Online Test विदारण व विस्तृत झीज योग्य पर्याय निवडा
Online Test अकरावी भूगोल योग्य पर्याय निवडा
Online Test विदारण व विस्तृत झीज योग्य पर्याय निवडा
खडक तुटणे, फुटणे, खडकाची झीज होणे, खडकांना तडे पडणे किंवा खडकात कमकुवत पणा येणे यास विदारण म्हणतात.उतारावरून खाली घसरत जाणाऱ्या माती, डबर, खडक वगैरेंमुळे होणारी जमिनीची झीज ही ‘विस्तृत झीज‘ असते.
विदारण: अपक्षय क्रिया
ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते. त्याला खनन किंवा शरण म्हणतात.
झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात. या क्रियेस वाहन कार्य म्हणतात. वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात.
सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
विदारणाचे प्रकार :
१.कायिक विदारण
२.रासायनिक विदारण
३.जैविक विदारण
योग्य घटक ओळखा
किंवा
अचूक पर्याय निवडा
प्रश्न- विदारण व विस्तृत झीज प्रकरणातील योग्य पर्याय निवडा
खडकांचे प्रकार-
पृथ्वीवर अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक असे खडकांचे तीन प्रकार आढळतात.
① अग्निजन्य खडक ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसापासून अग्निजन्य खडक निर्माण होतात. हा पृथ्वीवरील प्रथम निर्माण झालेला खडक आहे.
② स्तरित खडक- पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान तुकडे होतात. ते वाहून नेले जाऊन अन्य ठिकाणी एकमेकांवर स्तरांच्या स्वरूपात संचयित होतात. या अवसादात अन्य जैविक घटकही मिसळले जातात. यावर प्रचंड दाब पडत असल्यामुळे व लुकण पदार्थांद्वारे स्तरित खडकांची निर्मिती होते.
③रूपांतरित खडक- रूपांतरित खडकांची निर्मिती ही अग्निजन्य आणि स्तरित खडकांवर प्रचंड दाब पडल्याने व उष्णता निर्माण झाल्याने होते.
खडक कसे तुटू शकतात? भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकांवर त्या भागातील हवामानाचा प्रभाव पडतो. पाणी, दाब, उष्णता इत्यादीमुळे खडकांचे खंडन होते. एकसंघ खडकापेक्षा जोड किंवा स्तर असलेले खडक सहज तुटू शकतात. सर्वसाधारणतः अग्निजन्य खडकापेक्षा स्तरित खडक सहज तुटतात.
विदारण :-
खडकांचे तुटणे फुटणे, खडक कमकुवत होणे यालाच खडकांचे विदारण म्हणतात. खडक तुटत्तात त्यातील कण सुटे होतात. यामुळे खडक कमकुवत बनतात. त्यात विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात. यालाच विदारण असे म्हणतात.
विदारण हे पाणी व तापमान यांच्या क्रियेतून घडून येते. विदारणामध्ये पदार्थांचे जागा बदलत नाही किंवा. विदारण प्रक्रिया ही एकाच जागेवरच घडते. विदारणामुळे खडक झिजतात, पृष्ठभाग विलग होतो व मूळ खडकाचा आकार व गुणधर्म बदलतो.
① गोठण-वितळण प्रक्रिया– जेथे दैनिक तापमान कक्षा उच्च असते अशा प्रदेशात भेगांमध्ये शिरलेले पाणी रात्रीच्या वेळी गोठते. दिवसाच्या कालावधीत त्यांचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते.
जेव्हा पाणी गोठते त्यावेळी त्याच्या आकारमानात वाढ होते. त्यामुळे खडकाच्या भिंतीवर याचा दाब पडून भेगा मोठया होतात. ही क्रिया सतत चालू राहिल्याने शेवटी खडक तुटतो. या प्रक्रियेला गोठण-वितळण प्रक्रिया म्हणतात.
② जलीय अपघटन – वालुकाश्म, कोनी वालुकाश्म आणि पिंडाश्म यांसारख्या स्तरित खडकाचे पाण्यामुळे सहज विलगीकरण होते. पाण्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. पाण्यातील रेणूंचा खडकात असलेल्या खनिजांशी संयोग घडून येतो. त्यामुळे होणाऱ्या विदारणास जलीय अपघटन असे म्हणतात.
