HomeMoreBaravi Bhugol Nakashavaril Prashna

Baravi Bhugol Nakashavaril Prashna

Baravi Bhugol Nakashavaril Prashna

Baravi Bhugol Nakashavaril Prashna

नकाशावरील प्रश्न कसा सोडवावा.


प्रश्न 4 ) दिलेल्या नकाशा, आकृती, आलेखाचे निरीक्षण करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.


नकाशा काय दर्शवतो

  उत्तर नकाशा औद्योगिक प्रदेशांचे खंड निहाय वितरण दर्शवितो  किंवा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दर्शवितो

कोणत्या खंडात औद्योगिक प्रदेश जास्त आहे 

 उत्तर-  आशिया खंडात औद्योगिक प्रदेश जास्त आहे

कोणत्या खंडात औद्योगिक प्रदेश कमी आहेत

 उत्तर आफ्रिका खंडात औद्योगिक प्रदेश कमी आहेत

4 ऑस्ट्रेलिया खंडातील औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा

 उत्तर सिडनी, पर्थ, ॲडिलेड, मेलबर्न, ऑकलंड आणि वाइकाटो, कॅन्टरबरी

भारतातील औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा

उत्तर-  छोटा नागपूरचे पठार, मुंबई पुणे कॅरिडॉर, दिल्ली क्षेत्र, कोईमतूर-बंगळुरू, अहमदाबाद वडोदरा



1 )युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ?

उत्तर- लंडन हे युरोप खंडातील प्रमुख आंररराष्ट्रीय विमानतळ आहे.

2) दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो?

उत्तर- ट्रान्स-सैबेरीयन लोहमार्ग (मॉस्को ते व्हॅलाडीओस्टाँक)  हा लोहमार्ग दोन खंडाना जोडत आहे.

3) कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत?

उत्तर– अंटार्टीका खंडात कायमस्वरुपी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत.

4) कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो?

उत्तर-पनामा कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो.

5) आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा?

उत्तर– जोहान्सबर्ग हे अफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.


1) कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?

उत्तर- दक्षिण आशिया या प्रदेशात स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे.

2) दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे ?

उत्तर- दिलेल्या तीनही प्रदेशात पुरुषसत्ताक पद्धती असावी, समाजात पुरुषांचे वर्चस्वाचे स्थान, स्त्रियांचा दर्जा कमी व पुरुशांचे वर्चस्व अधिक.

3) 2016 मधील प्रौढ साक्षरता दरात सहारा वाळवंटी प्रदेशात स्त्री-पुरुष टक्केवारी कमी का आहे?

उत्तर- समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान, कमी मानसन्मान स्त्री आरोग्याची  व शिक्षणात निष्काळजीपणा, इ.

4) आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दरा विषयी स्वमत लिहा.

उत्तर- आलेखात सर्वच प्रदेशात स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. समाजातील स्त्रियांचा दर्जा कमी आहे. तर तिनही प्रदेशात पुरुषप्रधान संस्कृती आहे.

5) आलेखतील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?

उत्तर-  उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया हे प्रदेश सामाजिक दुष्ट्रया प्रगत असावेत


आलेत काय दर्शवतो

 उत्तर आलेख जागतिक खंडनिहाय भूमीची टक्केवारी दर्शवीत आहे

कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी जास्त आहे

 उत्तर आशिया खंडाची भूमीची टक्केवारी (29.2 %)  ही सर्वात जास्त आहे

3 कोणत्या खंडात भूमीची टक्केवारी कमी आहे

 उत्तर  ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी ची टक्केवारी (5.90 %) सर्वात कमी आहे

कोणत्या खंडात 9.2 % भूमी ची टक्केवारी आहे

 उत्तर अंटार्टिका खंडाची भूमि ची टक्केवारी 9.2 % आहे

5 युरोप खंडाची भूमी किती टक्के आहे

 उत्तर युरोप खंडाची भूमी ची टक्केवारी 6.8 आहे


1) आकृती काय दर्शविते. –

 उत्तर– आकृतीत जन्मदर व मृत्यूदरातील तुलना दर्शवीत आहे.

2) जन्मदरापेक्षा मृत्युदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल.

 उत्तर– लोकसंख्या कमी होईल.

3) मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसख्येवर काय परिणाम होईल.

उत्तर– मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्या वाढेल किंवा लोकसंख्या जास्त होईल

4) दोन्ही दर समान असल्यास काय होईल?

उत्तर– जन्मदर व मृत्युदर दोन्ही समान असल्यास लोकसंख्या स्थिर राहील

5) दोन्ही दार समान राहू शकतात का तुमचे मत लिहा.

उत्तर– दोन्ही दर अगदी समान असु शकत नाही असे वाटते. अपवादात्मक स्थितीत एखादया ठिकाणी अल्प काळासाठी अशी स्थिती येवु शकेल


1. आलेखातील निळी व काळी या रेषा काय दर्शवितात ?

 उत्तर- आलेखातील निळी रेषा जन्मदर व काळी रेषा मृत्यूदर दर्शविते.

2. आलेखातील दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवितो ?

उत्तर- आलेखातील हिरवाभाग  लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो.

3. आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो ?

उत्तर-   आलेखात निळा भाग लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो.

4. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

उत्तर-  पहील्या व चौथ्या टप्प्यात जन्मदर अल्पप्रमाणातच जास्त आहे, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

5. कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदराएवढाच आहे ?

उत्तर- आलेखात चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दर्शविणाऱ्या रेषा एकमेकास स्पर्श करतांना दिसत आहेत. म्हणजेच चौथ्या व पाचव्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदरा ऐवढा आहे.

6. कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे ?

उत्तर-   आलेखात पाचव्या टप्प्यात मृत्यूदर दर्शविणारी रेषा ही जन्मदर दर्शविणाऱ्या रेषेच्या वर दिसत आहे.  त्यामुळे पाचव्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे असे म्हणता येईल.


1) कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करतो 

 उत्तर ‘आ’  मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करतो

2) कोणत्या मनोर्‍यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळते

 उत्तर ‘इ’ मनोर्‍यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आढळते

3) कोणता मनोरा वृद्धांचा देश असल्याचे दर्शवितो

 उत्तर ‘आ’ मनोरा वृद्धांचा देश  असल्याचे दर्शवतो

4) मनोऱ्याचा तळ रुंद असल्याचे कारण कोणते

 उत्तर या ठिकाणी जन्मदर जास्त असल्याने बालकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे  त्याच बरोबर येथे  वाढत्या  वयाबरोबर मृत्यूदरही वाढलेला असल्याने या  मनोऱ्याचा तळ रुंद आहे

5) मनोरा स्तंभासारखा उभा का दिसतो 

 उत्तर या ठिकाणी जन्मदरात आणि मृत्युदरात स्थिरता आलेली असल्याने, दोघांमधील फरक नगण्य आहे आणि वयोगटातील प्रत्येक गटाची लोकसंख्येची टक्केवारी जवळजवळ समान आहे म्हणून हा मनोरा संभा सारखा उभा दिसतो


1) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे ?                                     

उत्तर – ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे

2) भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड ?                         

उत्तर – भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड ऑस्ट्रेलिया आहे

3) भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता ?                        

उत्तर – भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड आशिया आहे

4) कोणत्या विभाजीत वर्तुळात एक खंड कमी आहे व का?

उत्तर – लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असुन तेथे कायम (स्थायीक) वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही.

5) युरोप खंडाची भूमीची टक्केवारी किती?

उत्तर – युरोप खंडाची भूमीची टक्केवारी 6.80% आहे.


कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात जास्त आहे

 उत्तर मध्य आशिया, युरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आणि आग्नेय आशिया या प्रदेशात साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे

कोणत्या प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे

 उत्तर उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश या प्रदेशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे

स्त्री साक्षरतेचे प्रमाण कोणत्या प्रदेशात पुरुषांपेक्षा जास्त आहे

  उत्तर  स्त्री  साक्षरतेचे प्रमाण मध्य आशिया, युरोप व उत्तर अमेरिका या ठिकाणी जास्त आहे

आलेखा बाबतचे तुमचे निष्कर्ष लिहा

  उत्तर  I) जगात साक्षरतेचे प्रमाण असमान आहे,

II) साक्षरता जास्त असलेले प्रदेश विकसीत व विकसनशिल आढळतात

III) साक्षरता कमी असलेले देश सामाजिक दृष्टया मागासलेले आहेत.

IV) स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेले युरोप व उत्तर अमेरीका हे प्रदेश विकसीत आढळतात.  

