HomeMoreHsc Baravi Bhugol Sarav Prashnaptrika

Hsc Baravi Bhugol Sarav Prashnaptrika

Hsc Baravi Bhugol Sarav Prashnaptrika

Hsc बारावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता :- बारावी                                                                                                

विषय:- भूगोल

गुण :- 80                                                                                  

वेळ :- 3 तास

Hsc Baravi Bhugol Sarav Prashnaptrika

सूचना :

  1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
  2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.
  3. रंगीत पेन्सिल वापर करण्यास परवानगी आहे.
  4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा.
  5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  6. नकाशा पुरवणी मूळ उत्तर पुत्रिकेस जोडावी.

प्र.1. अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा.                                

5

अ.क्र.
1कायम बर्फाच्छादित प्रदेशहाताने निर्मिती उद्योगतृतीयक व्यवसाय
2कुटिरोद्योगप्राकृतिक घटकगंगा नदीचे खोरे
3माथेरानअंटार्क्टिकाकुंभार
4मत्स्यक्षेत्रपर्यटनडॉगर बँक
5औपचारिक प्रदेशईशान्य अटलांटिक महासागरकायम निवासी लोकसंख्या नाही

प्र.1. ‘ब’) अयोग्य घटक ओळखा.                                              

                                                                                                                       5

1)लोकसंखेच्या वितरणावर परीणाम करणारे मानवी घटक.

अ) वाहतूक व दळणवळण   आ) प्राकृतिक रचना    इ) औद्योगिक विकास   ई) नागरीकरण

2) स्थलांतराची प्राकृतिक कारणे –

अ) भूकंप                            आ) ज्वालामुखी             इ) आर्थिक                   ई) पूर

3) घरांमधील अंतराच्या आधारावर वस्तीचे प्रकार

अ) केंद्रित वस्ती                  आ) विखुरलेली वस्ती      इ) एकाकी वस्ती         ई) व्यापार वस्ती

4) उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरनावर परीणाम करणारे प्राकृतिक घटक

अ) हवामान              आ) बाजारपेठ सानिध्य   इ) कच्या मालाची उपलब्धता   ई) पाणीपुरवठा

5) एखादे क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते.

अ) हवामान                   आ) स्थान व विस्तार            इ) सीमा                         ई) श्रेणीबद्ध उतरंड


प्र.1.’क’) चूक की बरोबर ते लिहा.  

5

  1.  सर्वाधिक लोकसंखेची घनता आफ्रिका खंडात आहे.
  2. ग्रामीण नागरी झालर क्षेत्राचे संक्रमण हे नेहमीच स्वेच्छेने आणि समस्याशिवाय होते असे नाही.
  3. लोह्पोलाद उद्योग कच्च्या माल क्षेत्रातस स्थापन केले जातात .
  4. विकसित देशात सर्वाधिक लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात.
  5. मानव आणि पर्यावरण घटक यांच्या सह्संबंधाचा अभ्यास भूगोल शास्त्रात केला जातो.

 प्र.1. ‘ड’)  सहसंबंध ओळखा :- A- विधान, R- कारण

5

  1. A : दुस-या टप्प्यात मृत्यूदरात घट होते,पण जन्मदर स्थिर असतो.

R : दुस-या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.

अ) केवळ A बरोबर आहे. 

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————–

2) A : लोकसंखेच्या मनो-यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.

R : लोकसंख्या मनो-याचे रुंद शीर्ष  वृधांची संख्या अधिक असल्याचे दयोतक आहे.

अ) केवळ A बरोबर आहे.  

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————–

3) A : नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात.

R : एका नगरला केवळ एकच कार्ये असते.

अ) केवळ A बरोबर आहे.  

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————–

4) A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.

R : उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.

अ) केवळ A बरोबर आहे.  

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

———————–

5) A : नागपूर महानगर क्षेत्र प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेला प्रदेश नाही.

R : नागपूर महानगर क्षेत्र हा कार्यात्मक प्रदेश आहे.

अ) केवळ A बरोबर आहे.  

ब) केवळ R बरोबर आहे.

क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा.       (कोणतेही तीन)   

12 

  1. जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.
  2. ग्रामीण वस्ती मध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.
  3. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
  4. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.
  5. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.