③ द्रावीकरण – कायिक व रासायनिक विदारणासाठी मृदेत किंवा हवेत असलेले आर्द्रतेच्या स्वरूपातील पाणी महत्वाचे कार्य करते. पाण्यामुळे द्रावीकरणाद्वारे रासायनिक विदारण घडून येते. खडकातील काही खनिजे खडकातील पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळतात. या प्रक्रियेस द्रावीकरण असे म्हणतात.
2) उष्णता :
शुष्क हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे, विदारण प्रक्रिया तापमानातील बदलांमुळे घडून येते, उष्ण वाळवंटात तापमानाची दैनिक कक्षा अधिक असते. सूर्योदयानंतर तापमानात वाढ सुरू होते व खडक तापतात. खडकातील ही खनिजे तापमानवाढीस भिन्न प्रतिसाद देतात. म्हणूनच संपूर्ण खडक प्रसरण पावत नसून त्यातील काही खनिजे स्वतंत्ररीत्या प्रसरण पावतात. त्यामुळे खडकात ताण निर्माण होतो. हा रेणवीय ताण खडकाच्या विलगीकरणाचे मुख्य कारण आहे. औष्णिक फरकामुळे सातत्याने प्रसरण आणि आंकुचन पावून कणीय विदारणाची प्रक्रिया घडते. म्हणजेच खडकातील खनिज कण सुटे होतात.
3) जैविक विदारण :
सजीव प्राण्यांद्वारे होणाऱ्या क्रियांच्या परिणामामुळे खडकाचे विलगीकरण होते. झाडे आणि व त्यांची मुळे खडकांची झीज करतात. मृदेमध्ये वृक्षांची मुळे प्रवेश करतात आणि ती मुळे आकाराने मोठी होत जातात. ते खडकावरती दाब निर्माण करतात आणि भेगा अधिक रुंद व खोल करतात. शेवटी वनस्पतींची मुळे खडकांचे तुकडे करतात. काही वनस्पती या खडकांच्या फटीमध्ये वाढतात, ज्यामुळे त्या फटी अधिक रुंदावतात आणि शेवटी विलगीकरण घडून येते.
मानवनिर्मित विदारण :
मानव हा जैविक कारक असून त्याच्यामुळे नैसर्गिक विदारणाची वेग वाढतो. माणूस हा यांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने कमी वेळात मोठ्या प्रमाणात विदारण घडवून आणणारा प्रभावशाली घटक व कारक आहे.
खनिज उत्खनन, रस्ते, धरणे व इतर बांधकामांसाठी तो पृष्ठभागाचे विदारण करत असतो. डोंगराळ प्रदेशात सुरूंग लावले जातात. निसर्गतः विदारणाची प्रक्रिया होण्यास कदाचित हजारो ते अब्जावधी वर्षांचा कालावधी लागला असता. परंतु मानव तंत्र आणि यंत्राद्वारे ही प्रक्रिया काही महिन्यांत करतो.
विदारणाच्या प्रमाणाचा वेग वाढविण्यात हवा प्रदूषण साहाय्यभूत ठरते. वातावरणात कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांच्या ज्वलनातून रासायनिक घटक जसे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फरडाय ऑक्साईड इत्यादी बाहेर पडतात. जेव्हा त्या रासायनिक घटकांचे उष्णता व आर्द्रतेमुळे एकत्रिकरण होते. तेव्हा त्यांचे आम्लात रूपांतर होते व ते पृथ्वीवर आम्ल पर्जन्य स्वरूपात परत येतात. त्याच्या परिणामाने मोठ्या प्रमाणात काही प्रदेशांत हानी झाली आहे. काही प्रदेशांमधील चुनखडक व संगमरवरापासून बनविलेल्या ऐतिहासिक वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जगामधील महान स्मारके आणि शिल्पे याबाबत चिंता निर्माण झाली आहे. ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतातील ताजमहाल, आणि इजिप्तमधील स्फिंक्स यांचे नुकसान होत आहे.
खालील चौकटीवर क्लिक करुन पहिल्या प्रकरणावर आधारित online Test सोडवा.

Correct Option
अधिक वाचा

हवामान प्रदेश प्रकरणावरील online Test
भू हालचाली प्रकरणावरील online Test
10/8
nice work, 10/8
Thank you sir for this wonderful test 🙏.
I got 10/10 marks
10/3
अकरावी टेस्ट छान आहे
[…] […]
Thank u for test
Hi, good
11 vi test 10/10
11 vi test paper 10/10
Thank you 😊