XII Geography Regions and Regional Development give reasons
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
Marathi and English Medium

प्रकरण 7 : प्रदेश व प्रादेशिक
कारणे दया
1) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. (Oct 2021, July 2023, Mar 2024)
2) निरक्षरता व दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. (July 2024, Mar 2025)
3) हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. (Oct 2021, July 2022, Mar 23 )
4) दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे एकमेव निदर्शक नाही.
5) कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदूभोवती केंद्रित झालेले असतात.
6) भौगोलिक स्थान प्रदेशाच्या विकासावर परिणाम करते.
7) प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी शासकीय धोरणांची आवश्यकता असते.
8) प्रदेशाला स्वतःची सीमा असते.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
1) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
उत्तर :
- प्रदेशाच्या विकासावर प्राकृतिक रचना, हवामान आणि मृदा यांसारख्या घटकांचा मोठा प्रभाव पडतो.
- सुपीक मृदा, अनुकूल व सौम्य हवामान आणि मुबलक पाऊस असलेल्या मैदानी प्रदेशात शेतीचा विकास होऊन व उद्योगांचा विकास वेगाने होतो.
- उंच पर्वतीय, दुर्गम डोंगराळ, वाळवंटी, शीत व दलदलीच्या तसेच घनदाट अरण्यांच्या प्रदेशात साधनसंपत्तीची कमतरता व सुगमतेचा अभाव असल्याने विकासाला अनेक अडथळे असतात त्यामुळे प्रादेशिक विकासाचा दर व वेग मंद असतो.
- रस्ते व लोहमार्गांच्या विकासासाठी सपाट भूभाग आवश्यक असतो, जो डोंगराळ भागात सहज उपलब्ध नसतो. वाहतूकीच्या अभावाने उदयोगधंदे विकसीत होवु शकत नाही त्यामुळे प्रादेशिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो
2) निरक्षरता व दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
उत्तर :
- प्रादेशिक विकासासाठी नैसर्गिक साधनांबरोबरच मानवी संसाधनाची गुणवत्ता महत्त्वाची असते.
- उच्च निरक्षरता व दारिद्र्य असलेल्या प्रदेशात मानवी कौशल्यांचा विकास होत नाही.
- उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य व इष्टतम वापर करता येत नाही.
- सामाजिक विषमता व आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे जीवनमान खालावते.
- परिणामी त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास खुंटतो.
3) हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही.
उत्तर :
- हिमालयीन प्रदेशात अतिशय उंच पर्वतरांगा, तीव्र उतार व दुर्गम भूभाग आढळतो.
- हिमालयीन पर्वतीय प्रदेशात वाहतूक व संदेशवहनाच्या सुविधा विकसित करणे कठीण आणि खर्चिक आहे
- विषम हवामान व प्रतिकूल परिस्थितीमुळे शेती, उद्योग व शहरीकरणास मर्यादा येतात.
- पायाभुत सुविधा निर्माण करण्यास नैसर्गिक रित्या अनेक अडचणी आहेत
- या नैसर्गिक अडथळ्यांमुळे हिमालयीन प्रदेशाचा विकास इतर मैदानी प्रदेशांच्या तुलनेत कमी झालेला आहे.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
——————————
4) दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे एकमेव निदर्शक नाही.
उत्तर :
- दरडोई उत्पन्न केवळ आर्थिक स्थिती दर्शवते.
- त्यावरून संपत्तीचे वितरण किंवा लोकांचे समाधान समजत नाही.
- साक्षरता दर, लिंग गुणोत्तर, आरोग्य सुविधा, शालेय नावनोंदणी व जीवनमान हे सामाजिक निदर्शक महत्त्वाचे असतात.
- मानवी विकास निर्देशांकासारख्या सर्वसमावेशक घटकांचा विचार करणे आवश्यक असते.
5) कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदूभोवती केंद्रित झालेले असतात.
उत्तर :
- कार्यात्मक प्रदेश एखाद्या विशिष्ट कार्यामुळे किंवा आर्थिक क्रियांमुळे एकमेकांशी जोडलेले असतात.
- या प्रदेशात एक मुख्य केंद्र असते, साधारणपणे शहर.
- वाहतूक, संदेशवहन व व्यापार प्रणालीद्वारे सभोवतालचा परिसर त्या केंद्राशी जोडला जातो.
- उदाहरणार्थ, पुणे शहराभोवतीची गावे दूध, भाजीपाला व मजूर पुरवतात आणि शहर त्यांना विविध सेवा पुरवते.
- त्यामुळे सर्व भाग एका केंद्रबिंदूभोवती कार्य करतात.
6) भौगोलिक स्थान प्रदेशाच्या विकासावर परिणाम करते.
उत्तर :
- लांब किनारपट्टी व नैसर्गिक बंदरे असलेल्या प्रदेशांचा सुलभ वाहतुक व्यवस्था व आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जलद विकास होतो.
- भूवेष्टित किंवा व्यापार मार्गांपासून दूर असलेल्या प्रदेशांना वाहतूक खर्च अधिक करावा लागतो. त्यामुळे व्यापार व उदयोगाला अडचणी निर्माण होत असतात.
- बंदरे, विमानतळ व दळणवळण सुविधा असलेल्या प्रदेशांना स्थानाचा आर्थिक लाभ मिळतो. अशा प्रदेशात उदयोग व व्यवसाय वाढीस लागतात त्यातुन प्रदेशाच्या विकासाचा वेग वाढत असतो.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
7) प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी शासकीय धोरणांची आवश्यकता असते.
उत्तर :
- जगात नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण असमान असल्याने काही प्रदेश प्रगत तर काही प्रदेशाचा तुलनेने विकास कमी असतो किंवा विकास होत नाही अशा परिस्थितीत शासनस्थरावरुन काही धोरणे ठरवुन कमी विकसीत भागासाठी काही सेवा व सुविधा पुरविण्यात येत असतात.
- खाजगी गुंतवणूक प्रामुख्याने पायाभूत सुविधा असलेल्या भागात होते. त्यामुळे अशा प्रदेशात विकासदर जास्त असतो. कमी विकास दर असलेल्या प्रदेशात शासन काही करसवलती देते व उद्योगांचा आकर्षित करते.
- मागास, डोंगराळ व दुष्काळी प्रदेशांसाठी शासन विशेष निधी, अनुदान व कर सवलती देते. व उदयोग व्यवसायांना चालना देत असते.
- उद्योगांचे विकेंद्रीकरण करून प्रादेशिक असमतोल कमी करणे हे शासनाचे प्रमुख धोरण असते.
8) प्रदेशाला स्वतःची सीमा असते.
उत्तर :
- प्रदेशाची ओळख त्यातील समान वैशिष्ट्यांवर आधारित असते.
- एका विशिष्ट मर्यादेनंतर ही वैशिष्ट्ये बदलतात.
- त्या मर्यादेनंतर दुसऱ्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सुरू होतात.
- सीमा प्राकृतिक, राजकीय किंवा प्रशासकीय स्वरूपाच्या असू शकतात.
- सीमांमुळे एका प्रदेशाला दुसऱ्या प्रदेशापासून वेगळे ओळखता येते.

English Medium
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
English Medium
Give Reasons
- Regional development depends on physical structure.
(Oct 2021, July 2023, Mar 2024) - Factors like illiteracy and poverty affect regional development.
(July 2024, Mar 2025) - The Himalayan mountainous region has not developed much.
(Oct 2021, July 2022, Mar 2023) - Per capita income is not the only indicator of regional development.
- Functional regions are concentrated around a central point.
- Geographical location affects the development of a region.
- Government policies are necessary to reduce regional imbalance.
- A region has its own boundary.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
1) Regional development depends on physical factors.
Answer:
- Physical features such as relief, climate, and soil have a strong influence on the development of a region.
- Plains with fertile soil, favourable and mild climate, and adequate rainfall support agricultural growth, which in turn accelerates industrial development.
- High mountainous, remote hilly, desert, cold, marshy, and dense forest regions face a lack of resources and poor accessibility; hence development faces many obstacles and progresses slowly.
- The development of roads and railways requires flat terrain, which is not easily available in hilly regions. Poor transport facilities hinder industrial growth and adversely affect regional development.
2) Factors such as illiteracy and poverty affect regional development.
Answer:
- Along with natural resources, the quality of human resources is crucial for regional development.
- In regions with high illiteracy and poverty, human skills do not develop adequately.
- As a result, available resources cannot be used properly and optimally.
- Social inequality and lack of health facilities lower the standard of living.
- Consequently, the overall development of the region is hindered.
3) The Himalayan mountainous region is not highly developed.
Answer:
- The Himalayan region has very high mountain ranges, steep slopes, and rugged terrain.
- Developing transport and communication facilities in this region is difficult and expensive.
- Uneven climate and adverse conditions limit agriculture, industry, and urbanisation.
- There are many natural difficulties in creating infrastructure.
- Due to these natural barriers, the Himalayan region is less developed compared to the plains.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
4) Per capita income is not the sole indicator of regional development.
Answer:
- Per capita income reflects only the economic condition of a region.
- It does not indicate the distribution of wealth or people’s satisfaction.
- Social indicators such as literacy rate, sex ratio, health facilities, school enrolment, and standard of living are also important.
- Therefore, comprehensive measures like the Human Development Index need to be considered.
5) Functional regions are centred around a central place.
Answer:
- Functional regions are interconnected due to a specific function or economic activities.
- Such regions have a main centre, usually a city.
- The surrounding area is linked to the centre through transport, communication, and trade systems.
- For example, villages around Pune supply milk, vegetables, and labour, while the city provides various services.
- Thus, all areas function around a common central place.
6) Geographical location affects the development of a region.
Answer:
- Regions with a long coastline and natural harbours develop rapidly due to easy transport facilities and international trade.
- Landlocked regions or those far from major trade routes incur higher transport costs, creating difficulties for trade and industry.
- Regions having ports, airports, and good communication networks gain locational advantages, leading to the growth of industries and faster regional development.
7) Government policies are necessary to reduce regional imbalance.
Answer:
- Natural resources are unevenly distributed; therefore, some regions are developed while others remain less developed, making government intervention necessary to provide services and facilities to backward areas.
- Private investment usually flows to regions with good infrastructure, resulting in higher growth there; hence the government offers tax concessions to attract industries to less developed regions.
- The government provides special funds, subsidies, and tax benefits to backward, hilly, and drought-prone regions to promote development.
- Decentralisation of industries is a major government policy to reduce regional imbalance.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे
8) A region has its own boundary.
Answer:
- The identity of a region is based on its common characteristics.
- Beyond a certain limit, these characteristics begin to change.
- After that limit, the characteristics of another region start.
- Boundaries may be physical, political, or administrative in nature.
- Due to boundaries, one region can be clearly distinguished from another.
XII Geography Regions and Regional Development give reasons
XII भूगोल प्रदेश आणि प्रादेशिक विकास भौगोलिक कारणे व उत्तरे

अधिक वाचा –
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
मार्च 2021 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका-
बारावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका- 1 गुण 80
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप
बारावी भूगोल महत्वाच्या मुद्दयांची लिंक असलेली Smart PDF डाऊनलोड करा
