HomeMoreHuman Settlement and Land Use Distinguish between

Human Settlement and Land Use Distinguish between

Human Settlement and Land Use Distinguish between

Manvi Vasti  bhumi Upyogan  फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन

प्रकरणातील

फरक स्पष्ट करा.


फरक स्पष्ट करा.

1)  वस्तींची ग्रामिण रचना आणि शहरी रचना

2) भूमी उपयोजन आणि भूमी अच्छादन

3) रेषिय वस्ती आणि त्रिकोणी वस्ती

4) केंद्रित आणि विखुरलेली वस्ती

5) ओसाड आणि बिगर शेती

6) केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

Human Settlement and Land Use Distinguish between

1) वस्तींची ग्रामिण रचना आणि शहरी रचना-

ग्रामिण रचनाशहरी रचना
1 प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या कर्यशील लोकसंख्येचा वर्ग जेथे जास्त असतो तो ग्रामीण वस्ती रचना म्हणतात. 1) व्दितीय व तृतीयक व्यवसायात कार्यशील लोकससंख्या जास्त गुंतलेली असते अशा भागास शहरी किंवा नागरी वस्ती रचना म्हणतात.
2) ग्रामिण भागतील लोकांचे राहणीमान हे साधे असते. मर्यादीत सेवा वापरतात.  2) शहरी भागातील लोकांचे रहाणीमान चांगले व उच्च दर्जाचे असते. विविध सेवा व्यवसांचा ते वापर करतात.
3) ग्रामिण भागात लोकसंख्या कमी असते.    3) शहरी भागात लोकसंख्या जास्त असते.
4)  ग्रामिण वस्ती रचनेत पायाभुत सुविधांची कमतरता असते. 4) शहरी वस्ती रचनेत पायाभुत सुविधा उपलब्ध असतात.
5) या वस्ती रचनेत अनेक अपकर्षक घटक असल्याने ग्रामीण भागातुन अनेक लोक स्थलांतर करतात.    5) शहरी वस्ती रचनेत आकर्षक घटक असल्याने मोठया प्रमाणात लोक स्थलांतर करुन येथे येतात.

2) भूमी उपयोजन आणि भूमी अच्छादन

भूमी उपयोजनभूमी अच्छादन
1) मानवाने जमिनीचा विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोजन होय. उदा घरे, व्यावसाय, उदयोग, शेती वाहतूक मार्ग1) भूमीवर असणारे प्राकृतिक  घटकांचे आवरण म्हणजे भूमी अच्छादन होय. उदा. वने, नैसर्गीक जलाशये व बर्फ, वाळू, खडक, पर्वत
2) भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमा व्दारे सांगितले जाऊ शकत नाही..2) भूमी अच्छादन हे उपग्रह प्रतिमा द्वारे समजले जाऊ शकते.
3)   भूमी उपयोजनात मानवी क्रिया अंतर्भुत असतात.3) भूमी अच्छादनात नैसर्गिक  घटक विचारात घेतले जातात.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

3) रेषिय वस्ती आणि त्रिकोणी वस्ती

रेषिय वस्तीत्रिकोणी वस्ती
1) एखादया रस्त्या लगत किंवा रेल्वेलाईन किंवा नदी कालव्याला लागून या प्रकारच्या वस्त्यांची निर्मिती होत असते.1) दोन नदयांच्याकिंवा रस्त्यांच्या संगमावरकिंवा समुद्राकाठी अशा वस्त्यांची निर्मिती होत असते.
2) एका रेषेत असतात असतात किंवा रेषेत वाढत जातात2) प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बांजूनी होत असते.
3) कालांतराने या वस्तीच्या सरळ अनेक रांगा होतात.3) या वस्तीस नैसर्गिक मर्यादा असल्यास एका दिशेने वाढ होत जाते.

