HomeMoreअकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका

वेळ 3 तास

गुण 80

_____________________________________________________________________

अकरावी भूगोल वार्षिक प्रश्नपत्रिका

सूचना-

1 सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

2 आवश्यक तेथे आकृत्या काढून नावे दयावीत

3 रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4 नकाशा स्टेन्सिलच्या वापरास परवानगी आहे.

5 उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात.

6 आलेख व नकाशा पुरवणी उत्तरपत्रिकेस जोडावी



प्रश्न 1 अ) साखळी पुर्ण करा.   

5

भूजलप्लवकगट पर्वत
सागरी सूक्ष्मजीवसरपटणारे प्राणीलवणस्तंभ
सौरतापाचे परिणामभेगीय उद्रेकआवर्तांच्या संख्येत वाढ
वाळवंटअवकाळी पाऊसतापमान जास्त
विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखीय उद्रेककार्स्ट भूरुपेमासे

उत्तर-

भूजलकार्स्ट भूरुपेलवणस्तंभ
सागरी सूक्ष्मजीवप्लवकमासे
सौरतापाचे परिणामअवकाळी पाऊसआवर्तांच्या संख्येत वाढ
वाळवंटसरपटणारे प्राणीतापमान जास्त
विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखीय उद्रेकभेगीय उद्रेकगट पर्वत

5

1) नदी, हिमनदी, वारा या अपक्षरण कारकांच्या कार्याचा योग्य क्रम लावा.

अ) वाहून नेणे        ब) उचलने          क) संचयन करणे           ड) विलग करणे

उत्तर- ड) विलग करणे – ब) उचलने – अ) वाहून नेणे – क) संचयन करणे

———————-

2) समुद्रातील खालील संसाधनांचा जैविक संसाधन व अजैविक संसाधन गटात वर्गीकरण करा.

      शंख शिपंले,  पोटॅशियम,  शेवाळ,  खनिज तेल,  जिप्सम,   मासे

उत्तर- जैविक संसाधन- शंख शिपंले, शेवाळ, मासे

 अजैविक संसाधन- पोटॅशियम, खनिज तेल,  जिप्सम

———————-

3) भारताने खलील आपत्तीत होणारे नुकसान कमी करण्यात यश मिळविले आहे.

अ) भूकंप 

ब) ज्वालामुखी    

क) महापूर 

ड) आवर्त / वादळे

उत्तर- ड) आवर्त / वादळे

———————-

4) खालील महासागरांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार लहाण ते मोठा क्रम लावा.

अ) आर्टीक

ब) पॅसिफिक    

क) हिंदी

ड) अटलांटिक

उत्तर- ब) पॅसिफिक – ड) अटलांटिक – क) हिंदी – अ) आर्टीक 

———————-

5) खालील पैकी उच्च हवामानकक्षा असणारा प्रदेश ओळखा.

अ) उष्ण कटीबंधीय वर्षावने         

ब) विषुववृत्तीय वर्षावने       

क) बोरियल वने                  

ड) उष्ण वाळवंटी जीवसंहती

उत्तर- ड) उष्ण वाळवंटी जीवसंहती


5

1)  A : पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस सहाय्य करते.

    R : भूजल पातळी त्यास कारणीभूत असते.

      अ) केवळ A बरोबर आहे.          

आ) केवळ R बरोबर आहे.

      इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर-  अ) केवळ A बरोबर आहे.

———————-

2) A : टुंड्रा प्रदेशात खुरटया वनस्पती असतात

  R : टुंडा प्रदेशात सूर्य किरणे तिरपी पडतात.  

      अ) केवळ A बरोबर आहे.           

आ) केवळ R बरोबर आहे.

      इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- आ) केवळ R बरोबर आहे.

———————-

3)  A : मृदू खडकांना वळया पडतात  

   R : मृदूता व लवचिकतेमूळे ते तूटत नाहीत

      अ) केवळ A बरोबर आहे.          

आ) केवळ R बरोबर आहे.

      इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

———————-

4)  A : जागतिक समुद्र पातळीमध्ये सुमारे 50 मिमी पेक्षा आधिक वाढ झाली आहे. 

    R : बर्फस्तर व हिमनदयांच्या वितळल्याने महासागरांच्या जलपातळीत वाढ होते.   

      अ) केवळ A बरोबर आहे.          

आ) केवळ R बरोबर आहे.

      इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

———————-

5)  A : हिंदी महासागर भारताच्या हवामानाच्या दुष्ट्रीने महत्वाची भूमिका बजावतो.  

    R : हिंदी महासागरात मोसमीवाऱ्यांची निर्मिती .होते.          

      अ) केवळ A बरोबर आहे.          

आ) केवळ R बरोबर आहे.

      इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

      ई) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर- इ) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.


5

1) हवामान बदल अभ्यासण्याची साधने.

अ) हिमाच्या गाभ्यातील नमुने 

ब) प्रवाळ भित्ती    

क) वृक्ष खोडांवरील वर्तुळे 

ड) प्राचीन किल्ले

उत्तर-  ड) प्राचीन किल्ले

—————–

2) हिंदी महासागरातील सामुद्रधुनी

अ) फ्लोरीडा

ब) मलाक्का     

क) होर्मुझ

ड) बाब-एल-मान्देब

उत्तर-   अ) फ्लोरीडा

—————–

3) जैविक आपत्ती

अ) साथीचे आजार  

ब) कीटकांचा हल्ला        

क) चक्रीवादळ   

ड) पिकांवरील टोळधाड

उत्तर- क) चक्रीवादळ  

—————–

4) नदीच्या संचयन कार्यालयतील भूरूप

अ) घळई          

ब) नालाकृती सरोवर        

क) पूरमैदान        

ड) पूरतट

उत्तर- अ) घळई

—————–

5)  मोसमी हवामान प्रदेश

अ) भारत            

ब) वेस्ट-इंडीज            

क) मोझंबिक       

ड) मध्य चिली

उत्तर- ड) मध्य चिली


प्रश्न 2 रा. खालील प्रश्नाची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही चार)                           

12

1) वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.

