Earth position on March 21 and June 21
21 मार्च व 21 जुन पृथ्वीची भौगोलिक स्थिती
Earth position on March 21 and June 21
21 मार्च भौगोलिक स्थिती
21 मार्च रोजी, पृथ्वीवरील सर्व ठिकाणी दिवस आणि रात्र समान म्हणजे 12 तासाचे असतात, कारण या दिवशी सूर्य विषुववृत्तावर लंबरुप असतो, ज्याला खगोलशास्त्रात विषुवदिन म्हणतात, तसेच वसंत संपात दिन देखील म्हणतात. 21/ 22 मार्च रोजी पृथ्वीचा कोणताही धृव सूर्याच्या बाजुला कललेला नसतो.

या खगोलीय घटनेनुसार, 21/22 मार्च रोजी दिवस आणि रात्र समान असते. या दिवशी 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस असतो. या दिवशी पृथ्वीच्या विषवृत्तावर सुर्यकिरणे लंबरुप पडतात.
या दिवसापासून उत्तरगोलार्धात उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. या खगोलीय घटनेत 21-22 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असल्याने दिवस आणि रात्र समान असते. या दिवसापासून रात्र लहान होऊ लागते व दिनमान कालावधी वाढत जातो. या भौगोलिक स्थितीला वसंत संपात असेही म्हणतात.
वर्षात 365 / 366 दिवस असतात आणि प्रत्येक दिवस 24 तासांचा असतो, परंतु वर्षातील चार दिवस असे आहेत ज्यांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. हे चार दिवस 21-22 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर आहेत.
वर्षातून दोनच वेळेस दिवस आणि रात्र समान असते. म्हणजे वर्षातील दोनच दिवस व रात्र 12-12 तांसाची असते.
21 – 22 मार्च तसेच 23 सप्टेंबरलाही दिवस आणि रात्र समान असतात जेव्हा सूर्य उत्तरायण आणि दक्षिणायन दरम्यान येतो.
त्याच प्रमाणे 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आणि 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे.
पृथ्वी स्वत भोवती फिरता फिरता सुर्याभोवती फिरत असते, ती सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. या परिस्थीतीत ती आपल्या अक्षावर (डावीकडे / उजवकडे ) झुकते त्यामुळे दिवस आणि रात्रीची लांबी वाढते किंवा कमी होत असते. त्याच्या प्रभावामुळे हवामान उष्ण आणि थंड होत असते.
पृथ्वीच्या आपल्या अक्षावर झुकलेल्या स्थितीवरुन दिवस आणि रात्रीचा कालावधी कमी व जास्त होत असतो. म्हणजेच दिनमान व रात्रमान कमी अधिक होत असते. याचा परिणाम गोलार्धातील हवामानावरही होत असतो. तसेच मोसमीवाऱ्यांच्या निर्मितीवरही होत असतो.

Earth position on March 21 and June 21
21 जून भौगोलिक स्थिती
21 जून रोजी, उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर (Tropic of Cancer) सरळ रेषेत असतो, 21 जून रोजी पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेत अशा स्थितीत असते, जिथे उत्तर गोलार्ध सूर्याच्या अगदी समोर आलेला असतो ज्यामुळे उत्तर ध्रुवाला अधिक सूर्यप्रकाश मिळतो. या काळात सुर्याच्या प्रकाशमानामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. 21 जूनला उत्तर गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र लहान असते, 21 जूनला सूर्याचे उत्तरायण संपते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते.
दक्षिण गोलार्धात याउलट स्थिती असते. दक्षिण गोलार्धाचा सर्वात कमी भाग सुर्यासमोर असल्याने येथे दिनमान कमी व रात्रमान जास्त असते. याचा अर्थ 21 जुन ला दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस व मोठी रात्र असते.
On March 21, day and night are equal, 12 hours long, everywhere on Earth, because on this day the Sun is perpendicular to the equator, which is called the equinox in astronomy, and also the spring equinox. On this day, neither pole of the Earth is tilted towards the Sun.
According to this astronomical event, day and night are equal on March 21. On this day, there is 12 hours of night and 12 hours of day. On this day, the sun’s rays fall perpendicular to the Earth’s equator.
It is believed that summer begins in the Northern Hemisphere from this day. In this astronomical event, on March 21-22, the sun is at the equator, so day and night are of equal length. From this day, the night starts to shorten and the daylight hours increase. This geographical position is also known as the spring equinox.
There are 365/366 days in a year and each day is 24 hours long, but there are four days in a year that have their own special characteristics. These four days are March 21-22, June 21, September 23 and December 22.
Only twice a year are day and night equal. That is, only two days and nights in a year are 12-12 tansa. On March 21 – 22 and September 23, day and night are also equal when the sun comes between Uttarayan and Dakshinayan.

Hsc Board Exam 2021 Geography Question paper and Answersheet
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
बारावी भूगोल प्रात्यक्षिक क्र. 2 विदा विश्लेषण-
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे