HomeQuestion Papers11th Geo Second Sem Test and Answers

11th Geo Second Sem Test and Answers

11th Geo Second Sem Test and Answers

11th Geo Second Sem Test and Answers

अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

11th Geo Second Sem Test and Answers

सूचना-

1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.

2 उजवी कडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.

3. आवश्यकतेथे सुबक आकृत्या काढून भांगाना नावे दयावीत.

प्रश्न 1 अ- खालील अ-ब-क गटातील योग्य सहसंबध वापरुन सयुक्तीक साखळी पुर्ण करा.        

 4

मरियानाजागतिक 8.5 टक्के क्षेत्रबर्फाचे वितळणे
समुद्र पातळीतील वाढपुरसागरी गर्ता
भूखंडाची सिमाआवर्त-प्रत्यावर्तात वाढसौरतापाचे परीणाम
अवकाळी पर्जन्य11000 मीटर खोलखडांन्त उतार

प्रश्न 1 ब- चुकीचा घटक ओळखा.                                                  

3

1) जागतिक तापमान वाढीचे कारणे

अ) हरीत वायु उत्सर्जन

ब) निर्वनीकरण

क) सूर्याचे भासमान भ्रमण

ड) औद्योगिकरण

2) सागरी बेटांचे प्रकार

अ) खंडीय बेटे

ब) ज्वालामुखीय बेटे

क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली बेटे

ड) प्रवाळ बेटे

3) सागरी मैदानात आढळणारे घटक –

अ)ज्वालामुखीय राख  

ब) खनिज तेल  

क) उल्कांचे तुकडे  

ड) लोह

प्रश्न 2  रा.  खालील प्रश्नाची भौगोलीक कारणे लिहा. (कोणतेही तिन)                    

9

1) भविष्यात महासागरातील काही बेटे नकाशातुन नामशेष होण्याची शक्यता आहे.

2) सध्याच्या काळात हवामान बदल अभ्यासणे गरजेचे आहे

3) अवर्षण आणि पुरांच्या संखेत वाढ होत आहे.

4) महासागराखाली सुध्दा भूपष्ठावरील भूरुपांप्रमाणेच भूरुपे असतात.

प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.                            

4

1) आकस्मीत पुर

2)‍ महासागरातील जैविक साधन संपत्ती 

   

प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.                    

5

1) महासागरातील प्रदुषण मानवासाठी कसे घातक आहे यावर चर्चा करा.

2) हिंदी महासागराची तळरचना


अकरावी भूगोल

समर्थ भूगोल नोट्स

(गाईड)

होलसेल व माफक दरात उपलब्ध

संपर्क- Prof Manojj Deshmukh 9607371951



Join-Whatsapp Group

उत्तरपत्रिका

अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

प्र.1 (अ) संयुक्तीक साखळी पूर्ण करा

11th Geo Second Sem Test and Answers

(4 गुण)

उत्तर-

मरियाना11000 मीटर खोलसागरी गर्ता
समुद्र पातळीतील वाढबर्फाचे वितळणेपुर
भूखंडाची सीमाखंडांत उतारसौरतापाचे परिणाम
अवकाळी पर्जन्यजागतिक 8.5 टक्के क्षेत्रआवर्त-प्रत्यावर्तात वाढ

प्र.1 (ब) चुकीचा घटक ओळखा

(3 गुण)

1) जागतिक तापमान वाढीचे कारणे

अ) हरीत वायु उत्सर्जन

ब) निर्वनीकरण

क) सूर्याचे भासमान भ्रमण

ड) औद्योगिकरण

उत्तर- क) सूर्याचे भासमान भ्रमण

2) सागरी बेटांचे प्रकार

अ) खंडीय बेटे

ब) ज्वालामुखीय बेटे

क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली बेटे

ड) प्रवाळ बेटे

उत्तर- क) गाळाच्या संचयनाने तयार झालेली बेटे

3) सागरी मैदानात आढळणारे घटक –

अ) ज्वालामुखीय राख  

ब) खनिज तेल  

क) उल्कांचे तुकडे  

ड) लोह

उत्तर- क) उल्कांचे तुकडे

 

प्र.2 भौगोलिक कारणे (कोणतेही तीन) (9 गुण)

1) महासागरातील काही बेटे नामशेष होण्याची शक्यता.

