प्रकरण – 5 व्दितीय आर्थिक क्रिया
व्दितीय आर्थिक क्रिया टीपा लिहा
Dhwitiya Arthik kriya tipa liha
व्दितीय आर्थिक क्रिया टीपा लिहा
Dhwitiya Arthik kriya tipa liha
प्रश्न 5. टीपा लिहा
1) स्थानमुक्त उद्योग
2) वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका
3) सार्वजनिक उदयोग
4) अनुमापी अनुकूलता
5) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उदयोगांचे वर्गीकरण
6) मालकी हक्कावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण
1) स्थानमुक्त उद्योग
उत्तर:
① आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना स्थाननिवडीचे स्वातंत्र असते अशा उद्योगांना स्थानमुक्त उदयोग म्हणतात. कच्च्या मालाच्या स्वरुपावर स्थानमुक्त उदयोग ठरविता येतात.
② कापड उदयोग एका अर्थी स्थानमुक्त उदयोगाचे उदाहरण होऊ शकते. कारण या उदयोगाचा कच्चा माल कापुस हा टिकाऊ कच्चा माल असुन कापुस व त्यापासून बनणारे कापड यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे कापड उदयोग सध्या कोठेही स्थापन केले जाऊ शकतात.
③ स्थानमुक्त उदयोगातील तयार होणारा पक्का माल हा खूप मौल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असतो. उदा. हिऱ्यांना पैलू पाडणे, माहिती तंत्रज्ञान संदर्भातील विविध वस्तूंचे उत्पादन किंवा उत्पादनाची जुळणी करणे
④ स्थानमुक्त उदयोग हे प्रामुख्याने संसाधने, उत्पादन कौशल्ये व ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात.
⑤ या उद्योगांना वाहतूक खर्चात झालेली घट फारदेशीर ठरते. यातील कच्चा माल व पक्का माल सहसा दोन्ही वजनाने हलके व वाहतूकीस किफायतशीर असतात.
⑥ या उद्योगांना स्थानांचे महत्व नसते. हे उदयोग पुर्नस्थापित होण्याची शक्यता जास्त असते.
⑦ या उद्योगातील उत्पादन कमी असते परंतू त्याचे मूल्य जास्त असते.
⑧ या उद्योगांवर स्थानाचा फारसा प्रभाव नसतो त्यामुळे असे उदयोग सहसा शहरात स्थापन होतात.

2) वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका
उत्तर :
① वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे, ज्याव्दारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इ. प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. कोणत्याही व्यवसायाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे.
② सर्व आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो.
③ उदयोगधंदयाची लागणारा कच्चा माल हा, उत्पादित क्षेत्रापासून किंवा बाजारपेठेपासून उदयोगाच्या ठिकाणापर्यन्त कमी कालावधीत आणण्यासाठी प्रभावी वाहतूक व्यवस्था महत्वाची भूमिका बजावत असते.
④ उदयोगात तयार झालेला पक्का माल बाजारपेठे पर्यन्त व बाजारपेठेत विक्री झालेला माल थेट ग्राहकाच्या घरापर्यन्त नेण्यासाठी सक्षम व प्रभावी वाहतूक व्यवस्थेस महत्व आहे.
⑤ आंतरराष्ट्रीय उदयोग व व्यापारातील अवजड वाहतूकीसाठी जलवाहतूक अत्यंत प्रभावी व स्वस्त वाहतूक साधन माणले गेले आहे, त्यामुळे उदयोगांना मोठया प्रमाणावर खनिजे, रसायने, धातू, कोळसा, तेल किंवा कच्चा माल आयात व निर्यात करता येतो. बंदराच्या ठिकाणी औदयोगिक केंद्रे तयार होतात.
⑤ अंतर्गत जलवाहतूक व्यवस्था असलेल्या ठिकाणी अनेक व्यवसाय व उदयोग स्थापन झालेले आढळतात. उदा. खनिजांवर आधारित उदयोग, तेलशुध्दीकरण, जहाजबांधणी उदयोग इ. जगातील पंचमहासरोवरां प्रदेशामुळे अमेरिकेतली उदयोग व व्यवसायांना मोठा फायदा झालेला आहे.
⑦ अंतरराष्ट्रीय उदयोग व व्यापारात नाशंवत, वजनाने हलक्या, औषधी, वैद्यकीय उपकरणे या सारख्या मालासाठी हवाई वाहतूक महत्वाची मानली जाते. हवाई वाहतूक सर्वात वेगवान वाहतूक असल्याने सध्या उदयोग व्यवसायातील विविध बैढका, चर्चासत्रे इ. साठीही हवाई वाहतूकीचा वापर वाढला आहे.
⑧ देशा अंतर्गत वाहतूकीसाठी रेल्वे व रस्ता वाहतूक महत्वाची आहे. देशांअतर्गत वाहतूकीत जड व लांब पल्ल्याच्या वाहतूकीसाठी रेल्वे वाहतूक महत्वाची भूमिका बजावत असते. लोहमार्ग व्यवस्था विकसीत प्रदेशात औदयोगिक विकास झालेला आढळतो. उदा. ऱ्हाईन नदी खोरे, युरोपीय देश
⑨ कमी अंतराच्या वाहतूकीसाठी व इतर मार्गांच्या अडचणीच्या ठिकाणी रस्ते वाहतूक उत्तम व्यवस्था आहे. ग्रामिण भागातील उदयोग व व्यवसांसाठी रस्ते वाहतूकीला पर्याय नाही. रस्ते वाहतूक इतर सर्व वाहतूकींना पुरक वाहतूक साधन आहे. कमी अंतरावरील कच्चा व पक्कामाल वाहतूक, मंजुर व्यवस्था वाहतूकीत रस्ते वाहतूकीस महत्व आहे.
सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था उपलब्ध असलेल्या प्रदेशात अनेक प्रकारचे उदयोग व व्यवसांना चालना मिळालेली आढळते.

