HomeHSC Question PapersHSC 2021 Geography Question Paper and Answers

HSC 2021 Geography Question Paper and Answers

Table of Contents

HSC 2021 Geography Question Paper and Answers

Hsc 2021 Geography Question Paper

Hsc 2021 Geography Question Paper and Answer
Hsc 2021 Geography Question Paper and Answer

बारावी बोर्ड 2021 भूगोल प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका


सूचना :

1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आलेख काढावे

3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4) नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा

5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात,

6) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी,


प्रश्न 1 अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा:

5

अनक  
1प्रतिकूल हवामानभुरचनावैद्यकीय खर्च अधिक
2वृध्द लोकसंख्यावजन घटीत कच्चा मालशेताचा आकर लहान
3सखोल उदरनिर्वाहक शेतीवाळवंटी प्रदेशहिमालय
4साखर कारखाना60 वर्षे पेक्षा जास्त वयोगटकमी लोकसंख्येची घनता
5नैसर्गिक प्रदेशतांदूळऊस उत्पादक प्रदेश

—————————————–

प्रश्न 1 ब) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा :

5

1) लोकसंख्या घनता वर्गीकरणानुसार जास्त घनतेची वस्ती ते कमी घनतेची वस्ती असा क्रम लावा :

अ) विखुरलेली वस्ती

ब) एकाकी वस्ती

क) दाट वस्ती

ड) अपखंडीत वस्ती

2) खाली दिलेल्या खंडांचा साक्षरतेनुसार उतरता क्रम लावा :

अ) आशिया

ब) युरोप

क) आफ्रिका

ड) उत्तर अमेरिका

3) तृतीयक व्यवसायापासून प्राप्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार दिलेल्या देशांचा चढता क्रम लावा :

अ) भारत

ब) संयुक्त संस्थाने

क) केनिया

ड) डेन्मार्क

4) महाराष्ट्रातील दिलेल्या विभागांच्या आर्थिक विकासानुसार चढता क्रम लावा.

अ) विदर्भ

ब) पश्चिम महाराष्ट्र

क) खानदेश

ड) मराठवाडा

5) विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशांकडे वनांचा क्रम लावा :

अ) उष्णकटिबंधीय पानझडी वने

ब) विषुववृत्तीय सदाहरित वने

क) समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने

ड) समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने

———————————

5

A: विधान

R: कारण

1) A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.

   R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

2) A: नगरे वाढतात, त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.

    R: एका नगराला केवळ एकच कार्य कार्य असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

3) A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.

   R: उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

4) A: निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे.

   R: निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

5)

A: तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही.

R: या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


5

1) नागरीकरणाचे घटक-

अ) वाहतूक व्यवस्था

ब) व्यापार

क) शेती

ड) आरोग्य सुविधा

———————————

2) प्राथमिक आर्थिक क्रिया –

अ) फळे, कंदमुळे गोळा करणे

ब) मासेमारी

क) पशुपालन

ड) संदेशवहन

———————————

3) खनिजांवर आधारित उद्योग

अ) कागद निर्मिती उद्योग

ब) लोहपोलाद उदयोग

क) सिमेंट उद्योग

ड) अॅल्युमिनिअम उद्योग

———————————

4) क्षेत्रीय विकास मोजण्याचे मापदंड –

अ) शिक्षण

ब) पर्वत

क) आयुर्मान

ड) लोकसंख्या गुणवत्ता

———————————

5) मानवी भूगोलाच्या शाखा

अ) सामाजिक भूगोल

ब) राजकीय भूगोल

क) आर्थिक भूगोल

ड) मृदा भूगोल


12

1) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.

2) ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.

3) शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.

4) हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.

5) हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.

6) भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे.


9

1) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश

2) ओसाड भूमी आणि बिगरशेती भूमी

3) खाणकाम आणि मासेमारी

4) द्वितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया

5) प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश


6

1) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश

२) भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य

3) ऱ्‍हूर औदयोगिक क्षेत्र

4) पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र

5) सुएझ कालवा

6) चहा निर्यात करणारा प्रमुख देश

7) सहारा वाळवंट

8) जपानमधील एक प्रमुख औदयोगिक शहर

———————————

5

1) दिलेल्या आकृतीत काय दर्शविले आहे?

2) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे?

3) लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता?

४) 16.96% टक्केवारी कोणत्या खंडाची आहे?

5) या आकृतीमध्ये किती खंड दर्शविले आहेत?


12

1) मळ्याची शेती

2) स्थानमुक्त उद्योग

3) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व

4) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक

5) भूगोलातील आधुनिक कल


4

खनिज वापर  

मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे ही त्यांच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कास्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग या क्रमाने कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखीत करण्यात आले. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची प्रगती होत गेली आहे. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

1) मानवाने खनिजांचा उपयोग कोणकोणत्या वस्तू बनवण्याकरिता केला आहे?

2) मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य केव्हा आत्मसात केले ?

3) खनिजांच्या वापरानुसार कोणकोणते कालखंड आहेत?

4) मानवाने महासागराच्या तव्ळातून कोणकोणती उत्पादने घेतली आहेत?

——————————–

4

1) वयोरचनेचा विस्तारणारा मनोरा

2) रेषीय वस्ती

3) भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये


8

1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासहित स्पष्ट करा.

2) साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.


Click Hereto Join Geography WhatsApp Group- Click


HSC 2021 Geography Question Paper and Answers


उत्तरपत्रिका 2021

प्रश्न 1.) दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा

प्रश्न 1 अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा:

5

    उत्तर

अन
1प्रतिकूल हवामानवाळवंटी प्रदेशकमी लोकसंख्येची घनता
2वृध्द लोकसंख्या60 वर्षे पेक्षा जास्त वयोगटवैद्यकीय खर्च अधिक
3सखोल उदरनिर्वाहक शेतीतांदूळशेताचा आकार लहान
4साखर कारखानावजन घटीत कच्चा मालऊस उत्पादक प्रदेश
5नैसर्गिक प्रदेशभुरचनाहिमालय

————-

प्रश्न 1 ब) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा :

5

1) लोकसंख्या घनता वर्गीकरणानुसार जास्त घनतेची वस्ती ते कमी घनतेची वस्ती असा क्रम लावा :

अ) विखुरलेली वस्ती

ब) एकाकी वस्ती

क) दाट वस्ती

ड) अपखंडीत वस्ती

उत्तर- (क) दाट वस्ती (ड) अपखंडीत वस्ती (अ) विखुरलेली वस्ती (ब) एकाकी वस्ती

———————————

2) खाली दिलेल्या खंडांचा साक्षरतेनुसार उतरता क्रम लावा :

अ) आशिया

ब) युरोप

क) आफ्रिका

ड) उत्तर अमेरिका

उत्तर- (ब) युरोप (ड) उत्तर अमेरिका (अ) आशिया (क) आफ्रिका

———————————

3) तृतीयक व्यवसायापासून प्राप्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार दिलेल्या देशांचा चढता क्रम लावा :

अ) भारत

ब) संयुक्त संस्थाने

क) केनिया

ड) डेन्मार्क

उत्तर-(क) केनिया (अ) भारत (ड) डेन्मार्क (ब) संयुक्त संस्थाने

———————————

4) महाराष्ट्रातील दिलेल्या विभागांच्या आर्थिक विकासानुसार चढता क्रम लावा.

अ) विदर्भ

ब) पश्चिम महाराष्ट्र

क) खानदेश

ड) मराठवाडा

उत्तर-(ड) मराठवाडा (अ) विदर्भ(क) खानदेश(ब) पश्चिम महाराष्ट्र

———————————

5) विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशांकडे वनांचा क्रम लावा :

अ) उष्णकटिबंधीय पानझडी वने

ब) विषुववृत्तीय सदाहरित वने

क) समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने

ड) समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने

उत्तर-

ब) विषुववृत्तीय सदाहरित वने – अ) उष्णकटिबंधीय पानझडी वने

ड) समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने – क) समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने


प्रश्न 1 क) अचूक सहसंबंध ओळखा व लिहा :

5

A: विधान

R: कारण

1) A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.

   R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

———————————

2) A: नगरे वाढतात, त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.

    R: एका नगराला केवळ एकच कार्य कार्य असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

3) A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.

   R: उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————————

4) A: निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे.

   R: निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.

———————————

5)

A: तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही.

R: या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते.

अ) केवळ A बरोबर आहे.

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


प्रश्न 1 ड) अयोग्य घटक ओळखा व लिहा :

5

1) नागरीकरणाचे घटक-

अ) वाहतूक व्यवस्था

ब) व्यापार

क) शेती

ड) आरोग्य सुविधा

उत्तर -शेती

———————————

2) प्राथमिक आर्थिक क्रिया –

अ) फळे, कंदमुळे गोळा करणे

ब) मासेमारी

क) पशुपालन

ड) संदेशवहन

उत्तर- ड) संदेशवहन

———————————

3) खनिजांवर आधारित उद्योग

अ) कागद निर्मिती उद्योग

ब) लोहपोलाद उदयोग

क) सिमेंट उद्योग

ड) अॅल्युमिनिअम उद्योग

———————————

उत्तर- अ) कागद निर्मिती उद्योग

4) क्षेत्रीय विकास मोजण्याचे मापदंड –

अ) शिक्षण

ब) पर्वत

क) आयुर्मान

ड) लोकसंख्या गुणवत्ता

उत्तर- ब) पर्वत

———————————

5) मानवी भूगोलाच्या शाखा

अ) सामाजिक भूगोल

ब) राजकीय भूगोल

क) आर्थिक भूगोल

ड) मृदा भूगोल

उत्तर- ड) मृदा भूगोल


Click here to Join WhatsApp Group- Click


प्रश्न 2 ) खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही चार)

12

1)

उत्तर-

① व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे एका राजकिय सीमेतुन दुसऱ्या राजकीय सीमेत, कमी किंवा जास्त कालावधीसाठी किंवा कायमस्वरुपी जाता तेव्हा या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात.

② व्यक्ती नोकरीच्या संधी, उत्तम राहणीमान या सारख्या आकर्षक घटकांमुळे स्थलांतर करत असतो असे स्थलांतर बऱ्याच वेळा कायमस्वरुपी असते. अनेक वेळा व्यक्ती दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती, युध्दजन्य परिस्थिती, सामाजिक असुरक्षितता, राजकीय असुरक्षितता या सारख्या कारणांमुळे देखिल स्थलांतर करीत असतो.

③ दुष्काळी परीस्थिती, युध्दजन्य परिस्थिती, नैसर्गीक आपत्तीत केलेले स्थलांतर परिस्थिती सुधारल्या नंतर व्यक्ती पुन्हा आपल्या मुळस्थानी परत येतो

④ आर्थिक कारणाने नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेले अनेक लोकही निवृत्ती नंतर परत आपाल्यागावी येतात.

⑤ स्थलांतर हे विशिष्ट हेतु किंवा उद्दीष्टानुसार झाले असेल तर तो हेतू किंवा उद्दीष्ट साध्य झाल्यानंतर पुन्हा व्यक्ती मुळ ठिकाणी परत येतो

⑥ शैक्षणिक, पर्यटन, धार्मीक वैदयकीय कारणानांमुळे केलेल्या स्थलांतरात लोक पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी परत येतात म्हणजेच स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरुप असते असे नाही.


2)

②  ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या व शेती व्यवसातील लोकांचे प्रमाण तेथे जास्त असते.

③  ग्रामीण भागात प्रत्यक्ष लागवडी खालील क्षेत्र जास्त असते.

④ ग्रामिण भागात शेतीव्यवसाया बरोबरच शेतीसंमधी इतर वनक्षेत्र, फळबागा, ओसाड जमीन, पडीक जमीन क्षेत्र देखील आढळून येत असते.

⑤ अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या प्राण्यांसाठी गायरान व चराऊ जमीन सारखे ग्रामपंचायतीच्या मालकीची अथवा सरकारच्या मालकीची भूमी देखील उपलब्ध असते

⑥ ग्रामिण भागात शेती भागात किरकोळ वृक्षांची संख्या जास्त असते, तसेच वनराई देखील आढळुन येत असते.


3)

उत्तर-

① मानवाकडून चारितार्थासाठी  तसेच मांस, हाडे, लोकर, कातडी, केस, सुगंधी कस्तूरी, हस्तीदंत इ. मिळविण्यासाठी अतिप्राचीन काळापासून शिकार केली जात आहे.

② मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

③ काही प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

④ त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. व पर्यावरणाचे असंतुलन निर्माण होत आहे.

⑤ त्यामुळे जगभरात प्राण्यांच्या संरक्षण व सवंर्धनासाठी नवनवीन कायदे करुन शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.


4)

उत्तर-

① वाहतूक एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे.

② भूवाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापाऱ्यांमध्ये अनन्यसाधारण आहे.

③ वाहतूक साधनांद्वारे एखाद्या प्रदेशात आवश्यक असणारा माल हा दुसऱ्या प्रदेशातून पाठविता येतो.

④ यातून एका प्रदेशाचा दुसऱ्या प्रदेशाशी व्यापार चालतो. वाहतुकीमुळे माल हा कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत व ग्राहकापर्यंत पोहोचविला जातो, व व्यापार वृद्धिगत होतो.

⑤ मालाचे उत्पादन घेणारा प्रदेश व बाजारपेठ दूर-दूर असतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य वाहतूक साधनांमुळे शक्य होते.

⑥ ज्या प्रदेशात भूमार्ग, जलमार्ग व हवाई मार्गाचा विकास झालेला असतो, अशा प्रदेशात व्यापाराला अधिक चालना मिळते व व्यापाराचा विकास होतो.

⑧ त्यामुळे व्यापारामध्ये एक महत्त्वाची भूमिका वाहतुकीचे आहे.


5)

उत्तर-

① हवाई वाहतुक सर्वात आधुनिक व वेगवान वाहतूकीचे साधन असल्याने वेळची बचत होते.

② नाशवंत उत्पादने, मौल्यवान उत्पादने, वजनाने हलक्या मालाची वाहतूक व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक यासाठी हवाई वाहतुकीचा वापर वाढत आहे.

③ जीवनाआवश्यक औषधांचा तातडीने पुरवठा करण्यास हवाई वाहतुक महत्वाची भूमीका बजावते

④ अपघात, नैसर्गीक आपत्ती, आपत्कालीन स्थिती तसेच संकटकालीन स्थीतीत वेळी मदत व बचाव कार्यात हवाई वाहतुक महत्वाचे भूमीका बजावते.  

⑤ देशांच्या संरक्षण यंत्रनेतही हवाई वाहतूकीचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे.

⑥ जगातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औदयोगिक, व्यापारी महानगरे हवाई वाहतूकीमुळे जोडली गेलेली आहे.  लोकांचे राहणीमान उंचावत असल्याने हवाई वाहतूकीची पसंती वाढली आहे.

⑦ तंत्रज्ञानातील बदलामुळे, व्यापारातील वाढत्या मागणीमुळे, जलद गतीमुळे, वेळेची बचत होत असल्याने हवाई वाहतूकीचे प्रमाण वाढत आहे.


6)

उत्तर-

①  भूगोलात पृथ्वीच्या प्राकृतीक पर्यावरणाबरोबरच व मानवी क्रिया व त्यांच्या परस्परांशी असलेला संबंध अभ्यासला जातो.

② पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांमध्ये व मानवी घटकामध्ये सदैव परिवर्तन आढळते व या घटकांमध्ये विविधता आहे, या विविधतेचा अभ्यास भूगोलात केला जातो.

③ घटकांचे वितरण, प्रारुप व विविधता यांचा अभ्यास भूगोल अभ्यासक करतात. थोडक्यात कार्यकारणभाव जाणून घेणे हा भूगोल अभ्यासकाचा मुख्य हेतू आहे.

④ स्थळ क्षेत्र किंवा भौगोलिक स्थानाचाही अभ्यास भूगोलात करतात.

⑤ आधुनिक काळात भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) व भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) या तंत्रज्ञानाचा वापर भूगोलात केला जातो.

⑥ भूगोल विषयाचा अभ्यास निरीक्षण, वर्णन, विश्लेषण, सादरीकरण करताना आज दृकश्राव्य साधने, संगणक, माहिती तंत्रज्ञान, उपग्रहीय वापर, GIS, GPS या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो.

थोडक्यात निसर्ग व मानव परीवर्तनशील आहेत व गतिशील आहेत. त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरुप हे गतीशील आहे.


प्रश्न 3 ) खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) :

9

1)

देणारा प्रदेश घेणारा प्रदेश
1) ज्या प्रदेशातुन लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या कमी होते.1)ज्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढते..
2) ज्या प्रदेशातुन लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता कमी होते.2) ज्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात तेथे लोकसंख्येची घनता वाढते.
3) स्थलांतरामुळे लिंग रचना व वयोरचनाही बदलते. स्त्रियांचे प्रमाण वाढते उदा. केरळ3) स्थलांतरामुळे लिंग रचना वयोरचनाही बदलते. पुरुषांचे प्रमाण वाढते उदा. दिल्ली, चंदीगढ
4) या प्रदेशात कार्यकारी लोकसंख्या कमी होते.4) या प्रदेशात कार्यकारी लोकसंख्या जास्त्‍ होते.
5) या प्रदेशातील कार्यकारी लोकांचे स्थलांतर झाल्याने या प्रदेशात बालक, वृदध प्रमाण वाढते.5) युवा वर्ग याप्रदेशात आल्याने कार्यकारी लोकांचे प्रमाण वाढते.

2)

उत्तर-

ओसाड भूमीबिगरशेती भूमी
1) ओसाड भूमी प्रकार ग्रामीण भूमी उपयोजनात आढळून येते.1) बिगर शेती भूमी उपयोजन ग्रामीण व नागरी या दोन्हीं भूमी उपयोजनात आढळून येते.
2) उंचसखल, डोंगराळ भूमी, वाळवंट, घळीयुक्त भूमी या सारख्या अनुत्पादक घटकात ओसाड भूमी मोडली जाते.2) ग्रामीण व नागरी भागातील वस्ती, पायाभूत सोयी, रस्ते,महामार्ग, लोहमार्ग, कालवे, उदयोग, दुकाने, व्यापारी संकुल इ. चा या प्रकारात समावेश होतो. 
3) ग्रामीण भागातील हा भूमी प्रकारातुन कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही.3) बिगरशेती भूमी प्रकारात अनुत्पादन व उत्पादक अशा दोन्ही प्रकारातील भूमी उद्देशानुसार वापरात आणली जाते.
4) हा भूमी प्रकार कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान वापरुन शेतीसाठी वापरता येत नाही4)  व्दितीयक व तृतीय व्यवसायात होणाऱ्या बदलानुसार या श्रेणीतील भूमीचा वापर वाढत जातो.

———————————

3)

उत्तर-

खाणकाममासेमारी
1) खाणकाम हा व्यवसाय भूमी व जल या दोन्ही ठिकाणी करता येतो1) मासेमारी व्यवसाय हा फक्त जल विभागातील करता येतो.
2) या व्यवसायावर अक्षवृत्तांची परिणाम होत नाही.2) मासेमारी व्यवसायावर अक्षवृत्त वितरणाचा परिणाम होतो.
3) देशाच्या औद्योगिक विकासासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे.   3) वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे.
4) खाणकाम व्यवसायावर खनिज साठे यांचे वितरण, मजुरांची उपलब्धता, खनिज शुद्धीकरण यंत्रणा इत्यादी घटक परिणाम करतात.4) मासेमारी व्यवसायावर भूखंडमंच, समुद्रप्रवाह, आधुनिक बोटी व जाळी इत्यादी घटक परिणाम करतात.
5) उदा: भारतातील छोट्या नागपूरचे पठार, बॉम्बे हाय इत्यादी  5) उदा: डॉगर बँक, जॉर्जेस बँक इत्यादी.

4)

उत्तर-

द्वितीयक आर्थिक क्रियातृतीयक आर्थिक क्रिया
1) द्वितीयक आर्थिक व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याची उपयुक्तता वाढवितात.1) तृतीय आर्थिक व्यवसाय हे व्दितीय व्यवसायांना सेवा पुरवितात.
2) यातून मिळणाऱ्या कच्च्या मालाचे बाजार मूल्य प्राथमिक आर्थिक क्रियेतील मुल्यापेक्षा तुलनेने जास्त असते.2) व्दितीय व्यवसायातील तयार उत्पादनांना थेट ग्राहकापंर्यन्त पोहचविण्याचे कार्य करतात.
3) ज्या देशात प्राथमिक व्यवसाय जास्त प्रमाणात केले जातात, त्या देशाची आर्थिक विकासाची पातळी कमी असते.3) तृतीय व्यवसायाचे प्रमाण अधिक असणे देशाच्या आर्थिक विकासाचे दयोतक मानले जाते.
4) उदा. लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग इ.4) उदा. वाहतूक, संदेशवहन, पर्यटन, बँकीग, व्यापार आणि वाणिज्य, इ.

5)

उत्तर-

प्राकृतिक प्रदेशराजकीय प्रदेश
1. नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो, त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात. उदा. मोसमी हवामान प्रदेश1. राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सिमीत केलेली असते की, ज्यामुळे स्वतंत्र राज्य, राष्ट्र,प्रशासकीय विभाग, शासन प्रणाली इ. निकषांवर इतरांपासून वेगळा झालेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय. उदा. भारत – महाराष्ट्र -विदर्भ
2. हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सिमीत असतात. उदा. पर्वत, पठार, मैदान,हवामान इ.2. हे प्रदेश राजकीय सीमांनी सिमीत असतात. उदा. महाराष्ट्र – गुजरात
3.ज्या प्रदेशात प्राकृतिक / नैसर्गिक तत्तवे महत्तवपूर्ण असतात ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात.उदा. हिमालय पर्वतीय प्रदेश3.राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्वांचा समावेश नसतो तेथे फक्त राजकीय सीमांचा विचार होता.
4.प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकांमुळे वेगळे स्वरुप प्राप्त होते. जसे उंची, भू- रचना, हवामान इ.4. राजकीय प्रदेशात विविध सामाजिक, सांस्कृतिक, घटक जसे भाषा, वंश इ. मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो.

प्रश्न 4 अ) तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा) :

6

1) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश

2) भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य

3) हूर औदयोगिक क्षेत्र

4) पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र

5) सुएझ कालवा

6) चहा निर्यात करणारा प्रमुख देश

7) सहारा वाळवंट

8) जपानमधील एक प्रमुख औदयोगिक शहर

प्रश्न 4 ब) खालील आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

5

1) दिलेल्या आकृतीत काय दर्शविले आहे?

उत्तर- दिलेल्या आकृतीत लोकसंख्येचे वितरण दर्शविलेले आहे.

2) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे?

उत्तर- ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्येचे वितरण सर्वात कमी आहे.

3) लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता?

उत्तर- आशिया खंडात लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे.

4) 16.96% टक्केवारी कोणत्या खंडाची आहे?

उत्तर- अफ्रिका खंडाची टक्केवारी 16.96 % आहे.

5) या आकृतीमध्ये किती खंड दर्शविले आहेत?

उत्तर- दिलेल्या आकृतीत सहा खंड दर्शविले आहेत.

प्रश्न 5) खालील विषयांवर संक्षिप्त लिहा (कोणत्याही तीन) :

12

1)

उत्तर-

जी शेती उष्ण कटींबधीय घनदाट अरण्याच्या व विरळ लोकवस्तीच्या प्रदेशातील डोंगराळ भागात मोठया आकाराच्या शेतजमीनीत कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पध्दतीने,ठी भांडवल गुंतवणूक करुन, तेथील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक आहे अशा एकाच पिकाची लागवड करुन जी शेती व्यापार व निर्यात करण्याच्या उद्देशाने केली जाते त्या शेतीस “मळयाची शेती असे म्हणतात.

शेताचा आकार मोठा या शेतीत शेतांचा आकारा मोठा असतो साधारण पणे 40 ते 400 हेक्टर पर्यन्त आकार असु शकतो.

भांडवल पुरवठा –  मळयाच्या शेती करिता मोठया प्रमाणात भांडवल गुंतवणूक आवश्यक असते. या शेतीत मूलभूत सा व पिकांच्या देखभालीचा खर्च खूप जास्त असतो.

एक पीक पद्धती – मळयाच्या शेतीत संपूर्ण मळयात त्या प्रदेशातील भौगोलिक स्थिती नुसार, ज्या पिकास पोषक वातावरण आहे अशा एकाच पिकाची लागवड केली जाते.  उदा. भारतातील चहाचे मळे, ब्राझीलमधील कॉफीचे मळे.

मजुर पुरवठा – शेतीचा आकार मोठा असल्याने स्थानिक मंजुरामार्फत केली जात असतात.

शास्त्रीय पध्दतीने व्यवस्थापन– जागतिक मागणी व दर्जा टिकविण्यासाठी या शेतीचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पध्दतीने केले जाते. प्रत्येक पिकाची योग्य पध्दतीने प्रक्रिया व प्रतवारी केली जाते.

हेक्टरी कमी व दरडोई उत्पन्न जास्त – मळयाच्या शेतीचे हेक्टरी उत्पादन कमी असते मात्र शेतीक्षेत्र जास्त असल्याने दरडोई  उत्पादन जास्त होत असते.

दीर्घ काळ उत्पादन– मळयाच्या शेतीतील पिके जास्त काळ टिकणारी असल्याने एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षे उत्पादन घेता येते.

प्रमुख पिके-  भारतात चहा, कॉफी, रबर, कोको उत्पादन क्षेत्र तसेच  केरळ राज्यातील मसाल्याचे मळे, कोकण विभागातील काजूबागा हे मळयाच्या शेतीची उदाहरणे आहेत.

प्रदेश– मलेशिया,  भारत व श्रीलंका, कॅरेबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम इ. देशात मळयाची शेती केली जाते.


2)

उत्तर-

① आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना स्थाननिवडीचे स्वातंत्र असते अशा उद्योगांना स्थानमुक्त उदयोग म्हणतात. कच्च्या मालाच्या स्वरुपावर स्थानमुक्त उदयोग ठरविता येतात. 

② कापड उदयोग एका अर्थी स्थानमुक्त उदयोगाचे उदाहरण होऊ शकते. कारण या उदयोगाचा कच्चा माल कापुस हा टिकाऊ कच्चा माल असुन कापुस व त्यापासून बनणारे कापड यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे कापड उदयोग सध्या कोठेही स्थापन केले जाऊ शकतात.

③ स्थानमुक्त उदयोगातील तयार होणारा पक्का माल हा खूप मौल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असतो. उदा. हिऱ्यांना पैलू पाडणे, माहिती तंत्रज्ञान संदर्भातील विविध वस्तूंचे उत्पादन किंवा उत्पादनाची जुळणी करणे

④ स्थानमुक्‍त उदयोग हे प्रामुख्याने संसाधने, उत्पादन कौशल्ये व ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात.

⑤ या उद्योगांना वाहतूक खर्चात झालेली घट फारदेशीर ठरते. यातील कच्चा माल व पक्का माल सहसा दोन्ही वजनाने हलके व वाहतूकीस किफायतशीर असतात.

⑥ या उद्योगांना स्थानांचे महत्व नसते. हे उदयोग पुर्नस्थापित होण्याची शक्यता जास्त असते.

⑦ या उद्योगातील उत्पादन कमी असते परंतू त्याचे मूल्य जास्त असते.

⑧ या उद्योगांवर स्थानाचा फारसा प्रभाव नसतो त्यामुळे असे उदयोग सहसा शहरात स्थापन होतात.


3)

उत्तर-

(1) संदेशांचे आदान-प्रदान मानव फार पूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यासाठी चित्रे, मुद्रा, भाषा यांचा वापर करीत मानवाने विविध स्वरूपांतील संदेशवाहकांचीही मदत घेतली.

(2) वर्तमानकाळात मात्र संदेशवहनात कृत्रिम उपग्रहांद्वारे दूरध्वनी, मोबाइल, आंतरजाल या माध्यमांद्वारे वाणी, लिखित, विदा, ध्वनिफीत, चित्रफीत अशा विविध स्वरूपांच्या माहितीचे-संदेशांचे आदान-प्रदान केले जाते.

(3) कृत्रिम उपग्रहांमुळे ‘अंतर’ या अडथळ्यावरच पूर्णपणे मात झाली आहे. आता लक्षावधी लोकांपर्यंत, क्षणार्धात, जगाच्या कोणत्याही कोपन्यात एकाच वेळेस अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वरूपात माहितीची / संदेशांची देवाणघेवाण शक्य होत आहे.

(4) तसेच, कृत्रिम उपग्रहांमुळे समुद्राची स्थिती, हवामानाचा अंदाज, साधनसंपत्ती / खनिजसंपत्तीचा शोध, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन, हवाई वाहतूक, आंतराष्ट्रीय व्यापार या सेवा/व्यवसाय खूप सोपे झाले.


4)

उत्तर-

विकास हि एक सापेक्ष संज्ञा आहे विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड आहेत.

विविध क्रियाद्वारे त्या क्षेत्रातील उत्पन्न लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता शिक्षण आयुर्मान दारिद्रयतेचे प्रमाण इ. विकासाचे मापदंड आहेत परंतू विकासाचा कोणताही एक मापदंड एखाद्या क्षेत्राचा किंवा प्रदेशाचा विकास ठरविणारा एकमात्र घटक असू शकत नाही. एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वागीण विचार करता येत नाही सर्व साधारणपणे जेव्हा एखादया क्षेत्राच्या किंवा प्रदेशाचा विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक, सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय इ बाबी लक्षात घेतल्या जातात.

    ① प्रदेशाचे स्थान, हवामान, प्राकृतिक रचना, उंची, मृदा पाण्याची उपलब्धता समुद्राचे सानिध्य नैसर्गिक बंदरांची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात.

② लोकसंख्या घनता व रचना जन्म-मृत्यूदराचे प्रमाण व्यवसाय रचना, प्रजनन क्षमता जीवनमान आयुर्मान क्रमशक्ती दारिद्रयाचे प्रमाण शिक्षणाचे असे लोकसंख्याविषय गुणात्मक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात.

③ साक्षरता दर, शाळेतील नोंदणी गुणोत्तर, शाळा सोडण्याचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, महिला आणि मुलांवरील गुन्हेंगारी अशा निदर्शकांव्दारे प्रदेशांच्या विकासाचे चित्र सुस्पष्ट मिळते.

④ प्रदेशाचा विकास हा तेथील साधनसंपत्तीवर आणि लोकसंख्येच्या कार्यावर अवलंबून असतो.

⑤ प्रदेशाच्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर आवश्यक असतो

⑥ एकाचवेळी नैसर्गिक व मानवी संसाधनाचा योग्य वापर उपयोग करुन दरडोई उत्पन्न वाढविणे व जीवनमान उंचावणे या गोष्टी प्रादेशीक विकासात येतात


5)

उत्तर

भूगोलात

भूगोल विषयांत मुलभूत घटकांचा कार्यकारण भाव व त्याचा उपयोग, माहितीचे संकलन आणि नमुन्यांच्या आधारे विदा विश्लेषाणाबरोबर अंदाज वर्तविणे या साठी होत असतो

भूगोलात सांख्यिकीय माहितीचे संकलन व विश्लेषनाचा वापर होऊ लागला आहे.

संकलित केलेल्या माहितीच्या विश्लेषणाकरीता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, संगणक इत्यादीचा वापर वाढला आहे.

नकाशा निर्मिती करीता मोठया प्रमाणात GIS आणि GPS तसेच सदुर संवेदन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

भविष्यकालीन लोकसंख्या वाढ औद्योगिकरण हवामान बदल यासारख्या गोष्टींच्या अंदाजाकरीता उपयोजित भूगोलांमध्ये विविध ॲप तसेच गणितीय व संगणकीय प्रतिकृतिंचा वापर होऊ लागला आहेत.

अशा रितीने भूगोल विषयात नवनवीन बदल होत आहेत.


प्रश्न 6 अ) खालील दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

4

खनिज वापर  

मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे ही त्यांच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कास्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग या क्रमाने कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखीत करण्यात आले. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची प्रगती होत गेली आहे. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

प्रश्न :

1) मानवाने खनिजांचा उपयोग कोणकोणत्या वस्तू बनवण्याकरिता केला आहे?

उत्तर- मानवाने हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला.

2) मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य केव्हा आत्मसात केले ?

उत्तर- पाषाण युगाच्या शेवटच्या टप्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले.

3) खनिजांच्या वापरानुसार कोणकोणते कालखंड आहेत?

उत्तर- खनिजांच्या वापरानुसार कास्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग या क्रमाने कालखंड अधोरेखीत करण्यात आलेले आहेत.

4) मानवाने महासागराच्या तव्ळातून कोणकोणती उत्पादने घेतली आहेत?

उत्तर- मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे


पश्न 6 ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :

4

रेषीय वस्ती

प्रश्न 7) सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) :

8

1)

उत्तर-

उत्तर- लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक व मानवी घटकांचा परिणाम पहावयास मिळतो.  जगात मानवी जीवनास पोषक व आरोग्यवर्धक हवामान असलेल्या ठिकाणी मानवी लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यात विविध घटकांचा समावेश असतो. मानवी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे-  

  प्राकृतिक रचना ( भूरुपे)-

अ)  मैदाने / सुपिक खोरे-  मैदानी प्रदेशात विपुल जलसंपत्ती मुळे व सुपीक मृदेमुळे शेती व्यवसाय विकसीत झालेला असतो त्यामुळे तेथे शेतीवर आधारीत व्यवसाय विकसीत होतात. रोजगाराच्या संधी अशा प्रदेशात जास्त असतात. त्याच बरोबर वाहतुक मार्गांच्या विकास, व उत्सावर्धक हवामान यामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. उदा. गंगा-सिंधू नदी मैदानी प्रदेश, यांगत्से व मिसिसिपी नदयांचे खोरे

ब) पठारी प्रदेश– पठारी प्रदेशात खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे खनिज संपत्तीवर आधारीत जड उदयोग विकसीत होतात तसेच काही भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या प्रदेशात शेतीस पुरक वातावरण असल्याने येथे मध्यम ते जास्त लोकसंख्या आढळते. उदा. छोटा नागपुरचे पठार काही पठारांवर सुपिक मृदेमुळे लोकसंख्या जास्त आढळते.

क) पर्वतीय प्रदेश – पर्वतीय प्रदेशात उंची, पतिकूल हवामान, उतार, घनदाट अरण्ये, शेती अयोग्य जमीन यामुळे जिवन जगण्यास अनेक अडचणी असतात त्यामुळे पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते. उदा. रॉकी, हिमालय अँडीज पर्वतांचे प्रदेश.  काही ठिकाणी मात्र आवश्यक पाण्याची सोय, जीवन जगण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध असलेल्या पर्वतीय ठिकाणी काही प्रमाणात लोकसंख्या केंद्रीत झालेली आढळते. उदा. पर्वतीय पर्यटन स्थळे

  हवामान-  समशितोष्ण हवामान, भूमध्य सागरी हवामान, मोसमी हवामाना सारख्या अल्हाददायक हवामाच्या  प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते उदा. युरोप खंडातील देश, आशिया खंडातील मौसमी हवामानाचा प्रदेश या उलट अति थंड, अति उष्ण, वाळवंटी प्रदेश, अति पर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असते. उदा. विषृववृत्तीय हवामान, वाळवंटी प्रदेश.

पाण्याची उपलब्धता–  पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीही महत्वाचा घटक आहे. पाणी मानवाच्या दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला व मोठया प्रमाणावर आवश्यक असलेला प्राकृतिक घटक असल्याने प्राचीण काळापासून मानवाने आपल्या वसाहती पाण्याच्या ठिकाणी वसविलेल्या आहेत. उदा. नाईल, गंगा इ. नदयांच्या खोऱ्यातील प्रदेश. तसेच समुद्रकिनारी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. उदा. भारतीय किनारी प्रदेश. वाळवंटातील मरुदयाण्याच्या प्रदेशातही लोकसंख्या आढळते उदा. भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल् अहसा इ.

मृदा– सुपीक गाळाच्या मृदेच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसतील होतो त्यामुळे तेथे इतर व्यवसांचा विकास होवुन लोकसंख्या अधिक असते.  उदा. भारतातील गंगा नदी, मिसिसिपी, यांगत्से या नदयांची पुर मैदानांचा प्रदेश. त्याच बरोबर ज्वालामुखीय मृदेच्या सुपीकतेमुळे ही ज्वालामुखीय पर्वतांच्या पायथ्याच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसीत होतो व येथेही लोकसंख्या जास्त आढळते. उदा. जावा, जपान, सिसिली.


2)

उत्तर-

कच्चामाल :-

i) उस

ऊस हा वजन घटणारा आणि अवजड कच्चामाल आहे. उसापासून केवळ 10-12% साखर मिळविली जाते.  जर साखर उद्योग ऊस उत्पादक प्रदेशापासून खूप लांब स्थापन केले तर वाहतूक खर्च वाढतो. हा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी हे उद्योगधंदे ऊस उत्पादक प्रदेशालगत स्थापन केले जातात. ऊस हा नाशवंत कच्चामाल आहे. कालावधीनुसार त्यातील सुक्रोजचे प्रमाण कमी कमी होऊ लागते. म्हणून ऊस २४ तासाच्या आत गाळला जाणे आवश्यक आहे.

ii) बीट

बीट हा एक पर्यायी कृषी कच्चामाल, साखर उत्पादनासाठी बापरतात. बीट हा देखील जड, वजन घटणारा आणि नाशवंत कच्चा माल आहे. जर बीट शीतगृहात ठेवले तर त्यातील साखरेचे प्रमाण टिकविण्याचा कालावधी वाढविता येतो.

पाण्याची उपलब्धता :-

उद्योगधंद्याला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. साखरनिर्माण प्रक्रियेत स्वच्छ पाणी आधिक्याने वापरले जाते. शुद्धीकरणासाठी उत्पादने व यंत्रांना थंडावा देण्यासाठी साखर कारखान्यास मुबलक पाण्याची आवश्यकता असते.

वीज / ऊर्जासाधने :-

उसाचे गाळप करुन साखरेत रूपांतर करण्यासाठी यंत्राना वीजे ची आवश्यकता असते. त्यासाठी वीज किंवा जलविद्युत यासारख्या ऊर्जा साधनांचा उपयोग केला जातो. उद्योगधंद्याच्या स्थापनेवर याचा परिणाम दिसून येतो. वीज मुबलक व 24 तास मिळाल्यास उसाचे गाळप पूर्णवेळ करता येते.

भांडवल :- साखर कारखाना स्थापनेसाठी भांडवल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. साखर उदयोगात भांडवल गुंतवणूक ही केवळ उत्पादनांकरिता नसून त्याची गरज मोठ्या प्रमाणात विपणन क्रियेसाठी असते तसेच जमिनीच्या व साहित्याच्या खरेदीसाठी, कामगारांच्या वेतनासाठी साखर उद्योगात भांडवलाची गरज असते. महाराष्ट्रात सहकारी तत्वावर भांगभाडवल उभे करुन साखर कारखान्याची निर्मीती झाली आहे.

  तसेच इतर ठिकाणी सरकारी अनुदान, बँका, शेअर बाजार आणि परकीय चलनातून भांडवल प्राप्त केले जाते.

मजूर :- बहुतेक सर्वच वस्तुनिर्माण उद्योगात मजुरांची (मनुष्यबळाची) गरज असते. साखर उदयोगातही मजुर पुरवठा महत्वाची भूमीका बजावतो. मजुरांचे दोन प्रकार आहेत. सारख उदयोगात ऊसाच्या गाळपा पासुन थेट साखर कारखाण्याच्या बाहेर जाण्यापर्यन्त अनेक कामांसाठी मंनुष्य बळाची आवश्यकता असते. कुशल व अकुशल मजुरांची उपलब्धता ही अंतर, वेळ, गुणवत्ता, कुशलता व वेतन यावर आधारित असते.

वाहतूक :- साखर उदयोगात वाहतूकीला महत्वाचे स्थान आहे. कारण उस हा नाशवंत कच्चा माल असुन तो कापणी नंतर 24 तासांच्या आत गाळप होणे आवश्यक असते.  त्यामुळे उस उत्पादक प्रदेशात चांगल्या दर्जांच्या वाहतूकीची आवश्यकता असते. तसेच तयार झालेली साखर बाजारपेठे पर्यंन्त पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्वाची भूकीचा बाजावते.

साठवणक्षमता-

कारखान्यात तयार झालेली सारख, बाजारपेठेत जाण्या पर्यन्त् तिची साठवण चांगल्या ठिकाणी होणे गरजेचे असते.  अन्यथा साखरेचा दर्जा कमी होऊन बाजारपेठेत तिचीकिंमत कमी होऊ शकते.  त्याच बरोबर साखर पाण्याच्या संपर्कात अथवा आर्द्रयुक्त हवेच्या संपर्कात आल्यास नुस्कान होऊ शकते.

बाजारपेठ

साखर उदयोगात तयार झालेल्या साखरेला बाजारात उत्तम भाव मिळणे हा देखिल विचारात घेण्याची बाब आहे. त्यासाठी बाजारपेठ महत्वाची भूमीका बजावते.

जमिनीची उपलब्धता–  साखर कारखाना उभारणी साठी सपाट जमिनीची आवश्यकता असते.


विक्रीसाठी उपलब्ध संपर्क-

Prof.  Manoj Deshmukh

12 Geography Practical Book

अधिक वाचा

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page