उत्तर- ① हे प्रदेश आंतरखंडीय भागात आढळतात.

② पर्जन्याचे अत्यल्प प्रमाण, कोरडी हवा, निरंध्र आकाश, रेगुर, भरड व क्षारयुक्त जमीन, आर्द्रतेचा अभाव अशा परिस्थिती मुळे येथे दिवसाचे तापमान जास्त असते.

③ उपोष्ण उच्च तापमान व वेगाने वाहणारे वारे, रात्रीच्या वेळी जमिनीतून उष्णतेचे जलद उर्सजनामुळे रात्रीचे तापमान कमालीचे कमी होते.

④ येथे दिवसा जास्त तापमान व रात्रीचे फार कमी तापमान असते म्हणूनच वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त जाणवते.

—————–

2) चक्रीवादळांना समुद्रकिनारी प्रदेश संवेदनशील असतात.

उत्तर- i) एखादा प्रदेश किंवा त्या प्रदेशात राहणाऱे लोक तेथील भौगोलिक वैशिष्टयांमुळे एखादया आपत्तीला नेहमीच बळी पडतात तेव्हा त्यास त्या प्रदेशाची किंवा तेथील लोकांची विकारक्षमता म्हणतात. 

ii) चक्रीवादळे बऱ्याच वेळी सागरात निर्माण होत असतात, तेथे त्यांचा वेगही जास्त असतो.

iii) चक्रीवादळे जेव्हा जमिनीकडे सरकतात तेव्हा ते समुद्रकिनारी प्रदेशात प्रथमत:  धडकतात व किनारी प्रदेशात जास्त नुकसान करतात. 

iv) जमिनीवर आल्यानंतर विविध अडथळयांमूळे अंतर्गत भागात जांताना चक्रीवादळांचा वेग व तीव्रताही कमी होते त्यामुळे अंतर्गत भागात नुकसानीचे प्रमाणही कमी-कमी होत जाते.

v) चक्रीवादळे समुद्रीभागावरुन जमिनीकडे येतांना जास्तीत जास्त वेळा किनारी प्रदेशास नुकसान कारक असतात परंतु अंतर्गत भागात अनेक वेळा पोहचतही नाही म्हणून समुद्रकिनारी प्रदेश चक्रीवादळास जास्त विकारक्षम असतो

—————–

3) मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवरांची निर्मिती होते.

उत्तर- i) ज्या ज्वालामुखीचा एकदा उद्रेकानंतर परत पुन्हा दीर्घकाळ उद्रेक झालेला नसतो त्याला मृत ज्वालामुखी असे म्हटले जाते.

ii) ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीय काहील किंवा खड्डा निर्माण झालेला असतो.

iii) अशा ठिकाणी दिर्घकाळ ज्वालामुखीचा उद्रेक न झाल्यामुळे खड्डयात पावसाचे पाणी साचण्यास योग्य स्थिती असल्याने बऱ्याच वेळा त्यामध्ये निसर्गत: पावसाचे पाणी भरले जाते.

iv) यामुळे मृत ज्वालामुखी मध्ये विवर सरोवराची निर्मिती होते.

—————–

4) कारकांच्या प्रवाहाचा वेग आणि संचयनाचा थेट संबंध असतो.

उत्तर– i)नदी हिमनदी, वारा या सारख्या कारकांना गाळ वाहून नेणे कामी प्रवाहाचा वेग, ऊर्जा आवश्यक असते. ii) कारकांच्या प्रवाहास जास्त वेग असल्यास त्यांना जास्त अवसाद वाहून नेणे शक्य असते.               

iii) प्रवाहाचा वेग कमी झाल्यास सर्वच कारकांना, पूर्ण अवसाद वाहून नेणे शक्य होत नाही त्यामुळे गाळ साचण्यास सुरुवात होते त्याला आपण संचयन म्हणतो.

iv) त्रिभुज प्रदेश, बारखान सारखे भूरूपे कारकांच्या संचयनातून तयार होतांना दिसतात येथे प्रवाहाचा वेग कमी झालेला असतो. म्हणून कारकांचा वेग व सचंयन याचा थेट संबध असतो.

—————–

उत्तर- i) बंगालच्या उपसागरात गंगा, ब्रम्हपूत्रा या सारख्या बारमाही नदया तसेच व्दीपकल्पावरील इतरही अनेक नदयाच्या जलप्रणालीतून गोडया पाण्याचा येणारा प्रचंड विसर्ग आहे.

ii) मान्सूनमुळे काहीकाळ येथे पर्जन्यवृष्टी ही चांगली होत असते.

iii) या प्रदेशाचे तापमान तुलनेने कमी आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग तुलनेने कमी असतो.

iv ) यामुळे बंगाच्या उपसागरात पाण्याची क्षारता कमी आहे.

—————–

6) हिमरेषा आक्रसत आहेत.

उत्तर- i) बर्फ वितळणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी वाढत्या तापमानामुळे प्रमाणा पेक्षा जास्त हिमनदया व हिमनग वितळणे तसेच बर्फ निर्मिती पेक्षा बर्फ वितळण्याचा वेग वाढला आहे.

ii) मागील 25 वर्षात गंगोत्री हिमनदी 850 मीटर पेक्षा जास्त मागे सरकलेली आहे.

iii) हा दर प्रति वर्ष 22 मीटर आहे.

iv) हिमनदयांचे एवढया वेगाने वितळणे हे अनैसर्गिक आहे.

v) मांउन्ट किलोमांजरो, आल्प्स पर्वत व ध्रुवीय प्रदेशातील हिमनदयांचे व बर्फाच्या वितळण्याचा वेग वाढलेला आहे. यामुळे हिमनदया आक्रसत आहेत असे म्हणता येईल.


प्रश्न 3 रा फरक स्पष्ट करा. (कोणतेही तीन )                                           

9    

1)  ‘यु’ आकाराची दरी व ‘व्ही’ आकाराची दरी

उत्तर-

यु आकाराची दरीव्ही आकाराची दरी
1) ‘यु’ आकाराची दरी हिमनदीच्या खनन किंवा घर्षण कार्यामुळे तयार होणारे भूरूप आहे.1) ‘व्ही’ आकाराची दरी हे नदीच्या खनन किंवा घर्षण कार्यामुळे तयार होणारे भूरूप आहे.
2) पर्वतीय प्रदेशात असलेल्या दरीतून हिमनदी वाहत असतांना या दरीच्या काठाचे क्षरण होते. बर्फामुळे दरीचे काठ घासले जातात. तळाकडील भागात घर्षण जास्त असल्याने उभे काठ व रुंदतळ असलेली `यु` आकाराची दरी तयार होते.2) पर्वतीय प्रदेशात नदीच्या पाण्यात गाळाचे प्रमाण वाढल्यामुळे तळभागाचे खनन कमी होते परंतु नदीपात्राच्या काठांवर खननाचा जास्त प्रभाव होऊन नदीचे तट रुंदावल्या गेल्याने व्ही आकाराची दरीची निर्मिती होते.
3) या भूरुपाचा आकार इंग्रजी ‘U’ सारखा दिसतो; म्हणून त्यास यू आकाराची दरी  म्हणतात.3) या भूरुपाचाआकार इंग्रजी ‘V’ सारखा दिसतो; म्हणून त्यास व्ही आकाराची दरी म्हणतात.

—————–

2)  तैगा हवामान प्रदेश आणि टुंड्रा हवामान प्रदेश

उत्तर-

तैगा हवामान प्रदेशटुंड्रा हवामान प्रदेश
1) हा हवामान प्रदेश 550 ते 650 दरम्यान आढळतो.1) हा हवामान प्रदेश 650 ते 900 उ. दरम्यान आढळतो.  
2) या प्रदेशात तापमान कमी असते त्यामुळे हवेची बाष्प धारणक्षमता कमी असते, त्यांचा परिणाम येथे पर्जन्य कमी असते.2) या प्रदेशात पर्जन्य हिमाच्या स्वरुपातच असते, वार्षिक पर्जन्य 300 मिमी ते 500 मीमी असते. बाष्पीभवनापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते
3) या प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा खूप मोठी असते. उन्हाळयात तापमान 150 ते 200 से. तर हिवाळे शून्य अंशाच्या खाली असतात3) या प्रदेशात उन्हाळयातील तापमान सुमारे 100 से व हिवाळयातील तापमान सुमारे -200 ते -300 से. असते. येथील समुद्र किनाऱ्यावर काही काळ धुक्यांचे अच्छादन असते
4) येथील सुचिपर्णी वनस्पती चे लाकूड वजनाने हलके व मृदू असते.4) या प्रदेशात बर्फाच्छादीत हवामानामुळे वनस्पतींचा अभाव- येथे टुंड्रा वनस्पती आढळतात.

—————–

3) सन्निघर्षण आणि अपघर्षण

उत्तर-

अपघर्षणसन्निघर्षण
1) वारा, हिमनदी, सागरी लाटा कारकांमुळे अपघर्षण प्रक्रिया होते1) वारा, सागरी लाटा व नदी या कारकांमुळे सन्निघर्षण प्रक्रिया होते.
2) या प्रक्रियेत कारकांच्या अवसादांचे जमिनीच्या पृष्ठभागा सोबत घर्षण होते2) या प्रक्रियेत खडक व खडकांचे तुकडे वाहतांना एकमेंकावर आपटतात त्यामुळे त्यांचे आणखी लहान-लहान तुकडे होतात.
3) या प्रक्रियेत पृष्ठभाग गुळगुळीत होतो3) तुकड्यांचा आकार लहान होतो, त्यांना गोलाई प्राप्त होते.
4) या प्रक्रियेत पदार्थांच्या वहना दरम्यान भूपृष्ठावर परिणाम होत असतो4) या प्रक्रियेत जे पदार्थ वाहत असतात त्यांच्यावर परिणाम होत असतो (वाहते पदार्थांशी संबधित प्रक्रिया)

