Homeबारावीबारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया भौगोलिक कारणे लिहा

बारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया भौगोलिक कारणे लिहा

बारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया भौगोलिक कारणे लिहा.

बारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया भौगोलिक कारणे लिहा.


12th GEOGRAPHY STANDARD ECONOMIC ACTIVITIES Write the geographical reasons.


प्रश्न –

1) उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते.

2) सुती वस्त्रोदद्योगाच्या स्थानिकीकरणावर हवामान व बाजारपेठ हे घटक प्रभावी आहेत.

3) धनबाद या खनिजबहूल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात

4) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उदयोग स्थापित झालेले आढळतात.

5) दक्षिण अमेरिकेतली उदयोंगाच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?

6) मध्य ऑस्ट्रेलियात उदयोंगाचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत.

7) उद्योगांच्या स्थानिकीकरणावर नाशवंत कच्च्या मालाचा प्रभाव पडतो.

8)  साखर कारखाने ऊस क्षेत्राच्या परिसरातच उभारले जातात.


उत्तर :

① ज्या प्रदेशात उद्योगाधंदयाच्या स्थापनेसाठी आवश्यक घटक जास्त प्रमाणात असतात अशा प्रदेशात उदयोगधंदयाचा जास्त प्रमाणात विकास झालेला असतो.  

② विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल उदा. कृषिक्षेत्र, खनिज क्षेत्र, वनक्षेत्र, हे सर्वत्र सारखे नाही, त्यांचे वितरण असमान आहे.  

③ प्रतिकूल हवामान, वाहतूक सूविधांचा अभाव, पर्वतीय प्रदेश अशा प्रतिकूल घटकामुळे काही प्रंदेशामध्ये उदयोगधंदयाना फारशी चालना मिळालेली नसते.

④ उद्योगधंदयांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक उदा. प्राकृतिक, मानवी व इतर घटक हे प्रत्येक प्रदेशात सारख्या प्रमाणात उपलब्ध असतातच असे नाही. तसेच लोकसंख्या सर्वत्र समान वितरीत नाही व मानवी क्रयशक्ती प्रत्येक प्रदेशात समान नाही. तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही.

⑤ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उद्योगांचे वितरणही असमान असते.


उत्तर :

① सुती वस्त्रोद्योगात सरकी काढणे, कापूस पिंजणे, सूत कातणे व सूत विणणे या प्रमुख क्रिया आहेत.

② त्यांपैकी सूत कातणे व वस्त्र विणणे या दोन प्रमुख क्रियांसाठी दमट हवामान लागते. कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटतो, मात्र दमट हवामानात सूत कातणे व वस्त्र विणणे सोपे जाते. म्हणूनच बहुतांशी सुती वस्त्रोदयोग हे पूर्वी किनारपट्टीच्या दमट हवामानाच्या प्रदेशात केंद्रित झालेले आढळतात. उदा. मुंबई, सुरत, न्यु इंग्लड

③ मात्र सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंत्रांच्या सहाय्याने कारखान्याच्या अंतर्गत भागात कृत्रिम स्वरूपात दमट हवामान निर्माण करता येते.

④ कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल मजुरांची आवश्यकता असते. जिथे मोठया संक्ष्योने व स्वस्त दरात मजूर शक्ती सहज उपलब्ध असते अशा मोठया शहरात सुती वस्त्रोदयोग स्थापन उपलब्ध होतात.

⑤ दाट लोकसंख्येचे प्रदेश सुती वस्त्रोदयोगाच्या उत्पादनास मोठी बाजारपेठ मिळवून देतात.

⑥ कापूस व तयार कापडाच्या वाहतूकीसाठी जवळ-जवळ सारखाच खर्च येतो त्यामुळे स्वस्त मजुरांसाठी सुती वस्त्रोदयोग हा दाट लाकसंख्येच्या ठिकाणी (शहरात) किंवा बाजारपेठेजवळच केंद्रित झालेला दिसतो.


3) धनबाद या खनिजबहूल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.

उत्तर– ① धनबाद हे भारतातील छोटा नागपुरच्या खनिजबहूल क्षेत्रात वसलेले एक औदयोगिक क्षेत्र आहे. 

②  भारतातील छोटा नागपुरच्या पठारावर लोह खनिज, मॅगनीज तसेच कोळशाच्या खाणी आहेत.

③ लोहपोलाद उदयोग हा वजन घटीत कच्च्यामालावर आधारीत उदयोग आहे. म्हणजे लोहपोलाद निर्मीती साठी कच्च्या मालावर प्रक्रिया करतांना जास्त वजनाच्या खनिजांची (कच्च्या मालाची) आवश्यकता असते व त्यातुन निर्माण होणारा पक्का माल हा कमी वजनाचा असतो.

④ अवजड कच्च्या मालाच्या वाहतूकीसाठी तसेच जास्‍त अंतराच्या वाहतूकीसाठी वाहतुक खर्च जास्त लागतो उदा. कोळसा, लोहखनिज इ.  वाहतूक

⑤ तयार होणारे लोहपोलाद लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वजनापेक्षा वजनाने कमी असल्याने असे उदयोग कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापन करणे सोईचे असते.

⑥ त्यामुळे लोहपोलाद निर्मीती साठी लागणारे लोहखनिज, मॅगनीज, कोळसा हे धनबाद या खनिजबहूल क्षेत्रात उपलब्ध असल्याने तेथेच लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आहेत.


उत्तर-

① उद्योगाची स्थान निश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते.

② नाशवंत, वजनात घट होणाऱ्या कच्च्यामालावर आधारीत उदयोग कच्चामाल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन करणे योग्य असते.

③ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फणस, कोकम, काजु, ताग, नारळ, राणमेवा सारख्या फळांचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असते.

④ फळे नाशवंत असल्याने त्यांच्यावर प्रक्रिया करणे व ते हवाबंद डब्यात डब्यात भरणे याक्रिया त्वरित होणे गरजेचे असते. म्हणुन कोकणातील उत्पादीत फळांवर त्वरील प्रकीया करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दुष्ट्रीकोणातुन कोकणात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित झालेले आढळतात.


उत्तर-

पर्वतीय क्षेत्र–  दक्षिण अमेरिकेच्या पूर्वकिनार पट्टीस समांतर उत्तर- दक्षिण दिशेत पसरलेला ॲडीज पर्वत आहे. हा पर्वतीय प्रदेश दुर्गम क्षेत्राचा असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे उदयोग स्थापन होवू शकत नाहीत.

ॲमेझॉन नदी खोरे-  दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदी खोऱ्याने व्यापलेला असून हा प्रदेशत विषववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात मोडतो. त्यामुळे येथे उदयोग धंदयाना आवश्यक असे विस्तृत सपाट क्षेत्र, वाहतुक सोयी सुविधा नाहीत.

घनदाट जंगले–  दक्षिण अमेरिकेच्या कमी अक्षवृत्तांकडे विषववृत्तीय जंगलाचा प्रदेश असुन येथे घनदाट जंगले आहेत, हवामान दमट व रोगट आहे, या जंगलात मोठया प्रमाणात सरपटणारे व हीस्त्र प्राणी आहेत.  या जंगलाच्या प्रदेशात दलदलीचे मोठे क्षेत्र आहे.

वाळंवटी प्रदेश – या खंडात सुमारे 1600 किमी चा जमिनीचा पट्टा व्यापणारे अटाकामा नावाचे वाळंवटी क्षेत्र आहे.  या प्रदेशामुळे द. अमेरिका खंडातील पेरु व चिली या देशांच्या विकासावर परिणाम झालेला आहे.

कमी लोकसंख्या–  या खंडात लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्थानिक उदयोग व व्यापार तसेच बाजारपेठांचे प्रमाण कमी आहे.

तांत्रिकदुष्ट्रया कमी विकास– दक्षिण अमेरिकेत उरुग्वे, पारग्वे, ब्राझील, पेरु, व्हेनेझुएला, चिली, अर्जेटींना इ. देश तांत्रिक दुष्टया पुरेसे विकसीत नसुन त्यामुळे त्यांचा आर्थिक विकासही कमी आहे.

या सर्व कारणांमुळे दक्षिण अमेरिका खंडातील उद्योग व व्यवसायांना अडसर झालेला आहे.


उत्तर-

①  ऑस्ट्रेलिया खंडातील मध्य भागात ग्रेट ऑस्ट्रेलिय डेझर्ट हा 2700000 वर्ग किमी चा  मोठा वाळवंटी प्रदेश आहे.

हा प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. तेथे काही खारट व हंगामी सरोवरे आहेत

या प्रदेशातील जमिन नापिक असुन या प्रदेशात गोडया पाण्याची कमतरता आहे.

या प्रदेशातील हवामान उष्ण व कोरडे आहे व तापमान कक्षा ही जास्त आहे.

या प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या कमी आहे.

वाहतूक सुविधांचा अभाव आहे.

कच्च्या मालाचे स्त्रोत जवळ-जवळ नसल्या सारखे आहेत.  

या सर्व कारणांमुळे मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास झालेला नाही.


उत्तर :

① उद्‌योगांचे स्थान कच्च्या मालाच्या स्वरूपावर व गुणधर्मावर अवलंबून असते.

② ज्या उदयोगात वजनाने जड असलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने हलका असतो, अस उदयोग नेहमी कच्च्या मालाच्या क्षेत्रातच स्थापन करणे योग्य असते.

③ काही उ‌द्योगधंदयांना लागणारा कच्चा माल हा नाशवंत असतो. नाशवंत कच्च्या मालावर ठरावीक कालावधीत प्रक्रिया होणे जरुरीचे असते.

④ त्यामुळेच अशा नाशवंत कच्च्या मालावर आधारलेले उद्‌योगधंदे कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्रातच उभारले जातात. उदा., साखर कारखाने तसेच दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे.

⑤ त्याचप्रमाणे फळांवर प्रक्रिया करणारे अन्नप्रक्रिया उद्योगही फळनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात केंद्रित झालेले दिसतात.


उत्तर :

① ऊस हा वजन घटीत कच्चा माल आहे.

② उस तोडणी नंतर त्यातील शर्करेचे प्रमाण कमी-कमी होत जाते. त्यामुळे तोडणी नंतर उस 24 तासांच्या आत त्याची गाळणी होणे आवश्यक असते.

③ हा उदयोग वजन घटीत उदयोग आहे उसाच्या वजनापैकी फक्त 10 टक्के वजनाचे साखरेत रूपांतर होते. त्यामूळे उसाची वाहतूक लांबवर करणे जास्त खर्चाचे असते तसेच उत्पादन कमी होण्याची भिती देखिल असते.

④ उसाची वाहतूक ही साखरेच्या वाहतुकीपेक्षा अधिक खर्चाची असते. साखरेचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी साखर कारखाने ऊस क्षेत्राच्या परिसरातच उभारले जातात.



अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील टिपा लिहा

बारावी भूगोल व्दितीयक आर्थिक क्रिया वस्तूनिष्ठ प्रश्न

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objectiv


xii Practical cover


Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page