प्रश्न 3) फरक स्पष्ट करा. (कोणतेही तीन) 

9

  1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश .
  2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती
  3. भूमी उपयोजन आणि भूमी अच्छादन
  4.  द्वितीयक व तृतीयक व्यवसाय
  5. प्राकृतिक  भूगोल  आणि  मानवी भूगोल

प्रश्न ४. अ) तुम्हास दिलेल्या जगाचा नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साह्याने  दाखवा

     आणि सूची तयार करा. (कोणतेही सहा)   

6

  1. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश
  2. सर्वाधिक लोकसंख्येचा देश
  3. भारतातील एक महानगर.
  4. नैऋत्य अटलांटिक मधील मासेमारी क्षेत्र.
  5. पंचमहासरोवराजवळील औधोगिक क्षेत्र
  6. दोन खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग.
  7. अँडीज पर्वतीय प्रदेश
  8. कॅनडातील सुचीपर्णी वनक्षेत्र.

 प्रश्न 4 ब) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.  

5

कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे

2  कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे 

स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे

 4  आलेखा बाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा

 


प्रश्न 5) टिपा लिहा. (कोणतेही तीन)  

12

  1. जन्म आणि मृत्यू दरातील सहसंबंध.
  2. लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
  3. नागरी वस्तीच्या समस्या.
  4. मळ्याची शेती –
  5. व्यापारातील वाहतुकीची भूमिका –

प्रश्न ६. अ) उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 

4

कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाचे आहे. यात अनेक उद्योग जटील मार्गाने एकत्र काम करीत आहेत. आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्धा मधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिजम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे निश्‍चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायद्वारे दर्शविलेल्या कृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यवस्थांनी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्य स्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे.

  1. पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते.
  2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे.
  3. नियोजनाचे कोणतेही दोन फायदे सांगा.
  4. यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो.

प्रश्न 6 ब) आकृती काढून नावे द्या (कोणतेही दोन)   

4

  1. लोकसंख्या मनोरा.
  2. लोकसंख्या संक्रमण सिध्दान्ताचे टप्पे
  3. त्रिकोणी वस्ती

प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही एक)                                                                                                                                 8

1) लोकसंख्या वितरणावरील मानवी घटकांचा परिणाम उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

2)  व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा.



नमुना उत्तरपत्रिका

इयत्ता :- बारावी                                                                                             विषय:- भूगोल

गुण :- 80                                                                                                      वेळ :- 3 तास

प्र.1. अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा.                                  5

अ.क्र.
1अंटार्क्टिकाकायम बर्फाच्छादित प्रदेशकायम निवासी लोकसंख्या नाही
2कुटिरोद्योगहाताने निर्मिती उधोगकुंभार
3माथेरानपर्यटनतृतीयक व्यवसाय
4मत्स्यक्षेत्रडॉगर बँकईशान्य अटलांटिक महासागर
5औपचारिक प्रदेशप्राकृतिक घटकगंगा नदीचे खोरे

‘ब’) अयोग्य घटक ओळखा.    

5

  1. आ) प्राकृतिक रचना 
  2. – इ) आर्थिक    
  3. – ई) व्यापार वस्ती
  4. – आ) बाजारपेठ सानिध्य  
  5. – अ) हवामान  

‘क’) चूक की बरोबर ते लिहा. 

5

  1. चूक आहे.                                 
  2. बरोबर आहे.
  3. बरोबर आहे.
  4. चूक आहे.
  5. बरोबर आहे.

‘ड’)  सहसंबंध ओळखा :- A- विधान, R- कारण

5

  1.  इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
  2.   ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
  3.  अ) केवळ A बरोबर आहे.
  4.  ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
  5.  ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.      

प्र.2. भौगोलिक कारणे लिहा.(कोणतेही तीन) 

12

1)-

  1. लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो.
  2. मात्र, असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. देशाची आर्थिक स्थिती सुधारते.
  3. लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.
  4. मात्र, याच वेळेस मृत्युदरही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्म दर कमी असूनही मृत्युदर त्याहीपेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते.
  5. मात्र, ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते.