 4) केंद्रित आणि आणि विखुरलेली वस्ती

केंद्रित वस्तीविखुरलेली वस्ती
1) केंद्रित वस्ती मध्ये घरे परस्परांच्या जवळजवळ अंतरावर असतात. घरे दाटीवाटीने अधिक संख्येने असतात.1) या वस्तीमधील घरे हे परस्परांपासून दूर दूर अंतरावर असतात
2) यामध्ये काही ठिकाणी थोडी जागा शिल्लक असते व त्या ठिकाणी वस्ती होऊन वस्तीचे क्षेत्र वाढत जाते व त्या जाळ्याच्या आकारासारखा दिसतात.2) या वस्त्यांमध्ये कालांतराने घरांची संख्या वाढत जाऊन त्या अर्धकेंद्रित स्वरूपात रूपांतरित होतात
3) जेथे मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, योग्य हवामान, मानवी वस्तीसाठी पोषक घटक अधिक उपलब्ध असतात.  त्या प्रदेशात केंद्रित वस्ती निर्माण होते.3) विषम हवामान, डोंगराळ प्रदेश, दाट जंगले, वाळवंटी प्रदेश अशा प्रदेशात विखुरलेल्या वस्ती आढळतात.
4) संरक्षणाच्या दृष्टीने ही वस्ती योग्य असते. संकटाच्या वेळी लोक एकमेकांना मदत करतात. उदा: भारताच्या गंगेच्या मैदानी प्रदेशात केंद्रित वस्ती.4) उदा: भारतातील वाळवंटी प्रदेशात राजस्थान मध्ये या प्रकारच्या विखुरलेल्या वस्ती आढळून येतात.  

Human Settlement and Land Use Distinguish between


5) ओसाड आणि आणि बिगर शेती

ओसाड भूमीबिगरशेती भूमी
1) ओसाड भूमी प्रकार ग्रामीण भूमी उपयोजनात आढळून येते.1) बिगर शेती भूमी उपयोजन ग्रामीण व नागरी या दोन्हीं भूमी उपयोजनात आढळून येते.
2) उंचसखल, डोंगराळ भूमी, वाळवंट, घळीयुक्त भूमी या सारख्या अनुत्पादक घटकात ओसाड भूमी मोडली जाते.2) ग्रामीण व नागरी भागातील वस्ती, पायाभूत सोयी, रस्ते,महामार्ग, लोहमार्ग, कालवे, उदयोग, दुकाने, व्यापारी संकुल इ. चा या प्रकारात समावेश होतो. 
3) ग्रामीण भागातील हा भूमी प्रकारातुन कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही.3) बिगरशेती भूमी प्रकारात अनुत्पादन व उत्पादक अशा दोन्ही प्रकारातील भूमी उद्देशानुसार वापरात आणली जाते.
4) हा भूमी प्रकार कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान वापरुन शेतीसाठी वापरता येत नाही4)  व्दितीयक व तृतीय व्यवसायात होणाऱ्या बदलानुसार या श्रेणीतील भूमीचा वापर वाढत जातो.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.


6) केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती

केंद्रोत्सारी वस्तीवर्तुळाकार वस्ती
1) एका केंद्राच्या भोवती या  वस्त्यांचा विकास होतो.1) एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला या वस्त्या आकार घेतात
2)केंद्रापासून बाहेरील बाजूस वस्तीची निर्मिती होते2)केंद्राच्या आसपास गोलाकार स्वरूपात वस्तीची निर्मिती होते
3) केंद्रबिंदू वस्तीच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो3) या प्रकारात पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात.
4) हे केंद्र एखाद्या धार्मिक ठिकाण किंवा ऐतिहासिक वास्तू, जुना राजवाडा असू शकतो. त्याभोवती वस्तीची निर्मिती होते4) या प्रकारची वस्ती संरक्षणासाठी किंवा अन्य सोयीसाठी उपयोगी असते.
5) भारतात उत्तरेकडील मैदानी प्रदेशात या प्रकारच्या वस्ती जास्त आढळून येतात.    5) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर सभोवताली असलेली वस्ती तसेच आफ्रिकेतील मसाई जमातीची वसाहत क्रोल ही अशा प्रकारची वस्ती आढळते.