5  आलेख काय दर्शवितो  उत्तर-  

उत्तर-  आलेखात प्रदेशानुसार सन 2016 मधील  लिंग व प्रौढ साक्षरतेचे प्रमाण दर्शवलेले आहेआलेखात प्रदेशानुसार सन 2016



1 आलेख काय दर्शवतो

 उत्तर आलेखात वय व लिंगानुसार ( स्त्री- पुरुष ) यांची टक्‍केवारी लोकसंख्या मनोऱ्याव्दारे दर्शवलेली आहे

2 कोणत्या वयोगटात पुरुषांची टक्केवारी जास्त आहे

 उत्तर 0 ते 9  या वयोगटात पुरुषांची टक्केवारी जास्त आहे

कोणत्या वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे

  उत्तर  70 पेक्षा अधिक हा वयोगट वगळता सर्वच वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे. म्हणजेच 0 ते 69 या वयोगटात स्त्रियांची टक्केवारी कमी आहे.

4  30 ते 39 वयोगटात कोणाचे प्रमाण जास्त आहे

 उत्तर 30 ते 39 या वयोगटात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे

कोणत्या वयोगटात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे

 उत्तर कोणत्याही वयोगटात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे प्रमाण जास्त नाही


नकाशा काय दर्शवतो

 उत्तर दिलेल्या नकाशात जगतीक प्रमुख आर्थिक  क्रियांचे वितरण  दर्शवलेले आहे

नकाशात कोण-कोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे

 उत्तर नकाशात शेती, पशूपालन, मासेमारी, खाणकाम व लाकूडतोड या  प्राथमिक आर्थिक  व्यवसायांचे वितरण दाखवले आहे

लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्त दरम्यान आढळतो 

 उत्तर लाकूडतोड हा 30 अंश ते  60 अंश व्यवसाय दरम्यान आढळतो

कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाही? त्याचे कारण काय असावे?

 उत्तर अंटार्टिका खंड, ग्रीनलँड तसेच उत्तर कॅनडा च्या भागात प्राथमिक आर्थिक क्रिया आढळत नाहीत कारण या भागांमध्ये अतिथंड हवामान असून तेथे बर्फाचे प्राबल्य आहे. अशा प्रतिकुल हवामानामुळै या प्रदेशात  मानवी वस्त्या नाहीत, त्यामुळे येथे प्राथमिक आर्थिक क्रिया आढळत नाहीत

मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत

 उत्तर मासेमारीसाठी आवश्यक भूखंडमंच, दंतुर किनारा, थंड सागरी प्रवाह यांचा संगम, अशा काही नैसर्गिक स्थितीची आवश्यकता असते आणि मासेमारीसाठी उपयुक्त असे स्थिती काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असल्याने  मासेमारी व्यवसाय विशिष्ट ठिकाणी विकसित झालेले आहेत

युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात

 उत्तर युरोप खंडात शेती, खाणकाम, पशूपालन, याबरोबरच मासेमारी या आर्थिक क्रिया अधिक आढळतात

समुद्रामध्ये दर्शविलेले खान कामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल

 उत्तर समुद्रातील खाणकामाचे चिन्ह हे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन दर्शवत असेल

कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही? का?

 उत्तर अंटार्टिका खंडावर खाणकाम व्यवसाय आढळत नाही कारण येथे कोणत्याही देशास अथवा सस्थेंस  खाणकाम करावयाची आंतरराष्ट्रीय परवानगी नाही  किंवा तसे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत

9 जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते

 उत्तर जगात पॅसिफिक महासागर भागात मासेमारी जास्त प्रमाणात केली जाते

10  मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात

 उत्तर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे मासेमारी, खाणकाम, पशूपालन आणि काही प्रमाणात लाकूडतोड या प्राथमिक आर्थिक क्रिया आढळतात

11  आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात

 उत्तर आग्नेय आशियातील  बेटांवर खाणकाम  व   लाकूडतोड  या आर्थिक क्रिया आढळतात


अधिक वाचा

अधिक वाचा

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न

अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका

सागरी लाटांचे कार्य

अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप

Prof. Manoj Deshmukhhttp://geographyjuniorcollege.com
I am a Jr. College Lecturer working in Rashtriya Junior College, Chalisgaon Dist. Jalgaon
RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page