मानवी वस्ती व भूमी उपयोजन टिपा लिहा
Manavi Vasti ani Bhumi Upyojan Tipa Liha
- ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया.
- नागरी वस्तींच्या समस्या
- उपनगरे
- संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्र.
- लोकसंख्येच्या आधारावरुन नागरी वस्त्यांचे प्रकार –
- ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र-
1) ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया.
उत्तर-
① वस्त्यांचे ग्रामीण व नागरी असे प्रकार केले जातात. दोन्ही प्रकारच्या वस्त्यांमध्ये कोणते ना कोणते कार्य चालत असतेच.
② ग्रामीण भागात प्राथमिक व्यवसाय अधिक चालतो त्यामुळे ग्रामिण वस्त्यांमधुन भाजीपाला, अन्नधान्य, दुध, मांस, अंडी, फळे व फुले अशा प्रकारच्या वस्तुचा पुरवठा नागरी वस्त्यांना होत असतो.
③ ग्रामिण वस्तींमधुन उद्योगांना लागणारा अनेक प्रकारचा कच्चामाल नागरी भागातील उदयोगधंदयांना मिळत असतो
④ नागरी भागात उदयोगधंदे, व्यापार यांचे प्रमाण जास्त असल्याने व्दितियक, तृतीयक, व चतुर्थक व्यवसाय अधिक चालतो. नागरी भागातून तयार झालेला पक्का माल व विविध सेवा या ग्रामीण वस्त्यांना पुरवल्या जातात.
⑤ वाहतूक व पर्यटनासाठी ग्रामिण व नागरी भाग एकमेंकावर अवलंबुन असतात.
⑥ ग्रामीण भागातील लोक विविध कार्यासाठी, व्यापार करण्यासाठी नागरी वस्तीवर अवलंबून असतात.
⑦ नागरी भागातील शैक्षणिक व वैदयकीय सुविधा, प्रशासकीय कामकाज मनोरंजन, क्रिडा या सारख्या सेवासाठी ग्रामिण भागातील लोक नागरी भागावार अवलंबुन असतात.
⑧ नागरी भागातील उदयोगव्यवसायांसाठी स्वस्त व मुबलक मजुर पुरवठा हा ग्रामिण भागातुन होत असतो.
अशाप्रकारे ग्रामीण व नागरी वस्त्यांमध्ये आंतरक्रिया चालतात.
Manavi Vasti ani Bhumi Upyojan Tipa Liha
2) नागरी वस्तींच्या समस्या–
उत्तर-
नागरी वस्तीच्या वाढीबरोबरच नागरी वस्तीच्या समस्या मध्ये ही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्या समस्या खालील प्रमाणे आहेत.
① आर्थिक समस्या – नागरी भागात जास्तीच्या लोकसंख्येमुळे सर्वांनाच उदयोग, व्यवसाय किंवा रोजगार मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होते. जीवनाअवश्यक वस्तूची टंचाई निर्माण होवुन महागाई वाढते.
② सामाजिक समस्या – नागरी भागात येणारे लोकसंख्येचे लोंढे, वेगवेगळया विचारांचे व समुदायाचे असल्याने सर्वांचे विचार जुळतीलच असे नसते. त्यातुन प्रांतवाद, वर्चस्ववाद, राजकीय फायदे तोटे, जातीय वाद अशा बाबीतुन अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात.
③ सांस्कृतिक समस्या – नागरी वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांमुळे संस्कृतीक भिन्नता, भाषावाद, प्रांतवाद व धार्मिक वाद निर्माण होतो.
④ पायाभूत सोयी सुविधांची कमतरता – वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा, वीज व रस्ते, वैदयकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, अशा प्रकारच्या नागरी पायाभूत सोयी-सुविधांवर ताण निर्माण होतो. जागेच्या अडचणींमुळे झोपडपटटयांची निर्मिती होते त्यातुन अस्वच्छ परीसराचे प्रमाण वाढते.
⑤ पर्यावरणीय समस्या वाढते – नागरीकरणामुळे मोठया शहरांमध्ये जल, वायू, कचरा व ध्वनी इ. प्रकारचे प्रदूषण वाढत आहे.
⑥ प्रशासकीय समस्या – नागरी भागातील वाढत्या लोकसंख्येला प्रशासकीय सेवा सुविधा पुरविण्यात अडचणी येतात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते. अवैध धंदे वाढतात, वाहतूक कोंडी सारख्या समस्या निर्माण होतात.

3) उपनगरे
उत्तर-
① महानगरांच्या सीमावर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रात उपनगरे म्हणतात. उदा. भांडूप, कल्याण, विरार इ. मुंबई महानगराची उपनगरे आहेत.
② महानगरांच्या परिसरात व्यापार, उदयोगधंदे, शिक्षण आरोग्य व इतर आकर्षक घटकांमुळे ग्रामिण भागातील लोक स्थलांतर करीत असतात. यातुन अशा ठिकाणी दाट लोकवस्ती निर्माण होवुन जागेच्या समस्या निर्माण होत असतात पर्यायाने लोक शहरांच्या बाहेरील भागात वस्त्यांची निर्मिती करतात त्यातुन उपनगरे तयार होतात.
③ सर्व उपनगर मुख्यशहरांच्या विकासाच्या परिणामाने वाढलेले असतात. शहरात जागेच्या किंमती जास्त असतात त्यामुळे शहरांच्या बाहेरच्या भागात तुलनेने कमी किंमत असल्याने उपनगरांची निर्मीती होत असते.
④ उपनगरे आर्थिक व इतर कार्यासाठी मुख्य महानगरावर अवलंबून असतात.
⑤ उपनगरे ही मोठया व औदयोगिक शहरांना लागुन तयार होतात. पुणे शहराची वाकड, हिंजवाडी ही उपनगरे आहेत.
⑥ मुख्य शहर हे उपनगरांना रेल्वे, रस्ते व मेट्रो अशा प्रकारच्या वाहतूक सुविधांनी जोडलेले असतात. त्यामुळे उपनगरे कालांतराने मुख्य शहरांमध्ये विलीन होत जातात.
⑦ मुख्य शहरांप्रमाणे उपनगरांना प्रांतवाद, भाषावाद, पाणी टंचाई, वीज टंचाई प्रदुषणाच्या समस्या जाणवत असतात.
Manavi Vasti ani Bhumi Upyojan Tipa Liha
4. संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्र.
उत्त्तर–
① मानव ज्या ज्या कामांसाठी भूमीचा उपयोग करत असतो त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात. आणि मानव एकाच परीसरात अनेक व वेगवेगळया कामांसाठी भूमीचा वापर करील असेल तेव्हा ते समिश्री भूमी उपयोजन होते.
② संमिश्र भूमी उपयोजन हे नागरी वसाहतीमंध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळते.
③ नागरी भागात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मनोरंजन, क्रिडा, वाहतूक, व्यापारी क्षेत्र, संस्थात्कम क्षेत्र, अशा विविध बाबीसाठी भूमी उपयोजन आढळून येते.
④ नागरी भागात घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, खेळाचे मोकळे मैदाने, रस्ते, बसस्थानके, औदयोगिक इमारती एकाच ठिकाणी एकत्रीत असतात या भागात सर्व प्रकारचे सेवा व कार्य एकत्र आढळतात.

5) लोकसंख्येच्या आधारावरुन नागरी वस्त्यांचे प्रकार –
उत्तर-
अ) नागरी वस्त्यांचे लोकसंख्येच्या आधारावरून खालील प्रकार करता येतात.

1) नगर –
ज्या नगरी वस्तीची लोकसंख्या १,००,००० पर्यंत असते त्या वस्तीला नगर म्हणतात. नगरात विविध प्रकारची कार्य चालत असतात. तर ग्रामीण वस्तीची विकसित अवस्था म्हणजे नगर होय. तालुका व तालुक्यातील काही मोठ्या ठिकाणांचाही यात समावेश होतो. या प्रकारच्या वस्तीत शाळा, दवाखाने, पोस्ट ऑफिस, इ. सुविधा असतात.
2) शहर –
एक लाखापेक्षा जास्त व दहा लाकापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नागरी वस्त्यांना शहर असे म्हणतात. नगराची विकसित अवस्था म्हणजे ‘शहर‘ होय. नगरापेक्षा शहर आकाराने, लोकसंख्येने मोठे व विकसीत असतात शहरात नगरापेक्षा कार्याची विविधता जास्त असते. शहरे ही प्रशासन व्यापार, उच्चशिक्षण व दळणवळणाची केंद्रे असतात.
3) महानगरे –
जेव्हा शहराची लोकसंख्या 10 लाख ते 20 लाख दरम्यान असते तेव्हा त्या शहराला महानगरे किंवा दशलक्षी शहर असे म्हणतात. महानगरे ही व्यापारी केंद्रे, प्रशासकीय ठिकाणे, प्रादेशिक राजधानीची ठिकाणे असतात.
उदा. पुणे, नागपूर ही दशलक्षी शहरे आहेत.
4) महाकाय नगर-
सामन्यता ज्या शहरांची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त असते त्या शहरांना महाकायनगर / प्रमहानगर / अतिविशालनगर असे म्हणतात.
भारतातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व अनेक उपनगरे मिळून प्रमहानगर तयार झाले आहे. उदा. मुंबई शहर हे भारतातील सर्वात मोठे महाकायनगर आहे. न्यूयार्क, वाशिंग्टन, टोकियो, दिल्ली इ. हा जगातील महाकाय नगरे आहेत.
5) नगरांचा समूह – हा शहरीकिं वा त्यापेक्षा मोठया वस्त्यांचा पट्टा असतो किंवा समूह असतो यात प्रत्येक वस्तीची लोकसंख्या वीस हजारापेक्षा जास्त असते व सर्व वस्त्या एकमेंकांना लागुन असतात. त्याच्यांत कोणतही मोकळी जागा नसते.
6) बाहयवाढ नगर – वस्तींचा हा प्रकार एका मोठया शहराच्या अगदी जवळचा भाग असतो परंतु त्या शहराच्या बाहय सिमेवर विकसीत झालेला वेगळया वस्तीचा असतो. येथे या वस्तींच्या स्वत: च्या नागरी सुविधा असतात. उदा. सैन्य दलाची छावणी, शासकीय निवासी वसाहत, एखादया मोठया प्राजेक्ट किंवा उदयोगाच्या कामगाराची निवास व्यवस्था इ.
6) ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र-
उत्तर–
① ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात.
② या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. हे क्षेत्र वेगळे नसून या दोहोंमधील संक्रमण क्षेत्र असते.
③ या क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळते.
④ झालर क्षेत्राची रचना त्यामुळे गुंतागुंतीची असते. या भागात दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. उदा. ग्रामपंचायत आणि नगरपालिका.
⑤ झालर क्षेत्राजवळील नागरी क्षेत्र स्वतःची ओळख घालवून बसते. प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात.
⑥ या क्षेत्रात सोयी कमी दर्जाच्या असतात.
⑦ झालर क्षेत्रातील शेतीसाठी वापरात असलेली जमीन कालांतराने निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते.
⑧ या क्षेत्राची सरमिसळ ग्रामिण व नागरी अशा बाजूंनी झालेली असते. ग्रामीण-नागरी झालर क्षेत्रातून अनेक नागरीक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्यांच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात.

हे वाचा
मानवी वस्ती व भूमी उपयोजन प्रकरणावरील वस्तुनिष्ठ प्रश्न व उत्तरे
पहीली ते बारावी पर्यन्तचे पाठय पुस्तके डाऊलोड करा.
बारावी भूगोल मानवी वस्ती व भूमी उपयोजन प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल मानवी वस्ती व भूमी उपयोजन प्रकरणावरील फरक स्पष्ट करा.
Useful notes for School work
very nice