—————–

4) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली

मंद हालचालीशीघ्र हालचाली
1) पृथ्वीच्या अंतर्गत भागात ताण व दाब या सारख्या बलामुळे काही बदल घडून येत असतात. अशा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हालचालींना मंद हालचाली म्हणतात.1) पृथ्वीच्या अंतरंगातील बल, दाब व ऊर्जेमुळे काही वेळेस भूकवचात अचानक काही हालचाली घडतात त्यांना शीघ्र हालचाली म्हणतात.
2) पर्वतांची निर्मिती आणि खंडाचे वितरण हे मंद हालचालींशी संबधित आहे. उदा. वळी व गट पर्वत2) भूकंप व ज्वालामुखी उद्रेक हे शीघ्र हालचाली चे प्रकार आहेत.
3) मंद हालचाली या निरंतर व मंद गतीने चालणारी प्रक्रिया आहे.3) या हालचालींचे काही सेंकद किंवा तासांच्या कालावधीत परिणाम  भूपृष्ठावर दिसतात.
4) या हालचालींचे दिशा नुसार ऊर्ध्वगामी व क्षितिज संमातर असे गट पडतात.4) या हालचालीत भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील ऊर्जेचे उर्त्सजन होत असते.

—————–

5) अरिष्ट आणि आपत्ती

आरिष्ट  आपत्ती
1) अरिष्ट ही नैसर्गिक प्रक्रिया आहे1) आपत्ती ही मानवकेंद्री संकल्पना आहे.
2) अरिष्टांमुळे लोकांच्या जीविताला किंवा स्थावर मालमत्तांना धोके निर्माण होतात.2) अरिष्ट जेव्हा मानवी वसाहतीच्या प्रदेशावर व मानवावर परिणाम व नुकसान करतात, तेव्हा त्यांना आपत्ती म्हटले जाते.
3) भूकंप, ज्वालामुखी, वादळे, महापूर इ. सारख्या घटना घडल्या, परंतु त्या मानवी वसाहती असलेल्या ठिकाणी घडल्या नसतील, त्यांनी मानवी नुकसान केलेले नसेल तेव्हा त्यांना त्यावेळी ‘अरिष्ट’ म्हटले जाईल. उदा. महासागरातील वादळे,3) ज्या अरिष्टामुळे मृत्यू, दुखापत, मालमत्तेची हानी, आर्थिक हानी घडून येते तेव्हा त्या अरिष्टालाच आपत्ती म्हणतात. उदा. महाराष्ट्रातील खिल्लारी चा भूकंप
4) प्रत्येक अरिष्ट हे आपत्ती नसते4) आपत्ती ही अरिष्टामुळे निर्माण होवू शकते  

प्रश्न 4 अ जगाच्या नकाशात पुढील घटक योग्य चिन्हे व खुणा यांच्या सहाय्याने दर्शवा. (कोणतेही-6)  

6

      1 ऑस्ट्रेलिया खंड

      2 नव्वद पूर्व रांग

      3 सेंट हेलिना ज्वालामुखी

      4 सुंदा गर्ता

      5 तैगा वनांचा प्रदेश

      6 व्हेल्ड गवताळ प्रदेश

      7 इजिप्त देश

      8 अटाकामा वाळवंट

प्रश्न 4 ब खाली दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करुन त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे                

5

1) कोणत्या महिन्यात तापमान कमी आढळते?

उत्तर- पोर्टलँड येथे जानेवारी डिसेंबर या महिन्यात तर मेलबर्न येथे जुलै महीन्यात तापमान कमी आढळते

2) कोणत्या महिन्यात सर्वांत कमी पाऊस पडतो?

उत्तर- पोर्टलँड येथे जुलै महिन्यात तर मेलबर्न येथे जानेवारी महीन्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे.

3) पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य किती आहे?

उत्तर- पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य 150-175 मिमी आहे

4) पाऊस न पडलेल्या महिन्यांची नावे सांगा.

उत्तर- जवळ जवळ सर्वच महिन्यात पाऊस पडलेला आहे.

5) या हवामान प्रदेशाच्या निष्कर्षावर परिच्छेद लिहा

उत्तर- वार्षिक तापमान कक्षा कमी, सौम्य हिवाळे व वर्षभर तुरळक पर्जन्य यामुळे हा प्रदेश समशितोष्ण हवामानाचा आहे. 


प्रश्न 5 टीपा लिहा (कोणत्याही तीन)                                                  

12

1) उष्ण कटीबंधीय गवताळ (सॅव्हाना) हवामान प्रदेश

उत्तर- या प्रदेशास उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. गवताळ प्रदेशांना विविध प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत.

②येथील गवत उंच असल्याने त्यास एलिफंट ग्रास असेही म्हणतात. ते फारसे पोष्टीक नसते तर येथील झांडाना बाओब-ट्री असे म्हणतात.

③ या प्रदेशात मध्यान्ही सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यामुळे तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. सूर्याच्या कोनीय अंशानुसार अक्षवृत्तीय वारे याच प्रदेशात आपली वाहण्याची दिशा बदलतात.

④ वायुदाबातील फरकामुळे (ITCZ व उच्चदाब) वारे या प्रदेशातून कमी दाबाकडे वाहण्यासाठी परिस्थिती असते. उन्हाळयातच पर्जन्यमान परिस्थिती व कमी स्वरुपाची असते त्यामुळे या प्रदेशात सरासरी पावसाचे प्रमाण कमी असत. म्हणुन हा भाग दुष्काळग्रस्त असतो.

⑤ या प्रकारचे हवामान भारतात महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात, तेलंगणा, कर्नाटक व मिझोरम या प्रदेशांच्या काही भागात आढळते. तर दक्षिण अमेरिकेत व्हेनेझुएला, ब्राझील, दक्षिण व मध्य अफ्रीका खंड, व ऑस्ट्रेलियात आढळते.

