HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet
HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet
HSC जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरे
HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet
प्रश्न 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा. [20]
(अ) ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध साखळी पूर्ण कराः 5
अ | ब | क |
1) ग्राहकोपयोगी वस्तू | (क) प्राकृतिक भूगोल | (य) व्यापारी क्षेत्र |
2) भूगोल | (ख) आंतरराष्ट्रीय | (र) हवामान शास्त्र |
3) स्थलांतर | (ग) औदयोगिक क्षेत्र | (ल) औषध निर्मिती |
4) औपचारिक प्रदेश | (घ) वेगळ्या सीमा | (व)भारत ते ऑस्ट्रेलिया |
5)नागरी भूमी उपयोजन | (ड)थेट वापरासाठी तयार | (श) राज्य |
(स) वाहन निर्मिती | ||
उत्तर- | ||
अ | ब | क |
1) ग्राहकोपयोगी वस्तू | (ड) थेट वापरासाठी तयार | (ल) औषध निर्मिती |
2) भूगोल | (क) प्राकृतिक भूगोल | (र) हवामान शास्त्र |
3) स्थलांतर | (ख) आंतरराष्ट्रीय | (व) भारत ते ऑस्ट्रेलिया |
4) औपचारिक प्रदेश | (घ) वेगळ्या सीमा | (श) राज्य |
5)नागरी भूमी उपयोजन | (ग) औदयोगिक क्षेत्र | (य) व्यापारी क्षेत्र |
(ब) दिलेली विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखा: 5
(A: विधान R: कारण)
1) A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे |
.
2) A: नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्ये ही वाढतात.
R: नगरांना केवळ एकच कार्य असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे. |
3) A: भारतात औदयोगिक उत्पादनात विविधता आढळते.
R: भारत हा कृषीप्रधान देश आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही. |
4) A : लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्परसंबंध आहे.
R : लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. |
5) A: संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे.
R: भूगोलामध्ये संगणकीय ‘अॅप’ चा वापर होत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे. |
क) चुकीचा घटक ओळखा व लिहा : 5
1) लोकसंख्येचे घटक
अ) वयोरचना
ब) लिंगरचना
क) भूरचना
ड) व्यावसायिक रचना
उत्तर- क) भूरचना |
2) मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार-
अ) केंद्रित वस्ती
ब) विखुरलेली वस्ती
क) एकाकी वस्ती
ड) प्रादेशिक वस्ती
उत्तर- ड) प्रादेशिक वस्ती |
3) मालकीवर आधारित उद्योग –
अ) सहाय्यभूत क्षेत्र
ब) सार्वजनिक क्षेत्र
क) खाजगी क्षेत्र
ड) सहकार क्षेत्र
उत्तर- अ) सहाय्यभूत क्षेत्र. |
4) प्रादेशिक विकासाचे मापदंड
अ) साक्षरता
ब) भाषा
क) आर्युमान
ड) लोकसंख्येची गुणवत्ता
उत्तर- ब) भाषा. |
5) भूगोलाचे अभ्यासक
अ) हेकेट्स
ब) टॉलेमी
क) शेक्सपिअर
ड) स्टॅबो
उत्तर- क) शेक्सपिअर. |
ड) खालील विधाने ‘बरोबर‘ की ‘चूक‘ ते लिहा : 5
1) लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो.
उत्तर- हे विधान बरोबर आहे. |
2) मानव हा समाजशील प्राणी नाही.
उत्तर- हे विधान चूक आहे. |
3) बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत.
उत्तर- हे विधान चूक आहे. |
4) तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो.
उत्तर- हे विधान बरोबर आहे. |
5) प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात.
उत्तर- हे विधान बरोबर आहे. |
प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही चार) [12]
1) पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते
2) ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे.
3) मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत.
4) दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे.
5) हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे.
6) निरक्षरता व दारिद्रय हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात.
1) पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते.
उत्तर-
① प्रदेशाच्या विकासावर तेथील हवामान व प्राकृतीक रचनेचा मोठा प्रभाव असतो. पर्वतीय प्रदेश हे उंचसखल असतात तेथे थंड हवामान आहे, उंच अनेक शिखरे बर्फाच्छादित असतात.
② पर्वतीय प्रदेशात प्रतिकुल भौगोलिक स्थिती असल्याने तेथे शेती व्यवसायाचा फारसा विकास झालेला नसतो. जलसिंचनाच्या सोयी विकसीत झालेल्या नसतात.
③ पर्वतीय प्रदेशात उंचसखलपणा तीव्र उतार यामुळे वाहतूक सुविधांचा देखिल फारसा विकास झालेला नसतो.
④ पर्वतीय प्रदेशात वाहतुकीच्या मर्यादा व शेतीसाठी प्रतीकुल परिस्थिती यामुळे मोठे उदयोगधंदे व व्यावसायासाठी येथे अनुकुल परिस्थिती उपलब्ध नसते.
⑤ पर्वतीय प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, अरण्ये, निकृष्ट मृदा, उंचसखलपणा, मोठया उदयोगधंदयाचा अभाव यासारख्या प्रतिकुल घटकांमुळे लोकसंख्या विरळ आढळते. उदा. रॉकी, हिमालय अँडीज पर्वतांचे प्रदेश.
2) ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे.
उत्तर- शहरी भागात आकर्षक घटक जास्त असल्याने तेथे लोकआकर्षित होत असतात.
① रोजगाराच्या संधी – शहरी भागात विविध औदयोगिकरणामुळे उदयोग व व्यवसायांचे प्रमाण जास्त असते. अशा प्रदेशात अनेक रोजगार व व्यवसायांच्या संधी उपलब्ध असतात. अशा भागात लोक स्थलांतर करतात. उदा. मुबंई
② शिक्षणाच्या सुविधा– शहरी भागात अनेक प्रकारच्या व विविध क्षेत्रातील शिक्षणदेणाऱ्या सुविधा असतात, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक विद्यार्थी, कुटुंब शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी स्थलांतर करीत असतात. उदा. पुणे
③आरोग्य सुविधा– शहरी भागात अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने तेथे गरजुलोक स्थलांतर करीत असतात. उदा. पुणे, मुबंई
④ मनोरंजनाच्या सुविधा– शहरी भागात अनेक कलाकारांसाठी, नाटयगृह, सिनेमागृह, क्रिडांगणे, मॉल, शॉपिंग मार्केट व कला अविष्कार दाखविण्यासाठी मुबलक प्रमाणात सोयी उपलब्ध असतात, त्यामुळे तेथे लोक आकर्षित होत असतात. उदा. पटणा
⑤ शहरी जीवनाचे आकर्षण– अनेक तरुणांना शहरी जीवनातील उच्च राहणीमाण, खाणपान या विषयी आकर्षत असल्याने लोक तेथे स्थलांतरीत होतात.
⑥ शहरी भागात पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, पायाभुत सोयीसुविधा, उच्च राहणीमान या सारख्या अनेक आकर्षक घटक असल्याने तेथे मोठया प्रमाणात असल्याने शहरी भागांकडे स्थलांतर वाढत आहे.
3) मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत.
उत्तर-
①मुख्य नगरांच्या सीमेलगत– महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नागरे, लहान शहरेकिंवा मोठी नगरी असतात अशा नागरी क्षेत्रास उपनगरे म्हणतात. त्यांची जडण घडण ही मोठया शहरांवर अवलंबुन असते.
② मुख्य शहरातील जागा टंचाई – मोठया शहरांत औदयोगीकरणामुळे, उदयोग व्यवसायांच्या भरभराटीमुळे दाटलोकसंख्या असते. अशा भागातील भूमी उपयोजन तेथील लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यास अपूर्ण असते त्यामुळे मुख्य शहरात मोठया प्रमाणात जमिन जागा टंचाई असते. त्यामुळे लोक शहराच्या जवळच्या प्रदेशात स्थलांतर करतात त्यातुन उपनगरांची वाढ होण्यास सुरवात होते.
③ जागेची भरमसाठ किंमत– महानगरांच्या भागात जागेच्या टंचाईमुळे जमिनीच्याकिंमती मोठया प्रमाणात वाढलेल्या असतात. याकिंमती सर्व-सामान्य, नोंकरदार यांना परवडणाऱ्या नसतात त्यामुळे असे लोक शहरांच्या सिमावर्ती भागातील उपनगरांकडे वळतात व उपनगरे विकसीत होऊ लागतात.
④ पायाभूत सुविधांवरील ताण– जास्त लोकसंख्येमुळे महानरातील वाहतूक सुविधा, शैक्षणिक सुविधा, पाणी पुरवठा, गटारी, वैद्यकीय सुविधां इ. ताण निर्माण झालेला असतो त्यामुळे अनेक गैरसोयी निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे अनेक लोक उपनगरांकडे वास्तव्य करण्यास पसंती देतात.
⑤ झालर क्षेत्रातील जागेची उपलब्धता– शहरी- ग्रामिण क्षेत्रात जागेची उपलब्धतता असल्याने लोक वास्तव्यासाठी उपनगरेकिंवा झालर क्षेत्राकडे वळतात त्यातुन उपनगराची वाढ होतांना दिसते.
4) दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे
उत्तर– दक्षिण अमेरिकाखंडात उद्योगांच्या विकासासाठी अनेक अवरोध घटक आहेत.
① पर्वतीय क्षेत्र– दक्षिण अमेरिकेच्या पूर्वकिनार पट्टीस समांतर उत्तर- दक्षिण दिशेत पसरलेला ॲडीज पर्वत आहे. हा पर्वतीय प्रदेश दुर्गम क्षेत्राचा असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे उदयोग स्थापन होवू शकत नाहीत.
② विषववृत्तीय हवामान- दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग, विषववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात मोडतो. हा प्रदेश ॲमेझॉन नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. त्यामुळे येथे उदयोग धंदयाना आवश्यक असे विस्तृत सपाट क्षेत्र, वाहतुक सोयी सुविधा नाहीत.
③ सदाहरीत घनदाट जंगले– दक्षिण अमेरिकेच्या कमी अक्षवृत्तांकडे विषववृत्तीय जंगलाचा प्रदेश असुन येथे घनदाट जंगले आहेत, हवामान दमट व रोगट आहे, या जंगलात मोठया प्रमाणात सरपटणारे व हीस्त्र प्राणी आहेत. या जंगलाच्या प्रदेशात दलदलीचे मोठे क्षेत्र आहे.
④ वाळंवटी प्रदेश – या खंडात सुमारे 1600 किमी चा जमिनीचा पट्टा व्यापणारे अटाकामा नावाचे वाळंवटी क्षेत्र आहे. या प्रदेशामुळे द. अमेरिका खंडातील पेरु व चिली या देशांच्या विकासावर परिणाम झालेला आहे.
⑤ बाजारपेठाचे प्रमाण कमी – या खंडात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्थानिक उदयोग व व्यापार तसेच बाजारपेठांचे प्रमाण कमी आहे.
⑥ तांत्रिकदुष्ट्रया कमी विकास– दक्षिण अमेरिकेत उरुग्वे, पारग्वे, ब्राझील, पेरु, व्हेनेझुएला, चिली, अर्जेटींना इ. देश तांत्रिक दुष्टया पुरेसे विकसीत नसुन त्यामुळे त्यांचा आर्थिक विकासही कमी आहे. तंत्रज्ञानाचा अभाव
या सर्व कारणांमुळे दक्षिण अमेरिका खंडातील उद्योग व व्यवसायांना अडसर झालेला आहे.
5) हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे.
उत्तर-
① हवाई वाहतुक सर्वात आधुनिक व वेगवान वाहतूकीचे साधन असल्याने वेळची बचत होते.
② जीवनावश्यक औषधांचा तातडीने पुरवठा करण्यास हवाई वाहतुक महत्वाची भूमीका बजावते
③ देशांच्या संरक्षण यंत्रनेतही हवाई वाहतूकीचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे.
④ अपघात, नैसर्गीक आपत्ती, आपत्कालीन स्थितीच्या वेळी मदत व बचाव कार्यात हवाई वाहतुकीस महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
⑤ जगातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औदयोगिक, व्यापारी महानगरे हवाई वाहतूकीमुळे जोडली गेलेली आहे. लोकांचे राहणीमान उंचावत असल्याने हवाई वाहतूकीची पसंती वाढली आहे.
