HomeMoreChoose the correct option

Choose the correct option

Choose the correct option

योग्य पर्याय निवडा


अचुक पर्याय निवडा


लोकसंख्या संक्रमणातील खालीलपैकी ऋणात्मक वाढीचा टप्पा कोणता

    अ) पहिला टप्पा

    ब) तिसरा टप्पा 

    क) चौथा टप्पा

    ड) पाचवा टप्पा 

उत्तर- ड) पाचवा टप्पा 

लोकसंख्या संक्रमण संक्रमणातील पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा आहे


लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते

    अ)  अतिशय स्थिर टप्यात

    ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्प्यात

       क) कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्यात

    ड) ऋणात्मक वाढीच्या टप्प्यात

उत्तर- ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्प्यात

 आरंभीच्या काळात विस्तारणाऱ्या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पन्न वाढलेले असते


* खालीलपैकी कोणते क्षेत्र कमी लोकसंख्येचे असावे

    अ) गंगा नदी खोरे

    ब)  मसिसीपी नदी खोरे

       क)  ॲमेझॉन नदीचे खोरे

    ड) हो- यांग- हो नदी खोरे

उत्तर- क)  ॲमेझॉन नदीचे खोरे

  ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कमी लोकसंख्येचे क्षेत्र आहे


पूर्वीच्याकाळी या वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला

    अ) हवाई वाहतूक

    ब)  रेल्वे वाहतूक

    क)  सागरी वाहतूक

    ड)  रस्ता वाहतूक

Choose the correct option उत्तर- क)  सागरी वाहतूक

 सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला


* लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला देश

    अ)  लाटविया

    ब) संयुक्त अरब अमिरात

       क) रशिया

    ड) इस्टोनिया

उत्तर- ब) संयुक्त अरब अमिरात

 संयुक्त अरब अमिराती देशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे


 * यापैकी कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या जास्त असते

    अ) विस्तारणारा मनोरा

    ब) संकोचणारा मनोरा

       क) स्थिरावलेला मनोरा

    ड) यापैकी एकही नाही

उत्तर- ब) संकोचणारा मनोरा

 संकोचनाऱ्या मनात बुद्धांची संख्या जास्त असते


* साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला प्रदेश

अ) पूर्व व आग्नेय आशिया 

ब) उत्तर अमेरिका

क) दक्षिण आशिया

ड)  युरोप

उत्तर- क) दक्षिण आशिया

दक्षिण आशिया प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे


* यापैकी ग्रामीण भूमी उपयोजनाचे कोणते वैशिष्ट्य आहे

    अ) संस्थात्मक क्षेत्र

        ब) सीमांकित भूखंड

        क) संमिश्र भूमी उपयोजन 

    ड) कायमस्वरूपी गायरान व  चराऊ जमीन

उत्तर- ड) कायमस्वरूपी गायरान व  चराऊ जमीन

 कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन हे ग्रामीण उपयोजन भूमी उपयोजनाचे वैशिष्ट्य आहे


सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा खंड

    अ)  आशिया

       ब)   आफ्रिका

    क)   युरोप

    ड)   अंटार्टीका

उत्तर- अ)  आशिया

आशिया खंडाची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.


पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक क्षेत्र

    अ)  न्यु इंग्लड

    ब)   पर्थ

    क)  जर्मनी 

    ड)   इटली

उत्तर- क)  जर्मनी 

जर्मनी हे पश्चिम युरोपातील प्रमुख औदयोगिक क्षेत्र आहे


योग्य पर्याय निवडा Choose the correct option


* लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक

    अ)   शेती

    ब)   हवामान

    क)   पाण्याची उपलब्धता 

    ड)   मृदा

उत्तर- अ)   शेती

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा शेती हा मानवी घटक आहे


* लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांत या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते

    अ)  पहिला टप्पा

    ब)   दुसरा टप्पा

    क)   तिसरा टप्पा

    ड)   चौथा टप्पा

उत्तर- अ)  पहिला टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते


*  लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो

    अ)   दुसरा टप्पा

    ब)  तिसरा  टप्पा

    क)   चौथा टप्पा

    ड)   पाचवा टप्पा

उत्तर- ड)   पाचवा टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पाचवा टप्पा हा 0 वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो


* लोकसंख्या वयोरचना मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून  शिर्षाकडे तो निमुळता होत आहे याचा अर्थ…..

