HomeMoreXI Geography Choose the correct option

XI Geography Choose the correct option

XI Geography Choose the correct option

XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा


प्रकरण 1: भू-हालचाली  (योग्य पर्याय निवडा /  अचूक घटक ओळखा)

1) खालीलपैकी मंद भू-हालचालींमुळे निर्माण होणारे भूरूप कोणते?

अ) भूकंप

आ) ज्वालामुखी

इ) वली पर्वत

ई) सुनामी

उत्तर: इ) वली पर्वत

2) भूखंड आणि विस्तीर्ण पठारांची निर्मिती करणाऱ्या हालचालींना काय म्हणतात?

अ) क्षितिज समांतर हालचाली

आ) पर्वत निर्माणकारी हालचाली

इ) ऊर्ध्वगामी (खंड निर्माणकारी) हालचाली

ई) शीघ्र हालचाली

उत्तर: इ) ऊर्ध्वगामी (खंड निर्माणकारी) हालचाली

3) खालीलपैकी कोणता पर्वत अर्वाचीन वली पर्वताचे उदाहरण आहे?

अ) अरवली पर्वत

आ) उरल पर्वत

इ) ॲपेलिशियन पर्वत

ई) हिमालय पर्वत

उत्तर: ई) हिमालय पर्वत

4) ज्या वलीमध्ये मध्य भाग कमी उंचीवर असतो व तिच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात, तिला काय म्हणतात?

अ) अपनती वली

आ) अभिनती वली

इ) आडवी वली

ई) समनतक वली

उत्तर: आ) अभिनती वली

5) कठीण खडकांमध्ये दाब पडल्याने दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यावर कोणते भूरूप तयार होते?

अ) खचदरी

आ) वली पर्वत

इ) गट पर्वत (ठोकळा पर्वत)

ई) लावा पठार

उत्तर: इ) गट पर्वत (ठोकळा पर्वत)

6) भूकवचातील ज्या ठिकाणी साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला काय म्हणतात?

अ) अपिकेंद्र

आ) भूकंप केंद्र (नाभिकेंद्र)

इ) समकंप केंद्र

ई) छाया प्रदेश

उत्तर: आ) भूकंप केंद्र (नाभिकेंद्र)

7) फक्त घन माध्यमातून प्रवास करणाऱ्या भूकंप लहरी कोणत्या?

अ) प्राथमिक लहरी (P)

आ) दुय्यम लहरी (S)

इ) भूपृष्ठ लहरी (L)

ई) अवकाशीय लहरी

उत्तर: आ) दुय्यम लहरी (S)

8) भूकंपाची महत्ता मोजण्यासाठी कोणते प्रमाण वापरले जाते?

अ) मर्केली प्रमाण

आ) रिश्टर प्रमाण

इ) सेल्सिअस प्रमाण

ई) मिलिबार प्रमाण

उत्तर: आ) रिश्टर प्रमाण

9) ज्या लाव्हा रसामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते आणि तो पातळ व प्रवाही असतो, त्याला काय म्हणतात?

अ) आम्ल लाव्हा

आ) अल्कली लाव्हा

इ) घट्ट लाव्हा

ई) संमिश्र लाव्हा

उत्तर: आ) अल्कली लाव्हा

10) नकाशावर समान तीव्रतेची भूकंपाची ठिकाणे जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?

अ) समदाब रेषा

आ) समताप रेषा

इ) समकंप रेषा

ई) समोच्च रेषा

उत्तर: इ) समकंप रेषा


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

प्रकरण 2: विदारण आणि विस्तृत झीज  (योग्य पर्याय निवडा /  अचूक घटक ओळखा)

11) उष्ण वाळवंटी प्रदेशात तापमान बदलामुळे खडक फुटताना होणारा आवाज कशासारखा असतो?

अ) ढगांच्या गडगडाटासारखा

आ) पिस्तुलातून गोळी झाडल्यासारखा

इ) शिट्टीच्या आवाजासारखा

ई) विजांच्या कडकडाटासारखा

उत्तर: आ) पिस्तुलातून गोळी झाडल्यासारखा

12) उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय प्रदेशात खडकांच्या भेगांमध्ये पाणी गोठल्यामुळे होणाऱ्या कायिक विदारणास काय म्हणतात?

अ) गोठण-वितळण विदारण

आ) अपपर्णन

इ) भस्मीकरण

ई) द्रवीकरण

उत्तर: अ) गोठण-वितळण विदारण

13) ॲल्युमिनिअमयुक्त खडकांचे भस्मीकरण झाल्यावर खडकाला कोणता रंग प्राप्त होतो?

अ) तांबडा रंग

आ) पिवळा रंग

इ) काळा रंग

ई) पांढरा रंग

उत्तर: आ) पिवळा रंग

14) ग्रॅनाईटसारख्या एकसंघ खडकावर वरचा दाब कमी झाल्यामुळे बाह्य स्तर निघून जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

अ) भस्मीकरण

आ) अपपर्णन

इ) मातलोट

ई) पंकप्रवाह

उत्तर: आ) अपपर्णन

15) डोंगरउतारावरून चिखल, दगड आणि विदारित पदार्थांचे पाणी संपृक्त होऊन वेगाने वाहून येण्याला काय म्हणतात?

अ) सरक

आ) पंकप्रवाह

इ) मातलोट

ई) अपपर्णन

उत्तर: आ) पंकप्रवाह

16) अल्पाइन किंवा उपहिमनदीय प्रदेशात गोठलेल्या जमिनीवर मातीचा थर संथ गतीने सरकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?

अ) मातलोट

आ) दरड कोसळणे

इ) अपपर्णन

ई) भस्मीकरण

उत्तर: अ) मातलोट

17) वनस्पतींची मुळे खडकांच्या फटीत वाढून खडक फुटणे हे कोणत्या विदारणाचे उदाहरण आहे?

अ) कायिक विदारण

आ) रासायनिक विदारण

इ) जैविक विदारण

ई) मानवनिर्मित विदारण

उत्तर: इ) जैविक विदारण

18) समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यामुळे व कोरड्या-दमट ऋतूमुळे रत्नागिरीतील हरेश्वर येथे खडकांना कोणता आकार प्राप्त झाला आहे?

अ) विवर सरोवरासारखा

आ) मधमाशांच्या पोळ्यासारखा

इ) स्तंभ किंवा गुहेसारखा

ई) लाव्हा घुमटासारखा

उत्तर: आ) मधमाशांच्या पोळ्यासारखा

19) खालीलपैकी अत्यंत संथ गतीने होणारी विस्तृत झीज कोणती, जी काही वर्षे किंवा शतके चालू राहते?

अ) भूस्खलन

आ) दरड कोसळणे

इ) सरक

ई) पंकप्रवाह

उत्तर: इ) सरक

20) पोलादापेक्षाही कठीण असणारा रूपांतरित खडक कोणता, ज्याचे रासायनिक विदारण सहज होत नाही?

अ) चुनखडक

आ) ग्रॅनाईट

इ) क्वार्टझाईट

ई) वालुकाश्म

उत्तर: इ) क्वार्टझाईट

XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

प्रकरण 3: अपक्षरणाचे कारके

1) नदीच्या उगमक्षेत्रात तीव्र उताऱ्यामुळे नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या अपक्षरणास काय म्हणतात?

अ) अधोगामी अपक्षरण

ब) अभिशीर्ष अपक्षरण

क) बाजूचे अपक्षरण

ड) अनुलंब अपक्षरण

उत्तर: ब) अभिशीर्ष अपक्षरण

2) हिमनदीच्या तळाशी व काठावर सरकणाऱ्या बर्फाच्या दाबामुळे खडक उखडला जाण्याच्या अपक्षरण प्रक्रियेस काय म्हणतात?

अ) अपघर्षण

ब) सन्निघर्षण

क) उखड (Plucking)

ड) द्रवीकरण

उत्तर: क) उखड (Plucking)

3) वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे खडकाचा पायाकडील भाग जास्त झिजून छत्र्यासारखा आकार प्राप्त होणाऱ्या भूरूपास काय म्हणतात?

अ) वातघृष्ट खडक

ब) यारदांग

क) भूछत्र खडक

ड) वालुकानिगिरी

उत्तर: क) भूछत्र खडक

4) सागरी भूशिरावरील दोन परस्परविरुद्ध गुहा एकमेकांना मिळाल्यास खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते?

अ) सागरी स्तंभ

ब) सागरी कमान

क) तरंगघर्षित मंच

ड) खाजण

उत्तर: ब) सागरी कमान

5) चुनखडक व जिप्समयुक्त प्रदेशात भूजलाच्या विरघळण्याच्या क्रियेमुळे भूपृष्ठावर तयार होणाऱ्या वर्तुळाकार खळग्यांना काय म्हणतात?