⑥ या प्रदेशाचे तापमान उन्हाळयात 350 से.तर हिवाळयात 240 से.असते. पूर्वीय वाऱ्यांमुळे सरासरी वार्षिक पर्जन्य 250 ते 1000 मीमी पडते.

⑦ या प्रदेशात 2 ते 6 मीटर उंचीचे गवत, त्यावर उपजीवीका करणारे तृणभक्षक प्राणी, तसेच मांसभक्षक प्राणी आढळतात. येथे गुरचराई व पशुपालन व्यवसाय आढळतो.

———————-

2) ज्वालामुखीय पदार्थ

उत्तर-

A) द्रवरुप पदार्थ–  यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रवरुप पदर्थांचा समावेश असतो. यास भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात मॅग्मा व भूपृष्ठावर आल्यानंतर लाव्हा असे म्हणतात. द्रवरुप पदर्थांचे सिलीकांच्या असलेल्या प्रमाणावरुन दोन प्रकार पडतात.  

 i) आम्ल लाव्हा– यामध्ये सिलीकांचे प्रमाण जास्त असल्याने वितलन बिंदु उच्च असतो. हा घट्ट असल्याने त्यांचे वहन संथ गतीने होते. 

ii) अल्कली लाव्हा– या मध्ये सिलीकांचे प्रमाण कमी असल्याने वितलन बिंदु कमी असतो. हा पातळ असल्याने तो जास्त प्रवाही असतो.

B) घनरुप पदार्थ– धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यात समावेश असतो. त्यांच्यातही खालील प्रमाणे गट करता येतात. यांच्या आकारावरुन व उद्रेकावरुन धुलीकण व खडकांच्या या एकत्रीत समुहास पुढील संज्ञा वापरल्या जातात.

संज्ञास्पष्टीकरण
ज्वालामुखीय धूळउद्रेकाच्या वेळी धुलीकण व आणि खडकांचे तुकडे अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यांना ज्वालामुखीय धूळ म्हणतात.
राखउद्रेकाच्या वेळी धुलीकण, खडकांचे लहान आकाराचे तुकडे अशा घनरुप पदार्थांना राख म्हणतात.
सकोणाश्मउद्रेकाच्या वेळी धुलीकण व खडक हे घनरुप पदार्थ जेव्हा टोकदार असतात तेव्हा त्यांना ‘सकोणाश्म’ म्हणतात.
ज्वालामुखीबॉम्बकाही वेळा घनरुप लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकडयांच्या स्वरुपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो त्यास ‘ज्वालामुखीय बॉम्ब’ म्हणतात.

C) वायूरुप पदार्थ– उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसुन येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरुन त्यास ‘फुलकोबी ढग’ म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात.

——————

उत्तर-

      प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच ‘पूरा हवामान शास्त्र’ होय. मानव मागील 140 वर्षापुर्वी पासून हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकराणांचा उपयोग करीत आहे. पंरतु त्यापुर्वी ही हवामानाचा अभ्यास केला जात होता. त्या प्राचीन हवामानाच्या अभ्यासाची साधने पुढील प्रमाणे सांगता येतील.

प्रवाळकट्टे– प्रवाळकट्टे हे हवामानाच्या बदलांना फार संवेदनशील असतात. सागरी प्रवाळ हे कॅल्शियम कार्बोनेटला शोषून त्यापासून प्रवाळाचे सांगाडे तयार करतात. सागरी जलाचे तापमान बदलते तेव्हा सांगाडयातील कॅल्शियम कार्बोनेटची घनता ही बदलते.

      समुद्रातील प्रवाळांची उन्हाळयातील घनता व हिवाळयातील घनता वेगळी असते. प्रवाळांच्या वर्तुळांची वाढ ही ऋतूनुसार होत असते आणि याच वर्तुळांव्दारे पाण्याचे तापमान आणि प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे कळू शकते.

वृक्षखोडावरील वर्तुळे– पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरुप वृक्षांच्या निर्मितीत काही प्रमाणात भिन्नता आढळते. त्यामुळे भिन्न स्थितीत निर्माण झालेल्या वेगवेगळया वृक्षांच्या खोडांवरील वर्तुळांच्या निर्मितीत भिन्नता असते. त्याच वर्तुळांच्या बदलांचा मागोवा घेत पूरा पर्यावरणाच्या बदलांचा अभ्यास करता येतो.

बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने– अंटार्क्टिका व ग्रीनलँड या हिमक्षेत्रावरील पूष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. त्यात हिवाळयातील बर्फाचे थर व उन्हाळयातील बर्फाचे थर हे वेगवेगळे जाणवतात व प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे बर्फाचे थर त्या वर्षातील हिमाबद्दल भरपूर माहिती पूरवतात.

——————

4) मानवनिर्मित आपत्ती

उत्तर-  सामान्यपणे मानवनिर्मित आपत्ती या मानवी चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे घडत असतात, त्यामुळे त्या रोखता येवू शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येवु शकते. उदा. औदयोगिक क्षेत्रातील अपघात, वाहतुकीतील अपघात, आष्वीक अपघात, हे मानवनिर्मित आपत्तीचे प्रमुख प्रकार मानले जातात.

      मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतिने अनेक भौतिक सुखासाठी पर्यावरणाच्या विविध बांबीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. या अवाजवी हस्तक्षेपामुळे सुध्दा बऱ्याच वेळा मानवाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे ते ही मानवी आपत्तीतच मोडले जाते. उदा. नदयानाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातील अतिक्रणामुळे अतिवृष्टीच्या काळात आलेले महापूर. तसेच निर्वणीकरणामुळे वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण व त्यातून वाढलेले सरासरी तपामान. उंच इमारती, पुल, धरणे बांधकामाच्या वेळी झालेले अपघात.

