प्रकरण 4
Primary Economic Activities Give Reasons
बारावी भूगोल प्राथमिक आर्थिक क्रिया मधील कारणे दया
भौगोलिक कारणे लिहा.
- भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
- विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
- उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा.
- भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
- कॅनडा मध्ये लाकूडतोडीचा विकास झालेला आहे.
- शिकारीवरी बंदी घालण्यात आलेली आहे.
- उष्ण कटीबंधीय सदाहरीत वनांच्या प्रदेशात मुबलक वृक्ष असुनही लाकूडतोड व्यवसाय विकसीत झालेला नाही.
- मोसमी हवामानाच्या प्रदेशातील वने नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.
- जगातील वनांचे प्रमाण झपाटयाने कमी होत आहे.
- जपान मध्ये मासेमारीचा विकास झालेला आहे.
- ऑस्ट्रेलिया, दक्षिण व उत्तर अमेरिकेत पशुपालन व्यवयाचा विकास झालेला आहे.
- खाणकामामुळे देशाच्या आर्थिक विकासातही वाढ होते.
Primary Economic Activities Give Reasons
How to solve Write the geographical reasons.
बारावी भूगोल प्राथमिक आर्थिक क्रिया मधील कारणे दया

1) भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
उत्तर-
1) भारतामधील सर्वसाधारण 70 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.
2) ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो.
3) भारतात द्वितीय, तृतीय व चतुर्थ व्यवसायाच्या प्रमाणात शेती या प्राथमिक व्यवसायाचाविकास कमी झालेला आहे.
4) देशातील बहुतांश लोक हे आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत.
त्यामुळे भारतात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो..
2) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
उत्तर-
① विस्तृत शेती 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशात केली जाते.
② या प्रदेशात विरळ लोकसंख्या व शेतजमिनीचा आकार मोठा असल्यामुळे या शेतीमध्ये शेतीची पेरणीपासुन काढणीपर्यन्त ची सर्व कामे यांत्रिक साधनांच्या साह्याने केली जातात.
③ विस्तृत व्यापारी शेतीत पिंकासाठी आधुनिक पद्धत, नवनवीन संशोधन, व्यवस्थापन व नियोजन अशा पध्दतींचा वापर केला जातो.
④ मोठया प्रमाणावर भांडवल गुतंवणुक, तंत्रज्ञानाचा वापर, खते, पाणीपुरवठ्याचा, साधनांचा व बियाणांचा वापर करुन जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा उद्देश असतो.
⑤ या शेतीतीतील दरडोई उत्पादन खूपच अधिक असते, त्यामुळे निघालेले उत्पादन निर्यातीवर भर जास्त असतो.
⑥ या शेतीतून निघणाऱ्या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो.
त्यामुळे विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा एक प्रकार आहे..
Primary Economic Activities Give Reasons
3) उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा.
उत्तर-
① उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमधील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक आहे
② उष्ण कटिबंधीय प्रदेशातील वने अधिक घनदाट असुन हवामान आहे व वाहतूक सुविधांची कमतरता आहे
③ त्यामुळे तेथे व्यापारी तत्त्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकला नाही.
④ परंतु समशीतोष्ण कटिबंधातील एकाच प्रकारचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात.
⑤ हे वृक्ष उंच व सरळ वाढतात तसेच यांचे लाकूड हे मऊ असल्यामुळे या लाकडाला अधिक मागणी आहे
⑥ लाकडाच्या वाहतूकीसाठी स्वस्त व सुलभ सुविधा उपलब्ध आहेत.
त्यामुळे उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसीत झालेला आहे.
4) भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
उत्तर-
① भारतातील छोटा नागपूरच्या पठारावर विपुल प्रमाणात खनिजांचे साठे आढळून येतात.
② यामध्ये प्रामुख्याने दगडी कोळसा, लोह खनिज, बॉक्साईट खनिजांचे प्रमाण अधिक आहे.