3) सार्वजनिक उदयोग –
① सार्वजनिक उदयोग हा मालकीवर आधारित उदयोगांच्या वर्गिकरणातील एक उदयोग प्रकार आहे.
② सार्वजनिक उदयोग क्षेत्रातील उदयोंगाची मालकी ही केंद्र शासन किंवा राज्य शासनाची असते.
③ सार्वजनिक उदयोगाची सर्व यंत्रणा सरकारच्या माध्यमातुन चालत असतात.
④ या उद्योगांचे सर्व प्रकारचे भाग भांडवल, गुंतवणुक ही राज्य शासन किंवा केंद्र शासन यांची असते.
⑤ सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगातील उत्पादित मालाचे विपणन हे शासकीय यंत्रनांच्या माध्यमातून होत असते.
⑥ ज्या क्षेत्रात खाजगी गुतंवणूक कमी असते किंवा ज्या क्षेत्रात नफा मिळविण्याचा कालावधी हा जास्त असतो अशा क्षेत्रात सरकारच आपली गुतंवणुक करून सार्वजनिक उदयोग स्थापन करत असते. देशाच्या नियोजित विकासाच्या दुष्ट्रीने या प्रकारचे उदयोग शासन स्थापन करत असते.
⑦ लोहपोलाद उदयोग, बहुउद्देशीय धरण बांधणी, वीज निर्मीती प्रकल्प, रेल्वे बांधणी, दळणवळण, संदेशवहन, सरंक्षण क्षेत्रातील उदयोग प्रामुख्याने सार्वजनिक उदयोग असतात. किंवा या क्षेत्रात सुरवातीला शासनाला आपली गुंतवणुक करुन उदयोग स्थापन करावे लागतात.

4) अनुमापी अनुकूलता–
उत्तर-
① अनुमापी अनुकूलता ही उद्योगांच्या केंद्रीकरणातील एक प्रमुख प्रक्रिया आहे.
② एखादया प्रदेशातील सुविधांच्या आधारामुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. अशा मोठ्या उदयोगावर आधारित, त्यावर अवलंबून असणारे आणि या उद्योगाच्या सान्निध्यात अवलंबून असणारे पूरक किंवा साहाय्यक इतर अनेक उदयोग अशा ठिकाणी आकर्षित होतात. यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात.
③ एखादया प्रदेशात लोह-पोलाद कारखाना सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पादित होणाऱ्या पोलाद या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती, मोटार गाड्या निर्मिती, यंत्रनिर्मिती असे विविध उदयोग स्थापित होताना दिसतात.
④ मोठया उद्योगाच्या स्थापनेमुळे, इतर उदयोगांना लागणाऱ्या विविध पायाभूत सेवा-सुविधा तेथे आधीपासूनच उपलब्ध असतात. या सेवांच्या अनुकूलतेचा फायदा घेण्यासाठी कमी भांडवलात त्यावरील आधारित इतर लहान मोठया उद्योगांना सहजपणे जास्त नफा मिळविता येतो.
⑤ अनुमापी अनुकूलतेमुळे इतर उद्योगांना केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळते. मोठया उदयोगाच्या स्थानिकीकरणामुळे, त्यास असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांमुळे त्यावर आधारित इतर उद्योगांना व इतर पुरक उद्योगांना आपले व्यवस्थापन सहजपणे करता येत असते. त्यामुळे अशा प्रदेशात औदयोगिक पट्ट्याची निर्मिती होत असते.
5) कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उदयोगांचे वर्गीकरण–
उत्तर-
यामध्ये कृषीवर आधारित, सागरी उत्पादनावर आधारित, खनिजावर आधारित व प्राण्यांवर आधारित उद्योगांचा समावेश होतो, ते उद्योग पुढीलप्रमाणे –
① कृषी उत्पादनावर आधारित उद्योग –
या उद्योगात प्रामुख्याने कृषी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदा. या उद्योगात साखर कारखाने, कापड उद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो.
② सागरी उत्पादनावर आधारित उद्योग –
या उद्योगात सागरातून मिळणाऱ्या मत्स्योत्पादनावर प्रक्रिया केली जाते. उदा. या उद्योगात मासे हवाबंद डब्यात भरणे, माशांपासून तेल काढणे, खारवीणे, वाळविणे तसेच शंख, मोती, शिंपले, या सारख्या शोभेच्या वस्तू तयार करणे इ. उद्योगांचा समावेश होतो.
③ वनांवर आधारित उद्योग –
या उद्योगात जंगलातून मिळणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया करून उत्पादन मिळविले जाते. उदा. लाकडावर आधारित कागद उद्योग, जहाजबांधणी उद्योग, इमारतीसाठी, जळण्यासाठी, अवजारे, खेळणी, फर्निचर, इ. व्यवसाय चालतात. तसेच जंगलातून फळे, कंदमुळे, राळ, लाख, डिंक, मध, मेण, कात, रंग, वंगण, औषधी तेल, सुगंधी द्रव्ये, इ. पदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो.
④ खनिजांवर आधारित उद्योग
या उद्योगात खाणकाम व्यवसायातून मिळणाऱ्या खनिजांवर आधारित उत्पादनाचा समावेश होतो. उदा. या उद्योगात प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, लोहपोलाद आणि अॅल्युमिनियम, इ. उद्योगांचा समावेश होतो.
⑤ प्राणीजन्य पदार्थांवर आधारित उद्योग –
हे उद्योग पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनावर किंवा कच्च्या मालावर आधारित असतात. या उद्योगातून मिळणाऱ्या दुध, मांस, लोकर, हाडे, शिंगे, केस, कातडी, इ. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यावर आधारित उद्योगांचा यामध्ये समावेश होतो.
उदा. दुधापासून पावडर, दही, चीज. चॉकलेट, आईसक्रिम, लोणी, तूप, इ. पदार्थ. तसेच मांस प्रक्रिया उदयोग, लोगर उदयोग इ.

6) मालकी हक्कावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण–
उत्तर-
① सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग –
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे केंद्रशासन किंवा राज्य शासन यांच्या मालकीचे असतात. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शासन सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे मार्केटिग करते. उदा. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL).
② खाजगी क्षेत्रातील उदयोग –
खाजगी क्षेत्रातील उद्योग व व्यवसायांची मालकी ही पुर्णपणे खाजगी, भागीदारीतील किंवा स्वतंत्र किंवा वैयक्तिक स्वरूपात असते. मुळ मालकाने गुंतवणुक करुन उत्पादन तयार केलेले असते, उत्पादनातील नफा व तोटा देखील त्याचाच असतो. टाटा लोहपोलाद उद्योग (TISCO) हे खाजगी क्षेत्राचे उदाहरण आहे.
③ संयुक्त क्षेत्रातील उदयोग –
दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था यांनी संयुक्तरीत्या चालवलेल्या उद्योगांचा यात समावेश असतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूंच्या सहभागाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL).
④ सहकारी क्षेत्रातील उदयोग –
हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्त्वावर चालवला जातो. सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये उद्योगात झालेला नफा आणि तोटा विभागला जातो. दुग्धोत्पादन, साखर उद्योग, वस्त्रोद्योग इत्यादी सहकारी क्षेत्रात मोडतात. उदा. अमुल (AMUL).
⑤ बहुराष्ट्रीय क्षेत्रातील उदयोग –
खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते मर्यादित न राहता अनेक देशांमध्ये विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग म्हणतात. या उद्योगांची नोंदणी ज्या देशात झालेली असते तेथे त्यांचे मुख्यालय असते. उदा. खाजगी क्षेत्रातील

बारावी भूगोल प्रात्यक्षिक 1 सर्वेक्षण (सोडविलेले )
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया
मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न
अकरावी भूगोल प्रथमसत्र प्रश्नपत्रिका
अकरावी भूगोल मुल्यमापन आराखडा व सहामाही आणि वार्षिक प्रश्नापत्रिका स्वरुप