मानवी आपत्तीचे उदाहरणे व परिणाम

i) सन 1984 मध्ये भोपाळ येथे झालेल्या मिथेल आयासोसायनेट वायूगळती मध्ये सुमारे 10000 लोकांचा जीव गेला तर 5 लाख लोक प्रभावित झाले होते.

ii) सन 1995 मध्ये फिरोजाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात 400 लोकांचा मृत्यू झाला.

iii) सन 2005 मध्ये मुबंई येथे झालेल्या अतिवृष्टीत नाले व गटारी ब्लॉक होवून साचलेल्या पाण्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

——————

5) विशेष आर्थिक विभाग (EEZ)

उत्तर-

      मानवाने पृथ्वीवरील भूखंडाच्या वैशिष्टयांना अनुसरुन भौगोलिक सीमा प्रस्थापित केल्या आहेत. परंतू महासागरावर सपाट व विस्तार या वैशिष्टयांमूळे त्यावर सीमा निश्चित करणे शक्य नाही. त्यामुळे महासागरावर आपल्या सर्वांची मालकी आहे.

      महासागर कोणाच्याही मालकीचे नाहीत, हाच अनौपचारीक करार ‘‘सागराचा कायदा’’ म्हणून पाळला जात आहे. याच संदर्भाने (UNCLOS-1982) या कायदयानुसार संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये

महासागराच्या आधुनिक मालकी हक्कांची पायाभरणी करण्यात आली. ती पूढील प्रमाणे-

  1. कायदयानुसार देशाच्या किनारपट्टीपासून 12 नाविक मैलापर्यंन्तचे सागरी क्षेत्र हे त्या देशाचे  प्रादेशिक क्षेत्र म्हणून आळखले जाते.
  2. समुद्र सानिध्य असलेला देश आपल्या किनापट्टीपासून 200 नावीक मैल जलभाग ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ म्हणून वापरू शकतो.
  3. 200 नावीक मैल क्षेत्रांच्याआत सापडणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर करण्याचा अधिकार संमधीत त्या- त्या देशांनाच आहे.
  4. जे संसाधने कोणत्याही देशाच्या 200 नावीक क्षेत्राच्या आत येत नाहीत. ते खुल्या समुद्रात असतात अशा साधन संपत्तीचा वापर करण्याची परवानगी कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहमती शिवाय नाही. 

यालाच विशेष आर्थिक क्षेत्र  (Exclusive Economic Zone – EEZ) संबोधले जाते. भारतात हा नियम पहिल्या 200 नाविक मैल सागरतळ व समुद्रबुड जमिनीसाठी ही लागु आहे.



प्रश्न 6 अ खालील उताऱ्याचे वाचन करुन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.                   

4

इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेचा पाचवा स्थितीदर्शक अहवाल काही महिन्यांपूर्वी प्रसिध्द झाला. या अहवालाने हवामानबदलाचे गंभीर वास्तव आपल्यापुढे मांडले आहे.. हा अहवाल असे सांगतो की, हवामानावरील माणसाचा प्रभाव स्पष्ट आहे. माणसाच्या उद्योगांमुळे सध्याचे कार्बन वायूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. हवामानाच्या या बदलांचा माणूस आणि नैसर्गिक व्यवस्थांवर विस्तृत परिणाम झाला आहे. हा अहवाल हवामानबदलासंबंधी असला, तरी हवामानाचा सर्वात महत्वाचा घटक पाणी हाच आहे. कारण पृथ्वीचा सरासरी 71  टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे. पृथ्वीवरील पाण्याचे प्रचंड प्रमाण, अथांग महासागर, त्यातील विविध प्रवाह, ध्रुवीय प्रदेशातील बर्फा चा प्रचंड साठा, चक्रीवादळे, पर्जन्य……

यामुळे पाण्याचा पृथ्वीच्या हवामानावर व्यापक परिणाम होतो. त्याचप्रमाणे हवामानाची स्थिती किंवा हवामानातील बदल हे मुख्यत: पाण्याशी संभधितच असतात. वातावरणाच्या तापमानात औद्योगिक क्रांतीपासून नि:संशय वाढ झाली आहे. त्यात 1950 सालानंतर पाहायला मिळालेली तापमानवाढ तर गेल्या कित्येक दशकांपासून ते सहस्त्रकांमधील ‘न भूतो’ स्वरूपातील आहे.वातावरण आणि समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळले आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे

1) उताऱ्यात कोणत्या वायूमुळे परिणाम झाले असल्याचे नमुद केले आहे.

उत्तर– कार्बन डायऑक्साईड  या वायुमुळे परिणाम झाले असल्याचे नमुद आहे.

2) हवामान बदलामुळे कोणते परिणाम झालेले आहेत.

उत्तर– मोठया प्रमाणात बर्फ वितळल्याने समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे.

3) हवामानातील कोणत्या घटकांचा उल्लेख उताऱ्यात आलेला आहे.

उत्तर- महासागरीय प्रवाह, धृवीय बर्फ, चक्रीवादळे, तापमान वाढ, बर्फाचे वितळणे

4) कोणत्या संस्थेच्या कोणत्या अहवालावर लेख आधारित आहे.

