HomeअकरावीWork of sea waves सागरी लाटांचे कार्य

Work of sea waves सागरी लाटांचे कार्य


अकरावी भूगोल प्रकरण 3 रे

अपक्षरणांची कारके

Work of sea waves सागरी लाटांचे कार्य


Work of sea waves सागरी लाटांचे कार्य 

अकरावी भूगोल प्रकरण 3 रे Work of sea waves सागरी लाटांचे कार्य

अपक्षरणांची कारके

सागरी लाटांचे कार्य

1) सागरी कडा

2) सागरी गुहा

3) सागरी कमान

4) सागरी स्तंभ

5) विस्तृत तरंग घर्षित मंच / तरंग घर्षित चबुतरा

6) पुळण

7) आखात व भूशीर

8) वाळूंचा दांडा

9) खाजन किंवा कायल

10) वाळूचे बेट


सागरी लाटांचे कार्य-

वाहत्या प्रमाणेच सागरी लाटाही कार्य करीत असतात. अपघर्षण प्रक्रिया ही सागरी लाटांच्या कार्यातील सर्वात परीणामकारी प्रक्रीया आहे.  इतर सर्व कारकांच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य आहे. वारा, नदी सारख्या कारकांच्या कार्यामध्ये काहीवेळा पुरवठा, वेग व गती तसेच उर्जा यामुळे खंड पडतो सागरी लांटाच्या कार्यात अपक्षणाच्या जवळच निक्षेपणही सातत्याने होतांना दिसते. तसेच पुळण दांडे या सारख्या निक्षेपणामुळे तयार झालेल्या भरुपांचेही अपक्षरण होतांना दिसते त्यामुळे सागरी लांटाचे कार्य इतर कारकांपेक्षा विश्रांती शिवाय चालते असे म्हणता येईल.


तीव्र उतार असलेल्या जमिनीवर थेट आपटणाऱ्या लांटामुळे सागरी कडयांची निर्मीती होते. किंवा सागरी लांटाच्या वारंवार होणाऱ्या आघातामुळे किनाऱ्यावरील खडकांची झीज होऊन त्यांचा उभ्या भिंती प्रमाणे आकार तयार होतो त्यास ‘समुद्रकडा’ असे म्हणतात.

किनाऱ्याचा तीव्र उतार हा पाण्याखाली जाणारा असेल तर लाटा खडकांला फोडू शकतात अशा परीस्थीतीत जर किनाऱ्याच्या खालच्या भागात मृदू खडक असल्यास अशा मृदू खडकांची लांटाच्या माऱ्यामुळे झिज लवकर होते व सागरीकडेचा खालच्या भागाची झिज होवून तो आतल्या बाजुने सरकु लागतो त्यातुन सागरी गुहेची निर्मीती होते. म्हणजेच कठीण खडका खाली मृदूखडक जेव्हा लाटांमुळे झिजतो, तेव्हा ‘सागरी गुहा’ आकारास येते.

सागरी कडा

सागर जलात डोंगराचा काही भाग शिरलेला असेल त्या भागात मृदू व कठीण खडक असतील अशा स्थीतीत सागरी लांटाचा मारा या डोंराच्या भागावर सर्व बाजुनी होत असल्यास मृदू खडक जास्त झिजतात, कालांतराने डोंगरात एक कपार तयार होते ती दोन्ही बाजुने मोकळी असते त्यास ‘सागरी कमान’ म्हणतात. किंवा भूशिरावरील दोन गुहा एकमेकीस जुळल्यास सागरी कमानी तयार होतात.

सागरी स्तंभ

सागरी कमानीचे छत कोसळल्या नंतर तेथे सागरी स्तंभ निर्माण होतो. स्तंभासारख्या उभ्या असलेल्या या भागास ‘सागरीस्तंभ’ म्हणतात. हा भाग सागरजलात एखादा मोठा उभा दगड ठेवावा असा हा भाग दिसतो.