अ) विलयन विवर (Sinkhole)

ब) हिमविवर

क) अपवहन खळगा

ड) नालाकृती सरोवर

उत्तर: अ) विलयन विवर (Sinkhole)

6) नदीच्या पात्रातील अडथळ्यांमुळे प्रवाह चक्रीय बनून खडकांचे तुकडे गोल फिरल्याने पात्रात मडक्यासारखा खळगा तयार होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?

अ) उत्परिवहन

ब) वेधन (Pothole drilling)

क) कर्षन

ड) निलंबन

उत्तर: ब) वेधन (Pothole drilling)

7) वाऱ्याने वाहून आणलेले अतिसूक्ष्म मातीचे व पोटाचे कण मूळ स्थानापासून खूप लांब अंतरावर साचून तयार होणाऱ्या पिवळसर मातीच्या भूरूपास काय म्हणतात?

अ) लोएस (Loess)

ब) बारखाण

क) सैफ टेकड्या

ड) पुळण

उत्तर: अ) लोएस (Loess)

8) भूजलाद्वारे गुहेच्या छताकडून खाली झिरपणाऱ्या चुनखडकयुक्त पाण्यातील खनिजांमुळे छताकडून खाली लटकणारे स्तंभ कोणते?

अ) ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ

ब) अधोमुखी लवणस्तंभ

क) सलग लवणस्तंभ

ड) सागरी स्तंभ

उत्तर: ब) अधोमुखी लवणस्तंभ

9) हिमनदीने वाहून आणलेला अवसाद काठावर किंवा तळाशी साचून तयार होणाऱ्या निक्षेपास काय म्हणतात?

अ) पूरतट

ब) हिमोढ (Moraine)

क) वाळूचा दांडा

ड) पंकप्रवाह

उत्तर: ब) हिमोढ (Moraine)

10) समुद्रात शिरणाऱ्या जमिनीच्या अंतर्वक्र भागात लाटांच्या संचयन कार्यामुळे बारीक वाळू व गोटे साचून तयार होणाऱ्या किनाऱ्यावरील भूरूपास काय म्हणतात?

अ) भूशीर

ब) सागरी कडा

क) पुळण (Beach)

ड) सागरी गुहा

उत्तर: क) पुळण (Beach)

XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

—————————————————-

प्रकरण 4: हवामान प्रदेश

1) विषुववृत्तीय वर्षावने हवामान प्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार दोन्ही गोलार्धात प्रामुख्याने किती अक्षवृत्ता दरम्यान आढळतो?

अ) 0° ते 5°

ब) 5° ते 10°

क) 15° ते 30°

ड) 45° ते 65°

उत्तर: ब) 5° ते 10°

2) विषुववृत्तीय वर्षावने प्रदेशात वर्षभर जवळजवळ दररोज दुपारी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

अ) प्रतिरोध पाऊस

ब) आवर्त पाऊस

क) आरोह (कन्व्हेक्शनल) पाऊस

ड) मान्सून पाऊस

उत्तर: क) आरोह (कन्व्हेक्शनल) पाऊस

3) मोसमी (मान्सून) हवामान प्रदेशात उन्हाळ्यात व हिवाळ्यात वाऱ्यांची दिशा बदलण्यामागे कोणता प्रमुख घटक कारणीभूत असतो?

अ) आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राचे (ITCZ) स्थानांतरण

ब) सागरी प्रवाहांची हालचाल

क) वाळवंटी भागातील तापमान

ड) ध्रुवीय प्रत्यवर्त वारे

उत्तर: अ) आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राचे (ITCZ) स्थानांतरण

4) ‘जगातील शिकार्यांची भूमी’ म्हणून खालीलपैकी कोणता हवामान प्रदेश प्रसिद्ध आहे?

अ) विषुववृत्तीय वर्षावने

ब) उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश (सॅव्हाना)

क) तैगा हवामान प्रदेश

ड) टुंड्रा हवामान प्रदेश

उत्तर: ब) उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश (सॅव्हाना)

5) उष्णकटिबंधीय ओसाड (वाळवंटी) प्रदेश प्रामुख्याने खंडांच्या कोणत्या भागात व कोणत्या दाबपट्ट्याशी संलग्न आढळतात?

अ) खंडांच्या पूर्व भागात व विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्यात

ब) खंडांच्या मध्य भागात व ध्रुवीय उच्च दाब पट्ट्यात

क) खंडांच्या पश्चिम भागात व उपोष्णकटिबंधीय उच्च दाब पट्ट्यात

ड) खंडांच्या उत्तर भागात व समशीतोष्ण कटिबंधात

उत्तर: क) खंडांच्या पश्चिम भागात व उपोष्णकटिबंधीय उच्च दाब पट्ट्यात

6) उन्हाळा उबदार व कोरडा आणि हिवाळा सौम्य व आद्र असणे, हे कोणत्या हवामान प्रदेशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे?