उत्तर- i) जागतिक सरासरी तापमान वाढत असल्याने, वाढलेल्या तापमानामुळे हिमनदया व हिमक्षेत्रावरील हिम वितळण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

ii) त्यामुळे जागतिक समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

iii) तापमान वाढ अशीच पुढे होत राहील्यास सन 2100 पर्यन्त समुद्राची पातळी 9 ते 90 से.मी.ने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

iv) यामुळे जगातील अनेक समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण होणे,‍ किनार पट्टीवरील शहरे जलमय होणे तसेच मालदीव, लक्षव्दीप सारखी बेटे समुद्राच्या पाण्याखाली जावून नाहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

—————————-

2) हवामान बदलाचा अभ्यास करणे आवश्यक आहे

उत्तर- i)पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे.

ii) विसाव्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सुमारे 0.80 से. ने वाढ झाली असल्याचे विविध तापमानांच्या नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. याचा परिणाम शेती, पाणी व मानवी यांच्या आरोग्यावर होत आहे.   

iii) याचे मुख्य कारण वातावरणात कार्बन डायऑक्सॉईड, मिथेन यासरख्या उष्ण वायूचे होणारे उत्सर्जन मानले जाते. त्यामुळे पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे

iv) तापमानाच्या या वाढीचा आकडा फार मोठा दिसत नसला तरी त्याचे ऊष्णतेची लाट, समुद्र पातळीतील वाढ, हिम क्षेत्रावरील बर्फ वितळणे या सारखे इतर अनेक परिणाम चिंता करावयास लावणारे आहेत.

v) यामुळे हवामान बदल अभ्यासल्यामुळे प्रतिबंधक उपया करता येणे शक्य असल्याने हवामान बदल अभ्यासणे महत्वाचे आहे

—————————-

3) अवर्षण व पुरांची संख्या वाढत आहे

उत्तर- i)जागतिक तापमान वाढीमुळे सागरीय जलाचे तापमान वाढत आहे व पावसाच्या चक्रात बिघाड होत आहे.  त्यामुळे सागरी भागावरील पाण्याचे रेणू जास्त सक्रिय होऊन पाण्याच्या वाफेचे प्रमाण वाढत आहे.

ii) जलचक्रातील असंतुलनामुळे पाण्याच्या वाफेमुळे वातावरणात मोठया प्रमाणात बाष्प निर्माण होते, व बाष्प उष्णता साठवून ठेवते यामुळे आवर्त व प्रत्यावर्ताची निर्मिती तीव्रतेत वाढ होते.

iii) त्यातून चक्रवादळे व दुष्काळ अवर्षण निर्माण होतात. तापमानाच्या या वाढीमुळे इ.स. 1970 पासून पृथ्वीवर दुष्कळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.

—————————-

4) महासागराखालीही भूरुपे असतात.

उत्तर- i) भूपृष्ठावर असलेली भूरूपे ही भूविवर्तनिकी हालचाली, अनाच्छादन प्रक्रिया तसेच भूकंप, ज्वालामुखी, विदारण, अपक्षरण, झीज या प्रक्रियामुळे तयार झालेली आहे.

ii) या प्रक्रिया खंडीय भागात कार्यरत असतात तशाच त्या महासागरातही कार्य करीत असतात.

iii) सागरतळ सुध्दा भूमीखंडाचाच भाग असल्याने अंतर्गतशक्तींमुळे सागरतळावरही भूकंप, ज्वालामुखी, इतर कारकांचा तसेच पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली यांचा प्रभाव पडत असतो त्यातून तेथे पर्वत, पठारे, मैदाने, गर्तां सारखी विविध भूरूपे आहेत, त्यांना आपण जलमग्न भूरूपे म्हणतो.

iv) समुद्राच्या तळावर होणाऱ्या ज्वालामुखी क्रियेने देखील तळाच्या भागात नवीन भू-रचना तयार होत असते

v) त्यामुळे सागरतळावरही भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत असे म्हणता येते.

