Geo Practical Data Representation Divided Circles
विदा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे
उद्देश– दिलेली सांख्यिकीय माहीती विभाजित वर्तुळाव्दारे दर्शविणे
उद्दिष्टे- 1) नकाशामध्ये विविध प्रकारची आकडेवारी व त्यांचे उपघटक दर्शविण्यासाठी विभाजित वर्तुळाचा उपयोग केला जातो.
2) आकृतीवरुन सांख्यिकीय माहितीचे सविस्तर वर्णन करणे.
3) विभाजित वर्तुळात दर्शविलेल्या विदेचे विश्लेषण करणे……
विभाजित वर्तुळाचे फायदे
1) विभाजित वर्तूळ समजण्यास अतिशय सोपे असते.
2) अज्ञात लोकांनाही विभाजित वर्तूळाव्दारे माहितीचे प्रभावी संप्रेषण होऊ शकते.
3) विभाजित वर्तुळाव्दारे एका दृष्टीक्षेपात माहितीचे विश्लेषण करता येते व माहिती समजते.
4) एकाच प्रकारच्या गटाच्या माहितीची तुलना करण्यासाठी उपयोगी
5) विभाजित वर्तुळामुळे संख्येच्या परीक्षणाची आवश्यकता भासत नाही, आकृतीव्दारे निष्कर्ष काढता येतात
6) दिलेल्या माहितीची व्याप्ती समजते.
7) संख्यात्मक माहितीतील आकडेवारी मोठी असल्यास व हाताळण्यास किचकट असल्यास अशा माहितीचे विश्लेषण विभाजित वर्तुळाव्दारे चटकण होवू शकते.
8) विभाजित वर्तुळात आपणास ज्या घटकावर जास्त प्रकाश टाकावयाचा आहे अशा घटकाची पाकळीचा क्रम बदलवीता येणे शक्य असते.
विभाजित वर्तुळाचे तोटे
- माहितीचे जास्त उपविभाग असल्यास विभाजित वर्तुळ समजण्यास कमी प्रभावी ठरते. तर काही वेळेस विभाजित वर्तुळ काढणे शक्य नसते.
- विभाजित वर्तुळाव्दारे एकाच प्रकारच्या माहितीच्या संचाची तुलना होते. ज्या ठिकाणी माहितीचे अनेक संच (गट) असतात तेथे विभाजित वर्तुळ प्रभावी नसते.
- विभाजित वर्तुळाचे विश्लेषण करतांना तुलनात्मक चित्रामुळे चूका होवू शकतात किंवा वाचकांना त्रास होतो. तसेच विभाजित वर्तुळावरुन केलेले विश्लेषण ढोबळ स्वरुपाचे असते.
- तसेच आकृतीवरुन घटकाचे अचूक मुल्य काढता येत नाही.
- कमी अंशात्मक फरक असलेल्या माहितीची अथवा उपविभागाची तुलना करतांना समस्या निर्माण होतात.
- संख्यात्मक माहितीचे विश्लेषणाऐवजी आकृतीवर आधारीत विश्लेषणात चुकीचे निष्कर्ष निघू शकतात.
- निगेटीव्ह (ऋणात्मक) व पॉझिटिव्ह (धनात्मक) माहितीच्या एकत्रीत विश्लेषणात विभाजित वर्तुळ प्रभावहिन असते.
उपयोग
1) विभाजित वर्तुळ घटकांचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त असते.
2) विभाजित वर्तुळाचा उपयोग सामान्यत: टक्केवारी किंवा प्रमाणित माहिती दर्शविण्यासाठी होतो.
3) सामान्यत: प्रत्येक श्रेणीद्वारे दर्शविलेले टक्केवारी / आकडेवारी विभाजित वर्तुळाच्या पाकळीच्या पुढे प्रदान केली जात असल्याने माहीतीची तुलना करण्यास उपयोगी असते.
4) विभाजित वर्तुळ विदेचे सामान्य निष्कर्ष काढण्यास उपयोगी असते .
5) एकाच प्रकारच्या विदेच्या उपघटकांचे निरीक्षण व तुलना विभाजित वर्तुळावरुन करता येते.
अक्र | विभाजित वर्तुळाचे फायदे | विभाजित वर्तुळाचे तोटे | उपयोग |
1 | माहितीची तुलना करण्यासाठी उपयोगी | केवळ तुलनात्मक चित्र समजते. परंतु आकृतीवरुन अचूक मूल्य काढता येत नाही | घटकाचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त |
2 | विभाजित वर्तुळावरुन निष्कर्ष काढता येतात | मुल्यांमध्ये कमी फरक असल्यास निष्कर्ष काढतांना अडचणी येतात | माहीतीवरुन निष्कर्ष काढता येतो. |
3 | साख्यिकीय माहीतीचे व्याप्ती लक्षात येते | सांख्यिकीय माहीतीचे उपविभाग जास्त असल्यास विभाजीत वर्तुळ काढता येत नाही. | विदा ठराविक असेल तर तुलना करण्यासाठी उपयोग केला जातो. |
4 | मोठी आकडेवारी असल्यास निरीक्षणाने माहिती समजते. | तुलनात्मक निरीक्षण ढोबळमानाचे असते, अचूकता नसते. | विदाचे निरीक्षण करण्यासाठी उपयोग केला जातो. |
विदा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे
Geo Practical Data Representation Divided Circles
उदा. 1
खालील सांख्यिय माहिती विभाजित वर्तुळाच्या साहाय्याने दर्शवा व विश्लेषण करा
अक्र | रस्त्यांचा प्रकार | रस्ते बांधणी (किमी) |
1 | राष्ट्रीय महामार्ग | 2970 |
2 | राज्य महामार्ग | 30548 |
3 | प्रमुख जिल्हा मार्ग | 37234 |
4 | इतर जिल्हा मार्ग | 36403 |
5 | ग्रामीण रस्ते | 76602 |


निष्कर्ष-
दिलेल्या साख्यिंकीय माहीतीत ग्रामीण रस्त्यांचे बांधणीचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजेच 150 अंश (76602 कि.मी. ) आहे. तर सर्वात कमी रस्ते बांधणी राष्ट्रीय महामार्गांची आहे व त्याचे विभाजित वर्तूळातील मूल्य 5.82 अंश आहे. दिलेल्या विदेनुसार राज्य महामार्ग बांधणी 30548 किमी म्हणजे अशांत्मक 59.85 अंश मूल्य आहे. विदेत प्रमुख जिल्हामार्ग व इतर जिल्हामार्गाची अंशात्मक विभागणी अनुक्रमे 72.95 व 71.32 अंश आढळून येत आहे.
_______________________________________________________________
Geo Practical Data Representation Divided Circles
विदा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे
उदा. 2
एका प्रदेशातीलकिती पर्यटक विविध गंतव्यस्थांनाना गेले याचे वितरण खालील माहिती दाखवते. दिलेल्या विदेला विभाजित
वर्तुळाव्दारे दाखवा आणि विदेचे विश्लेषण करा.
गतव्य स्थान | पर्यटकांची संख्या |
अभयअरण्ये व प्राणीसंग्रालय | 300 |
ऐतिहासिक स्मारके | 200 |
थीम पार्क | 350 |
संग्रालये आणि कलादालने | 150 |
नदयांचे आणि समुद्र किनारे | 250 |
1250 |

निष्कर्ष-
दिलेल्या साख्यिकींय माहीतीवरुन असे लक्षात येते की सर्वात थीमपार्क स्थळांना सर्वात जास्त (350) पर्यटकांनी हे भेटी दिलेल्या आहेत व त्याचे विभाजित वर्तुळातील अंशात्मक मूल्य 101 0 आहे. अभयअरण्ये व प्राणी संग्रलायांना 300 पर्यटकांनी (860 ) भेटी दिलेल्या आहेत. ऐतिहासिक स्मारके व संग्रालये आणि कलादालने यांना 580 व 430 पर्यटकांनी भेटी दिलेल्या असल्याचे लक्षात येते नदयांचे व समुद्रकिनारे यांना 250 (720) पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत.