2)

  1. ग्रामीण वस्ती चे नागरी वस्ती हे वर्गीकरण सर्वसाधारणपणे कोणत्या व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले आहेत यावरून केले जाते.
  2. प्राथमिक व्यवसायात अधिक लोक गुंतलेले असतील तर तो ग्रामीण भाग व प्राथमिक व्यवसाय सोडून इतर व्यवसायात अधिक लोक गुंतलेले असतील तर तो शहरी भाग असतो.
  3. ग्रामीण वस्ती मधील बहुतांशी लोक हे शेती या प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात त्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे प्रमाण हे इतर व्यवसाय पेक्षा अधिक असते.
  4. शेती व शेतीसाठी लागणारे विविध अवजारे तयार करण्याचा व्यवसाय हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चालतात.
  5. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाने ग्रामीण भूमी उपयोजनाचे जे विविध क्षेत्रात वर्गीकरण केले आहे ते वर्गीकरण हे प्रामुख्याने शेतीत केली जाणाऱ्या पीक लागवडीचा कालावधी हंगाम दोन पिकांच्या लागवडी दरम्यान चा ठेवलेल्या जमिनीचा कालावधी यावर आधारित आहे यावरून ग्रामीण भागात शेती संबंधित भूमी उपयोजन हे अधिक असलेले दिसून येते.

3)-

  1. भारतातील छोटा नागपूरच्या पठारावर विपुल प्रमाणात खनिजांचे साठे आढळून येतात.
  2. यामध्ये प्रामुख्याने दगडी कोळसा, लोह खनिज, बॉक्साईट खनिजांचे प्रमाण अधिक आहे.
  3. या प्रदेशात खाणीमध्ये काम करण्यासाठी स्वस्त व अधिक मजूर पुरवठा सहज उपलब्ध होतो.
  4. त्याच प्रमाणे खाणकाम व्यवसायासाठी पोषक सरकारी धोरण, अधिक भांडवल गुंतवणूक आणि वाहतूक व यांत्रिक साधनांचा वापर यामुळे येथे खाणीवर आधारित विविध लोहपोलाद उद्योग, यांचेदेखील केंद्रीकरण या भागात मोठ्या प्रमाणात झाले आहे.
  5. त्यामुळे भारतातील छोटा नागपूर पठारावरून खाणकाम व्यवसाय अधिक विकसित झालेला आहे

4)

  1. ज्या प्रदेशात उद्योगाच्या स्थापनेसाठी अनुकूल घटक अधिक उपलब्ध असतात त्या प्रदेशात उद्योगाची स्थापना व विकास अधिक होतो.
  2. तर प्रतिकूल घटकामुळे उद्योगांचा विकास कमी होतो.
  3. उद्योगधंद्यांच्या स्थापण्यासाठी आवश्यक असणारे प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व इतर घटक हे प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात.
  4. यामुळे उद्योगधंद्यांचे वितरणही असमान असते.

5)-

  1. प्रादेशिक विकासावर प्राकृतिक रचनेचा परिणाम होत असतो.
  2. ज्या प्रदेशात नापीक मृदा असते, दुर्गम पर्वतीय भाग, वाळवंटी प्रदेश, घनदाट वने असतात. अशा प्रदेशांमध्ये प्रादेशिक विकासावर मर्यादा येतात.
  3. मात्र ज्या प्रदेशात सुपीक मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, लांब किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदरे इत्यादी प्राकृतिक रचना आढळून येते. त्या भागाचा प्रादेशिक विकास हा अधिक चांगल्या प्रकारे करता येतो.
  4. त्यामुळे दुर्गम पर्वतीय प्रदेशापेक्षा सुपीक मैदानी प्रदेशाचा प्रादेशिक विकास हा अधिक झालेला दिसून येतो.
  5. उदा: भारतातील हिमालय पर्वतीय क्षेत्रापेक्षा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील क्षेत्राचा प्रादेशिक विकास अधिक झालेला दिसून येतो.

प्र.३. फरक स्पष्ट करा. (कोणतेही तीन)  

9

1)

देणारा प्रदेशघेणारा प्रदेश
1.स्थलांतरामुळे लोक जो प्रदेश सोडून जातात त्या प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात.1.स्थलांतरामुळे लोक ज्या प्रदेशात जाऊन राहतात त्या प्रदेशाला घेणारा प्रदेश असे म्हणतात.
2.देणाऱ्या प्रदेशातील लोक स्थलांतर करून जाण्यासाठी आपकर्षक घटक कारणीभूत असतात.उदा. रोजगाराच्या कमी संधी, दुष्काळ, युद्ध इत्यादी.2.घेणाऱ्या प्रदेशात लोक स्थलांतर करून येण्यासाठी आकर्षण घटक कारणीभूत असतात. उदा. शिक्षण व रोजगाराच्या संधी, पोषक सरकारी धोरण, मनोरंजन, उच्च राहणीमान इत्यादी.
3.स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते.3.घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या वाढते.
4.देणाऱ्या प्रदेशातील प्रदेशातील पायाभूत सुविधा विनावापर किंवा कमी वापरल्या जातात त्यावर अनावश्यक खर्च होतो.4.घेणारा प्रदेशातील पायाभूत सोयी-सुविधांवर ताण निर्माण होतो.
5.देणाऱ्या प्रदेशातील कार्यशील लोकांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आर्थिक विकासाला मर्यादा पडतात.5.घेणाऱ्या प्रदेशात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण लोकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्या भागाच्या आर्थिक विकास अधिक वेगाने होतो.
6.देणाऱ्या प्रदेशातील अवलंबित लोकसंख्या व स्त्रियांचे प्रमाण वाढते. कारण कार्यशील वयोगटातील बहुतांशी पुरुष रोजगारासाठी स्थलांतर करून तो प्रदेश सोडून जातात.6.घेणाऱ्या प्रदेशात अवलंबित वयोगटाचे व स्त्रियांचे प्रमाण कमी होते. कारण कार्यशील पुरुषाचे प्रमाण वाढते.