③ या प्रदेशात खाणीमध्ये काम करण्यासाठी स्वस्त व अधिक तसेच कुशल व अकुशल मजूर पुरवठा होतो.
④ त्याच प्रमाणे खाणकाम व्यवसायासाठी पोषक सरकारी धोरण, अधिक भांडवल गुंतवणूक आणि वाहतूक व यांत्रिक साधनांचा वापर यामुळे येथे खाणीवर आधारित विविध लोहपोलाद उद्योग, यांचे देखील केंद्रीकरण या भागात मोठ्या प्रमाणात झाले आहे.
⑤ त्यामुळे भारतातील छोटा नागपूर पठारावरून खाणकाम व्यवसाय अधिक विकसित झालेला आहे
5) कॅनडा मध्ये लाकूडतोडीचा विकास झालेला आहे.
उत्तर-
① कॅनडा हा देश समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात येतो.
② येथे सुचीपर्णी वनांचे क्षेत्र अधिक आढळते. या वनात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात.
③ या वनातील वृक्ष सरळ, उंच वाढतात व लाकूड मऊ असल्याने याला मागणीही खूप असते. वृक्षतोडीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो.
④ तोडलेल्या लाकडांसाठी स्वस्त व योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.
त्यामुळे कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे..
Primary Economic Activities Give Reasons
6) शिकारीवरी बंदी घालण्यात आलेली आहे.
उत्तर-
① मानवाकडून चारितार्थासाठी तसेच मांस, हाडे, लोकर, कातडी, केस, सुगंधी कस्तूरी, हस्तीदंत इ. मिळविण्यासाठी अतिप्राचीन काळापासून शिकार केली जात आहे.
② मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
③ काही प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
④ त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. व पर्यावरणाचे असंतुलन निर्माण होत आहे.
⑤ त्यामुळे जगभरात प्राण्यांच्या संरक्षण व सवंर्धनासाठी नवनवीन कायदे करुन शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
7) उष्ण कटीबंधीय सदाहरीत वनांच्या प्रदेशात मुबलक वृक्ष असुनही लाकूडतोड व्यवसाय विकसीत झालेला नाही.
उत्तर-
① उष्ण कटीबंधीय प्रदेशातील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक आहे.
② उष्ण कटीबंधीय वने घनदाट आहेत.
③ या वनात अनेक प्रकारचे वृक्ष दाटीवाटीने एकाच ठिकाणी वाढलेले असतात, त्यांची कटाई करणे अवघड आहे.
④ येथील हवामान अतिशय दमट व रोगट आहे, कार्यक्षमता कमी असते.
⑤ या प्रदेशात वाहतूक सुविधांचा अभाव आहे.
⑥ या वनांच्या प्रदेशात सरपटणाऱ्या प्रांण्याच्या शेकडो प्रजाती आहेत तसेच इतरही हीस्त्र प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे.
यामुळे उष्ण कटींबधीय सदाहरीत वनांच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय विकसीत झालेला नाही.
8) मोसमी हवामानाच्या प्रदेशातील वने नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.
उत्तर-
① मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात.
② या वनांच्या तळाशी अनेक झाडेझुडपे उगवलेले असतात.
③ मोसमी हवामान प्रदेशातील वने दाट वस्तींच्या प्रदेशांच्या सानिध्यात आहेत.
④ मानवी वस्तींच्या जवळ असल्याने वनातील जमिनी मोठया प्रमाणात शेतीखाली आणल्या जात आहेत त्यामुळे ही वने नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
9) जगातील वनांचे प्रमाण झपाटयाने कमी होत आहे.
उत्तर-
① जगात अनेक कामांसाठी हलक्या व वेगवेगळया प्रकारची लाकडाची मागणी वाढत आहे.
② फर्निचर, जळावू लाकूड, जहाज बांधणी, कागदी निर्मिती इ. विविध कारणांसाठी लाकूड अतिशय उपयुक्त आहे.
③ लाकडाची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी सर्रास वृक्षतोड सुरु असुन पर्यायी वृक्षांची लागवडीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.
④ त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाटयाने कमी होत आहे.
10) जपान मध्ये मासेमारीचा विकास झालेला आहे.
उत्तर-
① जपान मध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे.
② जपान जवळ क्युरोशियो उष्ण प्रवाह व ओयाशियो थंड सागरी प्रवाहांचा संगम असल्याने प्लवकांची वाढ मोठया प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी माशांची पैदास मोठया प्रमाणावर होते.
③ जपानला दंतुर किनारपट्टी व विस्तिर्ण समुद्रबुड जमिन लाभलेली आहे.
④ जपान मध्ये मासेमारीसारी साठी लागणारे अदययावत तंत्रज्ञान उपलब्ध् आहे.
⑤ शीतगृहांची उच्च व्यवस्था जपान मध्ये आहे त्यामुळे जपान मध्ये मासेमारीचा विकास झालेला आहे.
11) ऑस्ट्रेलिया, दक्षिण व उत्तर अमेरिकेत पशुपालन व्यवयाचा विकास झालेला आहे.
उत्तर-
① ऑस्ट्रेलिया, दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात डाऊन्स, पंपाज, प्रेअरी, सॅव्हाना व सेल्वाज हे विस्तुत क्षेत्र असलेले गवताळ प्रदेश निसर्गत: उपलब्ध आहेत.
② या प्रदेशात विस्तीर्ण कुरणे उपलब्धतेमुळे सदाहारीत व सखस चारा या प्रदेशात उपलब्ध आहे. उदा. अल्फाफा, ल्युकन क्लोव्हर्स चारा
③ पशुपालनासाठी या भागात अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन उच्च प्रतिच्या जनावरांची पैदास केली जाते.
④ कुरणांची शास्त्रोक्त देखरेख ठेवली जाते
⑤ पशुपालनासाठी आवश्यक यांत्रीकरणाचा वापर मोठया प्रमाणावर होतो.
⑥ पशुधनासाठी आवश्यक भांडवलाची व बाजारपेठांची सोय तसेच पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत.
12) खाणकामामुळे देशाच्या आर्थिक विकासातही वाढ होते.
उत्तर-
① खणिजांचा वापर मानव प्राचीन काळापासुन करत आलेला आहे. आणि या प्राथमिक आर्थिक क्रियेतुन मानवाची उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे.
② तंत्रज्ञानामुळे समुद्राच्या आणि महासागराच्या तळातूनसुध्दा खनिजांच्या उत्खनन करणे शक्य झालेले आहे.
③ तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणांमुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणावर विकसीत होत आहे त्यामुळे उत्पान्नात वाढ होत आहे.
④ खाणकाम क्षेत्राजवळ खनिजांशी संबंधित अनेक उदयोगधंदे स्थापित होत असतात. त्यामुळे व्यवसाय व रोजगार निर्मिती मोठया प्रमाणावर होत असते.
⑤ खाणकाम व्यवसायास विकसीत वाहतूक व्यवस्था निर्माण होत असते त्यामुळे प्रदेशाच्या व देशाच्या विकासात भर पडत असते.
⑥ यातुन उदयोगधंदयाच्या विकास होत असतो.
⑦ खनिजांच्या निर्यातीतुन मोठया प्रमाणावर परकीय चलन मिळत असते
पर्यायाने देशाच्या आर्थिक विकास होत असतो.


अधिक वाचा
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Write the geographical reasons.
1) Agriculture is a large business in India. Give Reason.
Answer-
1) About 70 percent of India’s population lives in rural areas.
2) Agriculture is the main occupation in rural areas.
3) In India, the development of agriculture as the primary occupation has been reduced to the extent of second, third and fourth occupations.
4) Majority of the people of the country are engaged in agriculture related businesses for their livelihood.
Therefore, agriculture is a large business in India.
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
Geography work is so nice
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]
[…] Primary Economic Activities Give Reasons […]