HomeMoreXII Geo Ch 1: Distinguish Between

XII Geo Ch 1: Distinguish Between

फरक स्पष्ट करा.

Complete the statements as instructed

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा


1) लोकसंख्या संक्रमण :  दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा

2) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश

3) लोकसंख्या संक्रमण :  पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा (July 2025)

4) कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश

5) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर  (March 2022, Oct 2021,  July 24)

6) लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा

7) लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या वाढ

8) लोकसंख्येची सकारात्मक वाढ आणि नकारात्मक (ऋणात्मक) वाढ

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

●लोकसंख्यासंक्रमण :  दुसरा टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा

लोकसंख्या संक्रमण : दुसरा टप्पालोकसंख्या संक्रमण:  चौथा टप्पा
लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ‘आरंभीच्या काळात विस्तारणारा’ टप्पा म्हणून संबोधले जाते.लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ‘कमी बदल दर्शविणारा टप्पा म्हणून संबोधले जाते.
या टप्प्यात मृत्युदरात घट झालेली असते, परंतु जन्मदर स्थिर असल्याने लोकसंख्या झापाटयाने वाढत असते.या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर कमी झालेले असतात. जन्मदर व मुत्युदर जवळजवळ सारखाच असतो त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते.
या टप्प्यातील देशात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैदयकीय सुविधांचा विस्तार झालेला असतो.या टप्प्यात उच्चतम वैदयकीय सुविधा उपलब्ध असतात पटकी, प्लेग सारख्या साथीच्या आजारांचा नायनाट झालेला असतो.
या टप्प्यातील देशात शेती व उदयोगधंदयातील उत्पादने वाढलेली असतात.या टप्प्यातील देशात व्दितीय व तृतीय व्यवसायांचे प्रमाण प्राथमिक व्यवसायांपेक्षा खुप जास्त असते.
अधिक लोकसंख्या असणारेविकसनशील देश सध्या या टप्प्यातुन जात आहेत.  उदा. कांगो, बांग्लादेश, नायजर व युगांडाअमेरिकेची संयुक्त सस्थांने हाविकसीत देश या टप्प्यातुन जात आहे.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

  • लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश
लोकसंख्या वितरण:  मैदानी प्रदेशलोकसंख्या वितरण:  पर्वतीय प्रदेश
100  मीटर पेक्षा कमी उंची असलेल्या सपाट व मंद उताराच्या प्रदेशास मैदानी प्रदेश म्हणतात1000 मी. पेक्षा उंच, तीव्र उतार व शिखराकडे निमुळत्या होत गेलेल्या उंच प्रदेशास पर्वतीय प्रदेश म्हणतात.
मैदानी प्रदेशात जमीनीच्या सपाट भाग किंवा मंद उतारामुळे लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते.पर्वतीय प्रदेशात तीव्र उतारामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.
या प्रदेशात सुपिक गाळाची मृदा, जलसिचंन शेती सुघमता यामुळे लोकसंख्या वाढीस पुरकस्थ‍िती असते.पर्वतीय प्रदेशात ओसाड किंवा नापिक जमीन, दुर्गम भाग, पाण्याचा अभाव यामुळे लोकसंख्या विरळ असते.
सपाट किंवा मंद उतारामुळे या प्रदेशात वाहतुक सुविधांचा विकास झालेला असतो.तीव्र उतार व उंचसखलपणा यामुळे वाहतूक मार्ग फारसे विकसीत नसतात.
मैदानी प्रदेशात कच्च्या मालाची उपलब्धता, वाहतूक सुविधा या सारख्या पुरक स्थ‍िती उपलब्ध असल्याने उदयोगधंदयाचा  विकास झालेला असतो.  त्यामुळे लोकसंख्या एकवटलेली असते.शेती अयोग्य जमीन, घनदाट जंगले दुर्गम प्रदेश यामुळे उदयोगधदयांना फारशी चालणा मिळालेली नसते.
उदा. भारतातील गंगा सिधु नदीचे खोरे, इजिप्त मधिल नाईल नदीचे खोरे, मिसिसीपी नदीचे खोरेउदा. हिमालय पर्वत, रॉकी, अँडीज, ॲपलेशियन पर्वत रांगा

