HSC 2022 Geography Question Paper and Answer
Baravi Bhugol Hsc Board March 2022 Prashnapatrika ani Uttarpatrika
बारावी भूगोल Hsc 2022 प्रश्नपत्रिका व तिची उत्त्तरपत्रिका
HSC 2022 Geography Question Paper and Answer

Time: 3 Hrs.
Marks: 80
सूचना :
(1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(2) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.
(3) रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
(4) नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा.
(5) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
(6) नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.
प्रश्न 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा.
20
प्रश्न 1 अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा
5
अ. | ब | ‘क |
1 अंटार्क्टिका | आधुनिक शेती प्रकार | कायम निवासी लोकसंख्या नाही |
2 महानगर | अटलांटिक महासागर | भांडवलाचा अधिक वापर |
3 मंडई शेती | कायम बर्फाच्छादित प्रदेश | आर्थिक भूगोल |
4 पनामा कालवा | लोकसंख्या भूगोल | मुंबई |
5 मानवी भूगोल | दशलक्षी शहर | पॅसिफिक महासागर |
प्रश्न 1 ब) पुढोल विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा
5
1) चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा :
अ) प्रौढ
क) वृद्ध
ब) बालक
ड) युवा
2) वसाहतीचा आकारानुसार लहानकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा :
अ) नगर
क) उपनगर
ब) महानगर
ड) महाकाय नगर
3) कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा :
अ) मध्यम
क) लघु
ब) सूक्ष्म
ड) मोठे
4) पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावा :
अ) खेडे
क) जिल्हा
ब) राज्य
ड) तालुका
5) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढीसाठी भूमिउपयोजनाचे अनुकूल
घटकाकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा :
अ) पडीक भूमी.
ब) चराऊ भूमी
क) लागवडी खालील भूमी
ड) वनाखालील भूमी
प्रश्न 1 क) अचूक सहसंबंध ओळखा व लिहा :
(A: विधान R: कारण)
1) A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
——————-
2) A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दद्योतक आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————-
3) A: भारत हा कृषिप्रधान देश आहे.
R: भारतात शेतीव्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————-
4) A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R: मुंबईचे स्थान आरबी समुद्रालगत आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
———————
5) A : प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते.
R : प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रश्न 1 ड) चुकीचा घटक ओळखा व लिहा :
5
1) लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक :
अ) रोजगार
ब) शिक्षण
क) जनगणना
ड) आरोग्य
2) प्राथमिक आर्थिक क्रिया
अ) शेती
ब) शिकार
क) मासेमारी
ड) लघुउद्योग
3) मुंबई येथील सुती वस्त्रउद्योगास अनुकूल घटक :
अ) खनिज
क) बाजारपेठ
ब) दमट हवामान
ड) मजूर पुरवठा
4) आधुनिक संदेशवहनाची साधने :
अ) भ्रमणध्वनी
क) विमान
ब) दूरदर्शन
ड) ई-मेल
5) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक :
अ) भूरचना
क) बाजारपेठ
ब) हवामान
ड) पाणी पुरवठा
प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही चार):
12
1) लोकसंख्या वितरण असमान असते.
2) नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
3) कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे.
4) उदद्योगधंदयाचे वितरण असमान असते.
5) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
6) तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.
प्रश्न 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन)
9
1) जन्मदर व मृत्युदर
2) स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक
3) जलवाहतूक व हवाई वाहतूक
4) प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल
5) मळ्याची शेती व विस्तृत शेती
प्रश्न 4. अ) तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा):
6
1) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
2) तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा
3) हिंदुस्थान लिव्हर निगम यांचे मुख्यालय
4) मुंबई बंदर
5) जगातील सर्वांत जास्त आयुर्मान असणारा देश
6) दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय प्रदेश
7) जगातील सर्वांत मोठे वाळवंट
8) हूर औदयोगिक प्रदेश
प्रश्न 4 ब) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा :
4
प्रश्न :
1) कोणत्या गोलार्धात सर्वाधिक औदयोगिक प्रदेश आहेत?
2) ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.
3) आशिया खंडातील कोणत्याही दोन औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा.
4) व्हेनेझुएला औदद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आहे?
5) न्यू इंग्लंड औद्योगिक क्षेत्र कोणत्या खंडात आहे?
प्रश्न 5. खालीलपैकी टिपा लिहा (कोणत्याही तीन) :
12
1) नागरी वस्तीच्या समस्या
2) सखोल उदरनिर्वाह शेती
3) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व
4) लोकसंख्येची व्यावसायिक संरचना
5) उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका
प्रश्न 6 अ) दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा
4
‘शेती : एक प्राथमिक व्यवसाय’
जागतिक स्तरावरील, शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेतीक्षेत्र विस्तृत असूनदेखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्ट्रांत शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे.
शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याच प्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पहावयास मिळतात. शूती या व्यवसायावर भूरचना, मृदा, हवामान, पाणीपुरवठा, जैविक इ. प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो, तर मजूर, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक सुविधा, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इ. मानवी घटकांचा परिणाम होतो, या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो.
प्रश्न :
1) कोणत्या खंडात शेतीचा विकास कमी झाला आहे?
2) शेती व्यवसायावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो?
3) कोणत्या खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
4) शेती व्यवसायावर कोणत्या मानवी घटकांचा परिणाम होतो?
ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :
4
1) रेषीय वस्ती
2) भूगोल अभ्यासकाची कोणतेही पाच कौशल्य दाखवा.
3) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद.
प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) :
1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सोदाहरण स्पष्ट करा.
2) भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.

HSC 2022 Geography Question Paper and Answer
उत्तरपत्रिका मार्च 2022
Hsc Board Geography March 2022Answer Sheet
GEOGRAPHY (39)
प्रश्न 1 अ) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा
5
अ. | ब | ‘क |
1 अंटार्क्टिका | आधुनिक शेती प्रकार | कायम निवासी लोकसंख्या नाही |
2 महानगर | अटलांटिक महासागर | भांडवलाचा अधिक वापर |
3 मंडई शेती | कायम बर्फाच्छादित प्रदेश | आर्थिक भूगोल |
4 पनामा कालवा | लोकसंख्या भूगोल | मुंबई |
5 मानवी भूगोल | दशलक्षी शहर | पॅसिफिक महासागर |
उत्तर –
अ. | ब | ‘क |
1 अंटार्क्टिका | कायम बर्फाच्छादित प्रदेश | कायम निवासी लोकसंख्या नाही |
2 महानगर | दशलक्षी शहर | मुंबई |
3 मंडई शेती | आधुनिक शेती प्रकार | भांडवलाचा अधिक वापर |
4 पनामा कालवा | अटलांटिक महासागर | पॅसिफिक महासागर |
5 मानवी भूगोल | लोकसंख्या भूगोल | आर्थिक भूगोल |
प्रश्न 1 ब) पुढोल विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा
5
1) चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा :
अ) प्रौढ
क) वृद्ध
ब) बालक
ड) युवा
उत्तर- ब) बालक ड) युवा अ) प्रौढ क) वृद्ध
2) वसाहतीचा आकारानुसार लहानकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा :
अ) नगर
क) उपनगर
ब) महानगर
ड) महाकाय नगर
उत्तर- क) उपनगर अ) नगर ब) महानगर ड) महाकाय नगर
3) कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा :
अ) मध्यम
क) लघु
ब) सूक्ष्म
ड) मोठे
उत्तर- ब) सूक्ष्म क) लघु अ) मध्यम ड) मोठे
4) पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावा :
अ) खेडे
क) जिल्हा
ब) राज्य
ड) तालुका-
उत्तर- अ) खेडे ड) तालुका क) जिल्हा ब) राज्य
5) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढीसाठी भूमिउपयोजनाचे अनुकूल
घटकाकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा :
अ) पडीक भूमी.
ब) चराऊ भूमी
क) लागवडी खालील भूमी
ड) वनाखालील भूमी
उत्तर- क) लागवडी खालील भूमी ड) वनाखालील भूमी
ब) चराऊ भूमी अ) पडीक भूमी.
प्रश्न 1 क) अचूक सहसंबंध ओळखा व लिहा :
5
(A: विधान R: कारण)
1) A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
——————-
2) A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दद्योतक आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————-
3) A: भारत हा कृषिप्रधान देश आहे.
R: भारतात शेतीव्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
————————-
4) A: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R: मुंबईचे स्थान आरबी समुद्रालगत आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
———————
5) A : प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते.
R : प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर- अ) केवळ A बरोबर आहे.
ड) चुकीचा घटक ओळखा व लिहा :
5
1) लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक :
अ) रोजगार
ब) शिक्षण
क) जनगणना
ड) आरोग्य
उत्तर- क) जनगणना
—————————-
2) प्राथमिक आर्थिक क्रिया
अ) शेती
ब) शिकार
क) मासेमारी
ड) लघुउद्योग
उत्तर- ड) लघुउद्योग
—————————-
3) मुंबई येथील सुती वस्त्रउद्योगास अनुकूल घटक :
अ) खनिज
क) बाजारपेठ
ब) दमट हवामान
ड) मजूर पुरवठा
उत्तर- अ) खनिज
—————————-
4) आधुनिक संदेशवहनाची साधने :
अ) भ्रमणध्वनी
क) विमान
ब) दूरदर्शन
ड) ई-मेल
उत्तर- क) विमान
—————————-
5) प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक :
अ) भूरचना
क) बाजारपेठ
ब) हवामान
ड) पाणी पुरवठा
उत्तर- क) बाजारपेठ
प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतीही चार):
12
1) लोकसंख्या वितरण असमान असते.
