
Human Settlement and Land Use Give reasons
बारावी भूगोल मानवी वस्ती उपयोजन कारणे दया Give reasons
स्वाध्यायाच्या पेक्षा जास्तीचे कारणे दया व त्यांची उत्तरे
1) सर्व ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
2) ग्रामीण वस्ती मध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.
3) झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
4) नगरांची वाढही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे.
5) वाळवंटी प्रदेशात बहुतांश वस्त्या केंद्रीत स्वरुपाच्या असतात.
6) गंगेच्या मैदानी प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात.
बारावी भूगोल मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया Human Settlement and Land Use Give reasons

Human Settlement and Land Use Give reasons
प्रश्न 2. भोगोलिक कारणे लिहा. Give reasons
1) सर्व ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही.
उत्तर-
① वस्त्यांचे ग्रामिण व नागरी असे दोन प्रकार आहेत. वस्त्यांच्या कार्यात वाढ झाल्यास वस्त्यांची वाढ होत असते.
② वस्त्यांच्या वाढीसाठी प्राकृतीक घटक, औदयोगीकरण, वाहतूक सुविधा असे घटक परीणाम करत असतात. नागरी वस्तीच्या जवळच्या भागात असणाऱ्या ग्रामीण वस्ती चे रूपांतर काही कालावधीनंतर हे नागरी वस्तीत होत असते
③ काही ग्रामीण वस्ती या नागरी वस्तीपासून दूर असतात तसेच काही प्राकृतीक व वाहतुकीच्या घटकांच्या अडचणीमुळे त्याच्या कार्यात वाढ होत नसते.
④ अशा वस्तींमध्ये उदयोगांवर आधारीत व्दितीय व तृतीय व्यवसांची वाढ होत नाही. त्यामुळे अशा वस्त्या आपले ग्रामीण स्वरूप टिकून ठेवतात
⑤ नागरी वस्तीच्या जवळ असणाऱ्या काही ग्रामीण क्षेत्रातील लोक केवळ निवासासाठी वस्तींचा वापर वापर करतात त्यामुळे इतर व्यवसांच्या वाढीला मर्यादा आलेल्या असतात.
⑥ प्राकृतीक घटक, वाहतूक सुविधांचा अभाव, व्दितीय व तृतीय व्यवसांयाची कमतरता यामुळे अनेक ग्रामिण वस्तींच्या वाढीवर साधनसंपत्तीच्या कारणांमुळे मर्यादा पडत असतात.
म्हणुन सर्वच ग्रामिण वस्तींचे नागरी वस्तीत रुपांतर होवु शकत नाही.
2) ग्रामीण वस्ती मध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.
उत्तर-
① कोणत्याही वसाहतींचे तेथील भूमी उपयोजनावरुन ग्रामीण व नागरी वसाहती असे वर्गीकरण केले जाते.
② ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या व शेती व्यवसातील लोकांचे प्रमाण तेथे जास्त असते.
③ ग्रामीण भागात प्रत्यक्ष लागवडी खालील क्षेत्र जास्त असते.
④ ग्रामिण भागात शेतीव्यवसाया बरोबरच शेतीसंमधी इतर वनक्षेत्र, फळबागा, ओसाड जमीन, पडीक जमीन क्षेत्र देखील आढळून येत असते.
⑤ अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या प्राण्यांसाठी गायरान व चराऊ जमीन सारखे ग्रामपंचायतीच्या मालकीची अथवा सरकारच्या मालकीची भूमी देखील उपलब्ध असते
⑤ ग्रामिण भागात शेती भागात किरकोळ वृक्षांची संख्या जास्त असते, तसेच वनराई देखील आढळुन येत असते.
3) झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
उत्तर-
① ग्रामीण व नागरी झालर क्षेत्रांमधील भूमीला ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात. हे क्षेत्र ग्रामीण व नागरी संक्रमण क्षेत्र असते.
② झालर क्षेत्राची रचना ही गुंतागुंतीची असते. झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन कमी अधिक प्रमाणात दिसून येते.
③ झालर क्षेत्रात ग्रामपंचयात व नगरपालिका अशा दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळून येतात.
④ नागरी भागातील पक्के घरे तसेच ग्रामीण भागातील कच्ची घरे आढळतात
⑤ झालर क्षेत्रात शेतीक्षेत्र, वनक्षेत्र यावर आधारीत व्यवसाय तसेच नागरी भागातील व्दितीय, तृतीय व चतुर्थ व्यवसाय देखील कमी अधिक प्रमाणात चालतांना आढळतात.
यामुळे झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
बारावी भूगोल मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
Human Settlement and Land Use Give reasons
4) नगरांची वाढही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे.
उत्तर-
① नागरी भागातील नागरीकीकरण, औदयोगिकरण, वाहतुकी सुविधांचा विकास, विविध व्यवसायांच्या, सेवा व सुविधांच्या विकासामुळे नगरांची वाढ होत असते.
② ज्या प्रमाणात नगराचा विकास होत जातो त्याप्रमाणात तेथील जमीनीचा वापर वाढत जातो.
③ नगरातील वाढत्या नागरीकरणामुळे निवासी क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ होते व जमीनीची मागणी वाढते.
④ औदयोगीक क्षेत्रातील वाढीमुळे औदयोगीक करणांच्या विविध घटकांसाठी भूमीउपयोजन वाढत जाते.
⑤ नगरातील वाहतूक सुविधांच्या वाढीमुळे रस्तेमार्ग, लोहमार्ग, मेट्रो, हवाई क्षेत्रातही भूमी उपयोजन वाढत जाते.
⑥ व्यापारी क्षेत्रातील वाढीमुळे व्यापारी संकुल व मॉलचे प्रमाण वाढत जाते
⑦ नगरांच्या वाढीमुळे वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा तसेच खेळ व मंनोरजन सुविधांसाठी देखील भूमीचे उपयोजन वाढत जाते
अशाप्रकारे नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
5) वाळवंटी प्रदेशात बहुतांश वस्त्या केंद्रीत स्वरुपाच्या असतात.
उत्तर-
① वाळवंटी प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असते.
② उच्च तापमान कक्षा, वृक्षांची कमतरता, जास्तीचे तापमान यामुळे वाळवंटी प्रदेशातील हवामान अत्यंत प्रतीकुल असते.
③ वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या कमतरतेमुळे ज्या भागात पाणी उपलब्ध आहे अशाच ठिकाणी लोक आपली निवास व्यवस्था केंद्रीत करतात.
④ पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्याच्या आजुबाजुच्या प्रदेशात केंद्रीत स्वरुपाच्या वस्त्या यातुन निर्माण होत असतात.
6) गंगेच्या मैदानी प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात.
उत्त्तर-
①गंगा नदी बारमाही नदी असुन तीने वाहुन आणलेल्या गाळामुळे तेथील जमीन अतिशय सुपिक आहे.
② वर्षभर होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गंगेचे मैदान शेतीसाठी उपयुक्त आहे
③ गंगेचा मैदानी प्रदेश हा शेतीसाठी अतिशय उत्तम असल्याने येथे मोठया प्रमाणात शेती व त्यावर आधारीत व्यवसायाची भरभराटी झालेली आहे.
④ एकंदरीत सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी गंगेच्या खोऱ्यात सर्वत्र उपलब्ध असल्याने गंगेच्या मैदानी प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात.

अधिक वाचा-
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
Download PDF of All Text Books
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया


1) Not all rural settlements are converted into urban settlements.
Answer-
① Settlements are of two types namely rural and urban. If there is an increase in the activities of the settlements, the settlements are increasing.
② Factors such as natural factors, industrialization, transportation facilities influence the growth of settlements. The rural settlements in the vicinity of the urban settlements are converted into urban settlements after some time
③ Some rural settlements are far away from urban settlements and some natural and transportation factors do not increase its function.
④ There is no growth of secondary and tertiary occupations based on industries in such settlements. Hence such settlements retain their rural character
⑤ People in some rural areas close to urban settlements only use the settlements for residential purposes, thus restricting the growth of other businesses.
⑥ Due to natural factors, lack of transport facilities, lack of secondary and tertiary occupations, the growth of many rural settlements is restricted due to resource reasons.
Therefore, not all rural settlements can be converted into urban settlements.
2) Land use in rural settlements is related to agriculture.
Answer-
① Any settlements are classified as rural and urban settlements based on their land use.
② Since agriculture is the main occupation of people in rural areas, the proportion of people engaged in primary occupation and agriculture is high there.
③ Area under direct cultivation is more in rural areas.
④ In rural areas, along with agriculture, other forest areas, orchards, barren land, fallow land areas are also found in agriculture. ⑤ In many rural areas, Gram Panchayat-owned or Government-owned land is also available for farmers’ animals, such as gairan and grazing
3) Fringe areas are characterized by both rural and urban settlements.
Answer-
① The land between rural and urban fringe areas is called rural urban fringe area. This area is a rural and urban transition area.
② The structure of the fringe area is complex. Both rural and urban land use are more or less observed in Zalar area.
③ There are two types of administrative services in fringe area namely Gram Panchayat and Municipality.
④ Fixed houses are found in urban areas as well as mud houses in rural areas
⑤ In Zalar area, businesses based on agriculture sector, forest sector as well as secondary, tertiary and fourth sector businesses in urban areas are also found to be running more or less.
As a result, the fringe areas have characteristics of both rural and urban settlements.
4) Urban growth is also linked to land use.
Answer-
① Cities grow due to urbanization, industrialization, development of transport facilities, development of various businesses, services and facilities in urban areas.
② As the city develops, land use increases.
③ Due to the increasing urbanization in the city, there is a large increase in the residential area and the demand for land increases.
④ Growth in industrial sector increases land utilization for various components of industrialization.
⑤ Due to the increase in transport facilities in the city, the land utilization also increases in road, railway, metro and air sector.
⑥ Due to the increase in the commercial sector, the number of commercial complexes and malls increases
⑦ The growth of cities also increases land utilization for medical and educational facilities as well as sports and recreational facilities
Thus the growth of cities is closely related to land use.

6) Scattered settlements are found in the Gangetic plains.
Answer-
①The river Ganga is a perennial river and the land is very fertile due to the silt carried by it.
② The Gangetic Plain is suitable for agriculture due to its year-round water supply
③ As the Ganga plains are very good for agriculture, a large scale of agriculture and related businesses have flourished here.
④ On the whole all kinds of basic amenities are available everywhere in the Ganges basin, hence scattered settlements are found in the Gangetic plains.
5) Most of the settlements in desert regions are concentrated in nature.
Answer-
① Desert regions suffer from water scarcity due to low rainfall.
② The climate of desert region is very extreme due to high temperature zone, lack of trees, high temperature.
③ Due to the scarcity of water in desert regions, people tend to concentrate their habitations in areas where water is available.
④ Due to the availability of water, it creates concentrated settlements in its surrounding area.
[…] […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]
[…] Human Settlement and Land Use Give reasons […]