On line Test Choose the Correct Option
On line Test Choose the Correct Option प्रकरण 1 भू हालचाली
योग्य पर्याय निवडा किंवा योग्य घटक ओळखा
On line Test Choose the correct option
One line Test प्रकरण 1 भू हालचाली – Choose the correct option
पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. ताण व दाब यांसारख्या बलामुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचे निरीक्षण करता येत नाही. असे असले तरी त्यांचे परिणाम मात्र आपण भूपृष्ठावर पाहू शकतो.
Choose the correct option
On line Test Choose the correct option XI Geography
भू-हालचालींचे पुरावे :
One line Test Choose the correct option XI Geography- निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात. ती नेहमी बदलत असतात. अशा पुराव्यावरून असे दिसून येते, की भू हालचालींमुळे पृथ्वीपृष्ठाच्या भागावर परिणाम होतो.
उदा.
A) सन 2004 मध्ये आलेल्या सुनामीनंतर, सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटिमीटर्सने वाढली.
B) हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय, हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती भू हालचालींमुळे झालेली आहे.
C) सन 1963 च्या नोंव्हेंबर मध्ये आईसलँडजवळ एक बेट समुद्रसपाटीच्या वर आल्याचे काही नावीक सांगतात. हे नावीक त्यावेळी त्या परीसरातुन जात असतांना त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहीली असल्याचे बोलण्यात येते.
D) मेगापोड नावाचे बेट तसचे इतर बेटे सुनामीनंतर लुप्त झाल्याचे लक्षात आले आहे.
E) मुंबई बेटाच्या जवळ माझगाव गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत.
वलीकरण :
भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे वेगवेगळया घटकांवर अवलंबून असते यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता बलाचा कालावधी इ. घटक महत्वाची भूमीका बजावतात.
वळयांची निर्मिती– मृदु व लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो. ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जालहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदा. हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज इत्यादी.
दाब निर्माणकारी बलामुळे लवचिक खडकाला वळ्या पडतात. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने ते लवचिक असतात. त्यांना वळ्या पडतात.
वलीचे भाग : भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते.
①जेव्हा मध्य भाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेस उतरतात, त्या वलीस अपनती वली म्हणतात.
② जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात.
वळी पर्वंताचे प्रकार–
1) प्राचीन वली पर्वत- 200 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले उदा. अरवली, उरल पर्वत व अॅपेलिशियन. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर 1722 मी. आहे.
2) अर्वाचीन वली पर्वत – सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले उदा. रॉकी व हिमालय. हिमालयाची सर्वोच्च उंची 8848 मी. आहे.
विभंग (प्रस्तरभंग) :
पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे, खडकांच्या स्तरांत ताण निर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात. तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. हे विस्थापन अधोगामी, उर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर असू शकते. त्यास विभंग म्हणतात
खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात.
प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वलीप्रक्रियेस जुमानत नाही. अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो. अशा खडकांच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असे म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंगप्रतल असे म्हणतात.
अशा विभांगाच्या दिशेत खडक एकवटतात. या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गट पर्वत व खचदरीसारख्या भूरूपांची निर्मिती होते.
① गट पर्वत :
कठिण खडकांमध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडून विभंग निर्माण होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास ठोकळा किंवा गट पर्वत म्हणतात.
अशाचप्रकारे दोन विभंगादरम्यानचा भाग स्थिर राहिल्याने व दोन्ही बाजूचा भाग खचल्याने देखील ही क्रिया घडते. गट पर्वताच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. त्यांचा माथा सपाट असून निर्मिती काळात त्यावर शिखरे नसतात.
उदा. भारतातील मेघालयाचे पठार, नर्मदा आणि तापी नदी दरम्यानचा सातपुडा पर्वत, जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व फ्रान्समधील व्हॉसजेस पर्वत.

② खचदरी :
भूकवचातील दोन सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. अशा खचलेल्या भागास खचदरी असे म्हणतात. खचदरीच्या भिंती या विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. खचदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात. बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती आकाराभिमुख असतात.
उदा. आफ्रिकेतील रीफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा व तापी या नद्यांच्या दऱ्या.
भूकंप :
‘भू’ म्हणजे जमीन व ‘कंप’ म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे. भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण विशिष्ट मर्यादपलीकडे गेल्यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. ज्या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्यामुळे भूकवच कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
‘भूकंपाचे केंद्र’ – भूकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्हणतात.
भूकंपाचे अपिकेंद्र – या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात. भूकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो. भूपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.
भूकंपनिर्मितीची कारणे :
भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने . भूकवचातील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते. भूकंप निर्मितीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1 ) ज्वालामुखी :
ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे भूकंपांची निर्मिती होऊ शकते. अशा भूकंपांचे केंद्र सहसा कमी खोलीवर असते. आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच यांचा परिणाम पाहावयास मिळतो.
उदा. 1981 साली कॅसकेड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्याच वेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता.
2) भूविवर्तनकी हालचालः
भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. सर्वसामान्यपणे मोठया भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दोन भूपटांच्या हालचालींमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एकदुसऱ्या खाली जाणे इत्यादी बाबी घडत असतात.
इंडोनेशिया, कॅलिफोर्निया (उत्तर अमेरिका) आणि चिली (दक्षिण अमेरिका) मधील भूकंप, भारतातील उत्तर काशी आणि आसाममधील भूकंप ही या प्रकारच्या भूकंपाची उदाहरणे आहेत.
3) मानवनिर्मित भूकंप :
अलीकडच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये अणुचाचण्या, बांधकामे, आण्विक स्फोट, मोठ्या प्रमाणावरील खोदकाम, सुरूंगाचा वापर, तसेच खाणकाम या मानवी क्रियांमुळे देखील भूकंपांची निर्मिती होते. परंतु त्यांचे परिणाम स्थानिक असतात.

अकरावी भूगोल मुल्यमापन पध्दती व प्रश्नपत्रिका स्वरुप
हवामान प्रदेश प्रकरणावरील online Test योग्य पर्याय निवडा


Good Test
Nice sir ji, 10/10
Good, 10 marks for me 11th arts
11th Science PCB group
10/10 marks I obtained
Nice work for students . Me gate 10 marks .
10/10 marks
Art
Very good for study
Very good for study online test
Online test is very good
Bhugol 11 vi[Art] nice work
Art
Gating 10 marks to me
Very good for study
[…] On line Test Choose the Correct Option […]
Good question
I am gating 10 of 10 marks
Very nice study online test
[…] On line Test Choose the Correct Option […]
Nice Test
Very nice test