उत्तर-
① लोकसंख्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो.
② प्राकृतिक रचना, अल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेती योग्य सुपिक मृदा व मैदाने, या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणावर वितरीत झालेले नाहीत.
③ मानवी जिवनास प्रतिकुल असलेले घनदाट अरण्ये, दललदीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अति थंड व हिमाच्छादीत प्रदेश, असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते यांचे प्राकृतिक घटकांच्या असमान वितरणामुळे लोकसंख्या वितरण असमान आहे.
2) नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
उत्तर-
① नागरी भागातील नागरीकीकरण, औदयोगिकरण, वाहतुकी सुविधांचा विकास, विविध व्यवसायांच्या, सेवा व सुविधांच्या विकासामुळे नगरांची वाढ होत असते.
② ज्या प्रमाणात नगराचा विकास होत जातो त्याप्रमाणात तेथील जमीनीचा वापर वाढत जातो.
③ नगरातील वाढत्या नागरीकरणामुळे निवासी क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ होते व जमीनीची मागणी वाढते.
④ औदयोगीक क्षेत्रातील वाढीमुळे औदयोगीक करणांच्या विविध घटकांसाठी भूमीउपयोजन वाढत जाते.
⑤ नगरातील वाहतूक सुविधांच्या वाढीमुळे रस्तेमार्ग, लोहमार्ग, मेट्रो, हवाई क्षेत्रातही भूमी उपयोजन वाढत जाते.
⑥ व्यापारी क्षेत्रातील वाढीमुळे व्यापारी संकुल व मॉलचे प्रमाण वाढत जाते
⑦ नगरांच्या वाढीमुळे वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा तसेच खेळ व मंनोरजन सुविधांसाठी देखील भूमीचे उपयोजन वाढत जाते
अशाप्रकारे नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे.
3) कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे.
उत्तर- ① कॅनडा हा देश समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात येतो.
② येथे सुचीपर्णी वनांचे क्षेत्र अधिक आढळते. या वनात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात.
③ या वनातील वृक्ष सरळ, उंच वाढतात व लाकूड मऊ असल्याने याला मागणीही खूप असते. वृक्षतोडीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो.
④ तोडलेल्या लाकडांसाठी स्वस्त व योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.
त्यामुळे कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे..
4) उदद्योगधंदयाचे वितरण असमान असते.
उत्तर :
① ज्या प्रदेशात उद्योगाधंदयाच्या स्थापनेसाठी आवश्यक घटक जास्त प्रमाणात असतात अशा प्रदेशत उदयोगधंदयाचा जास्त प्रमाणात विकास झालेला असतो.
② विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल मग तो कृषिक्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रातून असेल किंवा वनक्षेत्रातून असेल ते सर्वत्र सारखे नाही, त्यांचे वितरणही असमान आहे.
③ प्रतिकूल हवामान, वाहतूक सूविधांचा अभाव, पर्वतीय प्रदेश अशा प्रतिकूल घटकामुळे काही प्रंदेशामध्ये उदयोगधंदयाना फारशी चालना मिळालेली नसते.
④ उद्योगधंदयांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक उदा. प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व इतर घटक हे प्रत्येक प्रदेशात सारख्या प्रमाणात उपलब्ध असतातच असे नाही.
⑤ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उद्योगांचे वितरणही असमान असते.
5) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
उत्तर-
① प्रदेशाचे स्थानावर, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात.
②हवामान- सम आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो.
③ नैसर्गिक बंदरे व नदया- सागरकिनारी मैदाने नद्याची मैदानी खोरी हे प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात.
③ पर्वतीय प्रदेश वाळवंटी प्रदेश घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात.
④ मैदानी प्रदेश- सुपिक मृदा असलेले प्रदेश शेती व्यवसायाच्या विकासामुळे प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात.
6) तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.
उत्तर :
① अनुत्पादक व्यवसाय– तृतीयक व्यवसाय हे कोणत्याही स्वरूपाच्या उत्पादनात सहभागी असतात.
② जोडण्याचे कार्य- तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात.
③ पुरक सेवा देणे– त्याचप्रमाणे या दोन व्यवसायांना पूरक अशा विविध सेवा, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा व इतर सेवा पुरवणे हा तृतीयक व्यवसायांचा भाग असतो.
④ थोडक्यात तृतीयक व्यवसाय हे कुठल्याही प्रकारचे उत्पादन न करता सेवा पुरवतात; म्हणून त्यांना सेवाक्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.
प्रश्न 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन)
9
अ क्र | जन्मदर | मृत्युदर |
1 | एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला जन्मदर म्हणतात | एका प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मूत्यु पावलेल्या आलेल्या बालकांच्या (अर्भकांच्या) संख्येच्या दराला जन्मदर म्हणतात |
2 | जन्मदर लोकसंख्येतील बदलात महत्वाची भूमीका बजावतो. | मृत्युदराची जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात भूमीका असते. |
3 | जन्मदर हा वाढता असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढत असते. | जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी अथवा जास्त असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्या कमी अथवा जास्त होते. |
4 | जन्मदराचे प्रमाण कमी असलेले देश विकसीत असतात तर जन्मदराचे प्रमाण जास्त असलेले प्रदेश विकसनशील किंवा अविकसीत असतात. | अविकसतील देशात मृत्यूदर जास्त आढळतो. तर विकसीत देशात मृत्युदराचे प्रमाण कमी असते. |
5 | सन 2017 ची आकडेवारी नुसार जन्मदर जास्त असलेला देश नायजर (46.5) आहे. तर जन्मदर कमी असलेला प्रदेश ग्रीस (8.2) आहे | सन 2017 ची आकडेवारी नुसार मृत्युदर जास्त असलेला प्रदेश ग्रीस (11.6) आहे. तर मृत्युदर कमी असलेला प्रदेश भारत (7.2) आहे. |
2) स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक–
आकर्षक घटक | अपकर्षक घटक |
1) व्यक्तीकिंवा व्यक्तीसमुह एखादया क्षेत्राकडेकिंवा प्रदेशाकडे आकर्षिक होतात अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. | 1) मानवाला मूळ वास्तव्याच्या स्थानापासुन दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षक घटक म्हणतात. |
2) शिक्षण, रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा, उच्च राहणीमान या सारखे घटक आकर्षक घटक म्हणून कार्य करत असतात. | 2) रोजगार कमी होणे, युध्द, दुष्काळ, पाण्याची कमतरता, सामाजिक ताण तणाव असे घटक अपकर्षक घटक म्हणून स्थलांतर घडवून आणतात. |
3) आकर्षक घटक ज्या प्रदेशात उपलब्ध असतात अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश असेही म्हणतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते व प्रदेशातील सोयीसुविधांवर ताण पडतो. | 3) अपकर्षक घटकामुळे प्रदेशातील लोक बाहेर पडतात. अशा प्रदेशास देणारा प्रदेश म्हणतात. तेथील लोकसंख्या कमी होते. अशा प्रदेशात सोयी सुविधांवर केलेला खर्च अनावश्यक ठरतो. |
4) अशा प्रदेशातील लिंग गुणोत्तरावर परिणाम होतो पुरुषांचे प्रमाण वाढते उदा. मुंबई | 4) रोजगारा साठी पुरुष बाहेर पडल्यामुळे अशा ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण जास्त होते उदा. केरळ राज्य |
3) जलवाहतूक व हवाई वाहतूक
जलवाहतूक | हवाई वाहतूक |
1)जलवाहतुक ही इतर वाहतूक मार्गांपेक्षा कमी खर्चिक आहे. | 1) हवाई वाहतुक ही इतर वाहतूक मार्गांपेक्षा खर्चिक आहे. |
2)अवजड परंतु टिकाऊ वस्तूंच्या वाहतुकीसाठी जल वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उदा. विविध खनिजे | 2) अत्यंत मूल्यवान व नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतुकीचा वापर करतात. उदा. दागदागिने, फळे इ. |
3) जलवाहतुकीची वहनक्षमता खूप जास्त आहे. | 3) हवाई वाहतुकीची वहनक्षमता तुलनेने खूप कमी आहे. |
4) प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल
उत्तर
प्राकृतिक भूगोल | मानवी भूगोल |
1) भूगोल विषयाची मुख्य शाखा असुन या शाखेत पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. | 1) मानवी भूगोही ही भूगोल विषयाची दुसरी मुख्य शाखा असुन यात मानव व नैसर्गिक घटक यांच्यातील आंतकक्रियांचा अभ्यास केला जातो. |
2) प्राकृतिक भूगोलाच्या स्वरुपशास्त्र, हवामानशास्त्र, जिवभूगोल, मृदाभूगोल इ. शाखा आहेत. | 2) मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक, राजकीय व ऐतिहासिक, भूगोल इ. शाखा आहेत. |
3) प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटकांत स्थ-काळपरत्वे असणाऱ्या भिन्नतेची कारणमीमांसा केलेली असते. | 3) मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध व त्याचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची कारणमीमांसा केलेली असते. |
5) मळ्याची शेती व विस्तृत शेती (विस्तृत व्यापारी शेती)
मळ्याची शेती | विस्तृत व्यापारी शेती |
1) या प्रकारची शेती उष्णकटिबंधात केली जाते. | 1) या प्रकारची शेती समशीतोष्ण कटिबंधात 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्त च्या दरम्यान केले जाते. |
2)या प्रकारच्या शेतीत चहा, कॉफी, कोको, केळी इत्यादीचे उत्पन्न घेतले जाते. | 2) या प्रकारच्या शेतीत गहू हे प्रमुख पीक घेतले जाते. |
3)कुशल व अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनिक तत्त्वावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. | 3) याशिवाय मका, तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते. |
4) शेतीबरोबर कोणताही जोड व्यवसाय केला जात नाही. | 4) शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात. म्हणून या शेतीस यांत्रिक शेती असेही म्हणतात. |
5) भारत, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड, म्यानमार, ब्राझील इत्यादी देशात या प्रकारची शेती केली जाते. | 5) संयुक्त संस्थानातील रशियातील स्टेप अर्जेंटिनातील पंपास, ऑस्ट्रेलियातील डाऊन्स, आफ्रिकेतील व्हेल्ड व न्यूझीलंडमध्ये कॅटबरी या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते. |
प्रश्न 4. अ) तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा):
6


प्रश्न 4 ब) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा :
4
प्रश्न :
1) कोणत्या गोलार्धात सर्वाधिक औदयोगिक प्रदेश आहेत?
उत्तर- उत्तर गोलार्धात सर्वाधिक औद्योगिक प्रदेश आहेत.
————————
2) ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.
उत्तर- ऑस्ट्रेलियातील पूर्वेला सिडनी औदयोगिक प्रदेश आहे.
————————
3) आशिया खंडातील कोणत्याही दोन औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा.
उत्तर- चिन मधिल- मांचूरिया- शांघाय व भारतातील- मुंबई-पुणे
————————
4) व्हेनेझुएला औदद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आहे?
उत्तर- व्हेनेझुएला औदयोगिक प्रदेशत दक्षिण अमेरिका खडांत येतो.
————————
5) न्यू इंग्लंड औद्योगिक क्षेत्र कोणत्या खंडात आहे?
उत्तर- न्यू इंग्लंड औदयोगिक प्रदेश उत्तर अमेरिका खंडात येतो.
प्रश्न 5. खालीलपैकी टिपा लिहा (कोणत्याही तीन) :
12
1) नागरी वस्तींच्या समस्या–
उत्तर-
नागरी वस्तीच्या वाढीबरोबरच नागरी वस्तीच्या समस्या मध्ये ही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्या समस्या खालील प्रमाणे आहेत.
① आर्थिक समस्या – नागरी भागात जास्तीच्या लोकसंख्येमुळे सर्वांनाच उदयोग, व्यवसाय किंवा रोजगार मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होते. जीवनाअवश्यक वस्तूची टंचाई निर्माण होवुन महागाई वाढते.
② सामाजिक समस्या – नागरी भागात येणारे लोकसंख्येचे लोंढे, वेगवेगळया विचारांचे व समुदायाचे असल्याने सर्वांचे विचार जुळतीलच असे नसते. त्यातुन प्रांतवाद, वर्चस्ववाद, राजकीय फायदे तोटे, जातीय वाद अशा बाबीतुन अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात.
③ सांस्कृतिक समस्या – नागरी वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांमुळे संस्कृतीक भिन्नता, भाषावाद, प्रांतवाद व धार्मिक वाद निर्माण होतो.
④ पायाभूत सोयी सुविधांची कमतरता – वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा, वीज व रस्ते, वैदयकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, अशा प्रकारच्या नागरी पायाभूत सोयी-सुविधांवर ताण निर्माण होतो. जागेच्या अडचणींमुळे झोपडपटटयांची निर्मिती होते त्यातुन अस्वच्छ परीसराचे प्रमाण वाढते.
⑤ पर्यावरणीय समस्या वाढते – नागरीकरणामुळे मोठया शहरांमध्ये जल, वायू, कचरा व ध्वनी इ. प्रकारचे प्रदूषण वाढत आहे.
⑥ प्रशासकीय समस्या – नागरी भागातील वाढत्या लोकसंख्येला प्रशासकीय सेवा सुविधा पुरविण्यात अडचणी येतात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते. अवैध धंदे वाढतात, वाहतूक कोंडी सारख्या समस्या निर्माण होतात.

2) सखोल उदरनिर्वाहाची शेती-
उत्तर –
शेतकरी व त्याच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी जी शेती सखोलपणे केली जाते तिला सखोल उदरनिर्वाह शेती असे संबोधले जाते. हा शेतीचा प्रकार जेथे लोकसंख्या जास्त, लागवडीखालील जमिनीचे प्रमाण कमी अशा देशात प्रामुख्याने आढळतो.
वैशिष्ट्ये –
① शेतीचा आकार लहान – ही शेती आकाराने लहान असून पूर्णतः निसर्गावर म्हणजे मोसमी पावसावरच आधारलेले असते. या शेती प्रकारात योग्य असलेला जमिनीचा तुकडा लागवडीखाली आणला जातो. जमीन पडीक ठेवली जात नाही.दाट लोकसंख्येमुळे दरडोई जमिनीचे क्षेत्र कमी असल्यामुळे जमिनीची किंमत जास्त असते.
② धान्य पिकाचे उत्पादन – ही शेती मुख्यत्वे पावसाच्या प्रमाणानुसार या शेतीतून पिकाची लागवड केली जाते.या शेतीतून मुख्यत्वे धान्य पिकाचे उत्पादन घेतले जाते. उदा: जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ तर कमी पावसाच्या प्रदेशात बाजरी, ज्वारी, मका इत्यादी धान्य पिकांची लागवड केली जाते.या शेतीत भात हे प्रमुख पीक असून त्याचबरोबर ज्वारी-बाजरी गहू मका हरभरा कापूस भाजीपाला फळे इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.
③ मुबलक मजूर पुरवठा – सखोल शेती प्रदेशात दाट लोकवस्ती असल्याने मनुष्यबळ स्वस्त स्वस्त असते. त्यामुळे मनुष्यबळाचा भरपूर वापर केला जातो.या शेतीची बहुतांश कामे मजुरांद्वारे हाताने केले जातात.
④ मशागतीसाठी जनावरांचा वापर– शेतीच्या मशागतीसाठी जनावरांचा व मनुष्य बळाचा वापर केला जातो उदा: बैल, रेडे इ.याशिवायशेतीच्या कामासाठी मजुरांचा वापर करावा लागतो.शेत जमिनीची काळजीपूर्वक मशागत पडीक जमिनीची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या खतांचा वापर पिकांची फेरपालट केली जात आहे.
⑤शेती पारंपारिक पद्धतीने – ही शेती प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. चांगल्या शेत जमिनीतून भरपूर मनुष्यबळाचा मदतीने मर्यादित भांडवलाचा उपयोग करून पारंपारिक अवजाराच्या साह्याने हेक्टरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
⑥ बियाणे व रासायनिक खताचा वापर कमी – या शेतीत संकरित बियाणे व रासायनिक खतांचा फारसा वापर होत नाही.
⑦यंत्राचा वापर करता येत नाही – शेतीचा आकार लहान असल्यामुळे यंत्राचा वापर करता येत नाही.शेतकामासाठी परंपरागत व जुनाट पद्धतीचे अवजारे वापरले जातात.बहुतेक भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असली तरी नवीन तंत्राचा वापर,मर्यादित प्रमाणात यांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे.
⑧ इतर उत्पादने – या शेतीत धान्य पिकाबरोबर भुईमूग, ऊस, तेलबिया, कापूस इत्यादी चे उत्पादन घेतले जाते.
⑨ जास्त भांडवल व कष्ट – या शेती प्रकारात जमिनीचे प्रमाण कमी व लहान असल्याने जमिनीच्या थोड्या क्षेत्रात जास्त भांडवल व कष्ट करून उत्पादन काढले जाते.
⑩ जमिनीला कृत्रिम जलसिंचनाच्या पुरवठा– जमिनीला कृत्रिम जलसिंचनाच्या पुरवठा व खतांचा पुरवठा केला जातो.शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जातात. या शेतीमधून एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात.
सध्या सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, यंत्रे, जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती यांचा अवलंब केला जात असल्यामुळे उत्पादन वाढत आहे.
⑪ प्रदेश– भारत, चीन, जपान, मलेशिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या देशात या प्रकारची शेती केली जाते.
सखोल उरनिर्वाहशेती प्रदेश

3) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व–
उत्तर :
① संदेशांचे आदान-प्रदान मानव फार पूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यासाठी चित्रे, मुद्रा, भाषा यांचा वापर करीत मानवाने विविध स्वरूपांतील संदेशवाहकांचीही मदत घेतली.
② वर्तमानकाळात मात्र संदेशवहनात कृत्रिम उपग्रहांद्वारे दूरध्वनी, मोबाइल, आंतरजाल या माध्यमांद्वारे वाणी, लिखित, विदा, ध्वनिफीत, चित्रफीत अशा विविध स्वरूपांच्या माहितीचे-संदेशांचे आदान-प्रदान केले जाते.
③ कृत्रिम उपग्रहांमुळे ‘अंतर’ या अडथळ्यावरच पूर्णपणे मात झाली आहे. आता लक्षावधी लोकांपर्यंत, क्षणार्धात, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकाच वेळेस अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वरूपात माहितीची व संदेशांची देवाणघेवाण कृत्रीम उपग्रहांमुळे शक्य झाले आहे.
④ तसेच, कृत्रिम उपग्रहांमुळे समुद्राची स्थिती, साधनसंपत्ती / खनिजसंपत्तीचा शोध, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन, हवाई वाहतूक, आंतराष्ट्रीय व्यापार या सेवा/व्यवसाय खूप सोपे झाले.
⑤ वेगवेगळया प्रकारचे हवामानाचे अंदाज काढणे शक्य झाले आहे.
⑥ वाऱ्यांची दिशा व वेग, चक्रीवादळे व इतर आपत्तींचा पुर्व अंदाज घेणे साठी कुत्रीम उपग्रहांची मदत घेता येते.
4) लोकसंख्येची व्यावसायिक संरचना–
उत्तर-
① व्यवसायिक संरचनेत प्राथमिक, व्दितीयक, तृतीयक व चतुर्थक अशा प्रकारची व्यवसायांची रचना आहे.
② देशातील कार्यशील लोकसंख्या कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुतंलंली आहे. त्यावरुन देशाचा आर्थिक स्तर ठरतो.
③विकसीत राष्ट्रांमध्ये औदयोगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्याने तेथील लोकसंख्या व्दितीयक, तृतीयक, व चतुर्थक व्यवसायात मोठया प्रमाणात गुंतलेली असते. त्यामुळे शेती या प्राथमिक व्यवसायामध्ये या देशातील लोक कमी प्रमाणात आढळतात.
④ ज्या देशात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण जास्त असे देश कृषी प्रधान असतात. तेथील विकास कमी प्रमाणात असल्याने ते अविकसीत किंवा विकसनशील म्हणून ओळखले जातात.
5) उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका–
उत्तर : ① प्रामुख्याने कच्चा माल उद्योगधंद्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी व तयार झालेल्य पक्का माल बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतूकाची आवश्यक असते.
② वाहतुकीच्या खर्चाचा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर व विकासावर परिणाम होतो. वाहतुकीचे रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग आणि हवाईमार्ग हे प्रमुख मार्ग आहेत. या सर्व मार्गामध्ये जलमार्गानी केली जाणारी वाहतूक कमी खर्चाची असते. म्हणूनच धातू, खनिजे, कोळसा, कच्चे खनिज तेल इ. अवजड कच्च्या मालाची वाहतूक प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते. त्यामुळे अनेक उद्योग हे नैसर्गिक बंदरांजवळ स्थायिक झालेले आहेत.
③ तसेच दोन किंवा अधिक रेल्वेमार्ग एकत्र येतात अशा रेल्वेजंक्शनजवळ उदयोग स्थायिक झालेले आढळतात. कारण त्या उदद्योगांना लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री सहजतेने त्या ठिकाणी पोहोचविता येते.
④ उदयोगातून तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर पाठविण्यासाठी वाहतुकीची आवश्यकता
असते.
प्रश्न 6 अ) : उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कोणत्या खंडात शेतीचा विकास कमी झाला आहे?
उत्तर- आफ्रिका खंडात शेतीचा विकास कमी झालेला आहे.
———————-
2) शेती व्यवसायावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो?
उत्तर- शेती व्यवसायावर प्राकृतिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो.
———————-
3) कोणत्या खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
उत्तर-आफ्रिका खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
———————-
4) शेती व्यवसायावर कोणत्या मानवी घटकांचा परिणाम होतो?
उत्तर- शेती व्यवसायावर मजूर, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक सुविधा, सरकारी धोरण, मालकी हक्क अशा प्रकारचे घटकांचा परिणाम होतो.
प्रश्न 6 ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :
4
1) रेषीय वस्ती

2) भूगोल अभ्यासकाची कोणतेही पाच कौशल्य दाखवा.

3) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद.

प्रश्न 7. सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) :
8
1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सोदाहरण स्पष्ट करा.
1) उत्तर –
लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक व मानवी घटकांचा परिणाम पहावयास मिळतो. जगात मानवी जीवनास पोषक व आरोग्यवर्धक हवामान असलेल्या ठिकाणी मानवी लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यात विविध घटकांचा समावेश असतो. मानवी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे-

① प्राकृतिक रचना ( भूरुपे)-
अ) मैदाने / सुपिक खोरे- मैदानी प्रदेशात विपुल जलसंपत्ती मुळे व सुपीक मृदेमुळे शेती व्यवसाय विकसीत झालेला असतो त्यामुळे तेथे शेतीवर आधारीत व्यवसाय विकसीत होतात. रोजगाराच्या संधी अशा प्रदेशात जास्त असतात. त्याच बरोबर वाहतुक मार्गांच्या विकास, व उत्सावर्धक हवामान यामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. उदा. गंगा-सिंधू नदी मैदानी प्रदेश, यांगत्से व मिसिसिपी नदयांचे खोरे
ब) पठारी प्रदेश– पठारी प्रदेशात खनिज संपत्तीच्या उपलब्धतेमुळे खनिज संपत्तीवर आधारीत जड उदयोग विकसीत होतात तसेच काही भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या प्रदेशात शेतीस पुरक वातावरण असल्याने येथे मध्यम ते जास्त लोकसंख्या आढळते. उदा. छोटा नागपुरचे पठार काही पठारांवर सुपिक मृदेमुळे लोकसंख्या जास्त आढळते.
क) पर्वतीय प्रदेश – पर्वतीय प्रदेशात उंची, पतिकूल हवामान, उतार, घनदाट अरण्ये, शेती अयोग्य जमीन यामुळे जिवन जगण्यास अनेक अडचणी असतात त्यामुळे पर्वतीय भागात लोकसंख्या विरळ आढळते. उदा. रॉकी, हिमालय अँडीज पर्वतांचे प्रदेश. काही ठिकाणी मात्र आवश्यक पाण्याची सोय, जीवन जगण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध असलेल्या पर्वतीय ठिकाणी काही प्रमाणात लोकसंख्या केंद्रीत झालेली आढळते. उदा. पर्वतीय पर्यटन स्थळे

② हवामान- समशितोष्ण हवामान, भूमध्य सागरी हवामान, मोसमी हवामाना सारख्या अल्हाददायक हवामाच्या प्रदेशात जास्त लोकसंख्या आढळते उदा. युरोप खंडातील देश, आशिया खंडातील मौसमी हवामानाचा प्रदेश या उलट अति थंड, अति उष्ण, वाळवंटी प्रदेश, अति पर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असते. उदा. विषृववृत्तीय हवामान, वाळवंटी प्रदेश.
③ पाण्याची उपलब्धता– पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीही महत्वाचा घटक आहे. पाणी मानवाच्या दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला व मोठया प्रमाणावर आवश्यक असलेला प्राकृतिक घटक असल्याने प्राचीण काळापासून मानवाने आपल्या वसाहती पाण्याच्या ठिकाणी वसविलेल्या आहेत. उदा. नाईल, गंगा इ. नदयांच्या खोऱ्यातील प्रदेश. तसेच समुद्रकिनारी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. उदा. भारतीय किनारी प्रदेश. वाळवंटातील मरुदयाण्याच्या प्रदेशातही लोकसंख्या आढळते उदा. भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल् अहसा इ.
④ मृदा– सुपीक गाळाच्या मृदेच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसतील होतो त्यामुळे तेथे इतर व्यवसांचा विकास होवुन लोकसंख्या अधिक असते. उदा. भारतातील गंगा नदी, मिसिसिपी, यांगत्से या नदयांची पुर मैदानांचा प्रदेश. त्याच बरोबर ज्वालामुखीय मृदेच्या सुपीकतेमुळे ही ज्वालामुखीय पर्वतांच्या पायथ्याच्या प्रदेशात शेती व्यवसाय विकसीत होतो व येथेही लोकसंख्या जास्त आढळते. उदा. जावा, जपान, सिसिली.
2) भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.-
उत्तर–
① सुरुवातीस भूगोलाचे स्वरुप हे वर्णनात्मक होते निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विशेषत: प्राकृतिक घटकांची वर्णने केलेली दिसून येतात उदा. हेकेट्स यांच्या ग्रेस – पिरिऑड्स यांच्या पुस्तकात भूमध्य सागर बेटे इ. वर्णनात्मक माहिती उपलब्ध होते.
② कार्यकारण भावात्म्क स्वरुप हे भूगोलात स्पष्टपणे दिसून येते एखादी घटना घडते तर त्या घटनेमागे कोणते भौगोलिक कारणे आहेत हे शोधून काढले जातात.
③ भूगोलामध्ये सैध्दांतिक स्वरुप दिसून येते. मानवी व प्राकृतिक घटकांशी संबंधितक अनेक सिध्दांत भूगोलात आहेत.
④ प्राकृतिक व मानवी घटक स्थळ आणि काळ यांनुसार बदलत अतसात . त्यामुळे भूगोलाचे स्वरुप गतिशील बनते.
⑤ भूगोलामध्ये अनेक विरोधाभासी विचारसरणी प्रचलित आहेत. उदा. निसर्गवाद व संभाव्यवाद अशा दोन्ही विचारसरणीमध्ये प्रत्येक विचारसरणीस अनुसरुन मते मांडली आहेत. त्यामुळे भुगोल विषयांचे स्वरुप हे द्वैतवादी बनले आहेत.
⑥ भूगोल या विषयाचा संबंध अनेक वेगवेग्गळया विदयाशांखेशी येतो. उदा. भूगर्भशास्त्र अर्थशास्त्र, संख्याशास्त्र यामुळे भूगोलाचे स्वरुप आंतरविदयाशाखीय बनले आहे.
⑦ भूगोलामध्ये मोठया प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. उदा. GIS, GPS, सुदूर, सवेदण इ.मुळे भुगोलाचे स्वरुप हे तांत्रिक बनले आहे.
HSC 2022 Geography Question Paper and Answer

अधिक वाचा –
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
मार्च 2021 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका-
बारावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका- 1 गुण 80
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
विक्रीसाठी होलसेल भावात उपलब्ध
संपर्क्र- प्रा. मनोज देशमुख 9421680541
Important questions it’s nice idea
very nice harshadadghjyukmht@gmail.com
[…] HSC 2022 Geography Question Paper and Answer […]
[…] HSC 2022 Geography Question Paper and Answer […]
[…] HSC 2022 Geography Question Paper and Answer […]
[…] HSC 2022 Geography Question Paper and Answer […]