बारावी भूगोल सराव परीक्षा प्रश्नपत्रिका
Baravi Bhugol Sarav Prashanpatrika
बारावी भूगोल सराव परीक्षा प्रश्नपत्रिका
Baravi Bhugol Sarav Prashanpatrika
विषय – भूगोल
गुण- 80
वेळ- 3.00 तास
Baravi Bhugol Sarav Prashanpatrika
बारावी भूगोल सराव परीक्षा प्रश्नपत्रिका
1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) प्रश्नांची उत्तरे लिहीतांना आवश्यक तेथे योग्य आकृत्या /आलेख काढावे.
3) आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तर पत्रिकेस जोडावी.
4) उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गुण दर्शवितात.

प्रश्न 1 ला अ) खालील ‘अ‘ ‘ब‘ आणि ‘क‘ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा.
5
अ | ब | क |
आशिया खंड | डॉगर बॅक | कुभांर |
कुटीर उदयोग | पर्यटन | लोकसंख्या 60% |
नागरी वसाहत | भूमी 30% | ईशान्य अंटलाटीक महासागर |
माथेरान | हाताने निर्मिती उदयोग | शहर |
मत्स्यक्षेत्र | नगर | तृतीय आर्थिक क्रिया |
प्रश्न 1 ब) दिलेल्या विधानांतील विधान व कारणांचा अचूक संबंध ओळखा.
5
1 ) A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
————————
2) A: अवलंबितांच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R: लोकसंख्येत वृध्दांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
3 ) A: मुंबई येथील दमट हवामान सुती-वस्त्रोद्योगास पूरक आहे.
R: उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
4) A: काही उत्पादने मानव थेट वापरु शकत नाही.
R: उत्पादने प्रक्रिया व्दारे व्दितीयक व्यवसायात समाविष्ठ होतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
5) A: भारतात औदयोगिक उत्पादनामध्ये विविधता आढळते.
R: भारत हा कृषिप्रधान देश आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
ब) केवळ R बरोबर आहे.
क) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड) A आणि R हे दोन्हीं बरोबर आहे, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रश्न 1 क) पुढीलपैकी अयोग्य घटक ओळखा.
5
1) भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश-
अ) छोटा नागपूर पठार
ब) कावासाकी-याकोहोमा
क) मुंबई-पुणे
ड) कोईन्बतूर-बंगलुर
2) मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती
अ) उष्ण थंड सागरी प्रवाह संगम
आ) उथळ सागर
ब) भूखंडमंच
क) प्लवकांची वाढ
3) जगात 100% स्त्री-साक्षरता असलेले प्रदेश-
अ) मध्य आशिया
ब) उत्तर अमेरिका
क) युरोप
ड) दक्षिण-आफ्रिका
4) मुंबई महानगराची उपनगरे –
अ) भांडूप
ब) हिंजवडी
क) कल्याण
ड) विरार
5) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक –
अ) शेती
ब) खाणकाम
क) हवामान
ड) वाहतुक आणि दळण-वळण
प्रश्न 1 ड) चुकीचा घटक ओळखा.
5
1) व्दितीयक आर्थिक क्रिया –
अ) बँकीग
ब) साखर कारखाने
क) सुती वस्त्रोउद्योग
ड) अन्न प्रक्रिया उद्योग
2 ) 2018 नुसार जगातील सर्वाधीक लोकसंख्या असणारे देश-
अ) चीन
ब) भारत
क) अमेरिका-संयुक्त संस्थाने
ड) नेपाळ
3) ऐच्छीक स्थलांतर –
अ) विवाह
ब) नोकरी
क) शिक्षण
ड) नैसर्गिक आपत्ती
4) मानवी भूगोल शाखा-
अ) लोकसंख्या भूगोल
ब) मृदा भूगोल
क) आर्थिक भूगोल
ड) राजकीय भूगोल
5) औद्योगीक प्रदेश-
अ) हवेली तालुका
ब) सिटी केबल सेवा क्षेत्र
क) कोल्हापूर जिल्हा
ड) उत्तर प्रदेश
प्रश्न २ रा) खालील प्रश्नांची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही-4)
12
1) लोकसंख्या वितरण असमान असते.
2) जेव्हा कार्यशिल लोकसंख्या वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
3) झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्टये आढळतात.
4) भारतातील छोटा-नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
5) कोकणातील रत्नागीरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक फळ-प्रक्रिया उद्योग स्थापीत झालेले आढळतात.
6) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
प्रश्न 3 रा) फरक स्पष्ट करा. (कोणतेही-3)
9
1) देणारा प्रदेश-घेणारा प्रदेश
2) मळ्याची शेती व विस्तृत शेती
3) विषुववृत्तीय वनातील लाकुडतोड व समाशितोष्ण वनातील लाकुडतोड
4) जलवाहतुक व हवाई वाहतूक
5) मानवी भूगोल व प्राकृतिक भूगोल