2)

मळ्याची शेतीविस्तृत व्यापारी शेती
१. या प्रकारची शेती उष्णकटिबंधात केली जाते.१.या प्रकारची शेती समशीतोष्ण कटिबंधात 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्त च्या दरम्यान केले जाते.
२.या प्रकारच्या शेतीत चहा, कॉफी, कोको, केळी इत्यादीचे उत्पन्न घेतले जाते.२.या प्रकारच्या शेतीत गहू हे प्रमुख पीक घेतले जाते.
३.कुशल व अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनिक तत्त्वावर पिकांचे उत्पादन घेतले जाते.३. याशिवाय मका, तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते.
४. शेतीबरोबर कोणताही जोड व्यवसाय केला जात नाही.४. शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात. म्हणून या शेतीस यांत्रिक शेती असेही म्हणतात.
५.या प्रकारची शेती अधिक लोकसंख्येच्या प्रदेशात केली जाते.५. शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय ही केला जातो.या प्रकारची शेती लोकसंख्येच्या प्रदेशात केले जाते.
६. भारत, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड, म्यानमार, ब्राझील इत्यादी देशात या प्रकारची शेती केली जाते.६. संयुक्त संस्थानातील रशियातील स्टेप अर्जेंटिनातील पंपास, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स, आफ्रिकेतील व्हेल्ड व न्यूझीलंडमध्ये कॅटबरी या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते.   
  • 3)
भूमी उपयोजनभूमी अच्छादन
1.मानवाने भूमीचा किंवा जमिनीचा विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोजन होय.1.भूमीवर असणारे प्राकृतिक  घटकांचे आवरण म्हणजे भूमी अच्छादन होय.
2.यामध्ये घरे, उद्योग, शेती, वाहतुकीचे मार्ग इत्यादीचा समावेश होतो.2.भूमी अच्छादन यामध्ये वने पाणी बर्फ वाळू खडक डोंगर पर्वत इत्यादींचा समावेश होतो.
3.भूमी उपयोजन हे मानवी क्रियांमुळे घडून येते.3.भूमी अच्छादन नैसर्गिक असते.
4.प्राकृतिक घटकांचा वापर मानव आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी करीत असतो.4.हे भूमी आच्छादन मानवाच्या गरजा पूर्तीसाठी उपयोगी ठरते.
5.प्रदेशातील भूमी आच्छादनाचा परिणाम मानवाच्या भूमी उपयोजनावर दिसून येतो. उदा; खनिज संपत्ती विपुल असणाऱ्या प्रदेशात उद्योगांची निर्मिती होते.5.भूमी अच्छादन प्रदेशानुसार बदलते भूमी अच्छा नात विविधता आढळून येते. उदा: डोंगराळ प्रदेश, जंगल, पर्वतीय प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादी.
6.भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमा द्वारे सांगितले जाऊ शकत नाही.6.भूमी अच्छादन हे उपग्रह प्रतिमा द्वारे  समजले जाऊ शकते.
  • 4)
द्वितीयक व्यवसायतृतीयक व्यवसाय
1.कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करणारे व्यवसायांना द्वितीय व्यवसाय म्हणतात.1. जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता, लोकांना केवळ सेवा पुरवितात अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात.
2.द्वितीयक व्यवसाय मध्ये कच्च्या मालापासून नवीन उत्पादने घेतली जातात.2. तृतीयक व्यवसायात कोणतेही उत्पादन घेतले जात नाही फक्त सेवा दिली जाते.
3.द्वितीयक व्यवसाय हे कच्चा मालासाठी प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात.3. तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांना पूरक व्यवसाय म्हणून कार्य करीत असतात.
4. द्वितीयक व्यवसायात कुटिर उद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, अवजड उद्योग इ. उद्योगांचा समावेश होतो.4. तृतीयक व्यवसायात वाहतूक, व्यापार, वाणिज्य, संदेशवहन, पर्यटन इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो.
5. द्वितीयक व्यवसाय मध्ये सुमारे 25 ते 30 टक्के जगातील लोकसंख्या गुंतलेले आहे.5. तृतीयक व्यवसायात जगातील लोकसंख्येपैकी सर्वात कमी म्हणजे १० ते १५ टक्के लोकसंख्या गुंतलेले आहे.
  • 5)
प्राकृतिक भूगोलमानवी भूगोल
1) नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय.1) मानव आणि पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधांमुळे पृथ्वीवर नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवनिर्मित पर्यावरणाचेही स्वतंत्र स्थान निर्माण झाले. मानवनिर्मित पर्यावरणाची एक स्वतंत्र अशी वेगळी शाखा निर्माण झाली. भूगोलाची ही वेगळी शाखा म्हणजेच मानवी भूगोल होय.
2) प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राकृतिक घटक म्हणजेच नैसर्गिक घटक केंद्रस्थानी असतात.2) मानवी क्रियांमुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय.
3) प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो.3) मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे.
4) शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्नघटकांशी येणारा संबंध या सहसंबंधांचा अभ्यास केला जातो.4) मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यासविषयांचा समावेश होतो.
5) खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीव भूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. या सर्व शाखा एकमेकांशी निगडित आहेत.5) लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, या ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि शहरी भूगोल या विशेष शाखांसह वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या विविध शाखा आहेत. या सर्व उपशाखा कमी-अधिक प्रमाणात एकमेकांशी निगडित आहेत.