अ) भूमध्यसागरीय हवामान प्रदेश

ब) चिनी प्रकारचे हवामान

क) तैगा हवामान प्रदेश

ड) विषुववृत्तीय हवामान प्रदेश

उत्तर: अ) भूमध्यसागरीय हवामान प्रदेश

7) भूमध्यसागरीय हवामान प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची फळशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते?

अ) सफरचंद व स्ट्रॉबेरी

ब) केळी व अननस

क) लिंबूवर्गीय व रसदार फळे (द्राक्षे, ऑलिव्ह, संत्री)

ड) नारळ व सुपारी

उत्तर: क) लिंबूवर्गीय व रसदार फळे (द्राक्षे, ऑलिव्ह, संत्री)

8) चिनी प्रकारच्या किंवा आद्र उपोष्णकटिबंधीय हवामान प्रदेशात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात?

अ) टॉर्नेडो व ब्लिझार्ड

ब) हरिकेन किंवा टायफून

क) सायक्लोन व विली-विली

ड) नॉरवेस्टर

उत्तर: ब) हरिकेन किंवा टायफून

9) पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली वर्षभर रिमझिम पाऊस पडणारा व उबदार सागरी प्रवाहामुळे सौम्य हवामान असणारा प्रदेश कोणता?

अ) समुद्री पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान

ब) उष्ण वाळवंटी हवामान

क) मॉन्सून हवामान

ड) टुंड्रा हवामान

उत्तर: अ) समुद्री पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान

10) मऊ व वजनाने हलके लाकूड पुरवणारी शंकूच्या आकाराची सुचिपर्णी वने कोणत्या हवामान प्रदेशात आढळतात?

अ) विषुववृत्तीय वर्षावने

ब) तैगा (उप-आर्क्टिक) हवामान प्रदेश

क) सॅव्हाना प्रदेश

ड) भूमध्यसागरीय प्रदेश

उत्तर: ब) तैगा (उप-आर्क्टिक) हवामान प्रदेश

11) तैगा हवामान प्रदेशात मऊ लाकडाच्या उपलब्धतेमुळे कोणता आर्थिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर भरभराटीस आला आहे?

अ) मासेमारी व्यवसाय

ब) लाकूडतोड व लगदा उद्योग

क) फळप्रक्रिया उद्योग

ड) पशुपालन व दुग्ध व्यवसाय

उत्तर: ब) लाकूडतोड व लगदा उद्योग

12) अत्यंत शीत हवामान, अल्पकालीन उन्हाळा, सील व वॉलरस प्राणी आणि एस्कीमो लोकांचे अधिवास असणारा प्रदेश कोणता?

अ) तैगा हवामान प्रदेश

ब) टुंड्रा हवामान प्रदेश

क) चिनी प्रकारचा प्रदेश

ड) सॅव्हाना प्रदेश

उत्तर: ब) टुंड्रा हवामान प्रदेश

13) वर्षभरात सर्व सरासरी मासिक तापमान 0° से. च्या खाली असणारा पृथ्वीवरील सर्वात तीव्र हवामान प्रदेश कोणता?

अ) तैगा प्रदेश

ब) बर्फाच्छादित (ध्रुवीय) प्रदेश

क) पश्चिम युरोपीय प्रदेश

ड) वाळवंटी प्रदेश

उत्तर: ब) बर्फाच्छादित (ध्रुवीय) प्रदेश

14) विषुववृत्तीय वर्षावनांमध्ये वनस्पतींची रचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची असते?

अ) एकस्तरीय काटेरी वनस्पती

ब) त्रिस्तरीय घनदाट सदाहरित वने

क) मऊ लाकडाची सुचिपर्णी वने

ड) केवळ गवताळ कुरणे

उत्तर: ब) त्रिस्तरीय घनदाट सदाहरित वने

15) उच्च दैनंदिन तापमान कक्षा, कोरडी हवा आणि निवडुंग व काटेरी झुडुपे हे खालीलपैकी कोणत्या हवामान प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे?

अ) उष्णकटिबंधीय ओसाड (सहारा) प्रदेश

ब) मोसमी हवामान प्रदेश

क) पश्चिम युरोपीय प्रदेश

ड) भूमध्यसागरीय प्रदेश

उत्तर: अ) उष्णकटिबंधीय ओसाड (सहारा) प्रदेश


अकरावी भूगोलाच्या अभ्यासक्रमावरील सर्व माहिती प्रश्नपत्रिका व इतर माहिती मिळविण्यासाठी खालील नोट्स वापरा

संपर्क- 9607371951


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

प्रकरण 5: जागतिक हवामान बदल

1) विसाव्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सुमारे किती सेल्सिअसने वाढ झाली आहे?