⑥ तंत्रज्ञानातील बदलामुळे, व्यापारातील वाढत्या मागणीमुळे, जलद गतीमुळे, वेळेची बचत होत असल्याने हवाई वाहतूकीचे प्रमाण वाढत आहे.
⑦ नाशवंत उत्पादने, मौल्यवान उत्पादने, वजनाने हलक्या मालाची वाहतूक व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक यासाठी हवाई वाहतुकीचा वापर वाढत आहे.
6) निरक्षरता व दारिद्रय हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात
उत्तर-
① शिक्षणाचा अभाव – शिक्षणाचा अभावामुळे समाजात निरक्षरता व दारिद्रय वाढते यामुळे देशातील लोकांचे राहणीमाण, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा यांच्यावर परिणाम होतो.
② रोजगाराचा अभाव– निरक्षरता व दारिद्रय लोकांची बौध्दीक, व्यवसायीक क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो. निरक्षरता व दारिद्रय जेवढे जास्त तेवढे देशात विविध व्यवसायाचे व रोजगारांचे प्रमाण कमी असते. .
③ आर्थिक अडचण – निरक्षरता व दारिद्रयतेमुळे देशात व्यवसाय, रोजगार कमी असतात, त्याप्रमाणात देशाचा आर्थिक विकास मंदावतो. देशात रोजगाराचा अभाव निर्माण होतो. देशातील नागरीकांना व देशाला विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
④ मुलभुत सुविधांचा अभाव– आर्थिक अडचणीमुळे लोकांचे राहणीमान दर्जा कमी होतो, निम्न दर्जाचे राहणीमान होते, पायाभुत सोयीसुविधा अभाव निर्माण होतो व स्त्रियांचा समाजातील दर्जा देखील कमी होत असतो, म्हणजेच सामाजिक दुष्ट्रया देखिल देश मागे पडत असतो.
⑤ कुपोषण- निरक्षरता व दारिद्रयतेमुळे रोजगार कमी होतो, आर्थिक अडचणीमुळे पूरेशा अन्नाची गरज भागत नसल्याने कुपोशन सारख्या घटना घडतात.
या सर्व घटकांमुळे प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
प्रश्न 3. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) [9]
1) त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती
2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
3) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
4) मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग
5) मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल
1) त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती
त्रिकोणी वस्ती | वर्तुळाकार वस्ती |
1) दोन नदयांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्राकाठी अशा वस्त्यांची निर्मिती होत असते. | 1) एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला या वस्त्या आकार घेतात |
2) प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बांजूनी होत असते. | 2) केंद्राच्या आसपास गोलाकार स्वरूपात वस्तीची निर्मिती व वाढ होते |
3) या वस्तीस नैसर्गिक मर्यादा असल्यास एका दिशेने वाढ होत जाते. | 3) या प्रकारात पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरांची रचना गोलाकार जवळजवळ असतात. |
4) या प्रकारच्या वस्तीत संगमामुळे,किंवा समुद्रामुळे संरक्षण मीळण असते. | 4) या प्रकारची वस्ती संरक्षणासाठी किंवा अन्य सोयीसाठी उपयोगी असते. |
2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
विस्तारणारा मनोरा | संकोचणारा मनोरा |
1)विस्तारणाऱ्या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असतो तर शीर्षाकडे तो निमुळता होत जातो. | 1)संकोचणाऱ्या मनोऱ्याचा तळ संकुचित असतो, तर शीर्षाकडे ते विस्तारलेला असतो. |
2) या मनोऱ्यानुसार वाढत्या वयोगटानुसार मृत्युदरही वाढतो असा अर्थ होतो. | 2) या मनोऱ्यानुसार वृध्दांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या कमी आहे असा अर्थ होतो. |
3) हा मनोरा जन्मदर व मृत्युदर जास्त आहे सांगतो. | 3) हा मनोरा जन्मदर व मृत्युदर अगदी कमी दर्शवतो |
4) या मनोऱ्यानुसार 0 ते 15 वयोगटातील बालकांचे प्रमाण जास्त व वध्दांचे प्रमाण कमी आहे दर्शवीतो | 4) या मनोऱ्यानुसार बालकांचे प्रमाण कमी व वृध्दांचे प्रमाण जास्त आहे असे समजते. |
3) ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्युदर
ढोबळ जन्मदर | ढोबळ मृत्युदर |
1) एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात | 1) एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मूत्यु पावलेल्या आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला ढोबळ जन्मदर म्हणतात |
