HomeMoreGeography First Semester Question Paper

Geography First Semester Question Paper

अकरावी भूगोल प्रथमसत्र  प्रश्नपत्रिका

Geography First Semester Question Paper

इयत्ता अकरावी

विषय- भूगोल

सुचना-

1 सर्व प्रश्न आवश्यक आहेत.  

2 प्रश्नांची उत्तरे लिहीतांना आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे

3 रंगीत पेंन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहेत.  

4 नकाशा स्टेंसिलचा वापर योग्य तेथे करावा.

5 उजवी कडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.  

6 आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तर पत्रिकेस जोडावी.


प्रश्न 1 दिलेल्या सुचनेनुसार वस्तुनिष्ठ प्रश्रांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1 अ ) खालील ‘अ ‘ब’ आणि ‘क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावुन साखळी पूर्ण करा.   

(गुण 4)

गट पर्वतवनस्पतींचे मुळगुहा
जैविक विदारणभूभाग वर उचलला जाणेथर
सागरी लाटाराजस्थानभेगा रुदांवणे किंवा खोल करणे
वाळवंटी प्रदेशकडामेघालय पठार

प्रश्न 1 ब) अयोग्य पर्याय निवडा                                         (गुण 3)

1) भूकंप-

अ) मंद हालचाल     

ब) मर्केली प्रमाण     

क) जमीन थरथरणे   

ड)  शीघ्र हालचाल

2) नदीच्या संचयन कार्यातील भूरूप

अ) घळई          

ब) नालाकृती सरोवर        

क) पूरमैदान  

ड) पूरतट

3) भूमध्य सागरी हवामान प्रदेश :

अ) मध्यचिली 

ब) सॅव्हाना            

क) दक्षिण युरोप       

ड) उत्तर आफ्रिका

प्रश्न 1 क) योग्य पर्याय निवडा                                                 (गुण 3)

1) नदीच्या संचयन कार्यातील एक भूरूप

अ) घळई                

ब) नालाकृती सरोवर

क) पूरमैदान              

ड) पूरतट

2) एक वळी दुसऱ्या वळीवर क्षितीज समांतर विसावणे

अ) असममित वळी   

ब) उलथलेली वळी

क) सममित वळी    

ड) आडवी वळी

3) पाण्यात क्षार विरघळण्याची क्रिया

अ) भस्मिकरण            

ब) कार्बनीकरण

क) द्रावीकरण             

ड) ऑक्सिडेशन

प्रश्न 1 ड) अचूक सहसंबध ओळखा  

A: विधान   R: कारण                         (गुण 3)

1 )

A : विभंगामुळे वली पर्वतांची निर्मिती होते.

R : एकमेकांविरुध्द दिशेने ताण निर्माणकारी बंलामुळे विभंग निर्माण होतो.

(अ) केवळ A बरोबर आहे.           

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

2)

A : टुंड्रा प्रदेशात वर्षभर बर्फाळ वातावरण असते.

R : येथे सूर्य किरणे तिरपी पडतात

(अ) केवळ A बरोबर आहे.           

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

3)

A : ओसाड प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावी असते.

R : शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहत असतात.

(अ) केवळ A बरोबर आहे.                      

(ब) केवळ R बरोबर आहे.          

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे  अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही. 

प्रश्न 2 रा)  भौगोलिक कारणे दया (कोणतेही 3)     (गुण 9)                               

1) भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो.  

2) भूजलामुळे तयार होणाऱ्या भूरुपांना “कार्स्ट भूरूपे” असेही म्हणतात.

3) पर्वतीय प्रदेशात नदया घळई व व्ही आकाराची दरी या भूरूपांची निर्मिती करते

4) मानव हा विदारणाचा एक कारक आहे.

5) वांळवटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.    

प्रश्न 3 रा) फरक स्पष्ट करा (कोणतेही -3)                                        (गुण 9)   

1) मौसमी हवामान प्रदेश आणि  भूमध्य सागरी हवामान प्रदेश

2) ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ आणि अधोमुखी लवणस्तंभ

3) विदारण आणि अपक्षण

4) पुरतट आणि पुरमैदान

5) मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण

प्रश्न 4 था) जगाच्या नकाशात घटक योग्य चिन्ह व सूचिच्या सहाय्याने दर्शवा (कोणतेही-5)         (गुण 5)

1) मोसमी हवामानाचा एक देश      

2) दक्षिण अमेरीकेतील वाळवंटी प्रदेश  

3) अंटार्टीका खंड                

4) विषववृत्त  

5) फुजी जागृत ज्वालामुखी         

6‍) स्कॉशिया भूपट्ट

7) चिली देश

प्रश्न 5 वा) टिपा लिहा (कोणत्याही -2)                                                 (गुण 8)

1) वळयांचे प्रकार

2) विदारण आणि खडकांचा एकजिनसीपणा

3) पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया

4) बर्फाच्छादीत प्रदेश

प्रश्न 6 अ ) खालील उताऱ्याचे वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा                       (गुण 4)

भारत हा उष्णकटीबंधीय देश आहे. संपूर्ण भारताभोवती समुद्रकिनारा नाही. एकीकडे हिमालय आहे. तर दुसरीकडे समुद्रकिनारा त्यामुळे या घटकांचा परिणाम भारतातील हवामानाच्या अंदाजावरही होतो. आपल्याकडे पावसाचा अंदाज म्हणजे जमिनीवरील हवा गरम होणे, त्यात बाष्पाचे प्रमाण, हे बाष्प वर जाऊन थंड होणे आणि त्यानंतर वादळी वारे आणि ढग अशा पद्धतीने पाऊस येतो यावर अवलंबुन आहे.  यामध्ये एवढी अचूकता नसते. यामध्ये विभागवार, राज्यवार पूर्वानुमान वर्तवता येते. पण हे अंदाज व्यापक भागासाठी लागू असतात. यात प्रादेशिक अचूकता मांडता येत नाही. यासंदर्भात हवामानतज्ज्ञ आणि इंडियन मेटरोलॉजिकल सोसायटी, पुणे या संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. आर. कुलकर्णी सांगतात की, परदेशात अचूक पूर्वानुमान देण्यासाठी वापरली जाणारी जगातील सगळी मॉडेल्स वापरून तीन-तीन तासांचे अंदाज घेतात तयानुसार आपल्यालाही भारतासाठी पूर्वानुमानसुद्धा आपल्यालाही देता येते. मात्र या पूर्वानुमानामध्ये काही प्रमाणात चूक असतेच. भारतीय मौसमी हवामानाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने परदेशाप्रमाणे अचूकता येत नाही. मात्र एखादा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर विस्तृत प्रमाणात पाऊस पडतो आणि वर्तवलेले बऱ्यापैकी अंदाज योग्य ठरू शकतात.

1) भारतात पाऊस पडणाऱ्या प्रकीयेचा अंदाज कसा घेतला जातो. ?

2) आपल्या देशातील हवामानाचे अंदाज कोणत्या कारणांमुळे/अभावामुळे 100% खरे ठरत नाहीत ?

3) पावसाचा अंदाज कोणत्या परीस्थीतीत योग्य ठरु शकतो.?

4) उताऱ्यात आलेली भारताची हवामानीय भौगोलीक परीस्थीती कोणती?

प्रश्न 6 ब) खालील पैकी कोणत्याही एका घटकांची सुबक आकृती काढून भागांना नावे दया.          (गुण 2)

      1) धबधबे व प्रपात गर्ता

      2) जैवीक विदारण


अकरावी भूगोल नोटस

होलसेल व किरकोळ विक्री साठी उपलब्ध- संपर्क- 9421680541



Geography First Semester Question Paper
Geography First Semester Question Paper

सागरी लाटांचे कार्य

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page