HomeMoreBaravi bhugol pratyakshik 1 sarvaekshan

Baravi bhugol pratyakshik 1 sarvaekshan

Baravi bhugol pratyakshik 1 sarvaekshan kase karave

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण कसे करावे

Baravi bhugol pratyakshik 1 sarvaekshan

सर्वेक्षणाव्दारे माहिती गोळा करणे ॲपच्या साहय्याने सर्वेक्षण


       भूगोलात विविध प्रकारची सांख्यिकीय माहिती अभ्यासली जाते, ज्यात हवामान, भूरचना, लोकसंख्या, भूमी उपयोजन स्थलांतर, शहरांपासूनचे अंतर, रस्त्यांची लांबी, आरोग्य इ. घटक आहेत यासाठी अशा घटकांच्या माहिती संकलनाचे कार्य भूगोल अभ्यासकाला करावे लागते.

उद्देश-  सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करणे व सर्वेक्षणाचे आयोजन करणे.

उद्दीष्टे  1) सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट व व्याप्ती ठरविणे.

        2) उत्कृष्ट प्रश्नावलीची वैशिष्टये समजून घेणे.

        3) सर्वेक्षणासाठी एक चांगली प्रश्नावली तयार करणे.

सर्वेक्षणाची Kml / PDF डाऊलनलोड केल्यावर त्यावरुन सर्वेक्षणाची विदा प्राप्त होईल.  

सर्वेक्षणाच्या आकडेवारी / विदेवरुन खालील प्रमाणे विविध मुद्दयांचे अनुशंगाने आपणास विदेचे विश्लेषण करता येईल


1) नमुना सर्वेक्षणातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर-

केलेल्या 15 कुटुबांच्या सर्वेक्षणातील एकूण पुरुष व स्त्रियांची संख्या शोधून त्यावरुन लिंग गुणोत्तर काढणे.

एकुण पुरुषएकुण स्त्रियाइतरएकूण
2119040

निष्कर्ष– नमुना सर्वेक्षणातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 905 असुन ते 1000 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ दर हजार पुरुषांच्या प्रमाणात स्त्रियांची संख्या कमी आहे. हे गुणोत्तर चांगले माणले जात नाही.


2)  नमुना सर्वेक्षणाची स्त्री-पुरुष वयोरचना-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील सदस्यांच्या लिंग व वयाचा विचार करुन लोकसंख्येचा मनोरा तयार करणे.

वयोगट (वर्षात)स्त्री ()पुरुष ()एकूण(अ+ब)  
0-10112
10-15235
15-20145
20-30404
30-406511
40-505510
50-60033
60+000
एकूण192140

निष्कर्ष- वरील मनोऱ्यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळत आहे. म्हणजेच अवलंबित्वाचे प्रमाण कमी आहे. या मनोऱ्यात वृध्दांचे वयोगटाचे प्रमाणही कमी दिसते. याचा अर्थ सर्वेक्षित कुटुबांमध्ये वैदयकीय खर्चाचे प्रमाण कमी असणार आहे.


3) कुटूंब संदस्याचा शैक्षणिक स्तर-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबातील सदस्यांच्या शैक्षणिक स्तराचे विश्लेषण करणे-

प्राप्त शैक्षणिक पात्रतापुरुषांची संख्या (अ)स्त्रिंयाची संख्या (ब)एकुण    (अ+ ब)
निरक्षर022
प्राथमिकपेक्षा कमी101
प्राथमिक022
उच्च्‍ प्राथमिक112
माध्यमिक628
उच्च्‍ माध्यमिक268
पदवीधर7411
पदव्युत्‍426
पदव्युत्तरपेक्षा जास्त000
एकूण211940

निष्कर्ष- सर्वेक्षण नमुन्यातील केवळ 5% लोकसंख्या निरक्षर आहे. तसेच पदव्युत्तर पेक्षा पुढील शिक्षण कोणाचेही नाही.पुरुषांमध्ये शिक्षणाचे सरासरी प्रमाण जास्त आहे. तर पदवी स्तरावर शिक्षणाचे प्रमाणही पुरुषांचे जास्त आहे. 


4) कुटुंबाचा पेशा / रोजगार / व्यवसाय

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबप्रमुखांच्या व्यवसायाचा विचार करुन विभाजीत वर्तुळ तयार करुन विश्लेषण करणे व्यवसायाची टक्केवारी चे विश्लेषण करणारा स्तंभालेख

निष्कर्ष- सर्वेक्षित आकडेवारीवरुन असे लक्षात येते की, एकूण कुटुबांपैकी प्राथमिक व्यवसायात 33.33% लोक गुंतलेले आहेत. तर व्दितीयक व्यवसायात 13.33% लोक गुंतलेले आहेत तर तृतीय व्यवसायात सर्वात जास्त म्हणजे 53.33% लोक गुंतलेले आहेत. तसेच अकार्यशील घटक या ठिकाणी नाहीत.


5) कुटुंबाचे उत्पन्न-

केलेल्या 15 कुटूबांच्या सर्वेक्षणातील कुटुंबाचे उत्पन्नाचे विश्लेषण करणे

निष्कर्ष-  सर्वेक्षित कुटुंबात सर्वच प्रकारचे उत्पन्न गटातील कुटुंब आढळून येतात. 50000 पेक्षा कमी उत्पन्न गटात 13.33  कुटूंब आहेत, तर 50001 ते 1000000 या श्रेणीत सर्वेक्षित कुटुंबापैकी 80 कुटूंब येतात. तर दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न गटात केवळ 6.67कुटुंब आहेत.


6) कुटुंबाचे रहात्या घराच्या स्वरुपाचे विश्लेषण-

सर्वेक्षण केलेल्या 15 कुटुंबाचे राहत्या घराचे विश्लेषण करणे. 

निष्कर्ष- सर्वेक्षण केलेल्या कुटुबांपैकी 6.67% कुटुबांकडे पत्र्याचे घर आहे.  बंगला व फ्लॅट मध्ये राहणारे कुटूंबाची टक्केवारी 20 असुन उर्वरीत सर्व कुटूंब हे इतर प्रकारच्या घरांमध्ये राहत असल्याचे दिसत आहे. 


7) वाहतूकीच्या साधनांच्या वापरानुसार कुटुबांची टक्केवारी-

निष्कर्ष-  सर्वेक्षण केलेल्या कुटुंबामध्ये वाहन नसलेले एकही कुटुंब नाही. तर 6.67% कुटूंबाकडे सायकल असुन 73.33% कुटूंब हे दुचाकी वाहनाधारक आहेत. 20%  कुटूंबाकडे चारचाकी वाहन आहे.


8) घरात स्वच्छतागृह असलेल्या कुटुबांची टक्केवारी

निष्कर्ष-  सर्वेक्षित कुटुंबामध्ये स्वच्छातागृह नसणाऱ्याचे प्रमाण नाही. तर तात्पुरत्या स्वरुपाचे स्वच्छतागृह असणाऱ्योची टक्केवारी 6.67 आहे.  उर्वरीत सर्वांकडे पक्क्यास्वरुपाचे स्वच्छतागृह आहेत.


Baravi bhugol pratyakshik 1 sarvaekshan

टप्पा 1 : –

विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले अॅप डाउनलोड करून स्वतःला नोंदवून घ्यायचे आहे. अॅपमधून सर्वेक्षणाचे काम सुरू करायचे आहे.

टप्पा 2 :-  

किमान 15 कुटुंबांचे सर्वेक्षण करायचे आहे. ही कुटुंबे शक्यतोवर एकाच भागातील असावीत, पण घरांमध्ये 20 मीटरचे अंतर असावे. शहरी भागांमध्ये एकाच बिल्डिंगमधील अनेक कुटुंबे घेऊ नये. एका बिल्डिंगमधले एकच कुटुंब घ्यावे. त्यांची सगळी माहिती अॅप मधील प्रश्नांच्याद्वारे तुम्ही गोळा करायची आहे. नवीन काही प्रश्न तुम्हीही जोडू शकता. सगळी 15 कुटुंबे झाल्यावर जमा झालेल्या माहितीची फाइल डाउनलोड करा.

