XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका
इयत्ता: 11 वी विषय: भूगोल
वेळ: 2.30 तास एकूण गुण: 50
सामान्य सूचना:
1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
2) आवश्यक तेथे सुबक आकृत्या व आलेख काढावेत.
3) नकाशाचा वापर योग्य तेथे करावा.
4) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.
5) प्रश्नपत्रिकेतील सर्व अंक इंग्रजीत दिलेले आहेत.
________________________________________
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 1. वस्तुनिष्ठ प्रश्न (एकूण गुण: 13)
प्रश्न 1 A) खालील ‘अ‘, ‘ब‘ आणि ‘क‘ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा: (4 गुण)
| अ | ब | क |
| 1) आम्ल लाव्हा | 1) चुनखडकाचा प्रदेश | 1) भूछत्र खडक |
| 2) कार्बनिक आम्ल | 2) सिलिकाचे प्रमाण जास्त | 2) U-आकाराची दरी |
| 3) भूजल कार्य | 3) तळाचे व काठांचे अपक्षरण | 3) तीव्र उताराचे शंकू |
| 4) हिमनदीचे खनन कार्य | 4) खडकांवर रासायनिक अभिक्रिया | 4) गुहा व लवणस्तंभ |
प्रश्न 1 B) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा / योग्य क्रम लावा: (3 गुण)
1) खालील भूरूपांचा नदीच्या उगमापासून मुखाकडे योग्य क्रम लावा:
अ) पूरमैदान
ब) घळई
क) त्रिभुज प्रदेश
ड) पंखाकृती मैदान
2) गोठण-वितळण प्रक्रियेचे टप्पे योग्य क्रमाने लावा:
अ) खडकांचे तुकडे होणे
ब) खडकांच्या भेगांत पाणी शिरणे
क) पाण्याचे बर्फात रूपांतर होऊन आकारमान वाढणे
ड) भेगा रुंदावणे
3) खालील हवामान प्रदेशांचा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे योग्य क्रम लावा:
अ) तैगा प्रदेश
ब) विषुववृत्तीय वर्षावने
क) भूमध्यसागरीय हवामान प्रदेश
ड) टुंड्रा प्रदेश
________________________________________
प्रश्न 1 C) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: (3 गुण)
1) वळीची दोन्ही अंगे समान कोनात झुकलेली व आणि तिचे अक्षीय प्रतल उभे असते
अ) असममित वळी
ब) सममित वळी
क) उलथलेली वळी
ड) आडवी वळी
2) कोरड्या आणि उष्ण वाळवंटी प्रदेशातील विदारण
अ) रासायनिक विदारण
ब) जैविक विदारण
क) कायिक विदारण
ड) द्रवीकरण
3) सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूप
अ) तरंगघर्षित चबूतरा
ब) सागरी गुहा
क) पुळण
ड) सागरी स्तंभ
________________________________________
प्रश्न 1 D) अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण): (3 गुण)
1)
A: विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर दुपारनंतर मुसळधार पाऊस पडतो.
R: या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि अभिसरण प्रवाह निर्माण होतात.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
2)
A: मंद हालचालींमुळे भूकवचाला वळ्या पडतात किंवा विभंग होतो.
R: पृथ्वीच्या अंतर्गाभातील ताण आणि दाब या बलांमुळे भूकवचात हालचाली घडतात.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3)
A: वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य हे भूजलाच्या कार्यापेक्षा अधिक प्रभावी असते.
R: वाळवंटी प्रदेशात वनस्पतींचे आच्छादन कमी असते आणि हवा कोरडी असते.
(अ) केवळ A बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
_______________________________________
प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही 3): (9 गुण)
1) पर्वतीय प्रदेशात नद्या ‘V’ आकाराची दरी आणि ‘घळई’ या भूरूपांची निर्मिती करतात.
2) रासायनिक विदारण हे आद्र आणि उष्ण हवामानाच्या प्रदेशात अधिक प्रभावी असते.
3) मृत आणि सुप्त ज्वालामुखींच्या मुखाशी विवर सरोवरांची (Crater Lakes) निर्मिती होते.
4) भूमध्यसागरीय हवामान प्रदेशात उन्हाळा कोरडा असतो आणि हिवाळ्यात पाऊस पडतो.