    अ)  जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी

    ब)   जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी

    क)   जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी

    ड)   जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त

उत्तर- ड)   जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त

लोकसंख्या व रचना  मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शिष्याकडे तो निमुळता होत जातो याचा अर्थ जन्म व मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत असा होतो


*  स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे

    अ)   लिंग-गुणोत्तर

    ब)    वयोरचना

    क)   साक्षरता

    ड)   व्यवसायिक संरचना

उत्तर- अ)   लिंग-गुणोत्तर

स्त्री व पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय


*  देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस काय संबोधतात.

              अ)   निरक्षर

              ब)   साक्षर

              क)   तज्ञ

              ड)   अडाणी

उत्तर- ब)   साक्षर

 देशात ज्या व्यक्तीस लिहिता-वाचता आणि गणिती प्रक्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस साक्षर म्हणतात


*  भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने या व्यवसायात गुंतलेली आहे

              अ)  चतुर्थक

              ब)   तृतीय

              क)   द्वितीय

              ड)   प्राथमिक

उत्तर- ड)   प्राथमिक

भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून येथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे


* लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांत या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते

    अ)  पहिला टप्पा

    ब)   दुसरा टप्पा

    क)   तिसरा टप्पा

    ड)   चौथा टप्पा

उत्तर- अ)  पहिला टप्पा

लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पहिल्या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते


*  काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते.

              अ)   बाह्य स्थलांतर

              ब)   दीर्घकालीन स्थलांतर

              क)   हंगामी स्थलांतर

              ड)   सामाजिक स्थलांतर

उत्तर- क)   हंगामी स्थलांतर

 काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर हंगामी स्थलांतर म्हणून ओळखले जाते.


*  एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन अथवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते.

अ)  आयताकृती वस्ती

ब)   आकारहीन वस्ती

ड)   रेषीय वस्ती

उत्तर- ड)   रेषीय वस्ती

एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा कालव्याला लागून रेषीय वस्त्या आढळतात


*  दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात.

अ)   आकारहीन वस्ती 

क)   वर्तुळाकार वस्ती

ब)   त्रिकोणी वस्ती

क)   रेषीय वस्ती

ड)   आयताकृती वस्ती

उत्तर- ब)   त्रिकोणी वस्ती

दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्राकाठी त्रिकोणी वस्त्या आढळतात


*  प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतले आहे असे शेतीखालील क्षेत्र

अ)   चालू पड जमीन

ब)  पिकाऊ अनुत्पादक जमीन

क)   कायमस्वरूपी गायरान व सराव जमीन

ड)   निव्वळ लागवडीखालील क्षेत्र

उत्तर- ड)   निव्वळ लागवडीखालील क्षेत्र

 प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतले आहे अशा शेतीखालील क्षेत्रास निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणतात.


*  अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात.

अ)   संस्थात्मक  क्षेत्र

ब)   निवासी क्षेत्र

क)   औद्योगिक क्षेत्र

ड)   मनोरंजना खालील क्षेत्र

उत्तर- क)   औद्योगिक क्षेत्र

अशी जमीन जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजिविकेसाठी काम करतात अशा क्षेत्रास औद्योगिक क्षेत्र म्हणतात