प्र.४. अ) तुम्हास दिलेल्या जगाचा नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साह्याने  दाखवा आणि सूची तयार करा.(कोणतेही सहा)  

6


 ब) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.     

5

1  कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे

 उत्तर मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आणि आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे

कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे

 उत्तर उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश या प्रदेशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे

स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे

  उत्तर  स्त्री  साक्षरतेचे प्रमाण मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका या ठिकाणी जास्त आहे

आलेखा बाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा

  उत्तर  I) जगात साक्षरतेचे प्रमाण असमान आहे,

II) साक्षरता जास्त असलेले प्रदेश विकसीत व विकसनशिल आढळतात


प्र. 5. टिपा लिहा. (कोणतेही तीन)                                                                                                                                                                          12

1) 

  1. जन्मदर आणि मृत्युदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र, लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्युदरातील तफावतीवर अवलंबून असते.
  2. जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्युदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते.
  3. जन्मदर जास्त व मृत्युदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते, हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते.
  4. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्युदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते.
  5. जन्मदर खूप कमी आणि मृत्युदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते.
  6. काही वळेस तर जन्मदर कमी आणि मृत्युदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात.

2)

  • लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय व लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. लोकसंख्या मनोर्‍याचे तीन प्रमुख प्रकार पडतात. विस्तारणारा, संकोचनारा आणि स्थिरावलेला मनोरा.
  • विस्तारणाऱ्या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणार असून शीर्षाकडे तो निमुळता होत असतो. हा मनोरा जन्म आणि मृत्यू दोन्ही दूर जास्त आहेत असे सांगतो.
  • संकोचनारा मनोऱ्याचा तळ संकुचित होत जातो. तर शिष्याकडे विस्तारलेला आहे.हा मनोरा जन्मदर कमी तर मृत्युदर अगदी कमी असतो असे सांगतो.
  • तिसरा स्थिरावलेला मनोर्‍यातील वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान असते. लोकसंख्या मनोर्‍यात 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते कार्यशील लोकसंख्या जास्त असण्याचे निर्देशक असते.
  • स्त्री-पुरुषांचा लोकसंख्येतील प्रमाणाला लिंगगुणोत्तर म्हणतात. देशातील दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण दाखवतात. देशातील स्त्रियांची स्थिती पुरुषाच्या तुलनेत किती हे लिंगगुणोत्तर याच्या आधारे समजण्यास मदत होते.
  • याउलट 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास ते अवलंबित्व चे प्रमाण जास्त असते. तसेच 60 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाच्या वैद्यकीय व आरोग्य सुविधांवर होणारा खर्च वाढणार निदर्शनास येते.
  • जागतिक स्तरावर लिंग गुणोत्तराचे सर्वसाधारण प्रमाण 990 स्त्रिया असे आहे. जगामध्ये विकसित राष्ट्रांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. तर जगात सर्वात कमी लिंगगुणोत्तर आशिया खंडात आहे.
  • 3)

 नागरी वस्तीच्या वाढीबरोबरच नागरी वस्तीच्या समस्या मध्ये ही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्या समस्या खालील प्रमाणे आहेत.