—————————-

प्रश्न 3 रा खालील पैकी कोणत्याही एका घटकावर टीप लिहा.                            

(गुण 4)

1) आकस्मीत पुर

उत्तर- पूर म्हणजे नदी, नाले यांना सरासरी पाणी वहन क्षमते पेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा होणे. आकस्मीत पूर म्हणजे अचानक पणे नदी-नाले यांच्यात सरासरीपेक्षा प्रंचड पाणीसाठा येणे होय. यात कमीवेळेत प्रचंड पावसामुळे नदी, नाले किंवा जलमार्गांचे वहन क्षमतेपेक्षा अधिक पाणी साचते.

② हवामान बदलामुळे किंवा जागतिक तापमान वाढीमुळे, मोसमी वाऱ्यांच्या निर्मिती व वहन प्रक्रियेतील बदल, समुद्रात निर्माण होणारे आवर्त व प्रत्यावर्त यामुळे जमिनीवर वादळे, आकस्मात पर्जन्य व त्यामुळे येणारे आकस्मीक पुरांची वारंवारता वाढलेली आहे.

③ वादळांमुळे बऱ्याच वेळा समुद्राचे पाणी नदीपात्रात शिरुन समुद्र किनारी प्रदेशात नदीस अचानक पूर येतात.

④ वाढत्या तापमानामुळे हिमनदया किंवा हिमखंड वितळून पाण्याचा साठा नदी पात्रात वाढून नदयांना आकस्मीक पूर येतात. पुराची काही उदाहरणे-       

I) 26 जुलै 2005 रोजी मुबंई येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुबंई येथे आलेला आकस्मीक पूर    II) सन 2013 मध्ये बद्रीनाथ केदारनाथ येथे झालेली ढगफुटी व त्यातून आलेला आकस्मीक महापूर.

—————————-

2) महासागरातील जैविक साधनसंपत्ती-

 उत्तर-

या साधनसंपत्तीत मुख्यत: सागरातील वनस्पती व प्राणी यांच्या हजारो प्रजातींचा समावेश होत असतो. सागरातील मासे हे महत्वाचे अन्न व पोषक घटकांचा स्त्रोत आहे.

i) माशांशिवाय शंख, शिपंले आणि शैवाल महासागरात मिळते.

ii) सागरातील अनेक प्राण्यांपासून तेल, कातडी, गोंद, पशुखादय इतर उपयोगी उत्पादने मिळतात.

iii) औषध उदयोगात सागरी वनस्पतींव्यतिरिक्त मोती, प्रवाळ यांचा वापर होतो.

iv) सागरी शैवाळाचा उपयोग अन्न म्हणून, त्वचेच्या मलमासाठी तसेच खंतासाठी होतो.

v) उष्णकटिबंधीय सागरी किनाऱ्यावरील वनस्पतींचे सागरी परिसंस्थेमध्ये फार महत्व आहे, येथे अनेक सागरीजीव राहतात व त्यापासून या जीवांना अन्न मिळते. 

vi) खारफुटीच्या जंगलातून इंधनासाठी व फर्निचर साठी लाकूड मिळते.

—————————-

प्रश्न 4 था खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.                    

(गुण 5)

1) महासागरातील प्रदूषण मानवासाठी घातक कसे ?

उत्तर– मानवी विकास व विकासाचे आर्थिक पैलु या माध्यमातून महासागराकडे पाहिल्‍यास त्याचे महत्व वाढत चालेले आहे. जगातील महासागरांमध्ये विपूल प्रमाणात जैविक-अजैविक साधन संपत्ती आहे. सध्याच्या काळात मानवी विकास होत असतांना महासागरातील पाण्याचे मोठया प्रमाणावर प्रदूषण जाणते- अजाणते पणे  होत आहे.