Human Settlement and Land Use Distinguish between

Explain the difference between

1) Rural structure and urban structure of settlements-

2) Land Use and Land cover

3) Linear Settlement and Triangular Settlement

4) Nucledated Settlement and Dispersed Settlements


Rural composition  urban design  
1 The segment of the working population engaged in primary occupation is called rural settlement structure.  1) An area where the working population is mostly engaged in secondary and tertiary occupations is called an urban or urban settlement structure.  
2) Living conditions of people in rural areas are simple. Uses limited services.   2) Living standards of people in urban areas are good and high quality. They use various services.  
3) Rural areas have less population.  3) Population is higher in urban areas.
4) Rural settlement structure lacks basic facilities  4) Infrastructure facilities are available in urban settlement structure.  
5) Many people migrate from rural areas due to many unattractive factors in this settlement structure.5) As it is an attractive factor in urban settlement structure, a large number of people migrate here
  

land use  land cover
1) Land use is the use of land by humans for various purposes. Eg houses, businesses, industries, agriculture transport routes  1) The covering of natural elements on the land is land cover. E.g. Forests, natural reservoirs and snow, sand, rocks, mountains  
2) Land use cannot be told through satellite images.  2) Land subsidence can be understood through satellite images.  
3) Land use involves human activities.3) Natural factors are taken into account in soil improvement.

Linear settlement  Triangular settlement  
1) These types of settlements are formed along a road or railway line or river canal.  1) Such settlements are formed at the confluence of two rivers or roads or by the sea.  
2) Are in a line or grow in a line  2) Due to natural or social reasons, the growth of such settlements occurs in all three directions.  
3) In course of time, many rows of these habitations are formed.3) If there is a natural limit to this population, it grows in one direction

Nucleated settlement Dispersed / scattered settlements  
1) In a Nucleated settlement the houses are at close distance from each other. Houses are more densely populated.  1) Houses in this settlement are far apart from each other  
2) In some places there is little space left and in those places the settlement area increases and it looks like a net shape2) Over time the number of houses increases in these settlements and they become semi-concentrated  
3) Where plains, availability of water, suitable climate, nutrients are more available for human habitation.  A concentrated settlement is formed in that region.  3) Scattered settlements are found in regions with heterogeneous climates, mountainous regions, dense forests, desert regions.
4) In terms of protection, this habitat is suitable. People help each other in times of crisis. Eg: concentrated settlements in the Gangetic plains of India.4) Eg: Scattered settlements of this type are found in Rajasthan, a desert region of India.

5) Barren Land and Non-agriultural Land

 Barren Land  Non-agricultural land  
1) Barren land type is found in rural land use.     1) Non-agricultural land use is found in both rural and urban land use.  
2) Wasteland is broken down into unproductive components like upland, hilly land, desert, barren land.  2) Settlements, infrastructure, roads, highways, railways, canals, industries, shops, commercial complexes etc. in rural and urban areas. This type includes
3) No production is taken from this type of land in rural areas.3) In non-agricultural land type, both unproductive and productive land is utilized according to purpose.  
4) This land type cannot be used for agriculture using any technology4) According to the change in secondary and tertiary occupations, land use in this category increases.

Explain the difference between human habitation and land use.

6) Radial Pattern settlements and circular settlements

Radial Pattern settlement  
1) These settlements develop around a centre.  
2) Settlements are formed from the center towards the outside  
3) A focal point is an important part of the development of a settlement
4) This center may be a religious place or a historical building, an old palace. A settlement is formed around it  
5) These types of settlements are mostly found in the northern plains of India.

Circular settlement  
1) These settlements take shape around a lake or pond  
2) Settlements are formed in circular form around the center  
3) In this type the houses are almost due to availability of water.
4) This type of settlement is useful for defense or other convenience.
5) Settlements around Lonar lake in Buldhana district and Krol, a colony of the Maasai tribe in Africa, are such settlements.

Human Settlement and Land Use Distinguish between


अधिक वाचा

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ट प्रश्न

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

पाठय पुस्तके येथुन डाऊनलोड करा.

भूगोल प्रात्यक्षिक वही-

विक्रीसाठी उपलब्ध

संपर्क- प्रा. मनोज देशमुख

मो. 9421680541

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

40 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

<p>You cannot copy content of this page</p>