* एका निश्चित घटकांच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश

              अ)   कार्यात्मक प्रदेश

              ब)  प्राकृतिक प्रदेश

              क)   औपचारिक प्रदेश

              ड)   राजकीय प्रदेश

उत्तर- क)   औपचारिक प्रदेश

एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय



योग्य पर्याय निवड Choose the correct option


*  ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे उपयोजन येथे आढळते

    अ)   मनोरंजनाखालील क्षेत्र

    ब)   ग्रामीण नागरी झालर क्षेत्र

    क)   संस्थात्मक शेत्र

    ड)   व्यापारी क्षेत्र

 उत्तर- ब)   ग्रामीण नागरी झालर क्षेत्र


 ग्रामीण व नागरिक असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात आढळते

* उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे

    अ)   समशीतोष्ण सूचिपर्णी वने

    ब)   समशीतोष्ण पानझडी वने

    क)   उष्णकटिबंधीय पानझडी वने

    ड)   विषुववृत्तीय सदाहरित वने

उत्तर- ड)   विषुववृत्तीय सदाहरित वने


  विषुवृत्तीय सदाहरित वनांमध्ये उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करण्याचा व्यवसाय होतो. 

मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती

अ)   दंतुर किनारे, उथळ समुद्र,  उष्ण हवामान, प्लवकांची वाढ   

ब)   उथळ समुद्रउष्ण- थंड  सागरी प्रवाह यांचा संगमप्लवकांची वाढ, थंड हवामान

क)   भूखंड मंच, प्लवक वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान

ड)   भूखंड मंच,  दंतुर किनारा,  प्लवकांची वाढ, थंड हवामान

उत्तर- ब)   उथळ समुद्रउष्ण- थंड  सागरी प्रवाह यांचा संगमप्लवकांची वाढ, थंड हवामान

मासेमारीसाठी सर्वोत्तम स्थिती म्हणजे उथळ समुद्र, उष्ण –  थंड सागरी  प्रवाहांचा संगम, प्लवकांची वाढ , थंड हवामान ही आहे


*  अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय

              अ)   लाकूडतोड

              ब)   मासेमारी

              क)   खाणकाम

              ड)   शेती

उत्तर- क)   खाणकाम

 अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय म्हणजे खाणकाम व्यवसाय होय


विस्तृत व्यापारी शेतीचे वैशिष्ट्ये

अ)   एक पिक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंधीय, धान्य उत्पादन

ब)   एक पिक पद्धती, यंत्रांचा वापर, उष्णकटिबंधीय, धान्य उत्पादन

क)   एक पिक पद्धती, मानवी श्रमाचा वापर विश्ववृत्त थायलंड, उद्यान शेती

ड)   एक पिक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन

उत्तर- ब)   एक पिक पद्धती, यंत्रांचा वापर, उष्णकटिबंधीय, धान्य उत्पादन

 विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये म्हणजे एक पिक पद्धती, यंत्रांचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन  हे होय


* प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चामाल म्हणून या व्यवसायात वापरले जातात व त्यापासून पक्का  माला तयार केला जातो

              अ)   प्राथमिक आर्थिक क्रिया

              ब)   व्दितीयक आर्थिक क्रिया

              क)   तृतीयक आर्थिक क्रिया

              ड)   चतुर्थक आर्थिक क्रिया

उत्तर- ब)   व्दितीयक आर्थिक क्रिया

 प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चामाल म्हणून व्दितीयक आर्थिक क्रिया यांच्या व्यवसायात वापरले जातात


*  औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते.

              अ)   विशेष आर्थिक क्षेत्र

              ब)   वाहतूक क्षेत्र

              क)   बाजारपेठ क्षेत्र

ड)   व्यापारी क्षेत्र

उत्तर- अ)   विशेष आर्थिक क्षेत्र

औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्राची  किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते 


* मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवन शैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो

              अ)   निसर्गवाद

              ब)   संभाव्यवाद

              क)  पर्यावरणवाद

              ड)  थांबा व जा निसर्गवाद

उत्तर- ब)   संभाव्यवाद


  • या पैकी कोणत्या जंगलातील लाकूड टणक असते.

अ) सूचीपर्णी वने

ब) उष्ण कटीबंधीय पानझडी

क) मोसमी वने

ड) उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने

उत्तर- ड) उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने


मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे असलेले देश-

अ) भारत व श्रीलंका

ब) जपान व चीन

क) अफ्रिकेतील देश

ड) रशिया व युक्रेन

उत्तर- ब) जपान व चीन



 Choose the correct option

अधिक वाचा

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

20 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page