अ) 0.2° से.

ब) 0.5° से.

क) 0.8° से.

ड) 1.5° से.

उत्तर: क) 0.8° से.

2) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सजीवांच्या अस्तित्वासाठी योग्य असे सर्वसाधारणपणे किती सेल्सिअस मानले जाते?

अ) 0° से.

ब) 10° से.

क) 14° से.

ड) 25° से.

उत्तर: क) 14° से.

3) मागील 25 वर्षांत गढवाल हिमालयातील ‘गंगोत्री’ हिमनदी सुमारे किती मीटरपेक्षा जास्त मागे सरकली (पिच्छेहाट झाली) आहे?

अ) 300 मीटर

ब) 500 मीटर

क) 850 मीटर

ड) 1200 मीटर

उत्तर: क) 850 मीटर

4) सागरी जलाचे तापमान 1° ते 2° सेल्सिअसने वाढल्यास प्रवाळ आपल्या पेशीतील शेवाळांना बाहेर टाकतात, त्यामुळे प्रवाळांचा रंग उडून ते मृत होतात; या प्रक्रियेला काय म्हणतात?

अ) प्रवाळ विरंजन (Coral Bleaching)

ब) प्रवाळ निक्षेपण

क) प्रवाळ भस्मीकरण

ड) प्रवाळ द्रवीकरण

उत्तर: अ) प्रवाळ विरंजन (Coral Bleaching)

5) भूतकाळातील किंवा प्राचीन हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात?

अ) भूशास्त्र

ब) पुराहवामानशास्त्र (Paleoclimatology)

क) हवामानशास्त्र

ड) वातावरणशास्त्र

उत्तर: ब) पुराहवामानशास्त्र (Paleoclimatology)

6) खालीलपैकी कोणते साधन प्राचीन हवामानाचा (पुराहवामानशास्त्र) अभ्यास करण्यासाठी अप्रत्यक्ष पुरावा म्हणून वापरले जात नाही?

अ) वृक्षखोडांवरील वर्तुळे (Tree Rings)

ब) बर्फाच्छादित प्रदेशातील गाभ्याचे नमुने (Ice Cores)

क) प्रवाळ कट्टे (Corals)

ड) रिश्टर मापन श्रेणी (Richter Scale)

उत्तर: ड) रिश्टर मापन श्रेणी (Richter Scale)

7) सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेत होणारे बदल आणि पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर बदलण्याच्या खगोलीय चक्राला काय म्हणतात?

अ) मिलनकोव्हिच आंदोलन

ब) एल निनो आंदोलन

क) ओझोन आंदोलन

ड) आयटीसीजी (ITCZ) आंदोलन

उत्तर: अ) मिलनकोव्हिच आंदोलन

8) पृथ्वी सध्या सूर्यमालेत सजीवांच्या अस्तित्वास व वास्तव्यास योग्य अशा पट्ट्यात आहे, या पट्ट्याला शास्त्रज्ञ काय म्हणतात?

अ) डोलड्रम्स विभाग

ब) गोल्डीलॉक्स विभाग (Goldilocks Zone)

क) हॉर्स अक्षांश विभाग

ड) आयटीसीजी (ITCZ) विभाग

उत्तर: ब) गोल्डीलॉक्स विभाग (Goldilocks Zone)

9) वातावरणातील ओझोन थराचा नाश करणाऱ्या घटकांचा वापर हळूहळू बंद करण्यासाठी 1987 साली कोणता आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला?

अ) क्योतो प्रोटोकॉल

ब) मॉन्ट्रिअल करार

क) पॅरिस करार

ड) रिओ वसुंधरा करार

उत्तर: ब) मॉन्ट्रिअल करार

10) जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत सातत्याने वाढ होत असून तिचा सरासरी दर प्रतिवर्ष सुमारे किती मिलीमीटर आहे?

अ) 1 मिमी

ब) 3 मिमी

क) 10 मिमी

ड) 15 मिमी

उत्तर: ब) 3 मिमी


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

इंग्रजी माध्यम

Class 11 Geography

Chapters 1 to 5 – Objective Questions

XI Geography Choose the correct option


अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा


Chapter 1: Earth Movements

(Choose the correct option / Identify the correct element)

1) Which landform is formed due to slow Earth movements?