2) ढोबळ जन्मदर लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमीका बजावतो. | 2) ढोबळ मृत्युदराची जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात भूमीका असते. |
3) ढोबळ जन्मदर हा वाढता असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढत असते. | 3) जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी अथवा जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी अथवा जास्त होते. |
4) ढोबळ जन्मदराचे प्रमाण कमी असलेले देश विकसीत असतात तर ढोबळ जन्मदराचे प्रमाण जास्त असलेले प्रदेश विकसनशील किंवा अविकसीत असतात. | 4) अविकसतील देशात ढोबळ मृत्यूदर जास्त आढळतो. तर विकसीत देशात मृत्युदराचे प्रमाण कमी असते. |
5) सन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ जन्मदर जास्त असलेला देश नायजर (46.5) आहे. तर ढोबळ जन्मदर कमी असलेला प्रदेश ग्रीस (8.2) आहे | 5) सन 2017 ची आकडेवारी नुसार ढोबळ मृत्युदर जास्त असलेला प्रदेश ग्रीस (11.6) आहे. तर मृत्युदर कमी असलेला प्रदेश भारत (7.2) आहे. |
4) मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग
मोठे उदयोग | मध्यम उदयोग |
1) भारतात रु 10 कोटींपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उदयोगात केली जाते असे उद्योग मोठे उदयोग या वर्गात मोडतात. | 1) मध्यम उदयोगातील गुतंवणूक 5 कोटींपेक्षा जास्त परंतु 10 कोंटीपेक्षा कमी असते असे उदयोग मध्यम उदयोग या वर्गात मोडतात. |
2) या श्रेणीत लोहपोलाद उदयोग, ऊर्जा उदयोग, वस्त्र उदयोग या प्रकारच्या उदयोगांचा समावेश होतो. | 2) या श्रेणीत सायकल बनवविणे, दूरदर्शन संच, रेडिओ बनविणे इ. प्रकारच्या उदयोगांचा समावेश होतो. |
3) या उद्योगांमध्ये इतर उद्योगांना लागणारे साहीत्य देखिल तयार होत असते उदा. लोहपोलाद | 3) या श्रेणीतील उदयोगात ग्राहकोपयोगी उत्पादने निर्मिती होत असते. उदा. औषधी, कागद निर्मिती |
4) या श्रेणीतील बरेच उदेयाग सार्वजिनीक श्रेतात मोडतात. | 4) या श्रेणीतील सर्व उदयोग खाजगी श्रेणीत मोडतात. |
5) मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल
मानवी भूगोल | प्राकृतिक भूगोल |
1) ही भूगोलाची मुख्य शाखा असुन यात मानव व नैसर्गिक घटक यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. | 1) प्राकृतीक भूगोल देखिल भूगोल विषयाची मुख्य शाखा आहे. या शाखेत पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. |
2) मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक, राजकीय व ऐतिहासिक, भूगोल इ. शाखा आहेत. | 2) प्राकृतिक भूगोलाच्या भूरुपशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल, मृदाशास्त्र इ. शाखा आहेत. |
3) मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध व त्याचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची यांचा सखोल अभ्यास करुन त्यांचा कार्यकारण भाव सांगितला जातो. . | 3) प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटकांत स्थळ व काळपरत्वे असणाऱ्या भिन्नतेचा कार्यकारणभाव अभ्यासला जातो. |
प्रश्न 4. (अ) दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा): 6 [11]
1) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश.
2) भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर.
3) आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश.
4) संयुक्त संस्थानांतील गवताळ प्रदेश.
5) दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश.
6) युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा.
7) आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट.
(8) उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट.


(ब) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा 5

प्रश्न :
1 )युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ?
उत्तर- लंडन हे युरोप खंडातील प्रमुख आंररराष्ट्रीय विमानतळ आहे.
2) दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?
उत्तर- ट्रान्स-सैबेरीयन लोहमार्ग (मॉस्को ते व्हॅलाडीओस्टाँक) हा लोहमार्ग दोन खंडाना जोडत आहे.
3) कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?
उत्तर– अंटार्टीका खंडात कायमस्वरुपी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
4) कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?
उत्तर-पनामा कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो.
5) आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा?
उत्तर– जोहान्सबर्ग हे अफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
प्रश्न 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) : 12
1) स्थलांतरित शेती.
2) कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण.
3) संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व.
4) भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे.
5) भूगोलातील आधुनिक कल
1) स्थलांतरित शेती.
उत्तर-
स्थलांतरित शेती हा शेतीचा आदिम प्रकार आहे. मानवाने अन्नधान्य पिकविण्याचा केलेला पहिला प्रयत्न या शेतीतून दिसून येतो. हा शेतीप्रकार आजही त्याच्या मूळस्वरूपात जगात विविध भागात अस्तित्वात आहे.
या शेतीमुळे मोठ्या प्रमाणात होणारे मृदा अपक्षरण, जमिनीचे अवनती (Degradation), मौल्यवान जंगल संपत्तीचा ऱ्हास, प्राणी जीवनावर होणारा विपरीत परिणाम, मोठ्या प्रमाणातील मानवी श्रमाची आवश्यकता व त्या तुलनेत मिळणारे कमी उत्पादन या गुण वैशिष्ट्यांमुळे या शेतीस ‘हानीकारक शेती’ असेही म्हणतात.
————————-
स्थलांतरित शेतीची वैशिष्ट्ये :-
① या शेती प्रकारात वनांतील भूभागाची शेतीसाठी निवड केली जाते. प्रामुख्याने ही शेती पर्वतीय उतार व जंगल प्रदेशात केली जाते.
② शेतीच्या या प्रकारात जंगल कटाई करून त्याला जाळून शिल्लक राहिलेली राख खत म्हणून मृदेत मिसळतात.
③ शेतीचा आकार लहान, साधारणतः 0.5 ते 1 हेक्टरपर्यंत असून शेते विखुरलेल्या स्वरूपात असतात.
④ काठी आणि फावडे यासारख्या पारंपरिक अवजारांचा वापर शेतीच्या कामासाठी केला जातो.
⑤ शेतीची सर्व कामे हाताने केली जातात.
⑥ या शेती प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडिक कालावधी दीर्घ असतो.
⑦ शेतीतून मिळणारे उत्पादन गरज भागविण्यास पुरेसे नसते. त्यामुळे शिकार, मासेमारी व जंगलातील फळे व कंदमुळे गोळा करणे इ. जोड व्यवसाय केले जातात.
वितरण- विषुववृत्तीय प्रदेशांतील वनांखालील जमीन, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इ. प्रदेशात स्थलांतरीत शेती आढळते.
2) कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण.
उत्तर-
यामध्ये कृषीवर आधारित, सागरी उत्पादनावर आधारित, खनिजावर आधारित व प्राण्यांवर आधारित उद्योगांचा समावेश होतो, ते उद्योग पुढीलप्रमाणे –
① कृषी उत्पादनावर आधारित उद्योग –
या उद्योगात प्रामुख्याने कृषी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदा. या उद्योगात साखर कारखाने, कापड उद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो.
② सागरी उत्पादनावर आधारित उद्योग –
या उद्योगात सागरातून मिळणाऱ्या मत्स्योत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदा. या उद्योगात मासे हवाबंद डब्यात भरणे, माशांपासून तेल काढणे, खारवीणे, वाळविणे तसेच शंख, मोती, शिंपले, या सारख्या शोभेच्या वस्तू तयार करणे इ. उद्योगांचा समावेश होतो.
③ वनांवर आधारित उद्योग –
या उद्योगात जंगलातून मिळणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया करून उत्पादन मिळविले जाते. उदा. लाकडावर आधारित कागद उद्योग, जहाजबांधणी उद्योग, इमारतीसाठी, जळण्यासाठी, अवजारे, खेळणी, फर्निचर, इ. व्यवसाय चालतात. तसेच जंगलातून फळे, कंदमुळे, राळ, लाख, डिंक, मध, मेण, कात, रंग, वंगण, औषधी तेल, सुगंधी द्रव्ये, इ. पदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो.
