बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया कारणे दया
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
प्रकरण 6 वे
तृतीयक आर्थिक क्रिया
भौगोलिक कारणे लिहा मराठी व इंग्रजी माध्यम

Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया कारणे दया

प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा
1) तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.
2) हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. (Jully 2021, Jully 2023)
3) तृतीयक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात. (March 22)
4) औद्योगिक प्रदेशात तृतीयक श्रेणीच्या व्यवसायांचा विकास होतो.
5) मानवाचे तृतीय व्यवसाय भौगोलिक घटाकांमुळे प्रभावीत प्रेरित होत असतात.
6) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. ( Jully 2022)
7) व्यापारावर भौगोलिक घटकांचा परिणाम होतो.
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया कारणे दया
1) तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.
उत्तर :
① निसर्गावर आधारित मानवी क्रिया या प्राथमिक आर्थिक क्रिया असतात, तर व्दितीय आर्थिक क्रियां मध्ये वस्तु निर्मिती चे कार्य होत असते.
② प्राथमिक व व्दितीय व्यवसाय यांच्यातील आदान प्रदान व दोघांना जोडण्यासाठी विविध सेवा आहेत, त्या तृतीय आर्थिक क्रिया आहेत. तृतीय आर्थिक क्रिया या प्राथमिक व व्दितीय व्यवसायातील दुवा आहे.
③ या व्यवसायात निसर्गातून काही घेतले जात नाही तसेच कोणतेही वस्तू निर्मितीचे कार्य होत नाही. या सेवामध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, व्यापार, कर्जरोखे, व केवळ सेवा दिली जाते. व त्या बदल्यात मोबदला घेतला जातो.
④ तृतीय व्यवसाय द्वितीयक व्यवसायाला पूरक असे कुशल मनुष्यबळ तयार करतात. तसेच व्दितीय व्यवसायात तयार झालेला पक्का माल थेट ग्राहकांच्या घरापर्यंन्त पोहचविण्याचे काम तृतीय व्यवसायातुन होत असते.
⑤ थोडक्यात या व्यवसायाचा विस्तार प्रामुख्याने सेवाक्षेत्राशी संबंधित आहे.
2) हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.
उत्तर :
① हवाई वाहतुक सर्वात आधुनिक व वेगवान वाहतूकीचे साधन असल्याने वेळची बचत होते.
② नाशवंत उत्पादने, मौल्यवान उत्पादने, वजनाने हलक्या मालाची वाहतूक व आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक यासाठी हवाई वाहतुकीचा वापर वाढत आहे.
③ देशांच्या संरक्षण यंत्रनेतही हवाई वाहतूकीचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे.
④ अपघात, नैसर्गीक आपत्ती, आपत्कालीन स्थितीच्या वेळी मदत व बचाव कार्यात हवाई वाहतुकीस महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
⑤ जीवनावश्यक औषधांचा तातडीने पुरवठा करण्यास हवाई वाहतुक महत्वाची भूमीका बजावते.
⑥ जगातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औदयोगिक, व्यापारी महानगरे हवाई वाहतूकीमुळे जोडली गेलेली आहे. लोकांचे राहणीमान उंचावत असल्याने हवाई वाहतूकीची पसंती वाढली आहे.
⑦ तंत्रज्ञानातील बदलामुळे, व्यापारातील वाढत्या मागणीमुळे, जलद गतीमुळे, वेळेची बचत होत असल्याने हवाई वाहतूकीचे प्रमाण वाढत आहे.
3) तृतीयक व्यवसायांना सेवाक्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.
उत्तर : ① तृतीयक व्यवसाय हे कोणत्याही स्वरूपाच्या प्रत्यक्ष उत्पादनात सहभागी नसतात. तर उत्पादनासाठी आवश्यक प्रक्रिया पुर्ण करतात.
② तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात. उदा. कच्चा माल उदयोगापर्यन्त (वाहतूक) आणने
③ त्याचप्रमाणे या दोन व्यवसायांना पूरक अशा विविध सेवा, व्यापार, वाहतूक, विपणन व संदेशवहन, वित्तीय सेवा व इतर सेवा पुरवणे हा तृतीयक व्यवसायांचा भाग असतो.
④ थोडक्यात तृतीयक व्यवसाय हे कुठल्याही प्रकारचे उत्पादन न करता सेवा पुरवतात; म्हणून त्यांना सेवाक्षेत्रातील व्यवसाय म्हणतात.
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया कारणे दया
4) औद्योगिक प्रदेशात तृतीयक श्रेणीच्या व्यवसायांचा विकास होतो.
उत्तर :
① औद्योगिक प्रदेशात विविध प्रकारचे उदयोग व व्यवसाय, तंत्रज्ञान एकवटलेले असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कुशल, अकुशल कारागीर एकवटलेले असतात व त्यांच्यावर अवलंबुन इतर लोकसंख्या असते.
② अशा प्रदेशात सर्व प्रकारच्या लोकसंख्येला व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने, अशा प्रदेशात राहणारे लोकांचे सरासरी राहणीमान चांगले असते.
③ या प्रदेशात सार्वजनिक व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध असतात.
④ लोकसंख्येच्या विविध गरजा पुर्ण करण्यासाठी विविध सेवा व्यवसाय वाढीस ही पुरकस्थिती या प्रदेशात असते.
⑤ वरील सर्व कारणांमुळे औदयोगिक प्रदेशात व्यापार, वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा व इतर सेवा अशा विविध स्वरूपांतील तृतीयक श्रेणीचे व्यवसाय विकसित होतात.
5) मानवाचे तृतीय व्यवसाय भौगोलिक घटाकांमुळे प्रभावीत प्रेरित होत असतात.
उत्तर- आर्थिक व्यवसायांचे वितरण हे अनेक भौगोलिक घटकांनी प्रेरित असते.
① मानवाच्या जवळ-जवळ सर्वच आर्थिक क्रिया निसर्गांवर अवलंबुन असतात. उदा. हवामान, भूरचना, समुद्र-सान्निध्य, खंडातर्गतता इ.
② नाशंवत कच्चा माल किती काळ टिकेल यावर व्दितीयक व्यवसाय अवलंबुन असतातच, परंतु या मालाची वाहतूक कोणत्या मार्गाने करायची हे भौगोलिक घटाकांरुनच ठरवावे लागते. उदा. अंतरराष्ट्रीय व्यापारात द्राक्ष- हवाई मार्गाने. तर कापूस- जल मार्गाने पाठवणे सोयीचे असते
③ मानवी वस्त्या भौगोलिक घटाकांच्या अनुकुलतेनुसार वसलेल्या असतात. आणि बाजारपेठा वस्त्यांमध्ये किंवा वस्त्यांच्या जवळ स्थापन होतात
उदा. बंदर, गोदी या ठिकाणी मालाची चढ-उतार होते ही स्थाने नैसर्गिक जल मार्गांजवळ असतात यावरही हवामानाचा परिणाम होत असतो.
④ हवाई वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणी भौगोलिक घटकांमुळे बाधित होत असते
⑤ संदेश वहन यंत्रना अनेक वेळा ढगाळ हवामान व इतर हवामानीय स्थितीमुळे बाधित होत असते.
⑥ तृतीय आर्थिक क्रिया मधीत पर्यटन व्यवसाय पुर्णपणे भौगोलिक घटाकांवर अवलंबुन आहे त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक वेळा भौगोलिक स्थितीमुळे पर्यटनास चालना मिळते तर काही ठिकाणी भौगोलिक स्थितीमुळे पर्यटनात अडथळे निर्माण होत असतात.
6) भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते.
उत्तर-
① व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाण-घेवाण होय. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विविधतेचा परिणाम आहे.
② जगात मृदा, खनिजे, वने, सुपिक मृदा, जल आणि मानवी संसाधने सर्वत्र समान वितरीत झालेले नाहीत.
③ मृदा संसादन (सुपिक मृदा) ज्या देशात विपुल प्रमाणात आहे तेथे शेती मोठया प्रमाणात होते, असे देश अन्नधान्य व इतर पिक उत्पादनांचे निर्यातदार बनतात. तर जेथे शेती होत नाही असे देश अन्न धान्य आयात करतात. उदा. गंगा, यागत्से, नाईल, मिसीसिपी नदयांचे खोरे
④ आखाती देशात खनिज तेलसाठे उपलब्ध असल्याने ते खनिज तेल निर्यात करतात व शेती उत्पादने व इतर महत्वाच्या वस्तू आयात करतात उदा. सौदी अरेबीयात गहू आयात केला जातो
⑤ उष्ण कटीबंधीय देश केळी, तांदुळ, कोको, चहा यांचे उत्पादन जास्त होत असल्याने या वस्तू निर्यात करतात.
⑤ वन उत्पादने, खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले देश ते निर्यात करतात
सांधनसंपत्तीचे वितरण असमान असल्याने व्यापार निर्मितीस चालना मिळते.
7) व्यापारावर भौगोलिक घटकांचा परिणाम होतो.
उत्तर-
① भूरचना, स्थान आणि हवामान हे प्रभावशाली भौगोलिक घटक असुन त्यांचा मानवी क्रिंयावर परिणाम होत असतो.
उंचसखल प्रदेशाच्या प्रदेशात रस्ते, लोहमार्ग व नळमार्ग विकसीत झालेले असतात. उदा. भारतातील उत्तर प्रदेश
या उलट घनदाट वने, पर्वतीय प्रदेशात वाहतूक सुविधांना अडचणी असतात. अशा प्रदेशात वाहतूक सुविधा विकसीत नसतात. उदा. अफ्रिका खंड व दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय व वनांचे प्रदेश.
② बंदरे आणि गोदींसाठी किनारी प्रदेश चांगले असतात. उदा. दंतुर किनारा पंरतु प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर बंदर होवु शकत नाही.
③ तंत्रज्ञानामुळे हवाई वाहतुकीच्या वापरात वाढ झालेली आहे. परंतू धुके, धुरके, पवर्त शिखरे अशा घटकांमुळे हवाई वाहतूकीवर परिणाम होतो.
④ आंतरराष्ट्रीय व्यापारात सागरी वाहतूकीचे अंतर कमी होण्यासाठी सागरी कालवे तयार करुन सागरी अंतर कमी करण्यात आले आहेत. उदा. सुएझ कालवा, पनामा कालवा
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया कारणे दया
———————————————————————————————–

1) Tertiary activities include both services and exchange
Answer:
① Human activities based on nature are called primary economic activities, whereas the secondary activities involve the production of goods.
② The various services that connect and facilitate exchange between primary and secondary occupations are tertiary economic activities. Thus, tertiary activities serve as a link between the primary and secondary sectors.
③ These activities neither extract anything from nature nor involve the production of goods. They include services like buying and selling of goods, transport, communication, trade, banking, and other service-oriented tasks for which payment is received.
④ Tertiary occupations provide skilled manpower to support secondary industries and help deliver finished goods from industries directly to consumers.
In short, these occupations are mainly related to the service sector.
2) The proportion of airways as means of transportation is increasing
Answer:
① Air transport is the most modern and fastest means of transportation, which saves time.
② It is increasingly used for transporting perishable goods, valuable items, lightweight cargo, and international passengers.
③ The use of air transport is also rising in national defense systems.
④ During accidents, natural disasters, or emergencies, air transport plays a crucial role in relief and rescue operations.
⑤ It helps in the quick delivery of essential medicines and emergency supplies.
⑥ Various national and international industrial and commercial cities are connected through air transport. As living standards rise, people prefer air travel more.
⑦ Due to technological advancements, growing trade demands, speed, and time efficiency, air transport has increased significantly.
3) Tertiary occupations are known as service-sector occupations.
Answer:
① Tertiary occupations are not directly involved in production but perform processes necessary for production.
② They connect the primary and secondary sectors—for example, transporting raw materials to industries.
③ They provide supplementary services such as trade, transport, marketing, communication, financial, and other related services.
④ In short, tertiary occupations provide services rather than goods, so they are known as service-sector occupations.
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
4) Tertiary sector occupations develop in industrial regions.
Answer:
① Industrial regions have a concentration of industries, trades, and technology, which attract skilled and unskilled workers and their dependents.
② Such regions offer employment opportunities for all kinds of people, leading to a higher standard of living.
③ Public and infrastructural facilities are available in these areas.
④ The diverse needs of the population create favorable conditions for the growth of service-oriented businesses.
⑤ Hence, trade, transport, communication, finance, and other service-based tertiary occupations develop in industrial regions.
————————————-
5) Human tertiary occupations are influenced and motivated by geographical factors.
Answer:
① The distribution of economic activities is influenced by several geographical factors.
② Almost all human economic activities depend on nature—for example, on climate, landforms, proximity to the sea, and continentality.
③ The durability of perishable raw materials affects secondary industries, but the mode of transport for goods is also determined by geographical conditions—e.g., grapes are best transported by air, while cotton is suitable for sea routes.
④ Human settlements are established in accordance with geographical suitability, and markets develop within or near these settlements. For example, ports and docks for loading and unloading goods are located near natural waterways, which are also influenced by climate.
⑤ Air transport systems in many areas are affected by geographical factors.
⑥ Communication systems can be disrupted by cloudy or adverse weather conditions.
⑦ The tourism industry—a tertiary activity—is entirely dependent on geographical conditions. In some regions, geography promotes tourism, while in others it creates obstacles.
Geo XII Tertiary Eco Activities give Reasons
6) Geographical diversity is responsible for trade to occur.
Answer:
① Trade is the voluntary exchange of goods and services between two or more countries. International trade results from variations in human resources and production.
② Natural resources such as soil, minerals, forests, fertile land, water, and human resources are unevenly distributed across the world.
③ Countries with abundant fertile soil produce agricultural goods on a large scale and become exporters of food grains and other crops, whereas countries lacking fertile land import food.
Example: River valleys of the Ganga, Yangtze, Nile, and Mississippi.
④ Gulf countries export crude oil because they have rich petroleum reserves, but import food grains and other essential goods (e.g., Saudi Arabia imports wheat).
⑤ Tropical countries produce bananas, rice, cocoa, and tea in large quantities and thus export them.
⑥ Countries rich in forest products and mineral wealth export these goods.
Hence, the unequal distribution of resources encourages trade.
7) Trade is influenced by geographical factors.
Answer:
① Relief, location, and climate are major geographical factors affecting human activities.
② In plains, roads, railways, and pipelines are well developed (e.g., in Uttar Pradesh, India).
③ In contrast, dense forests and mountainous regions (like those in Africa and South America) have poor transport facilities.
④ Coastal regions are suitable for ports and harbors—for example, along indented coastlines—but not every coast is suitable for port construction.
⑤ Technological advances have increased the use of air transport, but factors like fog, smoke, and mountain peaks still affect it.
⑥ To reduce sea distances in international trade, canals have been constructed—e.g., the Suez Canal and Panama Canal.

HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
नोट्स- https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/06/choose-correct-option-and-complete.html
व्हिडीओ- https://youtu.be/dfCtcZRaAS8