A) Earthquake
B) Volcano
C) Fold Mountain
D) Tsunami

Answer: C) Fold Mountain

2) What are the movements that form continents and extensive plateaus called?

A) Horizontal movements
B) Mountain-building movements
C) Vertical (continent-building) movements
D) Sudden movements

Answer: C) Vertical (continent-building) movements

3) Which of the following is an example of a young Fold Mountain?

A) Aravalli Mountains
B) Ural Mountains
C) Appalachian Mountains
D) Himalayan Mountains

Answer: D) Himalayan Mountains

4) What is the fold in which the central part is at a lower elevation and its limbs descend towards the central part called?

A) Anticline
B) Syncline
C) Horizontal fold
D) Isoclinal fold

Answer: B) Syncline

5) Which landform is formed when a block of the crust between two parallel faults is uplifted due to pressure in hard rocks?

A) Rift Valley
B) Fold Mountain
C) Block Mountain
D) Lava Plateau

Answer: C) Block Mountain

6) What is the place in the Earth’s crust where the accumulated stress is released called?

A) Epicentre
B) Focus (Hypocentre)
C) Isoseismal centre
D) Shadow Zone

Answer: B) Focus (Hypocentre)

7) Which earthquake waves travel only through solid medium?

A) Primary waves (P)
B) Secondary waves (S)
C) Surface waves (L)
D) Space waves

Answer: B) Secondary waves (S)

8) Which scale is used to measure the magnitude of an earthquake?

A) Mercalli Scale
B) Richter Scale
C) Celsius Scale
D) Millibar Scale

Answer: B) Richter Scale

9) What is the lava which contains less silica and is thin and fluid called?

A) Acid lava
B) Alkaline lava
C) Viscous lava
D) Composite lava

Answer: B) Alkaline lava

10) What is the imaginary line joining places of equal intensity of an earthquake on a map called?

A) Isobar
B) Isotherm
C) Isoseismal line
D) Contour line

Answer: C) Isoseismal line

XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा


Chapter 2: Weathering and Mass Wasting

(Choose the correct option / Identify the correct element)

11) What is the sound produced when rocks break due to temperature changes in hot desert regions similar to?

A) The sound of thunder
B) The sound of a pistol being fired
C) The sound of a whistle
D) The sound of lightning

Answer: B) The sound of a pistol being fired

12) What is the type of mechanical weathering caused by the freezing of water in cracks of rocks in high latitude or mountainous regions called?

A) Frost action
B) Exfoliation
C) Calcification
D) Liquefaction

Answer: A) Frost action

13) What colour does a rock acquire after calcification of aluminium-rich rocks?

A) Red colour
B) Yellow colour
C) Black colour
D) White colour

Answer: B) Yellow colour

14) What is the process in which the outer layers of a massive rock such as granite are removed due to a decrease in pressure called?

A) Calcification
B) Exfoliation
C) Soil creep
D) Mudflow

Answer: B) Exfoliation

15) What is the rapid flow of water-saturated mud, stones and weathered materials down a hill slope called?

A) Landslide
B) Mudflow
C) Soil creep
D) Exfoliation

Answer: B) Mudflow

16) What is the process of slow movement of a layer of soil over frozen ground in alpine or sub-glacial regions called?

A) Soil creep
B) Landslide
C) Exfoliation
D) Calcification

Answer: A) Soil creep

17) The breaking of rocks due to the growth of plant roots in cracks of rocks is an example of which type of weathering?

A) Mechanical weathering
B) Chemical weathering
C) Biological weathering
D) Man-made weathering

Answer: C) Biological weathering

18) Due to saline sea water and dry and humid seasons, what shape have the rocks acquired at Hareswar in Ratnagiri?

A) Like a crater lake
B) Like a honeycomb
C) Like a pillar or cave
D) Like a lava dome

Answer: B) Like a honeycomb

19) Which of the following is mass wasting that occurs at an extremely slow rate and continues for several years or centuries?

A) Landslide
B) Rockfall
C) Soil creep
D) Mudflow

Answer: C) Soil creep

20) Which metamorphic rock is harder than steel and does not undergo chemical weathering easily?

A) Limestone
B) Granite
C) Quartzite
D) Sandstone

Answer: C) Quartzite


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

Chapter 3: Agents of Erosion

Choose the correct option / Identify the correct element

1) What is the erosion that occurs in the opposite direction of the river flow due to the steep slope in the source region of a river called?

