थिती |
5) खाणकाम | 2) किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | 3) बॉम्बे हाय |
चूक की बरोबर ते सांगा.
1) आशिया खंडात शेती व्यवसायत गुंतलेल्या लोकसंख्यचे प्रमाण सर्वाधिक आहे.
उत्तर- दिलेले विधान हे चूक आहे.
2) सखोल उदरनिर्वाह शेती प्रकारत शेतजमिनीचा आकारा मोठा असतो
उत्तर- दिलेले विधान हे चूक आहे.
3) खाणकाम व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबध नसतो
उत्तर- दिलेले विधान हे बरोबर आहे.
4) स्थलांतरीत शेतीत वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर होतो.
उत्तर- दिलेले विधान हे बरोबर आहे.
5) मळयाच्या शेतीत हेक्टरी उत्पादन कमी असते
उत्तर- दिलेले विधान हे बरोबर आहे.
6) ताम्रयुगात मानवाने खाणकामाचे कौशल्य प्रथम आत्मसात केले.
उत्तर- दिलेले विधान हे चूक आहे.
7) जपान या देशांचे मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे.
उत्तर- दिलेले विधान हे बरोबर आहे.
8 ) दंतुरकिनारे उत्तम बंदरांच्या निर्मितीस अडसर ठरतात.
उत्तर- दिलेले विधान हे चूक आहे.
9) विषववृत्तीय जंगालाच्या प्रदेशात व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसाय विकसीत झालेला आहे.
उत्तर- दिलेले विधान हे चूक आहे.
10) भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करुन शकत नाही.
उत्तर- दिलेले विधान हे बरोबर आहे.

अधिक वाचा

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

छान आहे सर हे,
सहकार्य करावे – प्रथम घटक चाचणी इयत्ता अकरावी बारावी प्रश्नपत्रिका
ok
चुकीचा घटक ओळखा छान आहे
Mahima rajendra naik
छान आहे
खुप छान
𝙋𝙪𝙣𝙖𝙢, very good