5) विषुववृत्तीय वर्षावनांमध्ये जैविक विविधता मुबलक प्रमाणात आढळते.
________________________________________
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 3) फरक स्पष्ट करा (कोणतेही 3): (9 गुण)
1) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली
2) कायिक विदारण आणि रासायनिक विदारण
3) ‘V’ आकाराची दरी आणि ‘U’ आकाराची दरी
4) मोसमी हवामान प्रदेश आणि भूमध्यसागरीय हवामान प्रदेश
5) पूरतट आणि पूरमैदान
प्रश्न 4) जगाच्या नकाशा आराखड्यात खालील घटक योग्य चिन्हांच्या साहाय्याने दर्शवा व सूची तयार करा (कोणतेही 5): (5 गुण)
1. विषुववृत्त
2. ॲमेझॉन नदी खोऱ्याचा एक मोठा देश/ प्रदेश
3. भूमध्यसागरीय हवामान प्रदेश (स्पेन, इटली)
4. प्रशांत महासागराचे अग्निकंकण क्षेत्र
5. माउंट फुजी जागृत ज्वालामुखी
6. सेंट हेलिंना
7. ऑस्ट्रेलिया
प्रश्न 5) टिपा लिहा (कोणत्याही 2): (8 गुण)
1) खचदरी व गटपर्वत
2) भूजलाच्या द्रावण व संचयन कार्यामुळे निर्माण होणारी ‘कार्स्ट भूरूपे’
3) विस्तृत झीजेचे प्रकार
4) तैगा हवामान प्रदेशाची वैशिष्ट्ये
प्रश्न 6 अ) खालील उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (4 गुण)
हिंदी महासागराचा भारताच्या मोसमी हवामानावर मोठा प्रभाव पडतो. उन्हाळ्यात भारतीय भूभाग अधिक तापल्यामुळे हिंदी महासागरावरून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते आणि भारताकडे येणारे नैऋत्य मोसमी वारे आर्द्र बनतात. हे वारे हिंदी महासागरातून मोठ्या प्रमाणात जलवाष्प घेऊन भारतात प्रवेश करतात. त्यामुळे भारतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या शाखेमुळे मुसळधार पाऊस पडतो. बंगालच्या उपसागराची शाखाही मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन भारताच्या पूर्व व ईशान्य भागात पाऊस आणते. हिवाळ्यात हिंदी महासागर तुलनेने उष्ण राहिल्यामुळे समुद्र व भूभागातील तापमानातील फरक निर्माण होतो. या तापमानातील फरकामुळे मोसमी वाऱ्यांच्या दिशेत बदल होतो. त्यामुळे हिंदी महासागर भारतातील मोसमी हवामानाच्या निर्मिती आणि स्वरूपावर महत्त्वाचा प्रभाव टाकतो.
प्रश्न
- भारताच्या मोसमी हवामानावर कोणत्या महासागराचा मोठा प्रभाव पडतो?
- उन्हाळ्यात हिंदी महासागरावर बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात का होते?
- नैऋत्य मोसमी वारे भारतात येताना जलवाष्प कोठून घेतात?
- बंगालच्या उपसागराची शाखा भारताच्या कोणत्या भागात पाऊस आणते?