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

लोकसंख्या संक्रमण :  पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा

लोकसंख्या संक्रमण : पहिला टप्पालोकसंख्या संक्रमण:  पाचवा टप्पा
लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास अतिशय स्थिर टप्पा म्हणून संबोधले जाते.लोकसंख्या संक्रमणाच्या या टप्प्यास ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून संबोधले जाते.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त असल्याने लोकसंख्या वाढ स्थ‍िर असते.लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यात जन्मदर खुप कमी होवुन मृत्युदराशी समान झालेला असतो.  त्यामुळे लोकसंख्या वाढ अत्यल्प असते.
जन्मदर जास्त असल्याने या टप्प्यातील प्रदेशात बालकांची संख्या जास्त असते.या प्रदेशात जन्मदर कमी असल्याने बालकांची संख्या खुप कमी झालेली असते.
या टप्प्यातील देशात आर्थिक स्थ‍िती विकसीत नसते.या टप्प्यात नागरिकांची व देशाची आर्थिक स्थ‍िती उत्तम असते.
या टप्प्यातील देशात शेती किंवा प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते.या टप्प्यातील देशात तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते.
या टप्प्यातील देशात शैक्षणिक संधी मर्यादीत असतात तर वैदयकीय सुविधांचा अभाव असतो. या टप्याच्या प्रदेशात शैक्षणिक व वैदयकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात.
स्वच्छतेचा अभाव, मोठी कुटुंबे, संसर्गजन्य रोंगाचा प्रादुर्भाव, कुपोषण अशा अनेक समस्या या प्रदेशातील लोकांना असतात.उत्तम आरोग्य, चांगले पर्यावरण व आंनददायी जीवन या टप्प्यातील नागरीकांचे वैशिष्ट असते.
सदयस्थ‍ितीत एकही देश या टप्प्यात नाही.स्वीडन व फिनलँड  हे देश या टप्प्यात येतात.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

कमी लोकसंख्येचे प्रदेश आणि जास्त लोकसंख्येचे प्रदेश 

विरळ लोकसंख्येचे प्रदेशजास्त लोकसख्येचे प्रदेश
150 पेक्षा कमी लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास विरळ लोकसंख्येचे प्रदेश मानले जाते. 451 पेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रमाण असणाऱ्या प्रति चौरस कि.मी. क्षेत्रास प्रदेश जास्त लोकसंख्येचे प्रदेश मानले जाते.
प्रतिकुल हवामान असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते.अनुकुल व सौम्य हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते.
वाळवंटी प्रदेश, घनदाट वने, हिमाच्छादीत प्रदेश, उंच पर्वतीय प्रदेश, धृवीय प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. सौम्य व अल्हाददायक व मोसमी हवामान, नदयांचे सुपिक मैदानी खोरे, पाण्याची उपलब्धता, समुद्र किनारी प्रदेशात लोकसंख्या जास्त आढळते.
या प्रदेशात मानवी जीवन खडतर असल्याने लोकसंख्या कमी असते या प्रदेशात मानवी जीवनास उपयुक्त अशी स्थिती उदयोगधंदयाचा विकास, वाहतुक सुविधा यामुळे  लोकसंख्या जास्त असते.

ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर  March 2022

ढोबळ जन्मदरढोबळ मृत्युदर
एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतातएका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मूत्यु पावलेल्या आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात
ढोबळ जन्मदर लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमीका बजावतो.ढोबळ मृत्युदराची जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात भूमीका असते.
ढोबळ जन्मदर हा वाढता असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढत असते.जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी अथवा जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी अथवा जास्त होते. 
 ढोबळ जन्मदराचे प्रमाण कमी असलेले देश विकसीत असतात तर ढोबळ जन्मदराचे प्रमाण जास्त असलेले प्रदेश विकसनशील किंवा अविकसीत असतात.अविकसतील देशात ढोबळ मृत्यूदर जास्त आढळतो.  तर विकसीत देशात मृत्युदराचे प्रमाण कमी असते.
सन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ जन्मदर जास्‍त असलेला देश नायजर (46.5) आहे. तर ढोबळ जन्मदर कमी असलेला प्रदेश ग्रीस (8.2) आहेसन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ मृत्युदर जास्त असलेला प्रदेश ग्रीस (11.6)  आहे. तर मृत्युदर कमी असलेला प्रदेश भारत (7.2) आहे. 