उत्तर- इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेचा पाचवा स्थितीदर्शक अहवालावर हा लेख आधारित आहे.


प्रश्न 6 ब खालील पैकी आकृत्या काढून त्यांच्या भागांना योग्य नावे दया. (कोणत्याही दोन)          

4

1) खचदरी

——————

2) गोठण वितळण

——————

3) सागर तळरचना


प्रश्न 7 वा खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.                         

8

उत्तर-

नदीचे पाणी मार्गातील खडकांचे अपक्षरण करुन अवसांदाचे वहन करते व त्यानंतर त्यांचे संचयनही करते त्यातून विविध भूरूपे तयार होत असतात ते पुढील प्रमाणे

घळई-

      नदीच्या उगमाच्या भागात नदीच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने या भागात वाहते पाणी नदीच्या तळाचे खनन जास्त करते त्यामुळे तीव्र उताराचे काढ व अंरुद (खालच्या भागात निमुळते होत जाणारे) तळ असलेले भूरुप तयार होते त्यास घळई म्हटले जाते. अशा जास्त खोल घळईला कॅनियन असेही म्हटले जाते. उदा. उल्हास व नर्मदा नदीची घळई, कॅनन- मेक्सिको, गारगंटा- स्पेन, गॅड कॅनन- संयुक्त संस्थाने कॉपर

‘व्ही’ आकाराची दरी-

      नदीचा प्रवाहात पुढे गेल्यावर गाळाचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते, त्यामुळे तळभागावरील घर्षण कमी होऊन खनन कमी होते. मात्र नदीच्या काठावर किंवा काठांच्या उतारावर खनन होण्यास सुरवात होते. त्यामुळे नदी तट किंवा काठ रुदांवतात त्यामुळे नदीच्या दोन्ही काढांमधील रूंदी वाढत त्यातून नदीपात्रास इंग्रजीतील ‘व्ही’ आकार प्राप्त होतो अशा भूरुषास ‘व्ही’ आकाराची दरी म्हटले जाते.

धावत्या-

      जेव्हा नदी प्रवाह आलटून-पालटून कठीण व मृदु खडकांच्या स्तरांवरून वाहत असत त्यामुळे मृदू खडकांचे जास्त खनन हात व नदीपात्रात तीव्र उतार व पाय-यासारखा भाग तयार होतो अशा उतारानुसार पाणी वेगान खाली (धावते) जाते त्यास धावत्या अस म्हणतात. या ठिकाणी नदीच पाणी फेसाळलेले व वेगवान असते. उदा. शरावती नदीवरील जोग, चंबळ नदीवरील छुलीया धावत्या.

धबधबे  

      नदीचे पाणी डोंगर कडा किंवा उतारावरुन वेगाने खाली पडते त्यास धबधबा असे म्हटले जाते. असे धबधबे कठीण खडकांनतर मृदू खडक नदी प्रवाह मार्गात आल्याने व मृदू खडकांचे जास्त खनन झाल्यानेही तयार होतात.

प्रपात गर्ता

धबधब्याच्या ठिकाणी खडकांवर वरुन खाली वेगाने पाणी पडत असल्याने अशा पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खोल खड्डा / खळगा तयार होतो त्यास प्रपातगर्ता असे म्हणतात.

कुंभगर्ता / राजंणखळगा  

      नदीपात्रात असलेले खडक कमकुवत असल्यास किंवा त्यांना जोड असल्यास वाहते पाणी तडे किंवा जोड यांच्या मध्ये शिरते पाण्यासोबत पाण्यातील खड़े, दगडही आत शिरतात व पाण्याबरोबर ते चक्राकार फिरतात एकाच ठिकाणी दगडांच्या या चक्राकार फिरण्यामुळे त्याभागात वधन प्रक्रियेमुळे त तडे आतमध्ये मोठे व गोलाकार होतात आणि तेथे खळगे तयार होते त्यालाच कुंभगर्ता / रांजणखळगे म्हणतात. उदा. नगर जिल्हयातील निघोड येथे कुकडी नदीतील रांजणखळगे

( यावरील अधिक आकृत्यांसाठी समर्थ भूगोल नोटस पहाव्यात)


उत्तर-

① पृथ्वीच्या भौगोलिक क्षेत्रावर नैसर्गिकपणे वेगवेगळया प्रकारच्या व लहान मोठया प्रमाणात वनस्पतींचे समुदाय आढळतात त्यांच्यावर अवलंबुन असणारे प्राणीही तेथेच आढळत असतात. सजीवांच्या अशा एकत्रीत समुदायास जीवसंहती म्हणतात.

② एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशास जीवसंहती म्हणतात.

                म्हणजेच जीवसंहतीत विशिष्ट परिस्थितीत विविध वनस्पती प्रजातींचा व प्राणी समूह

एकमेकांशी सहसंबध प्रस्तापीत करतात, व तेथील हवामानाच्या स्थितीस सर्वांनी जुळवून घेतलेले असते.  जमिनीवर जीवसंहतीच्या सिमा मुख्यत्वे हवामानानुसार निश्‍चित होत असतात. सामान्यपणे एकाच स्वरुपाच्या जीवसंहती समान अक्षांशावर आढळतात.

