Online Test
अकरावी भूगोल प्रकरण 3 अपक्षणाची कारके प्रकरणावर आधारित
online Test Apaksharnachi Karke Achuk Ghatak Olkha
योग्य घटक ओळखा
अचुक घटक ओळखा
योग्य पर्याय निवडा
online Test Apaksharnachi Karke Achuk Ghatak Olkha
Apsharnachi Karke Achuk Ghatak Olkha
हिमनदी – उच्च अक्षवृत्तीय व अति उंचावरील प्रदेशात हिमवर्षावाच्या स्वरुपात वृष्टी होते. या हिमवृष्ट्रीमुळे भूपुष्ठावर हिमथर साचून कालांतराने त्याचे बर्फात रुपांतर होते. बर्फाच्या प्रचंड दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात. अशा बर्फाच्या प्रवाहास हिमनदी म्हणतात.
1) उखड –
हिमनदी या कारकामुळे ही क्रिया घडते. यामध्ये हिमनदीच्या मध्ये असलेल्या खडकांच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या बर्फाचा दाब पडतो. त्यामुळे, तळाकडून वर आलेल्या व काठावर पुढे आलेल्या खडकाचा भाग उखडला जातो, यालाच उखड प्रक्रिया म्हणतात. उखड क्रियेतील खडकाचा उगमाकडील भाग गुळगुळीत असतो तर प्रवाहाच्या दिशेकडील भाग खडबडीत असतो.

2) अपघर्षण –
या प्रक्रियेत पृष्ठभागाचे घर्षण होउन ते खरवडले जाते. जसे फर्निचरला पॉलिश करताना खरखरीत कागद वापरला जातो तशीच क्रिया येथे घडते. कारकाबरोबर वाहत असलेल्या गाळाच्या कणांमुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. कारकाचा वेग जसा वाढतो तसे अपघर्षण ही वाढत जाते.
3) सन्निघर्षण-
खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकावर आपटतात व ते एकमेकांवर आपटल्यामुळे तुटून त्याचे लहान तुकडे तयार होतात. वाहतांना तुकड्यांचा आकार लहान होतो, व त्यास गोलाई येते.
अपघर्षण आणि सन्निघर्षण या प्रक्रियेतील फरक म्हणजे अपघर्षण प्रक्रियेत पदार्थाच्या वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो, तर सन्निघर्षण हे वाहत्या पदार्थांशी संबंधित असते.
4) द्रावण –
जेव्हा काही खडकांचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलाचे आम्लात रूपांतर झाल्यामुळे होते, अशा प्रक्रियेस द्रावण प्रक्रिया म्हणतात. खडकातील चुना व चुनखडक ही खनिजे पाण्यात विरघळतात. नंतर ती पाण्याबरोबर वाहून किनारी भागात जेथे चुनखडक, डोलोमाईट, वालुकाश्म असे खडक असलेले किनारीभाग अशा त-हेच्या अपक्षरणास जास्त संवेदनशील असतात.
5) अपवहन-
जमिनीवरील कोरडे व सुटे झालेले मातीचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. जिथे झाडे कमी आहे तेथे ही क्रिया अधिक घडते. एखादया भागातील मातीच्या व वाळूच्या वाहून जाण्याने खङडा किंवा खळगा तयार होतो. यालाच अपवहन खळगा असे म्हणतात.

6) वेधन –
नदीतील पाण्याबरोबर गाळ वहात असतो. काहीवेळा तळावरील अडथळ्यांमुळे किंवा तळाला असलेल्या भेगांमुळे प्रवाह चक्राकार बनतो. त्याबरोबर असलेल्या खडकांचे तुकडे देखील चक्रीय गतीने फिरतात. असा प्रवाह एकाच जागी सतत फिरल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये खळगा निर्माण होतो. हा खळगा पुढे मोठा व खोलगट होत जातो. त्याला मडक्या सारखा आकार प्राप्त होतो. या क्रियेस वेधन म्हणतात यामुळे रांजणखळगे तयार होते.
7) अधोगामी अपक्षरण (अनुलंब अपघर्षण) –
ही पाण्याच्या प्रभावाने होणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे तळाकडील पदार्थांचे अपक्षरण होऊन असे पदार्थ वाहून गेल्यामुळे नदीचे पात्र किंवा तळभाग खोल होत जातो. यामुळे घळई व व्ही आकाराची दरी तयार होते.
8) अभिशीर्ष अपक्षरण :
नदीच्या उगमकडे होणारे पार्श्ववर्ती अपक्षरण. नदीच्या उगमाकडील माती, दगडगोटे किंवा खडक हे तीव्र उतारामुळे कोसळतात. असे कोसळलेले पदार्थ नदी प्रवाहाच्या दिशेने वाहून नेते. यामुळे नदीचा प्रवाह उगम क्षेत्राकडे वाढतो.
9) बाजूकडील अपक्षरण :
हे नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या काठांवर होते. दरीच्या बाजूंचे अपक्षरण उपनद्यांद्वारे व इतर लहान नद्यांद्वारे होते. जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते, बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. या प्रक्रियेला दरीचे रुंदीकरण म्हणतात. दरीच्या तळाकडील भागात सुद्धा बाजूकडील अपक्षरण घडते. याच्यामुळे मुख्यतः पूर मैदानांचे विस्तारीकरण घडते.
10) कर्षण-
कारकांकडून संपादीत झालेल्या पदार्थांचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे या क्रियांद्वारे वहन होते. अशाप्रकारे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकांचे होते.
11) निलंबन – हलके सूक्ष्म पदार्थ प्रवाहाच्या वरच्या भागातून वाहत जातात. बऱ्याच अंतरापर्यंत हे कण तळाकडे स्थिर होत नाहीत. द्राविकरण पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ पाण्याद्वारे वाहून नेले जातात. ज्या प्रदेशात चुनखडक व चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे खडक आढळतात, त्या प्रदेशात विरघळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असतात
12) संचयन प्रक्रिया –
कारकांच्या कार्यादरम्यान काही घटकांमुळे संचयनाची प्रक्रिया घडत असते. कारकांच्या प्रवाहाची गती कमी झाल्यास त्यांची वहनाची क्षमता कमी होते व त्यानुसार वाहून नेत असलेल्या पदार्थांचे आकारमानदेखील कमी होईल.
तसेच त्यांचे वहन व संचयन कमी होते. पूर परिस्थितीत किंवा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना नदीची गती जास्त असते, त्यामुळे वहन क्षमता देखील जास्त असते. तसेच संचयित केलेल्या पदार्थांचा आकार मोठा असतो. जर जमिनीचा उतार किंवा प्रवाहाची दिशा बदलली तर तेथे संचयन घडून येते. जेव्हा प्रदेशात उतारमान बदलते.
मैदानी प्रदेश तेथे नद्यांची गती कमी होते त्यामुळे गुरुत्व बलामुळे मोठे कण लवकर संचयित होतात नंतर लहान कणांचे संचयन होते. तेथे अवसादांना पुढे वाहून नेण्यास नदया असमर्थ ठरतात व तेथे संचयनास सुरुवात होते. लहान कण प्रवाहात दीर्घकाळ तरंगत असतात. नदी व वारे सूक्ष्म कणांना शेवटपर्यंत वाहून नेतात आणि त्यानंतरच्या अवस्थेत त्यांचे संचयन घडते. प्रवाहमार्गात वृक्ष, पर्वत किंवा तत्सम अडथळा आल्याने कारकांचा वेग मंदावतो, अशा स्थानी संचयनास सुरुवात होते.
खालील लिंकवर क्लिक करुन अकरावी प्रकरण 1 भू-हालचाली प्रकरणावरील Online Test सोडवा
खालील लिंकवर क्लिक करुन अकरावी प्रकरण 2 विदारण व विस्तृत हालचाली प्रकरणावरील Online Test सोडवा
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात
अधिक वाचा
Nice Test
Gud tist