प्रश्न 6 B) खालीलपैकी कोणत्याही एका घटकाची सुबक आकृती काढून नावे द्या: (2 गुण)
1 धबधबा व प्रपातगर्ता
2 कातर विभंग
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोलाच्या अभ्यासक्रमावरील सर्व माहिती प्रश्नपत्रिका व इतर माहिती मिळविण्यासाठी खालील नोट्स वापरा
संपर्क- 9607371951

प्रथम सत्र परीक्षा – आदर्श उत्तरपत्रिका
इयत्ता: 11 वी | विषय: भूगोल
वेळ: 2.30 तास | एकूण गुण: 50
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
उत्तरपत्रिका
प्रश्न 1. वस्तुनिष्ठ प्रश्न (एकूण गुण: 13)
(A) खालील ‘अ‘, ‘ब‘ आणि ‘क‘ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा: (4 गुण)
| अ | ब | क |
| 1) आम्ल लाव्हा | 2) सिलिकाचे प्रमाण जास्त | 3) तीव्र उताराचे शंकू |
| 2) कार्बनिक आम्ल | 4) खडकांवर रासायनिक अभिक्रिया | 1) चुनखडकाचा प्रदेश |
| 3) भूजल कार्य | 1) चुनखडकाचा प्रदेश | 4) गुहा व लवणस्तंभ |
| 4) हिमनदीचे खनन कार्य | 3) तळाचे व काठांचे अपक्षरण | 2) U-आकाराची दरी |
(B) पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा / योग्य क्रम लावा: (3 गुण)
1) उत्तर: ब) घळई ड) पंखाकृती मैदान अ) पूरमैदान क) त्रिभुज प्रदेश
2) उत्तर: ब) खडकांच्या भेगांत पाणी शिरणे क) पाण्याचे बर्फात रूपांतर होऊन आकारमान वाढणे ड) भेगा रुंदावणे अ) खडकांचे तुकडे होणे
3) उत्तर: ब) विषुववृत्तीय वर्षावने क) भूमध्यसागरीय हवामान प्रदेश अ) तैगा प्रदेश ड) टुंड्रा प्रदेश
(C) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: (3 गुण)
1) उत्तर: ब) सममित वळी
2) उत्तर: क) कायिक विदारण
3) उत्तर: क) पुळण (Beach)
(D) अचूक सहसंबंध ओळखा (A: विधान, R: कारण): (3 गुण)
1) उत्तर: क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
2) उत्तर: क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
3) उत्तर: क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 2. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही 3): (9 गुण)
1) उत्तर:
i) पर्वतीय प्रदेशात नदीच्या पात्राचा उतार अतिशय तीव्र असतो, ज्यामुळे प्रवाहातील पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असतो.
ii) तीव्र उताऱ्यामुळे आणि जास्त वेगामुळे नदी मुख्यतः तळाचे अपक्षरण तीव्रतेने करते.
iii) प्रवाहाबरोबर वाहणारे खडक, वाळू व दगड तळावर घासले जाऊन तळाची झीज घडवून आणतात, ज्यामुळे दरीची खोली वाढून तीव्र उताराची ‘V’ आकाराची दरी निर्माण होते.
iv) अतिशय कठीण खडकांच्या प्रदेशात तळाचे खनन तीव्र पण काठांचे अपक्षरण मंद झाल्यामुळे अत्यंत उभा उतार असलेल्या अरुंद ‘घळई’ची (Gorge) निर्मिती होते.
2) उत्तर:
i) रासायनिक विदारण प्रक्रियेसाठी पाण्याची उपलब्धता (आद्रता) आणि उच्च तापमान हे दोन घटक अत्यंत आवश्यक असतात.
ii) उष्ण आणि आद्र हवामानात खडकांमधील खनिजांची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया (द्रावीकरण, भस्मीकरण व कार्बनन) जलद गतीने घडते.
iii) तापमानातील वाढीमुळे रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढतो आणि पावसाच्या पाण्यात विरघळलेले वायू खडकांतील खनिजांचे विघटन करतात.
iv) याउलट कोरड्या प्रदेशात पाणी नसल्याने रासायनिक अभिक्रिया मंद होतात; म्हणूनच आद्र व उष्ण हवामानात रासायनिक विदारण अधिक प्रभावी ठरते.
3) उत्तर:
i) ज्वालामुखीचा उद्रेक थांबल्यानंतर किंवा तो सुप्त/मृत झाल्यावर त्याच्या शिखरावरील उद्रेकाचे मुख (Crater) उघडे आणि रिकामे राहते.
ii) कालांतराने पर्जन्यवृष्टीमुळे या ज्वालामुखीच्या विशाल मुखामध्ये पाऊस व बर्फ वितळलेले पाणी साचण्यास सुरुवात होते.
iii) ज्वालामुखी खडक अपारगम्य असल्याने साचलेले पाणी जमिनीत न मुरता तेथेच मोठ्या साठ्याच्या रूपात टिकून राहते.
iv) ज्वालामुखीचा पुढील उद्रेक न झाल्याने हे साचलेले पाणी एका नैसर्गिक सरोवराचे रूप धारण करते, ज्यास ‘विवर सरोवर’ (उदा. लोणार सरोवर) म्हणतात.