# अक्षांशाव्यतिरिक्त जीवसंहतीवर पर्जन्य, तापमान, आर्द्रता, सौरउर्जा स्थिती, मृदेची स्थिती, प्रदेशाची उंची, प्रदेशाचे स्थान व वारे हे घटक परिणाम करतात

A) वनस्पती – पृथ्वीवरील सजीवांच्या निम्म्या पेक्षा जास्त प्रजाती विषुववृत्तीय वनांमध्ये आढळतात. वर्षभर पडणारा पाउस, कोरडया ऋतूचा अभाव व भरपूर सुर्यप्रकाश यामुळे या जीवसंहतीत अनेक प्रजातीच्या वनस्पती आहेत. येथे कमी उंचीचे झुडपे, मध्यम उंचीच्या वनस्पती तर जास्त उंचीच्या वनस्पती आणि शेकडो प्रजातीच्या वेली एकत्रित रित्या दाटीवाटीने वाढत असतात. येथील वनस्पती आवश्यक सुर्यप्रकाश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळेच अनेक वनस्पती उंच वाढतात, त्यांचे शेंडयाकडील आच्छादन पसरट व दाट असते, सुर्यकिरणे वनस्पतींवर असावी याकरीता वनस्पतींची पाने रुंद असतात. या सर्व कारणांमुळे ही जंगले घनदाट असतात. येथील बहुतांश वृक्षांचे लाकूड कठीण्‍ असते. महोगनी, एबनी, रोजवुड, रबर, ताड, नारळ, पाम असे वृक्ष तसेच ऑर्किड, जंगली फुले, विविध प्रकारच्या वेली, नेचे, शेवाळी इ. वनस्पती येथे आढळतात.

B) प्राणी जीवन– विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात माकड- ओरांगऊटान, गोरीला, चिंपाझी इ;    पक्षी– गिधाड वर्गीय, हॉर्नबिल, पोपट इ; किटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी; स्तरीय वृक्ष रचनेमुळे जमिनीपासून ते शेंडयापर्यंत प्राणी व पक्ष्यांच्या प्रजातींचे क्षेत्र वनांनी आखुन दिलेले आढळते.

C) मानवी जीवन- या जीवसंहतीत मानवी जीवन फारसे सुकर नाही. येथे अजुनही बऱ्याच मानवी जमाती आदिम अवस्थेत असुन त्या पांरपारीक (प्राथमिक) व्यवसायात गुतंलेत्या आहेत. उदा. वनोत्पादने गोळा करणे, शिकार करणे, इ. कांगो प्रदेशात पिग्मी जमात, ॲमेझॉनच्या प्रदेशात बोरो इंडीयन जमात, अंदमान-निकोबार प्रदेशात सेंटिनल, ऑग्वा, जारवा इ. जमाती आढळतात.

A) वनस्पती– या वनातील वनस्पती पावसाळयात हिरव्यागार व कोरडया ऋतूत पानझड होऊन पर्णहीन होतात. त्यामुळे या जीवसंहतीतील वनांना पानझडी वने म्हणतात. साग, साल, शिसव, चंदन, खैर, कुसूम उंडल इ. महत्वाचे वृक्ष येथे आढळतात. या वनांचे दोन प्रकार पडतात.  

  I) आर्द्र पानझडी वने– यात वृक्ष मोठे, उंच, त्यांच्या फांदयाचा आकार मोठा, मुळे जाड व जमिनीत खोलवर                         गेलेली असतात.

  II) शुष्क पानझडी वने– यातील वृक्ष कमी उंचीचे व झूडपांसारखी असतात तर वृक्षांची घनता कमी असते                            तसेच हे वने सलग नसुन विखुरलेली असतात.

B) प्राणी जीवन– या जीवसंहती मध्ये प्राणीजीवनात मोठया प्रमाणात विविधता आढळते. येथे अतीसूक्ष्‍म सजीवांपासून ते महाकाय हत्ती, पाणघोडे, गेंडे, तसेच वाघ, सिंह, गवे, माकडे इ. प्राणी आढळतात . भारव्दाज, धनेष, कोकीळ, मोर, गिधाड, ससाणा, कबुतर, चिमणी इ; पक्षी, तसेच मुंग्या, फुलपाखरे, कृमी कीटक इ. आढळतात.

C) मानवी जीवन– या जीवसंहती मध्ये मानवी जीवन सुखकर आहे. वनांवर आधारित प्राथमिक व व्दितीय व्यवसाय, शेती तसेच पाशुपालन, दुग्धोत्पादन, मांसोत्पादन हे व्यवसाय या जीवसंहतीत केले जातात. तसेच येथे पाळीव प्राण्यांचा वापर शेतीसाठी होतो. या जीवसंहतीत वनांवर मानवाकडून अतिक्रमण होत आहे.

( या व्यतिरिक्त नकाशे व आकृत्या तसेच अधिक स्पष्टीकरणांसाठी समर्थ भूगोल नोंटस चा आधार घ्यावा. संपर्क- 9421680541)


अकरावी भूगोल समर्थ नोट्स
अकरावी भूगोल समर्थ नोट्स

अकरावी भूगोल समर्थ नोटस होलसेल भावात उपलब्ध संपर्क 9421680541


अधिक वाचा

अधिक वाचा

अकरावी भूगोल मुल्यमापन पध्दती व प्रश्नपत्रिका स्वरु

सागरी लाटांचे कार्य

अकरावी भूगोल व्दितीय घटक चाचणी सहा प्रश्नपत्रिका मराठी 3 + इंग्रजी माध्यम 3


बारावी भूगोल तयारी

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-


Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सर खूपच छान प्रश्न प्रत्रिका व उत्तर प्रत्रिका

    याचा फायदा नक्कीच इ. 11वी विद्यार्थ्यांना होईल

    धन्यवाद सरजी 🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page