  1. पायाभूत सोयी सुविधांची कमतरता – वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी वस्तीच्या पायाभूत सोयी-सुविधांवर ताण निर्माण होतो. नागरी वस्तीत पाणीपुरवठा वाहतूक इत्यादी पायाभूत सुविधांची कमतरता जाणवते.
  2. आर्थिक समस्या – अधिक लोकसंख्येमुळे सर्वांनाच काम मिळते असे नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याचा परिणाम आर्थिक समस्या वरती होतो.
  3. सामाजिक समस्या – येणारे स्थलांतराचे लोंढे, जागेच्या वाढत्या किमती त्यामुळे झोपडपट्टीची समस्या निर्माण होते. गुन्हेगारी व इतर अवैध प्रकारच्या कार्यात वाढ होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात येते.
  4. सांस्कृतिक समस्या – नागरी वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांमुळे संस्कृतीक भिन्नता, भाषावाद,  प्रांतवाद व धार्मिक वाद निर्माण होतो.
  5. पर्यावरणीय समस्या वाढते – नागरीकरण यामुळे नागरी वस्त्यांमध्ये जल, वायू  व ध्वनी इत्यादी प्रकारचे प्रदूषण वाढत आहे.
  6. प्रशासकीय समस्या – नागरी भागातील वाढत्या लोकसंख्येला प्रशासकीय सेवा सुविधा पुरविण्यात अडचणी येतात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते.
  • 4)

उष्ण कटिबंधीय प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीला अनुसरून विशिष्ट पिकांची मोठ्या प्रमाणावर जी लागवड केली जाते त्यास मळ्याची शेती असे संबोधले जाते. 

मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये –

  1. मळ्याची शेती ही व्यापारी तत्त्वावर केवळ व्यापारासाठी केली जाते.
  2. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र फारच विस्तृत असते आणि जास्त भांडवलाची आवश्यकता असते.
  3. विस्तृत शेती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांचा वापर केला जातो.
  4. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान देखरेखीसाठी व जंतुनाशके कीटकनाशकांच्या फवारणीसाठी हेलिकॉप्टरचा वापर ही या शेतीत केला जातो.
  5. या शेतीत प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर या प्रमुख नगदी पिकांचे व मसाल्याचे पदार्थ, काजू या दुय्यम पिकांचे उत्पादन घेतले जाते.
  6. मात्र क्षेत्रात एकाच प्रमुख पिकांची लागवड केली जाते त्यामुळे या शेती प्रकारास एक पीक शेती असेही म्हटले जाते.
  7. प्रदेश–भारत, श्रीलंका, मलेशिया, ब्राझील, म्यानमार, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, कॅरिबियन बेटे,  व्हीयतनाम या भागात मळ्याची शेती आढळून येते.

मळ्याच्या शेतीच्या समस्या

  1. वाहतूक साधनांचा व भांडवल यांचा अभाव आणि प्रदूषण या प्रमुख समस्या आहेत.
  2. याव्यतिरिक्त विस्तृत शेती जमिनीमुळे निगा राखण्यासाठी अडचणी येतात.
  3. मजुरांचे प्रश्न आणि एक पैकी शेत क्षेत्रामुळे पर्यावरणातील बदलामुळे होणारे संभाव्य नुकसान या समस्याही आहेत.
  • वाहतूक एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे.
  • भूवाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापाऱ्यांमध्ये अनन्यसाधारण आहे.
  • वाहतूक साधनांद्वारे एखाद्या प्रदेशात आवश्यक असणारा माल हा दुसऱ्या प्रदेशातून पाठविता येतो.
  • यातून एका प्रदेशाचा दुसऱ्या प्रदेशाशी व्यापार चालतो. वाहतुकीमुळे माल हा कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत व ग्राहकापर्यंत पोहोचविला जातो, व व्यापार वृद्धिगत होतो.
  • मालाचे उत्पादन घेणारा प्रदेश व बाजारपेठ दूर-दूर असतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य वाहतूक साधनांमुळे शक्य होते.
  • ज्या प्रदेशात भूमार्ग, जलमार्ग व हवाई मार्गाचा विकास झालेला असतो, अशा प्रदेशात व्यापाराला अधिक चालना मिळते व व्यापाराचा विकास होतो.
  • त्यामुळे व्यापारामध्ये एक महत्त्वाची भूमिका वाहतुकीचे आहे.