सागर किनाऱ्यावर होणाऱ्या लाटांच्या आघातामुळे खडकांच्या पायथ्याचे  अपक्षरण जास्त होते व खडकांच्या पायथ्यालगत कपार निर्माण होते व कालांतराने ही कपार मोठी होऊन त्यावरील सागरी कडयांचा भाग कोसळतो  त्यामुळे सागरीकडा मुळ स्थानापासून मागे सरकतो. हे मच ओहोटीच्या वेळी स्पष्ट दिसतात कडयाचे मागे सरकणे हा त्याचा पुरावा आहे.


सागरी किनाऱ्यावरील  सहज आढळणारे संचनाचे भूरूप म्हणजे पुळण आहे. सागराच्या लांटाबरोबर  वाहत येणारी बारीक वाळू, रेती इ. पदार्थ समुद्रकिनाऱ्या लगत साचते वाळूच्या या निक्षेपणास पुळण असे म्हणतात. भारतात गोवा, केरळ, तमिळनाडू, गणपतीपुळे, अलिबाग येथे पुळणांची निर्मीती झालेली दिसते. भारतातील सर्वात लांब पुळण मरिना पुळण हे चेन्नई येथे आहे.


समुद्र किनारी प्रदेशात खडकांची रचना मृदू व कठीण अशी असलेल्या ठिकाणी आखात व भूशीरांची निर्मीती होते.  मृदू खडक सागरी लांटामुळे या जास्त झिजतात त्यामुळे समुद्राचे पाणी जमीनीच्या जास्त आत जाते अशा पाणी शिरलेल्या भागास ‘आखात’ म्हणतात. तर कठीण खडक हे कमी झिजतात त्यामुळे  जमीनीचा भाग समुद्रात शिरल्या प्रमाणे दिसतो समुद्रात ‍शिरणाऱ्या जमीनीच्या भागास भूशीर म्हणतात.

आखात व भूशीर

सागरी लाटांचे कार्य


सागरी लांटानी आपल्या सोबत आणलेले वाळू, रेती इ. घटक किनाऱ्याकडे वाहून नेले जात असतात. परंतु या प्रवाहाच्या मार्गात खाडीमुळे, आखातामुळे किंवा उथळ भागामुळे अडथळे आल्यास सागरीलाटा या वाळूचे निक्षेपण आखाताच्या मुखाशी उथळ भागातच करतात त्यातून सागरी किनाऱ्यास समांमर अशा लांबच-लांब उंचवटयाची निर्मीती होते याला वाळूचा दांडा म्हणतात. बऱ्याचवेळा सागरी वादळ व त्सुनामी सारख्या विनाशकारी शक्तीची तिव्रता या वाळूंच्या दांडयामुळे कमी होते उदा. श्रीवर्धन, रेवदंडा


कधीकधी वाळूंचे दांडे आणि जमिन यांच्या दरम्यान समुद्राचा भाग बदीस्त होतो. या ठिकाणचे पाणी मंचूळ होते  अशा खाऱ्या व मचूळ पाण्याच्या सरोवरास कायल किंवा खाजन म्हणतात.

      सागरी लांटाच्याकार्यामुळे निर्माण झालेली वाळूची दांडे ही आखाताच्या मुखाशी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंन्त  वाढत गेल्यास आखात व वाळूंचा दांडा यात समुद्राचे पाणी अडवले जाऊन खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होते, त्यास खाजण असे म्हणतात. उदा.‍ ओडिशातील चिल्का आणि केरळ मधील वेम्बनाड सरोवर


काळी वेळेस वाळूचे दांडे मुख्यभूमि पासून लवकर वेगळे होत नाही व समुद्राच्या आत लांब होत जातात त्यांस वाळूची दांडी म्हणतात असे वाळूचा दांडा व वाळूची दांडी समुद्राच्या पाण्यामूळे जमिनी पासून विलग झाल्यामुळे वाळूंच्या च्या त्या उंचवटयास वाळूचे बेट म्हणतात.


सागरी लाटांमुळे तयार झालेली भूरुपे


Work of sea waves

अधिक वाचा

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील टिपा लिहा

वस्तूनिष्ठ प्रश्ने

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

16 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page