4 अ) जगाच्या नकाशा आराखडयात पुढील बाबी योग्य ठिकाणी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दर्शवा सूची तयार करा.
6
1) रॉकी पर्वतीय प्रदेश
2) मुंबई
3) ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
4) व्हूर-औद्योगिक क्षेत्र
5) पंचमहासरोवर औद्योगिक प्रदेश
6) डॉगर बैंक
7) पनामा कालवा
8) लिंग गुणोत्तर जास्त असलेले भारतातील राज्य

प्रश्न 4 ब) पुढील आलेखाचे काळजीपुर्वक निरिक्षण करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
5

1 आलेत काय दर्शवतो
2 कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी जास्त आहे
3 कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी कमी आहे
4 कोणत्या खंडात 9.2 % भूमी ची टक्केवारी आहे
5 युरोप खंडाची भूमी किती टक्के आहे
प्रश्न 5 वा) टिपा लिहा. (कोणतेही-3)
12
1) व्यापारी तत्वावरील लाकुडतोड व्यवसाय
2) भूगोलाच्या शाखा
3) स्थानमुक्त उद्योग
4) पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन
5) प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण

प्रश्न 6 वा अ) पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
4
विविध प्रकारच्या मानवी वस्तींमध्ये पाडे, खेडी, छोटी शहरे, मोठी शहरे, सर्वदूर ठिकाणे, नगरे आणि नगरांचे समूह समाविष्ट आहेत. काही प्रणालींमध्ये मानवी वस्तीचे शहरी, उपनगरी आणि ग्रामीण असे प्रकार केले जातात.
` उदाहरणार्थ, अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचा जनगणना विभाग वस्तीचे वर्गीकरण निर्धारित व्याख्यांच्या आधारे शहरी किंवा खेड्यांमध्ये, कमी लोकसंख्या आणि सेवांमध्ये प्रवेश मर्यादित आहे. मोठ्या प्रकारच्या वस्ती, जसे शहरे, जास्त लोकसंख्या, उच्च घनता आणि सेवांमध्ये अधिक प्रवेश आहे. उदा. खेड्यात फक्त एक किंवा दोन सामान्य स्टोअर असू शकतात, तर मोठ्या महानगरात अनेक विशिष्ट स्टोअर आणि चेन स्टोअर असू शकतात. हे फरक निम्न ऑर्डर सेवा सेटलमेंट आणि उच्च ऑर्डर सर्व्हिस सेटलमेंट म्हणून ओळखले जातात. मानवी वस्तीची कार्येदेखील भिन्न आहेत कारण बंदरे, बाजारपेठे आणि रिसॉर्ट्स म्हणून सेटलमेंट्स स्थापित केल्या जाऊ शकतात. ग्रामीण वसाहतीच्या प्रकारांना शेती, मासेमारी आणि खाणकाम यांच्या निकटतेसारख्या कार्याद्वारे देखील वर्गीकृत केले जाऊ शकते. एका आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित केलेल्या सेटलमेंटस एकल कार्यशील सेटलमेंट म्हणतात. मानवी वस्ती कायम किंवा तात्पुरती असू शकते. उदा. उदा. निर्वासित छावणी ही तात्पुरती वस्ती असते तर शहर कायमस्वरूपी वस्ती असते.
1) दिलेल्या उताऱ्यात कोण कोणत्या मानवी वस्तीचा उल्लेख केलेला आहे?
2) शहरी आणि ग्रामीण भागाचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे ?
3) ग्रामीण वस्तीत कोणती कार्ये केली जातात?
4) निम्न-क्रम सेवा आणि उच्च क्रम सेवा वस्तीतील फरक सांगा?
—————————————–
प्रश्न 6 ब) सुबक आकृती काढून नावे द्या. (कोणत्याही -2)
4
1) औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश
2) आर्थिक क्रिया मनोरा
3) केंद्रोत्सारी वस्ती
प्रश्न 7) सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही – 1)
8
1) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक थोडक्यात स्पष्ट करा ?
2) प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा.
Baravi Bhugol Sarav Prashanpatrika
बारावी भूगोल सराव परीक्षा प्रश्नपत्रिका

अधिक वाचा –
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
[…] Baravi Bhugol Sarav Prashanpatrika […]
It’s very benificial to students
May you send for English Medium Geography?
Nice and useful
Thanks
Nice and Good information
Mustaq
Sir Gave Answer Key Also