उदा. i) तेल जहाजातून होणारी तेल गळती

 ii) सागरीकिनारी भागातील होणारे खनिज तेलाचे उत्खनन

iii) किरणोत्सारी पदार्थांसारख्या घनकचऱ्याची विल्हेवाट

iv) अणुचाचण्या

vi) नदयानी वाहुन आणलेल्या गाळातील टाकावू पदार्थ व सांडपाणी

vii) उदयोगातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थांचा कचरा इ.

महासागरातील या प्रदुषणामुळे  मोठया प्रमाणावर महासागरांची व पर्यावरणाची हानी होत आहे. महासागरात जाणाऱ्या या अयोग्य तसेच दुषित घटकांमुळे सागरी जीवसहंती धोक्यात आली आहे. सागरी जीवसंहती ही मानवासाठी फार महत्वाची आहे. अनेक सागरी जीव, मासे यांचा वापर मानव अनेक वर्षांपासून करत आलेला आहे अशा परिस्थितीत सागरी जलप्रदुषणामुळे सागरीजीवांच्या प्रजाती व जीवंसहतीची हानी सुरु झालेली आहे, याच प्रमाणे जर सागरी पाण्याचे प्रदुषण होत राहील्यास अन्न म्हणून मासे, व इतर अनेक औषधी, खते, कॉस्‍मेटीक घटकांचा सागरी कच्चा माल यासारख्या अनेक गोंष्टी ज्या महासागरा पासून मानवास मिळतात व पुढे त्या महासागरापासून प्राप्त होणार आहेत त्या मिळणे कठीण होईल. सागरी पाण्याच्या प्रदूषणाचा परिणाम मानवासाठीच घातक ठरणार आहे.

—————————-

2) हिंदी महासागराची तळरचना

A) भूखंड मंच किंवा समुद्रबुड जमीन

किनाऱ्यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागरतळाचा सर्वात उथळ भाग आहे.  हा भाग जलमग्न, रुंद, उथळ, मंद उताराचा असतो, भूखंड मंचाचा विस्तार जगात सर्वत्र सारखा नाही.      भूखंड मंच मानवासाठी महत्वपूर्ण आहेत.

B) खंडान्त उतार (खंडान्त उतार व संचयन) –

भूखंड मंचाचा विस्तार संपल्यानंतर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो. या उतारांचा कोन 2ते 5च्या दरम्यान असु शकतो या उतारांना खंडान्त उतार असे म्हटले जाते. या भागात समुद्राची खोली 200 ते 4000 मी. पर्यंन्त खोल असते. खंडान्त उताराने महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 8.5% क्षेत्र व्यापलेले आहे. खंडान्त उतार हा ज्या सागरी किनाऱ्यावर पर्वत आहेत तेथे तीव्र आढळतो. किनाऱ्या पासून हे क्षेत्र लांब असल्याने खंडान्त उताराच्या सुरवातीच्याच टप्यात नदयांनी वाहुन आणलेला गाळ काही प्रमाणात पोहचत असतो, खंडान्त उतार तीव्र असल्याने गाळाचे संचयन कमी प्रमाणातच असते त्यामुळे या क्षेत्रात संचयन खूपच कमी असते.  

C) सागरी मैदाने– 

खंडान्त उताराच्या पुढे सागरी मैदाने आढळतात, सागरी मैदाने आकाराने मोठे असतात त्यावर लहान-मोठया आकारांचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारे इ. भूरूपे असतात. मैदानांचा उतार मंद असून सागरी मैदानांनी महासागराच्या तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 66% क्षेत्र व्यापलेले आहे.

D) सागरी गर्ता-

सागर तळांवर किंवा मैदानांवर काही ठिकाणी खोल व अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरुपे आढळतात. त्यांना ‘सागरी डोह’ किंवा ‘गर्ता’ म्हणतात.

  सागरी डोह– साधारण सागरी तळ किंवा मैदानावरील कमी खोलीच्या भूरुपास ‘सागरी डोह’ म्हणतात.

  सागरी गर्ता– सागरी तळ किंवा मैदानावरील जास्त खोलीच्या कमी रुदींच्या भूरूपाला ‘सागरी गर्ता’ म्हणतात. गर्ता सागर तळातील सर्वात खोल भाग आहे. त्या हजारो मीटर पर्यंन्त खोल असतात. त्या भूपट्टांच्या सीमावर्ती प्रदेशात आढळतात व जागृत ज्वालामुखीची व भूंकप प्रवणाची क्षेत्रे असतात.

E) जलमग्न रांगा, पठार व सागरी बेटे

सागरतळावरील पर्वतरांगा जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो कि.मी. रुंद व हजारो कि.मी. लांब असतात. काही सागरी उंचवटयांचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. उदा. हिंदी महासागरातील छागोस चे पठार.

F) सागरी बेटे– जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरजल पातळीच्या वर आलेले असतात त्यांना आपण ‘सागरी बेटे’ म्हणून ओळखतो.


अकरावी भूगोल जर्नल

माफक व होलसेल दरात

उपलब्ध

संपर्क- Prof Manojj Deshmukh 9607371951


Join- Whatsapp Group


अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

11th Geo Second Sem Test and Answers

अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

11th Geo Second Sem Test and Answers

Instructions

  1. All questions are compulsory.
  2. The numbers on the right side indicate the marks for each question.
  3. Draw neat diagrams wherever necessary and label the parts properly.

Q.1 (A) Complete the logical chain by using correct correlation between A-B-C groups.

(4 Marks)

ABC
Mariana8.5% of the world areaMelting of ice
Rise in sea levelFloodOcean trench
Continent marginIncrease in cyclones & anticyclonesEffect of solar heat
Unseasonal rainfall11000 meters deepContinental slope

Q.1 (B) Identify the incorrect element.

(3 Marks)

1) Causes of Global Warming

      A) Emission of greenhouse gases

      B) Deforestation

      C) Apparent movement of the Sun

      D) Industrialization

2) Types of Oceanic Islands

      A) Continental islands

      B) Volcanic islands

      C) Islands formed due to deposition of sediments

      D) Coral islands

3) Elements found on the ocean floor

      A) Volcanic ash

      B) Mineral oil

      C) Meteorite fragments

      D) Iron

Q.2 Write the geographical reasons for the following. (Any three)

(9 Marks)

1) There is a possibility that some islands in the oceans may disappear from the world map in the future.

2) It is necessary to study climate change in the present times.

3) The number of droughts and floods is increasing.

4) There are landforms under the oceans similar to the landforms on the Earth’s surface.

Q.3 Write a short note on any one of the following.

(4 Marks)

1. Flash Floods

2. Biological resources of the ocean

Q.4 Answer any one of the following questions in detail.

(5 Marks)

1. Discuss how ocean pollution is harmful to humans.

2. Seafloor configuration of the Indian Ocean

———————————————————————————————————————————————————————————————–

Answersheet

अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

11th Geo Second Sem Test and Answers

Q.1 (A) Complete the logical chain using appropriate correlation from groups A-B-C.

(4 marks)

ABC
Mariana8.5% of world areaMelting of ice
Rise in sea levelFloodOcean trench
Boundary of the continentIncrease in vortex and anti-vortexEffect of solar heat
Unseasonal rainfall11000 m deepSteep continental slope

———————————-

Q.1(B) Identify the incorrect element.

(3 marks)

1) Causes of global warming

A) Emission of greenhouse gases

B) Deforestation

C) Apparent motion of the Sun

D) Industrialization

Answer C) Apparent motion of the Sun

———————————-

2) Types of oceanic islands

A) Continental islands

B) Volcanic islands

C) Islands formed by sediment deposition

D) Coral islands

Answer C) Islands formed by sediment deposition

———————————-

3) Components found in the oceanic plain

A) Volcanic ash

B) Mineral oil

C) Meteorite fragments

D) Iron

Answer C) Meteorite fragments

Q.2 Write the geographical reasons for the following (Any three)

(9 marks)

1) There is a possibility that some islands in the oceans may disappear from maps in future.

Answer :

i) Due to increasing global temperature, melting of glaciers and ice sheets has increased.

ii) This has resulted in a rise in sea level across the world.

iii) If this rise continues, sea level may increase by 9 to 90 cm by the year 2100.

iv) Many coastal regions may face flooding and countries like Maldives & Lakshadweep may submerge under water.

—————————-

2) It is necessary to study climate change in the present period.

Answer :

i) The earth’s average temperature is increasing, causing rise in natural disasters.

ii) In the 20th century, the Earth’s surface temperature increased by about 0.8°C, affecting agriculture, water and human health.

iii) Greenhouse gases like CO₂ and methane are mainly responsible for this.

iv) Heat waves, sea-level rise, glacier melting etc. have become concerning issues.

v) Studying climate change helps in taking preventive measures.

—————————-

3) The number of droughts and floods is increasing.

Answer :

i) Due to increased sea temperature, normal rainfall patterns have changed.

ii) Excess water vapour forms in the atmosphere, storing latent heat and intensifying cyclonic systems.

iii) This leads to floods, cyclones and droughts. Since 1970, drought-prone areas on Earth have nearly doubled.

—————————-

4) There are landforms beneath the oceans similar to landforms on continents.

Answer :

i) Landforms are created by internal and external geomorphic processes like earthquakes, volcanism, erosion etc.

ii) The same processes operate under the oceans.

iii) Since the ocean floor is also part of the Earth’s crust, submerged mountains, plateaus, plains and trenches exist there.

iv) Underwater volcanic activity continuously forms new features.

—————————-

Q.3 Write short notes on any one of the following

(4 marks)

1) Flash Floods

Answer :

i) A flood occurs when water in rivers exceeds carrying capacity. A flash flood is a sudden rise in water level within a short duration.

ii) Due to climate change, unseasonal rainfall and cyclones have increased the frequency of flash floods.

iii) Sometimes sea water enters rivers due to storms, causing sudden floods in coastal areas.

iv) Melting glaciers also cause sudden rise in river water.

Examples :

• Mumbai Flash Flood — 26 July 2005

• Kedarnath Disaster — 2013

—————————-

2) Biological resources in the oceans

Answer :

i) These include thousands of marine plant and animal species. Fish are an important food resource.

ii) Shells, oysters, and seaweeds are also obtained.

iii) Many animals provide oil, skin, glue and animal feed.

iv) Pearls and corals are used in medicines and ornaments.

v) Seaweeds are used as food and cosmetics.

vi) Mangrove forests provide wood and support marine ecosystems.

Q.4 Answer any one of the following in detail

(5 marks)

1) How is ocean pollution harmful to humans?

Answer :

Human activities have polluted the oceans severely.

Major causes:

i) Oil spills from ships

ii) Offshore oil extraction

iii) Disposal of radioactive and solid waste

iv) Nuclear testing

v) Industrial effluents and sewage carried by rivers

Due to this, marine biodiversity is endangered.

If pollution continues, fish and other marine products used for food, medicines, fertilizers, cosmetics etc. will become scarce.

Ultimately, ocean pollution will prove harmful to human survival.

———————————-

2) Ocean floor of the Indian Ocean

Answer :

A) Continental Shelf — Shallow, submerged part of continents along the coast; economically important.

B) Continental Slope — Steep slope after the continental shelf; depth 200–4000 m; covers about 8.5% of ocean-floor area; sediment deposition is low here.

C) Abyssal Plains (Oceanic Plains) — Very wide and flat; cover about 66% of ocean-floor area; include submerged landforms like mountains and plateaus.

D) Ocean Trenches — Deep, narrow valleys with steep slopes; found along tectonic boundaries; earthquake and volcanic zones; thousands of meters deep.

E) Submarine Ridges and Plateaus — Example: Chagos Plateau in the Indian Ocean.

F) Oceanic Islands — Tops of underwater mountains that rise above sea level.


अकरावी भूगोल व्दितीय सत्र घटक चाचणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका

11th Geo Second Sem Test and Answers


अकरावी भूगोल व्दितीय घटक चाचणी 3 + 3 प्रश्नपत्रिका

अकरावी भूगोल वार्षिक नियोजन

इयत्ता अकरावी भूगोल मूल्यमापन पद्धती

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page