प्रकरण 1 लोकसंख्या भाग 1
On Line Test योग्य पर्याय निवडा
On Line Test योग्य पर्याय निवडा
अचुक घटक ओळखा
योग्य पर्याय निवडा
अचुक घटक निवडा

अधिक वाचा
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप

होलसेल विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध संपर्क प्रा मनोज देशमुख 9421680541
अधिक माहीती
सामान्यतः जन्म व मृत्युदरास ढोबळ दर म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे हे दर सांगताना वयोरचना विचारात घेतलेली नसते. यात लोकसंख्येतील कोणता वयोगट प्रजननशील आहे हे विचारात घेतले जात नाही. तसेच प्रत्यक्ष जन्म आणि मृत्युदर सांगताना देशाच्या लोकसंख्येतील वयोरचना विचारात घेतली जाते. कारण जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटासाठी समान नसतो.
लोकसंख्येचे घटक :
लोकसंख्येचे सर्व गुणधर्म, जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. उदा. ग्रामीण-नागरी निवास, वय, लिंग-गुणोत्तर, वैवाहिक स्थिती इत्यादी. या घटकांच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी करता येते. यामुळे प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये सुस्पष्ट होतात.
लोकसंख्येची रचना :
लोकसंख्येच्या घटकांमुळे प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेचे सर्वसामान्य स्वरूप लक्षात येते. उदा. वयोरचनेच्या आधारे लोकसंख्येतील बाल, युवा, वृद्ध यांची टक्केवारी कळते. लोकसंख्येच्या या रचनेमुळे आपल्याला अवलंबित्वाचे गुणोत्तर समजते. यांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल हे लक्षात घेता येते किंवा याबद्दल निष्कर्ष काढता येतो.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील?
उत्तर- ① पौढ लोकांचे जास्त प्रमाण– या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही कमी असल्याने लोकसंख्या कमी असली तरी नागरिकांचे आयुर्मान दीर्घ असते त्यामुळे प्रौढ लोकांचे प्रमाण या टप्प्यात जास्त असते. युरोप खंडातील अनेक देशात प्रौए लोकांचे प्रमाण 66% आहे. तर 65 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण 20% आहे.
② बालकांचे कमी प्रमाण– जन्मदर कमी झाल्याने जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी असते.
③ नैसर्गिक लोकसंख्या वाढ थांबणे– या टप्पयातील काही देशात अनेक ठिकाणी जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झाल्याने नंतर लोकसंख्या नैसर्गिक लोकसंख्या वाढ थांबलेली आहे. 1990 नंतर युरोपातील अनेक देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत देशातील वृध्दांचे प्रमाण वाढते.
④ शिक्षण क्षेत्रावरील परीणाम– जन्मदर कमी झाल्याने काही भागात बालवाडया, शिशुविहार बंद होत आहेत तर मागणीत कायमची घट झाल्याने महाविदयाये व विदयापीठेही आपले काही भाग/कोर्स कमी करीत आहेत.
④ श्रमशक्तींचा मर्यादीत वापर– या टप्प्यात शिक्षणांचा दर्जा सुधारलेल्या असल्याने युवकांचे दिर्घकाळ शिक्षण घेण्यात वेळ जास्त गेल्याने देशाच्या श्रमपुरवठयात युवक उशिरा भाग घेतात, त्यामुळे देशाच्या औदयोगिक व आर्थिक क्षेत्राला आवश्यक श्रमपुरवठा मंद गतिने होतो
⑤ अवलबिंत्वाचे प्रमाण जास्त – साधारण पणे वृध्द हे दुसऱ्यांवर अवलंबुन असतात वृध्दांचे प्रमाण जास्त असल्याने अशा देशांत दुसऱ्यांवर अवलंबुन असणाऱ्या नांगरिकांचे प्रमाण जास्त असते.
⑥ ग्रामीण भागात समस्या प्रमाण जास्त– शहरीभागात महाविदयालये, विदयापिठे, दवाखाने, बँका आणि करमणूक केंद्रे इ. सुविधांमुळे ग्रामीण युवक शहरी भागात स्थलांतरीत होतो त्यातुन ग्रामीण रहिवासात वृध्दांचे जास्त प्रमाण वाढते. ग्रामीण शेती, इतर उदयोंगावर त्याचा परीणाम होवून ग्रामीण भागात अनेक समस्याना तोंड दयावे लागते.
⑦ शहरी भागातील समस्या– शहरी भागांचा औदयोगिकरण व इतर घटकांमुळे चांगला विकास झाला असल्याने विकासाबरोबर प्रदृषण, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, मानसिक ताणतणाव, सामाजिक व पर्यावरणीय समस्यांना या देशातील नागरिकांना तोंड दयावे लागते.
⑧ युवकांचे प्रमाण कमी– जन्मदर कमी असल्याने बालकांचे प्रमाण कमी असतेच नैसर्गिकरित्या युवकांचे प्रमाण कमीच असते त्यामुळे उत्पादीत घटक हा कमी असतो. युरोपातील अनेक देशांचा जन्मदर 0.5% पेक्षा कमी आहे. त्या तुलनेत जागतिक दर 1.4% आहे.
Test is best method of study
Khushi Santosh fandeker
10/10
Khushi Santosh fandeker
10/10
Nice Test 10/10
Test is very good 10 /10
good and great work sir ji
Ok
[…] On Line Test योग्य पर्याय निवडा […]
Online test so interesting.
Thank you
Nilesh वाणी, छान मार्गदर्शन
Nice Test 8/10
Ok
Manoj pujari class 12th