प्र. ६. अ) उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा.  

 4

  1.  पर्यटन क्षेत्रात नियोजनाची आवश्यकता आहे. कारण पर्यटन क्षेत्रातील निश्‍चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते शकते.
  • समुदाय हे पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. पर्यटनाचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम हा समुदायावर होणारा असतो. त्यामुळे त्यांची स्वीकृती आणि सहभाग हा पर्यटनाच्या नियोजनात महत्त्वाचा आहे.
  • 1. उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवणे.2. विविध क्षेत्राची योग्य वाढ करणे.
  • मुख्यतः पर्यावरणीय सामाजिक सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थाने  यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

ब) आकृती काढून नावे द्या (कोणतेही दोन) 

4

  1. लोकसंख्या मनोरा.
  • लोकसंख्या संक्रमण तक्ता टप्पे
  • त्रिकोणी वस्ती

प्र. 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.(कोणतेही एक)                                                                                                                                      8

1) –

              लोकसंख्येच्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव पडतो. अनुकूल प्राकृतिक पर्यावरणात साधारणतः जास्त लोकसंख्या असते, तर प्रतिकूल प्राकृतिक पर्यावरणात कमी लोकसंख्या असते. मात्र, मानवनिर्मित सांस्कृतिक पर्यावरणाचे घटकही काही प्रदेशात जास्त प्रभावी ठरतात आणि त्यामुळे काही वेळेस प्राकृतिक पर्यावरण प्रतिकूल असूनही सांस्कृतिक पर्यावरणाच्या प्रभावामुळे त्या प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते.

अ) आर्थिक घटक :

  1. औदयोगिक विकास : जेथे नोकरी / कामधंदा मिळण्याची संधी सहजासहजी उपलब्ध असते, अशा ठिकाणी लोक कायमची वस्ती करून राहतात. शहरांमधील सरकारी खात्यात किंवा खाजगी संस्थांमध्ये, तसेच कारखाने, खाणकाम, वाहतूक, दळणवळण, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात नोकरी / कामधंदा मिळण्याची शक्यता जास्त असते. शहरांमध्ये औदयोगिक विकास व व्यापाराची प्रचंड उलाढाल होत असते, यामुळे शहरात लोकवस्ती एकवटलेली आढळते. लंडन, शांघाय, टोकियो, सिंगापूर, मुंबई-दिल्ली यांसारख्या शहरात लोकवस्ती अतिशय दाट आहे.
  2. वाहतूक व दळणवळणाच्या सोयी : शहरे, बंदरे व रेल्वे जंक्शन्स या ठिकाणी वाहतुकीची साधने व दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तेथे मालाची व प्रवाशांची सतत चढ उतार होत असते, पर्यायाने तेथील व्यापार वाढतो. मोठ्या बंदरांचा विकास होऊन ती आयात-निर्यात व्यापाराची केंद्रे बनतात. उदा., मुंबई, कोलकाता पुढे या बंदरांच्या आजूबाजूस रस्त्यांचा विकास झाल्यामुळे तेथे अनेक उपनगरे निर्माण होऊन तेथील शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे.
  3. व्यापारी शेती : ज्या प्रदेशात शेतीयोग्य जमीन, पोषक हवामान व जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत, अशा प्रदेशात शहरांना पूरक किंवा निर्यातक्षम वस्तूंच्या उत्पादनासाठी शेती व्यवसाय विकसित होतो. अशा प्रदेशात लोकवस्ती जास्त प्रमाणात आढळते. उदा., शहरांच्या आसपास ट्रक फार्मिंग किंवा मंडई बागायती क्षेत्र.
  4. खाणकाम व्यवसाय : ज्या प्रदेशात विपुल खनिजसंपत्ती उपलब्ध असते. अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसते. उदा.भारतातील दख्खनचे पठार, ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणांचा प्रदेश, मध्यपूर्वेतील खनिज तेल संपन्न देश.
  5. नागरीकरण : शहरात येऊन कायमचे वास्तव्य करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरांची संख्याजास्त देखील वाढत आहे. शहरात नोकरी/कामधंदा मिळण्याची सुलभता, कामाच्या जागी आवश्यक सुविधा, राहण्यासाठी चांगली घरे तसेच व्यापार, वाहतूक, शिक्षण, करमणूक यांच्या आवश्यक सोयी यांमुळे ग्रामीण भागातील लोकांचा ओघ शहराकडे येत राहतो. या कारणांमुळे लंडन, टोकियो, सोम पाऊल, बीजिंग, मुंबई, कोलकाता यांसारख्या शहरात लोकवस्ती अत्यंत दाट झालेली आढळते.