____________________________________________________________
उदा 3
खालील विदा शहरामधील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दर्शविते. विभाजित वर्तुळाच्या सहाय्याने दिलेल्या विदेचे सादरीकरण करा. विदेचे विश्लेषण करा.
भूमी उपयोजन | भूमीची टक्केवारी |
निवासी | 52 |
व्यावसासिक | 15 |
औदयोगिक | 8 |
शेती | 2 |
मोकळी जागा | 5 |
संमिश्र | 18 |
एकूण | 100 |
निष्कर्ष-
प्रस्तृत विदेवरुन शहरात सर्वात जास्त भूमीचे उपयोजन निवासी भागासाठी 52% झाले असल्याचे आढळून येत आहे. तसेच व्यावसासिक व औदयोगिक कामांसाठी भूमीचे उपयोजन 15% व 8% असुन त्याचे विभाजित वर्तुळातील अंशात्मक मुल्य हे 54 व 29 आहे. शहरातील सर्वात कमी भूमीचा वापर हा शेतीसाठी असुन त्यांची टक्केवारी 2 आहे व विभाजित वर्तुळात त्याचे अंशात्मक मुल्य हे 7 आहे. शहरातील मोकळी जागा व संमिश्र भूमी उपयोजनाची टक्केवारी 5 व 18 असुन त्यांचे विभाजित वर्तुळातील अंशत्मक मूल्य अहे 18 व 65 आहे.
________________________________________________________________________
उदा. 4.
एका प्रदेशात विविध प्राकृतिक भूरूपांनी किती भूमी व्यापली आहे, याची माहिती पुढील कोष्टकात दिली आहे. विभाजित वर्तुळाच्या मदतीने विदा दर्शवा आणि विश्लेषण करा.
प्राकृतिक भूरुपे | भूमी % |
डोंगर | 10 |
मैदाने | 40 |
पठार | 30 |
अति उंच पर्वत | 20 |
एकुण | 100 |
निष्कर्ष– प्रस्तृत प्रदेशात सर्वात जास्त मैदान हे भूरूप असून, त्या खालोखाल पठार हे भूरूप आहे. तर डोंगर हे भूरूप 10% असून अतिउंच पर्वतांची टक्केवारी 20 आहे.
________________________________________________________________________
Geo Practical Data Representation Divided Circles
विदा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे
उदा क्र 5
खालील विदेसाठी विभाजित वर्तुळ काढा व आपले निष्कर्ष लिहा.
भारताची विविध देश प्रदेशात होणारी निर्यात. (टक्केवारी)
देश – प्रदेश | निर्यातीची टक्केवारी |
युरोपियन संघ | 22.3 |
अमेरीकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा | 20.1 |
ओपेक | 15 |
आफ्रिकी देश | 4.5 |
आग्नेय आशियाचे देश | 28.9 |
कॅरेबियन देश | 2.2 |
इतर | 7 |
निष्कर्ष– भारताची सर्वात जास्त् निर्यात ही आग्नेय आशियायी देशांसोबत आहे. तर युरोपियन संघ देशाशी 22.3% आढळून येत आहे. तर अमेरिकेची संयुक्त सं. आणि कॅनडा यांच्य 20.1 %निर्यात आहे. ओपेक राष्ट्रांसोबत 21% ,आफ्रिकी देश 4.5%, कॅरेबीयन देश 2.2% निर्यात भारताची वरील विभाजीत वर्तुळात आढळुन येत आहे. इतर देशांसोबत 7% निर्यात असल्याचे ही लक्षात येते.
खालील लिंकचा वापर करुन विविध व्हिडीओ पहा
प्रात्यक्षिक क्र 08 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण सर्व प्रश्नांची उत्तरे.
बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )