अकरावी भूगोल प्रथमसत्र सराव पेपर
अकरावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका
Eleventh Geography First Semester Question Paper
प्रश्नपत्रिका क्र – 2
इयत्ता अकरावी
विषय- भूगोल
गुण – 50
वेळ- 2.30 तास
सुचना- 1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
2 प्रश्नांची उत्तरे लिहीतांना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे
3 रंगीत पेंन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहेत.
4 नकाशा स्टेंसिलचा वापर योग्य तेथे करावा.
5 उजवी कडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
6 आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तर पत्रिकेस जोडावी.
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
Eleventh Geography First Semester Question Paper
प्रश्न 1 दिलेल्या सुचनेनुसार वस्तुनिष्ठ प्रश्रांची उत्तरे लिहा.
अ ) खालील ‘अ ‘ब‘ आणि ‘क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावुन साखळी पूर्ण करा.
(गुण 4)
अ | ब | क |
मंद हालचाली | चुनखडक | अग्नेय आशिया |
स्तरित खडक | खचदरी | व्ही आकाराची दरी |
नदीचे खनन कार्य | हिंदी महासागर | कायिक विदारण |
नैऋत्य मोसमी वारे | घळई | विभंग |
प्रश्न 1 ब) योग्य पर्याय निवडा
(गुण 3)
1) उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश
अ) उष्ण कटिबंधीय वर्षावने
ब) उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश
क) उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश
ड) उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान प्रदेश
2) नदीच्या संचयन कार्यातुन निर्माण होणारे भूरूप
अ)हिमोढगिरी
ब) घळई
क) पूर मैदान
ड) वालूकागिरी
3) अर्वाचिन पर्वत
अ) अरवली पर्वत
ब) उरल पर्वत
क) ॲपलेशियन पर्वत
ड) हिमालय व आप्ल्स पर्वत
प्रश्न 1 क) अयोग्य पर्याय निवडा
(गुण 3)
1) सागरी भूरूप
अ) विलयन विवर
ब) खचदरी
क) वाळूंचा दांडा
ड) पूरमैदान
2) ज्वालामुखीय उद्रेक
अ) वायुरुप पदार्थ
ब) लाव्हा
क) वाफ
ड) माती
3) तैगा हवामान प्रदेश
अ) दक्षिण चिली
ब) न्यूझीलँड
क) ग्रीनलँड
ड) दक्षिण आलास्का
प्रश्न 1 ड) चूक की बरोबर ते सांगा
(गुण 3)
1) विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पर्जन्य पडतो.
2) विस्तृत झीजेत पाण्याचा संबंध नसतो.
3) मर्केली प्रमाणानुसार भूकंपाचे मापन करता येते.
प्रश्न 2 रा) भौगोलिक कारणे दया (कोणतेही 3)
(गुण 9)
1) भारताच्या पूर्वकिनारपटटीवर नदयांची त्रिभूज प्रदेश निर्माण केले आहेत परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाडयांची निर्मिती झाली आहे.
2) भूजलामुळे तयार होणाऱ्या भूरुपांना “कार्स्ट भूरूपे” असेही म्हणतात.
3) हिमरेषा ही अपक्षरण कारकांच्या स्वरुपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते.
4) उतार हा विस्तृत झीजेचा मुख्य घटक आहे.
5) सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झीज पुर्व बाजुपेक्षा जास्त असेल.
प्रश्न 3 रा) फरक स्पष्ट करा (कोणतेही -3)
(गुण 9)
1) यु आकाराची दरी आणि व्ही आकाराची दरी
2) उपनदया आणि वितरीका
3) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली
4) विदारण आणि अपक्षरण
5) वर्षावनांचा हवामान प्रदेश आणि सॅव्हाना हवामान प्रदेश
प्रश्न 4 था) जगाच्या नकाशात घटक योग्य चिन्ह व सूचिच्या सहाय्याने दर्शवा (कोणतेही-5)
(गुण 5)
1) ब्राझील मधील वर्षावनांचा प्रदेश
2) तैगा हवामान प्रदेश
3) फुजी जागृत ज्वालामुखी
4) अरेबिया भूपट्ट
5) भूमध्य सागरी हवामान प्रदेश
6) स्कॉशिया भूपट्ट
7) चिली देश
प्रश्न 5 वा) टिपा लिहा (कोणत्याही -2)
(गुण 8)
1) विभंगाचे प्रकार
2) विस्तृत झीजेतील पाण्याची भूमीका
3) वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक परिस्थिती
4) ज्वालामुखीय पदार्थ
प्रश्न 6 अ ) खालील उताऱ्याचे वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
(गुण 4)
भूगोलाची प्रमुख शाखा भूगर्भशास्त्र यात खडकांच्या रचनेचा सखोल अभ्यास केला जातो. पृथ्वीवरील भूरूपांची निर्मिती खडकावरच अवलंबून असते. खडक आणि मानवी जीवन यांचाही अतिशय निकटचा संबंध आहे. खडकांचा उपयोग मानवाने घरे व इमारती व धरणांच्या तसेच अन्य बांधकामासाठी करून घेतला आहे. भूगर्भात कोणत्या प्रकारचे खडक आहेत हे माहिती असल्यास त्यात कोणती खनिजद्रव्ये आढळतील, त्यापासून कोणत्या प्रकारची माती निर्माण होईल, त्या मातीत कोणत्या प्रकारची वनस्पती व पिके निर्माण होऊ शकतील इत्यादी मानवी जीवनाशी निगडित गोष्टींची माहिती मिळू शकते व त्यामुळे मानवी जीवन सुखकर करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच आपण भूगोलात खडकांचा अभ्यास करतो. भूकवचाच्या बदलत्या स्वरूपाची माहिती खडकांवरून होऊ शकते व विविध भूरचना प्रकारांची निर्मितीही खडकांच्या स्वरूपावरच अवलंबून असते. खडकांच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या निर्मितीचा कालखंड निश्चित करता येतो. पृथ्वीच्या भूतकाळाची माहिती देणारा दस्तऐवज म्हणून खडकांना महत्त्व आहे.
प्रश्न :
1) पृथ्वीवरील भूरूपांची निर्मिती कशावर अवलंबून असते ?
2) खडकांचा प्रमुख उपयोग लिहा.
3) खडकांच्या स्वरूपावरून कशाची निर्मिती होते ?
4) खडकांच्या अभ्यासावरून कशाचा कालखंड निश्चित करता येतो ?
प्रश्न 6 ब) खालील पैकी कोणत्याही एका घटकांची सुबक आकृती काढून भागांना नावे दया.
(गुण 2)
1) खचदरी
2) भूछत्र खडक
अकरावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका pdf
Class XI Geography First Semester Practice Question Paper pdf

अधिक वाचा
अकरावी भूगोल मुल्यमापन पध्दती व प्रश्नपत्रिका स्वरुप

