Twelfth Geography First Semester Question Paper
बारावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
विषय- भूगोल
गुण -50
वेळ- 2.30 तास
सुचना-
1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या /आलेख काढा.
3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
4) योग्य तेथे नकाशा स्टेंसिलचा वापर करावा.
5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
6) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.
Twelfth Geography First Semester Question Paper बारावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
विषय- भूगोल
प्रश्न 1) दिलेल्या सुचने नुसार उप-प्रश्न सोडवा
प्रश्न 1 अ) साखळी पूर्ण करा.
(गुण- 4)
अ | ब | क |
नैसर्गिक वायूचे उत्पादन | घनदाट वने | बॉम्बे हाय |
फळे कंदमुळे गोळा करणे | खाणकाम | लघुउद्योग |
कुंभार | कौशल्यावर आधारीत | खाजगी उदयोग |
टाटा लोहपोलाद उदयोग | वैयक्तिक | प्रतिकुल परिस्थिती |
प्रश्न 1 ब) अचूक सहसंबंध ओळखा
A:विधान R: कारण
(गुण- 3)
1)
A : सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R : सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे
ब) केवळ R बरोबर आहे
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
2)
A : नगरे वाढतात, त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.
R : एका नगराला केवळ एकच कार्य असू शकते.
अ) केवळ A बरोबर आहे
ब) केवळ R बरोबर आहे
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3)
A : लोकसंख्या लाभांशाचे फायदे आपोआप मिळत नाहीत.
R : देशातील शासन वेगवेगळ्या क्षेत्रासाठी धोरणे आखते.
अ) केवळ A बरोबर आहे
ब) केवळ R बरोबर आहे
क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रश्न 1 क) अचूक घटक ओळखा
(गुण- 3)
1) अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय
अ) लाकूडतोड
ब) मासेमारी
क) खाणकाम
ड) शेती
2) दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात.
अ) आकारहीन वस्ती
ब) त्रिकोणी वस्ती
क) रेषीय वस्ती
ड) आयताकृती वस्ती
3) सखोल उदरनिर्वाह शेतीचे प्रदेश .
अ) चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका
ब) संयुक्त संस्थाने, रशिया,
क) ऑस्ट्रेलिया
ड) गवताळ प्रदेश
प्रश्न 1 ड) चूकीचा घटक ओळखा
(गुण- 3)
1) मासेमारी उपयुक्त घटक-
अ) खोल समुद्र
ब) थंड व उष्ण सागरी प्रवाहांचा संगम
क) मुबलक प्लवक
ड) उथळ भूखंड मंच
2) लोकसंख्येसाठी अनुकूल घटक.
अ) सुपीक मृदा
ब) समशीतोष्ण हवामान
क) उष्ण हवामान
ड) पाण्याची उपलब्धता
3) लोकसंख्या संक्रमण प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश
अ) भारत
ब) कांगो
क) बांगलादेश
ड) नायजर
Twelfth Geography First Semester Question Paper बारावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
प्रश्न 2 रा) भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही 2)
(गुण- 6)
1) जन्मदर कमी असुनसुध्दा लोकसंख्या वाढू शकते.
2) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते.
3) कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे.
प्रश्न 3 रा ) फरक स्पष्ट करा. (कोणतेही 2)
(गुण- 6)
1) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
2) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
3) खाणकाम आणि मासेमारी
प्रश्न 4 अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील घटक योग्य चिन्हांच्या व सुचिच्या सहाय्याने दर्शवा (कोणतेही- 4)
(गुण- 4)
1) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
2) अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र
3) डॉगर बँक मत्स्यक्षेत्र
4) सर्वात कमी लिंगगुणोत्तर असणारा देश
5) लोकसंख्या संक्रमणावस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील कोणताही एक देश
प्रश्न 4 ब) खाली दिलेल्या लोकसंख्या मनोऱ्यांचे निरीक्षण करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
(गुण- 3)

1) कोणता मनोरा वैदयकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व करतो ?
2) विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो ?
3) “अ” मनोऱ्याचे तळ रुंद असल्याचे कारणे कोणते ?
प्रश्न 5 वा) टीपा लिहा. (कोणतीही एक)
(गुण- 4)
1) ग्रामिण भूमी उपयोजन
2) मळयाची शेती
प्रश्न 6 अ) पुढील उताऱ्याचे वाचन करुन त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
(गुण- 4)
व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करणे म्हणजे वाहतूक होय. तर विचार किंवा कल्पनांचे स्थलांतरण म्हणजे संप्रेषण होय. साधनसंपत्तीचे वितरण सर्वत्र समान प्रमाणात नाही म्हणून जेथे साधनसंपत्तीची कमतरता असते अशा ठिकाणी त्यांची वाहतूक केली जाते. कारखान्यांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी कच्चा माल तर बाजारपेठांमध्ये वितरणासाठी पक्क्या मालाची ने-आण वाहतुकीच्या साधनांद्वारे होते.
प्राचीन काळापासून मानव दळणवळणाच्या साधनांच्या मदतीने मालाची ने-आण किंवा व्यापार करीत आला आहे. प्रारंभीच्या काळात, मानव दीर्घकाळ स्वतः वाहतुकीचे साधन म्हणून भार वाहून इच्छित स्थळी पोहचवित असे किंबहुना आजही काही विकसनशील आणि अविकसित देशात अशा प्रकारे काही मानवाच्या मार्फत वाहतूक केली जाते. अगदी प्रारंभीच्या काळातील ओझेवाहक मानव ते प्राणी आणि नंतर हातगाडी ते आधुनिक वाहने अशा क्रमाने वाहतूक विकसित होत गेली.
प्रश्न:
1) वाहतूक म्हणजे काय ?
2) वाहतूक कोणत्या क्रमाने विकसित होत गेली ?
3) वाहतुकीचा उपयोग कशासाठी केला जातो ?
4) कोणत्या प्रदेशात दळणवळणासाठी प्राण्यांचा वापर केला जातो ?
प्रश्न 6 ब) खालील पैकी एक सुबक आकृती काढून भागांना नावे दया.
(गुण- 2)
1) त्रिकोणी वस्ती
2) केंद्रीत वस्ती
प्रश्न 7 वा) खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
(गुण- 8)
1) प्राथमिक आर्थिक व्यवसायांचे विविध प्रकार व त्यांचे वैशिष्टे स्पष्ट करा.
2) लोकसंख्या सक्रमण सिध्दांन्तातील चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करा.
Twelfth Geography First Semester Question Paper
बारावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

अधिक वाचा
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Hi, Very Useful to me
Very nice presentation sir
good
good