(ब) सामाजिक घटक : जगातील वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या सामाजिक रूढी असतात. भारतात खेडोपाडी आजही बालविवाह व लवकर लग्न करण्याची पद्धत आहे. आफ्रिकेत काही समाजात बहुपतिकत्व आणि बहुपत्नीकत्व या चालीरिती आहेत. अशा सामाजिक रूढींचा परिणाम त्या-त्या देशांतील लोकसंख्या वाढीवर झालेला दिसून येतो.

 (क) राजकीय व ऐतिहासिक घटक : कोणत्याही देशात खळबळजनक राजकीय बदल झाला, तर लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. हिंदुस्थानची फाळणी झाल्याने पाकिस्तानमधून लाखो निर्वासित भारतात आले. तसेच बांगला देशाची निर्मिती होण्यापूर्वीदेखील तेथून मोठ्या संख्येने निर्वासित भारतात आले. त्यांचे पुनर्वसन करण्यात आले व नवीन शहरे निर्माण झाली.एखादया प्रदेशातील राजकीय तणाव हादेखील त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होण्यास कारणीभूत ठरतो. कारण युद्धाचा धोका टाळण्यासाठी लोक राजकीय यंत्रणा असलेल्या प्रदेशातून दूर जातात.उदा., सिरिया या देशातील युद्धजन्य, अस्थिर परिस्थितीमुळे लोकसंख्येवर विपरीत परिणाम झाला आहे.

                काही देशांचे बदलते राजकीय धोरणही लोकसंख्या वितरणावर प्रभाव पाडते. उदा., सायबेरियासारख्या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना रशियाचे सरकार विशेष भत्ते आणि जीवनावश्यक सुविधा देऊ करते. जगातील अनेक देश सध्या शहरांमधील गर्दी कमी करण्यासाठी विकेंद्रीकरणाच्या धोरणास प्रोत्साहन देत आहेत. अशा प्रकारच्या शासकीय धोरणांचा प्रभावही लोकसंख्या वितरणावर होतो.

                भारत व चीन यांसारख्या देशांना त्यांच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला असल्यामुळे या देशांत फार पूर्वीपासून लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते.


2).

वस्तूची देवाणघेवाण किंवा आदलाबदल करण्याचे माध्यम म्हणजे व्यापार होय. व्यापारावर खालील विविध घटकांचा परिणाम दिसून येतो.

  1. नैसर्गिक संसाधनाचे वितरण असमान – मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनाचे वितरण असमान असते. मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीचे असते, तेथे कृषी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. याउलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केले जात नाही, अशा देशांना अन्नधान्य आयात करावे लागते. उदा: आखाती देश खनिज तेल निर्यात करतात. या देशात हे खनिजे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत, त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात.
  2. हवामानाचा परिणाम – हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदा: वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात, व ही उत्पादने निर्यात करतात. उदा: श्रीलंका हा चहा निर्यात करणारा प्रमुख देश आहे.
  3. लोकसंख्या प्रमाण – लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व विविधता यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देश निहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापाराच्या प्रमाणावर हि त्याचा परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्नपुरवठा बाबत चिंता करावी लागते. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूचे उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते.
  4. विशिष्ट कला आणि हस्तकला – जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. त्यांचे जगभरात मूल्य अधिक असते. उदा: चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील कश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास मोठी चालना मिळते.
  5. उत्पादनावरील खर्च – हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यास ही व्यापार होतो. उदा: एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशाकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाईल.
  6. निपुणता – काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदा: इज्राईल ने कोरडवाहू शेती आणि शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे देशादरम्यान व्यापार होऊ शकतो.
  7. शासकीय धोरण – आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरही अवलंबून असते. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. उदा: दुसऱ्या देशाचे चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्याबरोबर व्यापार करू शकतो.

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे


Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page