टप्पा 3 :-

 ही फाइल डाऊनलोड केल्यावर प्राप्त झालेल्या विदेचे विश्लेषण करायचे आहे. यासाठी प्रात्यक्षिकात शिकवल्या जाणाऱ्या आणि मागील इयत्तात शिकवलेल्या सर्व आकृत्यांचा आधार घ्यायचा आहेत: मनोरा, आलेखांचे प्रकार, इत्यादी. हे विश्लेषणाच्या साहाय्याने व शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विश्लेषण करून निष्कर्ष काढावेत. सदर अहवाल – हस्तलिखित अथवा टायपिंग करून पूर्ण झाल्यावर आपल्या शिक्षकाकडे दिवाळीच्या सुट्टीअगोदर सोपवायचे आहे. हे विश्लेषण हार्डकॉपी (कागदावर) असणे आवश्यक आहे. हे तीन टप्पे पूर्ण झाल्यावरच तुमचे कार्य पूर्ण समजले जाईल.






एच.एस.सी. बोर्ड प्रश्नपत्रिका


पायरी 1 :

गुगल प्लेस्टोरमधून बालभारतीचे ‘जिओ सर्व्हे अॅप’ डाऊनलोड करून घ्या. सदर अॅपवर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा, विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, सर्वे करण्यासाठी तुम्हांला शिक्षकांचा परवलीचा कोड क्रमांक वापरायचा आहे. तुमच्या विषय शिक्षकाकडून हा क्रमांक घ्या. हा क्रमांक अॅपमध्ये भरल्यावर तुम्हांला तुमच्या शाळा / कॉलेजची माहिती दिसेल. ती तपासून होकार दया. आता तुम्हांला तुमचे सर्वेक्षण करता येईल. सर्वेक्षण करताना GPS (भौगोलिक स्थान निर्धारण) चे बटण सुरू ठेवावे.

पायरी 2  :-

    सर्वेक्षणासाठी मराठी किंवा इंग्रजी यांपैकी एक भाषा प्रतिसाद देण्यासाठी निवडावी. प्रत्येक सर्वेक्षणानंतर तुम्ही तुमचे सर्वेक्षण save करू शकता किंवा सर्व्हरला सादर (submit) करू शकता किंवा तुम्ही सर्व सर्वेक्षण एकत्रितरित्याही सर्व्हरला सादर करू शकता. save किंवा submit करण्यापूर्वी प्रतिसादकासोबत तुमचा selfie काढा. लक्षात घ्या तुम्ही एकदा तुमचे सर्वेक्षण सादर केले की तुम्हांला पुन्हा त्या सर्वेक्षणात बदल करता येणार नाही.

पायरी 3 :-

 तुम्ही पंधरा कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून सव्र्व्हरला सादर केल्यावर अॅपवरून Kml आणि . Excel file ही तुम्हांला पुढील विश्लेषणासाठी उपयोगी पडणार आहे. ‘Kml file’ चा वापर ‘गुगल अर्थ’ किंवा ‘भुवन’ या वेबसाईटच्या आधारे सर्वेक्षित घरांचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे. या दोन्ही डाऊनलोड केलेल्या फाईल्स तुम्ही संगणकावर घेणे आवश्यक आहे. कारण संगणकावरून हे काम करणे जास्त सुलभ होणार आहे.

पायरी 4 :-

 तुम्ही डाऊनलोड केलेली एक्सेल फाईल संगणकावर उघडा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ती उघडल्यावर तुम्हाला जमवलेल्या माहितीचा तक्ता दिसेल. असे किमान दोन तक्ते (sheets) या फाईलमध्ये असतील. पहिल्या तक्त्यात तुम्ही सर्वेक्षित केलेल्या कुटुंबाची माहिती मिळेल तर दुसऱ्या तक्त्यात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची माहिती मिळेल.



अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

अधिक वाचा

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

सागरी लाटांचे कार्य

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. खूप छान माहिती आहे सर, शिकवण्यासाठी आम्हाला उपयोगी पडते .धन्यवाद🙏

  2. परिसरात पूर्वक उत्तम प्रकारे मांडणी करून प्रात्यक्षिकातील गणिती क्रिया व आकृत्या सहज समजेल अशा स्वरूपात मांडल्यात सर खूप खूप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page