A) Downward erosion
B) Headward erosion
C) Lateral erosion
D) Vertical erosion

Answer: B) Headward erosion

2) What is the process of erosion in which rocks are plucked due to the pressure of moving ice at the bottom and sides of a glacier called?

A) Abrasion
B) Attrition
C) Plucking
D) Liquefaction

Answer: C) Plucking

3) What is the landform called in which the lower part of a rock is more eroded by the erosional work of wind and acquires an umbrella-like shape?

A) Ventifact
B) Yardang
C) Rock pedestal
D) Sand dune

Answer: C) Rock pedestal

4) Which of the following landforms is formed when two caves on a headland facing each other meet?

A) Sea stack
B) Sea arch
C) Wave-cut platform
D) Lagoon

Answer: B) Sea arch

5) What are the circular depressions formed on the surface in limestone and gypsum regions due to the dissolving action of groundwater called?

A) Sinkhole
B) Cirque
C) Deflation hollow
D) Oxbow lake

Answer: A) Sinkhole

6) What is the process in which a pothole is formed in a river bed when the flow becomes circular due to obstacles in the river bed and rock fragments rotate?

A) Transportation
B) Pothole drilling
C) Traction
D) Suspension

Answer: B) Pothole drilling

7) What is the landform of yellowish soil formed by the deposition of very fine soil particles carried by wind over a very long distance from their original place called?

A) Loess
B) Barchan
C) Seif dunes
D) Beach

Answer: A) Loess

8) What are the downward-hanging columns formed from the minerals in limestone-rich water dripping from the roof of a cave by groundwater called?

A) Upward stalagmites
B) Downward stalactites
C) Continuous limestone columns
D) Sea stacks

Answer: B) Downward stalactites

9) What is the deposit formed by sediments carried by a glacier and deposited along its sides or at its bottom called?

A) Flood plain
B) Moraine
C) Sand bar
D) Mudflow

Answer: B) Moraine

10) What is the coastal landform formed by the deposition of fine sand and pebbles due to the depositional work of waves in the concave part of land projecting into the sea called?

A) Headland
B) Sea cliff
C) Beach
D) Sea cave

Answer: C) Beach


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

Chapter 4: Climatic Regions

Choose the correct option

1) Between which latitudes is the Equatorial Rainforest climatic region mainly found in both hemispheres?

A) 0° to 5°
B) 5° to 10°
C) 15° to 30°
D) 45° to 65°

Answer: B) 5° to 10°

2) Which type of rainfall occurs almost every afternoon throughout the year in the Equatorial Rainforest region?

A) Orographic rainfall
B) Cyclonic rainfall
C) Convectional rainfall
D) Monsoon rainfall

Answer: C) Convectional rainfall

3) Which major factor is responsible for the change in the direction of winds in summer and winter in the Monsoon climatic region?

A) Shifting of the Inter-Tropical Convergence Zone
B) Movement of ocean currents
C) Temperature of desert regions
D) Polar anticyclonic winds

Answer: A) Shifting of the Inter-Tropical Convergence Zone

4) Which of the following climatic regions is famous as the ‘Land of Hunters’ in the world?

A) Equatorial Rainforest region
B) Tropical Grassland region (Savanna)
C) Taiga climatic region
D) Tundra climatic region

Answer: B) Tropical Grassland region (Savanna)

5) Tropical desert regions are mainly found in which part of the continents and are associated with which pressure belt?

A) Eastern part of continents and Equatorial Low Pressure Belt
B) Central part of continents and Polar High Pressure Belt
C) Western part of continents and Subtropical High Pressure Belt
D) Northern part of continents and Temperate Belt

Answer: C) Western part of continents and Subtropical High Pressure Belt

6) Warm and dry summers and mild and humid winters are the major characteristics of which climatic region?

A) Mediterranean climatic region
B) China type of climate
C) Taiga climatic region
D) Equatorial climatic region

Answer: A) Mediterranean climatic region

7) Which type of fruit cultivation is carried out on a large scale in the Mediterranean climatic region?

A) Apples and strawberries
B) Bananas and pineapples
C) Citrus and juicy fruits (grapes, olives, oranges)
D) Coconut and areca nut

Answer: C) Citrus and juicy fruits (grapes, olives, oranges)

8) What are the cyclones formed in summer in the China type or Humid Subtropical climatic region called?

A) Tornadoes and blizzards
B) Hurricanes or typhoons
C) Cyclones and willy-willies
D) Nor’easters

Answer: B) Hurricanes or typhoons

9) Which region receives rainfall throughout the year under the influence of Westerlies and has a mild climate due to warm ocean currents?

A) Marine West European type of climate
B) Hot desert climate
C) Monsoon climate
D) Tundra climate

Answer: A) Marine West European type of climate

10) In which climatic region are softwood-producing coniferous forests found?

A) Equatorial Rainforest region
B) Taiga (Sub-Arctic) climatic region
C) Savanna region
D) Mediterranean region

Answer: B) Taiga (Sub-Arctic) climatic region

11) Which economic activity has developed on a large scale in the Taiga climatic region due to the availability of softwood?

A) Fishing
B) Lumbering and pulp industry
C) Fruit processing industry
D) Animal husbandry and dairy farming

Answer: B) Lumbering and pulp industry

12) Which region has extremely cold climate, a short summer, seals and walruses, and is inhabited by Eskimo people?

A) Taiga climatic region
B) Tundra climatic region
C) China type region
D) Savanna region

Answer: B) Tundra climatic region

13) Which is the most severe climatic region on the Earth where all average monthly temperatures throughout the year are below 0°C?

A) Taiga region
B) Ice-covered (Polar) region
C) West European region
D) Desert region

Answer: B) Ice-covered (Polar) region

14) What type of vegetation structure is found in the Equatorial Rainforests?

A) Single-layer thorny vegetation
B) Three-layered dense evergreen forests
C) Softwood-producing coniferous forests
D) Only grasslands

Answer: B) Three-layered dense evergreen forests

15) High daily range of temperature, dry air, cactus and thorny shrubs are characteristics of which climatic region?

A) Tropical Desert (Sahara) region
B) Monsoon climatic region
C) West European region
D) Mediterranean region

Answer: A) Tropical Desert (Sahara) region


XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

Chapter 5: Global Climate Change

Choose the correct option

1) By approximately how many degrees Celsius has the average temperature of the Earth’s surface increased during the twentieth century?

A) 0.2°C
B) 0.5°C
C) 0.8°C
D) 1.5°C

Answer: C) 0.8°C

2) What is generally considered to be the average temperature of the Earth’s surface suitable for the existence of living organisms?

A) 0°C
B) 10°C
C) 14°C
D) 25°C

Answer: C) 14°C

3) In the last 25 years, by approximately how many metres has the Gangotri Glacier in the Garhwal Himalaya retreated?

A) 300 metres
B) 500 metres
C) 850 metres
D) 1200 metres

Answer: C) 850 metres

4) When the sea water temperature increases by 1°C to 2°C, corals expel the algae from their cells, causing the corals to lose their colour and die. What is this process called?

A) Coral bleaching
B) Coral deposition
C) Coral calcification
D) Coral liquefaction

Answer: A) Coral bleaching

5) What is the science that studies past or ancient climate called?

A) Geology
B) Palaeoclimatology
C) Climatology
D) Atmospheric science

Answer: B) Palaeoclimatology

6) Which of the following is not used as indirect evidence for the study of ancient climate (Palaeoclimatology)?

A) Tree rings
B) Ice cores
C) Corals
D) Richter Scale

Answer: D) Richter Scale

7) What is the astronomical cycle related to changes in the energy received from the Sun and changes in the distance of the Earth from the Sun called?

A) Milankovitch cycle
B) El Niño cycle
C) Ozone cycle
D) ITCZ cycle

Answer: A) Milankovitch cycle

8) The Earth is currently situated in a zone of the Solar System suitable for the existence and habitation of living organisms. What do scientists call this zone?

A) Doldrums zone
B) Goldilocks Zone
C) Horse Latitudes
D) ITCZ zone

Answer: B) Goldilocks Zone

9) Which international agreement was made in 1987 to gradually stop the use of substances that destroy the ozone layer?

A) Kyoto Protocol
B) Montreal Protocol
C) Paris Agreement
D) Rio Earth Summit Agreement

Answer: B) Montreal Protocol

10) The global sea level is continuously increasing due to global warming. What is its average rate of increase per year?

A) 1 mm
B) 3 mm
C) 10 mm
D) 15 mm

Answer: B) 3 mm

XI Geography Choose the correct option


अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा

XI Geography Choose the correct option

अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा


आणखी पहा

1) अकरावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50 (PDF स्वरुपात डाऊनलोड साठी उपलब्ध)

2) अकरावी इंग्रजी माध्यम प्रश्नपत्रिका गुण 50

3) अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका गुण 50

अकरावी भूगोलाच्या अभ्यासक्रमावरील सर्व माहिती प्रश्नपत्रिका व इतर माहिती मिळविण्यासाठी खालील नोट्स वापरा

संपर्क- 9607371951

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page