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

  • लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा
दुसरा टप्पा (आरंभीच्या काळात विस्तारणारा)तिसरा टप्पा (नंतरच्या काळात विस्तारणारा)
येथे जन्मदर स्थिर असतो परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे मृत्यूदर वेगाने घटतो.या टप्प्यात मृत्यूदर अधिक कमी होतो आणि लोकांची शैक्षणिक पातळी उंचावल्याने जन्मदरही घटू लागतो.
जन्मदर व मृत्यूदरातील फरकामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते, याला ‘लोकसंख्या विस्फोट’ म्हणतात.येथे लोकसंख्या वाढत असली तरी वाढीचा दर मंदावतो.
देशाची आर्थिक स्थिती विकसनशील असते, शेती व उद्योगातील उत्पादन वाढते.लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहापेक्षा जास्त असते, राहणीमान उंचावते आणि गरिबी कमी होते.
कांगो, बांगलादेश, नायजर आणि युगांडा हे देश या टप्प्यात आहेत.चीन हा देश या टप्प्यातून जात आहे.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

  • लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या वाढ
लोकसंख्येची घनतालोकसंख्या वाढ
एका विशिष्ट क्षेत्रफळात (उदा. दर चौ.किमी) किती लोक राहतात, याचे प्रमाण म्हणजे घनता होय.एका विशिष्ट कालावधीत प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत झालेला बदल म्हणजे लोकसंख्या वाढ होय.
घनता = एकूण लोकसंख्या / एकूण क्षेत्रफळ.वाढ = सध्याची लोकसंख्या – आधीची लोकसंख्या.
भूरचना, हवामान, पाण्याची उपलब्धता यांसारख्या नैसर्गिक घटकांचा घनतेवर परिणाम होतो.जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या बदलाचे (वाढीचे) तीन मुख्य घटक आहेत.
घनता ही प्रदेशातील लोकसंख्येचे जमिनीवरील वितरण दर्शवते.वाढ ही सकारात्मक (संख्या वाढणे) किंवा नकारात्मक (संख्या घटणे) असू शकते.
  • लोकसंख्येची सकारात्मक वाढ आणि नकारात्मक (ऋणात्मक) वाढ
लोकसंख्येची सकारात्मक वाढलोकसंख्येची नकारात्मक (ऋणात्मक) वाढ
जेव्हा दोन कालावधीच्या दरम्यान प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत वाढ होते, तेव्हा त्यास सकारात्मक वाढ म्हणतात.जेव्हा दोन कालावधीच्या दरम्यान प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत घट होते, तेव्हा त्यास नकारात्मक वाढ म्हणतात.
जेव्हा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो किंवा इतर ठिकाणाहून लोक मोठ्या प्रमाणावर येतात.जेव्हा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी असतो किंवा मृत्यूदराशी समान असतो.
ही स्थिती प्रामुख्याने लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रकर्षाने जाणवते.ही स्थिती लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यात अनुभवास येते.
भारत, नायजर यांसारख्या देशांत सकारात्मक वाढ दिसून येते.स्वीडन, फिनलंड यांसारख्या देशांत ऋणात्मक वाढ दिसून येते.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

Explain the differences.

1) Population Transition: Second Stage and Population Transition: Fourth Stage

2) Population Distribution: Plains and Population Distribution: Mountainous Regions

3) Population Transition: First Stage and Population Transition: Fifth Stage

4) Low Population Density Regions and High Population Density Regions

5) Crude Birth Rate and Crude Death Rate (March 2022)

6) Second Stage and Third Stage of Demographic Transition

7) Population Density and Population Growth

8) Positive Population Growth and Negative Population Growth

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————


1) Population Transition: Second Stage and Population Transition: Fourth Stage

Population Transition: Second StagePopulation Transition: Fourth Stage
This stage is known as the Early Expanding Stage.This stage is known as the Low Fluctuating Stage.
Death rate declines, but birth rate remains high; hence population increases rapidly.Both birth rate and death rate are low and almost equal; hence population growth is very low.
Due to development of science and technology, medical facilities begin to expand.Advanced medical facilities are available and epidemic diseases like cholera and plague are eliminated.
Agricultural and industrial production increases.Secondary and tertiary occupations dominate over primary occupations.
Highly populated developing countries are in this stage. Example: Congo, Bangladesh, Niger, Uganda.Developed countries like the United States of America are in this stage.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

2) Population Distribution: Plains and Population Distribution: Mountainous Regions

Population Distribution: PlainsPopulation Distribution: Mountainous Regions
Plains are flat or gently sloping regions below 100 metres altitude.Mountainous regions are highlands above 1000 metres with steep slopes and pointed peaks.
Due to flat land and gentle slopes, population distribution is dense.Due to steep slopes, population distribution is sparse.
Fertile alluvial soil, irrigation facilities and favourable conditions support population growth.Barren land, inaccessibility and scarcity of water result in sparse population.
Transport facilities are well developed due to flat terrain.Transport routes are poorly developed due to rugged terrain.
Availability of raw materials and transport facilities encourages industrial development, leading to dense population.Agriculture is unsuitable and industries do not develop due to dense forests and inaccessibility.
Examples: Ganga–Indus plains (India), Nile valley (Egypt), Mississippi valley.Examples: Himalayas, Rockies, Andes, Appalachian ranges.