4)उत्तर:
i) भूमध्यसागरीय हवामान प्रदेश हा दोन्ही गोलार्धांत 30° ते 40° अक्षवृत्तांदरम्यान खंडांच्या पश्चिम भागात स्थित आहे.
ii) उन्हाळ्यात सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे वाऱ्यांचे पट्टे ध्रुवाकडे सरकतात; परिणामी हा प्रदेश खंडांवरून येणाऱ्या कोरड्या व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो, ज्यामुळे उन्हाळा कोरडा राहतो.
iii) हिवाळ्यात वाऱ्यांचे पट्टे विषुववृत्ताकडे सरकल्यामुळे हा प्रदेश महासागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त पश्चिमात्य वाऱ्यांच्या (Westerlies) प्रभावाखाली येतो.
iv) हे पश्चिमात्य वारे महासागरावरून मुबलक बाष्प आणतात आणि भूमध्यसागरीय प्रदेशात हिवाळ्यात मुसळधार आवर्त पाऊस पाडतात.
5) उत्तर:
i) विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने उच्च तापमान (सुमारे 27°C) आणि दररोज दुपारनंतर अभिसरण स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडतो.
ii) सततची उष्णता आणि मुबलक आद्रता या अनुकूल हवामानामुळे येथे झाडांची अत्यंत जलद व घट्ट वाढ होते.
iii) येथे सदाहरित, अतिघनदाट, विविध स्तरांचे (अनेक मजली) वृक्ष आणि मुबलक वनस्पतींची घनता विकसित होते.
iv) वनस्पतींच्या या समृद्ध आच्छादनामुळे कीटक, पक्षी, प्राणी व जलचर यांना मुबलक अन्न व सुरक्षित अधिवास मिळतो, ज्यामुळे येथे जगातील सर्वाधिक जैविक विविधता आढळते.
XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 3. फरक स्पष्ट करा (कोणतेही 3): (9 गुण)
1) उत्तर
| मंद हालचाली | शीघ्र हालचाली |
| i) पृथ्वीच्या अंतर्गाभातून सलग परंतु अत्यंत मंद गतीने कार्य करणाऱ्या बलांमुळे होणाऱ्या हालचालींना मंद हालचाली म्हणतात. | i) अंतर्गाभातून अचानक आणि क्षणार्धात कार्य करणाऱ्या तीव्र बलांमुळे होणाऱ्या हालचालींना शीघ्र हालचाली म्हणतात. |
| ii) या हालचालींचा परिणाम दिसण्यासाठी शेकडो किंवा हजारो वर्षांचा कालावधी लागतो. | ii) या हालचालींचा परिणाम काही सेकंदात किंवा मिनिटांत स्पष्टपणे दिसून येतो. |
| iii) या हालचालींमुळे वली पर्वत, गटपर्वत, खचदरी आणि खंडांची निर्मिती होते. | iii) या हालचालींमुळे प्रामुख्याने भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक घडून येतात. |
| iv) उदा. हिमालय पर्वताची निर्मिती, आफ्रिकेची खचदरी. | iv) उदा. भूकंपाचे धक्का बसणे, जागृत ज्वालामुखीचा उद्रेक होणे. |
2) उत्तर
| कायिक विदारण | रासायनिक विदारण |
| i) रासायनिक बदल न होता केवळ भौतिक बलांमुळे खडकांचे तुकडे होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण म्हणतात. | i) खडकांमधील खनिजांमध्ये रासायनिक बदल होऊन खडक कमकुवत होण्याच्या प्रक्रियेस रासायनिक विदारण म्हणतात. |
| ii) तापमान फरक, गोठण-वितळण चक्र, दाबमुक्ती आणि स्फटिक वाढ हे याचे प्रमुख घटक आहेत. | ii) पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि आम्ल हे याचे प्रमुख घटक आहेत. |
| iii) हे विदारण उष्ण-कोरड्या वाळवंटी व अतिथंड प्रदेशात प्रामुख्याने आढळते. | iii) हे विदारण उष्ण आणि आद्र (दमट) हवामानाच्या प्रदेशात प्रामुख्याने आढळते. |
| iv) अपपत्रण, कणात्मक विदारण, कणविखंडन हे याचे प्रकार आहेत. | iv) द्रावीकरण, भस्मीकरण, कार्बनन हे याचे प्रकार आहेत. |
3) उत्तर
| ‘V’ आकाराची दरी | ‘U’ आकाराची दरी |
| i) या दरीची निर्मिती नदीच्या तीव्र बहत्या पाण्याच्या खनन कार्यामुळे होते. | i) या दरीची निर्मिती हिमनदीच्या घर्षण व खनन कार्यामुळे होते. |
| ii) या दरीचा तळ अरुंद असतो आणि दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात (‘V’ सारखा आकार). | ii) या दरीचा तळ रुंद व सपाट असतो आणि दोन्ही बाजूंचे उतार उभे असतात (‘U’ सारखा आकार). |
| iii) नदी प्रामुख्याने पात्राच्या तळाचे उभ्या दिशेने अपक्षरण (Vertical Erosion) करते. | iii) हिमनदी तळासोबतच काठांचे (बाजूंचे) देखील तीव्रतेने अपक्षरण करते. |
| iv) ही दरी पर्वतीय प्रदेशात नदीच्या उच्च टप्प्यात आढळते. | iv) ही दरी अतिउंच पर्वतीय किंवा ध्रुवीय हिमनदीच्या प्रदेशात आढळते. |
4) उत्तर
| मोसमी हवामान प्रदेश | भूमध्यसागरीय हवामान प्रदेश |
| i) विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस 10° ते 30° अक्षवृत्तांदरम्यान खंडांच्या पूर्व भागात आढळतो. | i) दोन्ही गोलार्धांत 30° ते 40° अक्षवृत्तांदरम्यान खंडांच्या पश्चिम भागात आढळतो. |
| ii) या प्रदेशात उन्हाळ्यात ऋतूमानानुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. | ii) या प्रदेशात हिवाळ्यात महासागरावरून वाहणाऱ्या पश्चिमात्य वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. |
| iii) उन्हाळा उष्ण व आद्र (पावसाळी) असतो, तर हिवाळा कोरडा असतो. | iii) उन्हाळा उष्ण व कोरडा असतो, तर हिवाळा सौम्य व आद्र (पावसाळी) असतो. |
| iv) निम-सदाहरित व पानझडी वृक्षांची वने आढळतात (उदा. साग, बांबू). | iv) जाड मेणचट पानांची व रसाळ फळांची झाडे आढळतात (उदा. संत्री, लिंबू, ऑलिव्ह). |
5) उत्तर
| पूरतट | पूरमैदान |
| i) नदीला पूर आल्यावर पात्राच्या दोन्ही काठांवर गाळाच्या संचयनातून बनलेल्या नैसर्गिक बांधांना पूरतट म्हणतात. | i) पुराचे पाणी काठ ओलांडून पसरल्यानंतर संपूर्ण मैदानी भागात साचलेल्या गाळास पूरमैदान म्हणतात. |
| ii) हे नदीपात्राला समांतर असलेल्या उंच व अरुंद बांधांच्या स्वरूपात असतात. | ii) हे नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना पसरलेले विशाल, सपाट व सुपीक मैदान असते. |
| iii) पूरतटाची निर्मिती भरड व मोठ्या आकाराच्या गाळाच्या संचयनातून होते. | iii) पूरमैदानाची निर्मिती बारीक व सुपीक गाळाच्या संचयनातून होते. |
| iv) हे नदीच्या पात्राला लागूनच काठांवर तयार होतात. | iv) हे पूरतटाच्या पलीकडे दूरपर्यंत पसरलेल्या विस्तृत खोऱ्यात तयार होतात. |
प्रश्न 4. जगाच्या नकाशा आराखड्यात खालील घटक योग्य चिन्हांच्या साहाय्याने दर्शवा व सूची तयार करा (कोणतेही 5): (5 गुण)


XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 5. टिपा लिहा (कोणत्याही 2): (8 गुण)
1) उत्तर:
i) भूकवचातील अंतर्जात ताण आणि दाब या क्षितिजसमांतर बलांमुळे खडकांना तडे किंवा भेगा पडतात, या प्रक्रियेस ‘विभंग’ (Fault) म्हणतात.
ii) विभंगाचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात: a) सामान्य विभंग b) व्युत्क्रम विभंग c) कातर विभंग आणि d) प्रणोद विभंग.
iii) विभंग प्रक्रियेमुळे भूकवचाचे खडक एकमेकांपासून दूर सरकतात किंवा एकमेकांवर चढतात, ज्यातून विशिष्ट भूरूपे तयार होतात.
A) गटपर्वत (Block Mountain): जेव्हा दोन समांतर विभंगांमधील मध्यवर्ती भूभाग अंतर्जात दाबांमुळे वर उचलला जातो, तेव्हा त्यास गटपर्वत म्हणतात. गटपर्वताचा माथा सपाट असतो आणि कडे अत्यंत तीव्र उताराचे व खड्या खडकांचे असतात (उदा. भारतातील सातपुडा पर्वत, युरोपमधील व्हास्कस पर्वत).

B) खचदरी (Rift Valley): जेव्हा दोन समांतर विभंगांमधील मध्यवर्ती भूभाग अंतर्जात ताणामुळे खाली खचतो, तेव्हा तयार होणाऱ्या खोल दरीस खचदरी म्हणतात. खचदरीचे तळ सपाट असतात आणि दोन्ही बाजूंचे भिंतीसारखे उभे कडे असतात (उदा. भारतातील नर्मदा व तापी नदीची घळई/खचदरी, आफ्रिकेची महान खचदरी).

अशा प्रकारे अंतर्जात बलांमुळे घडणारे विभंग भूकवचाची रचना बदलून गटपर्वत व खचदरी यांसारख्या प्रमुख भू-स्वरूपांची निर्मिती करतात.
2) उत्तर:
चुनखडकयुक्त (Calcium Carbonate) प्रदेशात भूजलाच्या रासायनिक द्रावण व संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांना ‘कार्स्ट भूरूपे’ म्हणतात. पावसाच्या पाण्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड विरघळून सौम्य कार्बनिक आम्ल तयार होते, जे चुनखडकाच्या भेगांत पाझरते.
i) विलय विवर (Sinkholes): कार्बनिक आम्लामुळे चुनखडक विरघळतो आणि भूपृष्ठावर लहान-मोठे खड्डे व विवरे तयार होतात. अशा ठिकाणी पाण्याचे प्रवाह लुप्त होतात.
ii) भूजल गुहा (Caves): जमिनीखाली प्रवाहित होणाऱ्या भूजलाच्या द्रावण कार्यामुळे खडकांमधील विरघळलेला भाग मोकळा होऊन मोठ्या गुहा बनतात.
iii) अधोमुखी लवणस्तंभ (Stalactites): गुहेच्या छतातून चुनखडकयुक्त पाणी पाझरताना पाण्याचे बाष्पीभवन होऊन छताकडून खाली चुनखडकाचे स्तंभ वाढू लागतात.
iv) ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ (Stalagmites): गुहेच्या जमिनीवर पाझरणाऱ्या पाण्याच्या थेंबांतील चुनखडक साचून जमिनीकडून वरच्या दिशेने स्तंभ वाढतात.
v) गुहा स्तंभ (Cave Pillars): कालांतराने अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ एकमेकांना जोडले जाऊन गुहेत अखंड खांब/स्तंभ तयार होतात.
भारतातील महाबळेश्वरजवळील कास पठार किंवा आंध्र प्रदेशातील बोरा गुहा ही कार्स्ट भूरूपांची उत्तम उदाहरणे आहेत.

3) उत्तर:
गुरुत्वाकर्षण बलामुळे खडकांचे तुकडे, माती व गाळ उताराच्या दिशेने खाली घसरण्याच्या प्रक्रियेस ‘विस्तृत झीज’ (Mass Movement) म्हणतात. वेगाच्या आणि आद्रतेच्या आधारावर विस्तृत झीजेचे दोन प्रमुख गट पडतात a) मंद विस्तृत झीज आणि b) तीव्र विस्तृत झीज.
विस्तृत झीजेचे प्रकार–
i) सरक– विदारणामुळे भुसभुशीत झालेले पदार्थ कोणत्याही वाहक घटकाविना (पाणी/वारा न वापरता) केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली सरकतात.
ii) मातलोट- (Soil Creep): मंद उतारावर मातीचे कण अत्यंत मंद गतीने (अदृश्यपणे) खाली घसरतात, हा मंद विस्तृत झीजेचा प्रकार आहे.
iii) सोलिफ्लक्शन (Solifluction): टुंड्रा किंवा अतिथंड प्रदेशात बर्फ वितळल्यावर दलदलयुक्त मातीचा थर खडकावरून हळूहळू घसरतो.
iv) पंकप्रवाह (Mudflow): मुसळधार पावसामुळे मातीमध्ये पाणी साचून तिचा चिखल बनतो आणि तो वेगाने उतारावरून खाली वाहतो.
v) दरड कोसळणे / भू-स्खलन (Landslides): पर्वतीय उतारावरील खडकांचे मोठे तुकडे किंवा संपूर्ण कडा अचानक वेगाने खाली कोसळतो.
तीव्र विस्तृत झीजेमुळे पर्वतीय प्रदेशात मोठी जीवित व वित्तहानी होते आणि वाहतूक मार्ग ठप्प होतात (उदा. माळीण दुर्घटना).
4) उत्तर:
i) तैगा हवामान प्रदेश उत्तर गोलार्धात 55° उत्तर ते 70° उत्तर अक्षवृत्तांदरम्यान उत्तर अमेरिका व युरेशिया खंडाच्या उत्तरेस पसरलेला आहे.
ii) या प्रदेशात अतिशय दीर्घ, अत्यंत थंड व कोरडा हिवाळा असतो (तापमान -20°C ते -40°C पर्यंत खाली जाते).
iii) उन्हाळा अतिशय लहान, सौम्य व उबदार स्वरूपाचा असतो (औसत तापमान 15°C ते 20°C).
iv) येथे वार्षिक पर्जन्यमान कमी (300 ते 500 मिमी) असते आणि हिवाळ्यात प्रामुख्याने हिमवृष्टीच्या रूपात पाऊस होतो.
v) या प्रदेशात सूचीपर्णी (Coniferous) वनस्पतींची वने आढळतात; वृक्षांची पाने सुईसारखी टोकदार आणि मेणचट असतात.
vi) पाइन, स्प्रुस, फर् आणि लार्ज हे या वनांतील प्रमुख वृक्ष असून त्यांचे लाकूड अतिशय मऊ व व्यापारीदृष्ट्या मौल्यवान असते.
vii) येथील प्राण्यांच्या अंगावर जाड केस व चरबीचा थर असतो (उदा. रेंडीअर, सिल्व्हर फॉक्स, अस्वल).
viii) लाकूडतोड (Lumbering) आणि कातडी कमावणे हे या प्रदेशातील मानवाचे प्रमुख आर्थिक व्यवसाय आहेत.

XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
प्रश्न 6. (A) उताऱ्यावर आधारित प्रश्न उत्तर (4 गुण)
1) उत्तर: आधुनिक भौगोलिक अभ्यासात उपग्रह तंत्रज्ञान, सुदूर संवेदन (Remote Sensing) आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
2) उत्तर: उपग्रहीय प्रतिमांचा वापर मुख्यत्वे भूपृष्ठातील बदल, नदीपात्रातील फेरबदल आणि वनाच्छादनातील घट या नैसर्गिक व भौगोलिक घटकांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी होतो.
3) उत्तर: आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळवणे, परिस्थितीचे अचूक व वेळेत निरीक्षण करणे आणि मानवी जीवितहानी रोखणे हा उपग्रह तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा आहे.
4) उत्तर: अवकाश संशोधन आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था ‘इस्रो‘ (ISRO – Indian Space Research Organisation) ही आहे.
प्रश्न 6. (B) आकृती काढणे व नावे देणे (कोणतीही 1): (2 गुण)
1) जलप्रपाताची (धबधबा व प्रपातगर्ता) आकृती:

2) कातर विभंग-

XI Geo First Semester Que Paper & Ans
XI Geography First Semester Question Paper & Answers
अकरावी भूगोल प्रथमसत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
आणखी पहा

1) अकरावी भूगोल प्रथमसत्र सराव प्रश्नपत्रिका गुण 50 (PDF स्वरुपात डाऊनलोड साठी उपलब्ध)
2) अकरावी इंग्रजी माध्यम प्रश्नपत्रिका गुण 50
3) अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका गुण 50
अकरावी भूगोलाच्या अभ्यासक्रमावरील सर्व माहिती प्रश्नपत्रिका व इतर माहिती मिळविण्यासाठी खालील नोट्स वापरा
संपर्क- 9607371951

खालील अकरावी भूगोल प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा
