HomeMoreGeo Data Representation Divided Bar Graphs

Geo Data Representation Divided Bar Graphs

Geo Data Representation Divided Bar Graphs

विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख

उद्देश– दिलेली सांख्यिकीय माहिती ही विभाजित आयताव्दारे दर्शविणे.

उद्दिष्टे- 1 विभाजित आयताकृतीव्दारे दोनपेक्षा अधिक विविध भौगोलिक घटक त्यांच्या प्रमाणानुसार दर्शविण्यात येतात हे समजुन घेणे

2. आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करणे.


उदा 01 

खालील सांख्यिकीय माहिती विभाजित आयताच्या साहाय्याने दर्शवा.

फळेक्षेत्र (हेक्टर)
आंबा527147
फणस1451
नारळ26325
संत्री168979
डाळिंब33280
एकुण757182

निष्कर्ष– प्रस्तृत विदेत राज्यात आंबा फळाचे पिकाखालील क्षेत्र (32% ) सर्वात जास्त असून, त्या खालोखाल संत्री फळाचे (33.32%)  पिकाखालील क्षेत्र आहे. नारळ व डांळीब फळांचे पिकाखालील क्षेत्र हे (3.48% व 4.40%) आहे. सर्वात कमी फणस फळाचे पिकाखालील क्षेत्र हे 0.19 % आहे.

 ______________________________________________________________________

Geo Data Representation Divided Bar Graphs

विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख

उदा. 2 

   एप्रिल 2019 मध्ये एका प्राणि संग्रालयास भेट देणाऱ्या विविध वयोगटातील लोकांची आकडेवारी खाली दिलेली आहे. या विदेच्या आधारे विभाजित आयत काढा आणि विदेचे विश्लेषण करा.

वयोगटपर्यटकांची संख्या
0-5150
5-10200
10-15150
15-20125
20-40100
40-5050
50-6050
60 पेक्षा जास्त वयाचे50

निष्कर्ष-  

एप्रिल 2019 मध्ये प्राणी संग्रालयास भेट देणाऱ्यात 5 ते 10 वयोगटातील बालकांची संख्या (200) जास्त आहे. तसेच 0 ते 5 व 10- 15 या वयोगटाचे भेट देणाऱ्यामध्ये प्रमाण सारखे 150 आहे. 15 – 40 वयोगटातील 225 लोकांनी प्राणी संग्रालयास भेटी दिलेल्या आहेत. तर 40 पेक्षा जास्त वयोगटातील भेट देणाऱ्या लोकांचे जवळ-जवळ  (50) सारखेच प्रमाण आहे.

 _________________________________________________________

Geo Data Representation Divided Bar Graphs

विदा सादरीकरण : विभाजित आयत आलेख

उदा. 3 

    खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोंकसख्ये विषयी माहिती दर्शविते विभाजित आयत काढा.

तृतीयक व्यवसायगुंतलेली लोकसंख्या (%)
बॅकींग20
वाहतूक25
पर्यटन10
किरकोळ व्यापार22
घाऊक व्यापार15
संदेशवहन15

निष्कर्ष-  प्रस्तृत विदेवरुन असे लक्षात येते की ‘क्ष’  तृतीय व्यवसायातील वाहतूक क्षेत्रात सर्वातजास्त लोकसंख्या गुंतलेली 25 %  आहे. तर बँकीग व किरकोळ व्यापार क्षेत्रात 20% व 22 % लोकसंख्या गुंतलेली आहे. घाऊक व्यापार क्षेत्रात 15% व पर्यटन क्षेत्रात 10% लोकसंख्या गुंतलेली आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या संदेशवहन क्षेत्रात असुन तीची टक्केवारी 8 आहे.


उदा. 4  

विविध पीकांचे अंदोज उत्पादन (दशलक्ष टनात)

पिकेउत्पादन दशलक्ष टनात
तृणधान्य95.98
डाळी43.68
तेलबिया18.24
कापूस32.48
इतर पिके33
 223.38


बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-

Practical Question Papers –

Practical No 3

Practical No 4

Prof. Manojj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page