④ खनिजांवर आधारित उद्योग
या उद्योगात खाणकाम व्यवसायातून मिळणाऱ्या खनिजांवर आधारित उत्पादनाचा समावेश होतो. उदा. या उद्योगात प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, लोहपोलाद आणि अॅल्युमिनियम, इ. उद्योगांचा समावेश होतो.
5) प्राणीजन्य पदार्थांवर आधारित उद्योग –
हे उद्योग पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनावर किंवा कच्च्या मालावर आधारित असतात. या उद्योगातून मिळणाऱ्या दुध, मांस, लोकर, हाडे, शिंगे, केस, कातडी, इ. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यावर आधारित उद्योगांचा यामध्ये समावेश होतो.
उदा. दुधापासून पावडर, दही, चीज. चॉकलेट, आईसक्रिम, लोणी, तूप, इ. पदार्थ. तसेच मांस प्रक्रिया उदयोग, लोगर उदयोग इ.
3) संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व.
उत्तर-
संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे. ज्ञान, माहीती व संदेश यांची देवाण-घेवाण म्हणजे संदेश वहन होय. संदेश वहनात माहीती व संदेशाचे आदान प्रदान होते.
संदेश वहनाची साधने – टपाल, भ्रमणघ्वनी, दुरध्वनी, फिल्म, रेडियो, टीव्ही, छापील माहीती, ईमेल, फॅक्स, माहितीचे स्रोत, प्रसारण, फोटोग्राफ, छायाचित्रे, हवामान अंदाज, खनिज संशोधन, कृत्रिम उपग्रह, इ.

संदेश वहनाचे महत्व-
① संदेशवहन संप्रेषणाच्या माध्यमातुन ज्ञान माहीती चे आदानप्रदान करणे सोयीचे होते.
② अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिक उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम करत मोठया प्रमाणावर मानवी विकासासाठी लाभदायी ठरत आहेत.
③ शेती, उदयोग, व्यापार, शिक्षण, करमणुक, क्रिडा व वाहतूक क्षेत्रात संदेश वहनाचे महत्व अतिशय महत्वाचे ठरत आहे.
④ संदेशवहनाच्या विविध माध्यमांमुळे सध्याच्या काळात कमीत-कमी वेळात लांखोलोकांच्या संपर्कात राहता येते.
⑤ हवामानाचे अंदाज, जागतीक घडामोडी संदेशवहनामुळे अल्पावधित मिळतात.
⑥ जनजागृती, अंधश्रध्दा निर्मुलन, यासाठी संदेशवहनाचे माध्यमे प्रभावी होत ठरत आहेत.
⑦ प्रादेशिक विकासासाठी संदेशवहन महत्वाची भूमीका बजावत आहे.
क्रमश:- यापुढील उत्तरे लवकरच अपलोड करण्यात येतील
4) भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे.
उत्तर–
प्राकृतिक घटक स्थान,
उठाव,
उंची,
साधनसंपत्ती उपलब्धता,
लवचीकता
मानवी घटक – कुशल मजूर, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठांची उपलब्धता
5) भूगोलातील आधुनिक कल
उत्तर-
संदेशवहनाच्या सुविधा,
GIS व GPS,
संगणक प्रणाली,
नोकरीच्या संधी,
व्याप्ती
———————————–
प्रश्न 6. (अ) खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा : (4) [8]
खाणकाम: खनिजांचा वापर
मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांच्या वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसारअनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले.मानवाने समुद्र आणि महासागरांच्या तळातूनसुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखादया ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इ. घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे.
प्रश्न :
1) मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत?
2) प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे?
3) खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे?
(4) खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही?
प्रश्न 6. ( ब) सुबक आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन): 4
1) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची / सेवांची तरतूद.
2) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा.
3) भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण.
————————————
प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) : 8
1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणांसह स्पष्ट करा.
2) प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा.

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र 1 सर्वेक्षणाव्दारे माहिती गोळा करणे : ॲपच्या साहय्याने सर्वेक्षण
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप
Vidya babasaheb ukhale, chhan Mahiti
vry nice
Super
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
Nice
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
Nice 👍
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
Thanks for you
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
Thanks for you
Nice
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]
[…] HSC July 2024 Geography Question Paper and Answer Sheet […]