3) Population Transition: First Stage and Population Transition: Fifth Stage

Population Transition: First StagePopulation Transition: Fifth Stage
Known as the Highly Stationary Stage.Known as the Negative Growth Stage.
Both birth rate and death rate are high; population growth remains stable.Birth rate becomes very low and equals death rate; population growth is extremely low.
Due to high birth rate, proportion of children is high.Due to very low birth rate, proportion of children is very low.
Economic condition is underdeveloped.Economic condition of people and the country is very good.
Primary occupations like agriculture dominate.Tertiary occupations dominate.
Educational opportunities are limited and medical facilities are inadequate.High-quality educational and medical facilities are available.
Problems like poor sanitation, large families, infectious diseases and malnutrition are common.Good health, clean environment and high quality of life are observed.
At present, no country belongs to this stage.Examples: Sweden and Finland.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

4) Low Population Density Regions and High Population Density Regions

Low Population Density RegionsHigh Population Density Regions
Regions having less than 150 persons per sq. km are called low population density regions.Regions having more than 451 persons per sq. km are called high population density regions.
Population is low in regions with unfavourable climate.Population is high in regions with favourable and moderate climate.
Deserts, dense forests, snow-covered regions, high mountains and polar regions have sparse population.Fertile river valleys, monsoon regions, coastal areas and regions with water availability have dense population.
Due to harsh living conditions, population remains low.Availability of industries and transport facilities makes human life easier, resulting in high population.

5) Crude Birth Rate and Crude Death Rate (March 2022)

Crude Birth RateCrude Death Rate
Crude Birth Rate is the number of live births per thousand population in a year.Crude Death Rate is the number of deaths per thousand population in a year.
Crude birth rate plays an important role in population change.Crude death rate also plays an important role in population change.
If the birth rate is high, population increases.If death rate is higher or lower than birth rate, population decreases or increases accordingly.
Countries with low birth rate are developed, while those with high birth rate are developing or underdeveloped.Underdeveloped countries have high death rate, while developed countries have low death rate.
As per 2017 data, Niger (46.5) has the highest birth rate, while Greece (8.2) has the lowest.As per 2017 data, Greece (11.6) has the highest death rate, while India (7.2) has a low death rate.

6) Second Stage and Third Stage of Demographic Transition

Second Stage (Early Expanding)Third Stage (Late Expanding)
The birth rate remains stable, but due to scientific progress, the death rate declines rapidly.In this stage, the death rate decreases further, and as people’s literacy/educational levels rise, the birth rate also begins to decline.
Due to the difference between the birth rate and death rate, the population grows rapidly; this is called a ‘Population Explosion’.Although the population continues to grow here, the rate of growth slows down.
The country’s economic condition is developing, and production in agriculture and industry increases.People’s income exceeds basic subsistence levels, the standard of living rises, and poverty decreases.
Countries like Congo, Bangladesh, Niger, and Uganda are in this stage.China is currently passing through this stage.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा

————————————————————————

7) Population Density and Population Growth

Population DensityPopulation Growth
The proportion of people living in a specific land area (e.g., per sq. km) is called population density.The change in the number of inhabitants in a region during a specific period of time is called population growth.
Density = Total Population / Total AreaGrowth = Current Population – Previous Population
Natural factors like landforms, climate, and water availability affect population density.Births, deaths, and migration are the three main components of population change (growth).
Density indicates the spatial distribution of a region’s population on land.Growth can be positive (an increase in numbers) or negative (a decrease in numbers).

8) Positive Population Growth and Negative Population Growth

Positive Population GrowthNegative Population Growth
When there is an increase in the number of inhabitants in a region between two time periods, it is called positive growth.When there is a decrease in the number of inhabitants in a region between two time periods, it is called negative growth.
Occurs when the birth rate is higher than the death rate or when people migrate into the region in large numbers.Occurs when the birth rate is lower than the death rate or equal to it (with high out-migration).
This condition is prominently observed in the second and third stages of demographic transition.This condition is experienced in the fifth stage of demographic transition.
Positive growth is observed in countries like India and Niger.Negative growth is observed in countries like Sweden and Finland.

————————————————————————

XII Geo Ch 1: Distinguish Between

बारावी भूगोल लोकसंख्या भाग 1 फरक स्पष्ट करा


प्रकरण 3 – मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा
प्रकरण 4 – प्राथमिक आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा
प्रकरण5 – द्वितीयआर्थिकक्रियाफरकस्पष्टकरा(मराठीवEnglish medium)
प्रकरण 6 – तृतीय आर्थिक क्रिया फरक स्पष्ट करा (मराठी व English medium)
——————

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page