XII Geography First Unit Test
बारावी भूगोल प्रथम घटक चाचणी
XII Geography First Unit Test
(गुण 25)
प्रश्न 1 अ) योग्य सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. ‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
(गुण 3)
अ | ब | क |
लोकसंख्या सक्रमण पाचवा टप्पा | तळ विस्तारणारा शीर्ष निमुळते | भूमीक्षेत्र 6% |
विस्तारणारा मनोरा | 1 % पेक्षा लोकसंख्या कमी | स्वीडन |
ऑस्ट्रेलिया खंड | ऋणात्कम वाढीचा | जन्मदर व मृत्यूदर जास्त |
प्रश्न 1 ब) योग्य पर्याय निवडा.
(गुण 2 )
1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक
अ) शेती
ब) खाणकाम
क) वाहतूक
ड) हवामान
——————-
2) लिंग गुणोत्तर सर्वात कमी असलेला देश
अ) लाटविया
ब) संयुक्त अरब अमिरात
क) रशिया
ड) इस्टोनिया
——————————————————————————————
प्रश्न 2) भौगोलिक कारणे लिहा. (कोणतेही 2)
(गुण 6)
1) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
2) लोकसंख्या वितरण असमान असते.
3) वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
—————————————————————————————
प्रश्न 3 ) फरक स्पष्ट करा. ( कोणतेही 2 )
(गुण 6)
1) अल्पकालीन स्थलांतर आणि दिर्घ कालीन स्थलांतर
2) स्थलांतराचे आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक
3) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश
—————————————————————————————–
प्रश्न 4) खालिल पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
(गुण 8)
1) लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील?
2) लोकसंख्या वाढ व स्थलांतर यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा.
XII Geography First Unit Test
बारावी भूगोल प्रथम घटक चाचणी
XII Geography Unit Test
बारावी भूगोल प्रथम घटक चाचणी
XII Geography First Unit Test
बारावी भूगोल प्रात्यक्षिक जर्नल सोडविलेल्या उदाहरणासह संपर्क- Prof. Manojj Deshmukh 9607371951 9421680541 सवलतीच्या दरात उपलब्ध

उत्तर पत्रिका
प्रश्न 1 अ) योग्य सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. ‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
(गुण 3)
उत्तर-
अ | ब | क |
लोकसंख्या सक्रमण पाचवा टप्पा | ऋणात्मक वाढीचा | स्वीडन |
विस्तारणारा मनोरा | तळ विस्तारणारा शीर्ष निमुळते | जन्मदर व मृत्यूदर जास्त |
ऑस्ट्रेलिया खंड | 1 % पेक्षा लोकसंख्या कमी | भूमीक्षेत्र 6% |
——————————————-
प्रश्न ब) योग्य पर्याय निवडा.
(गुण 2 )
उत्तर-
1) ड) हवामान
2) ब) संयुक्त अरब अमिरात
प्रश्न क्र. 2) कारणे दया
1)
उत्तर-
① सर्व प्रकारचे वाहतूक मार्ग जगाला जगाशी जोडतात त्यामुळे ते नेहमीच विकासासाठी आधारभुत असतात कोणत्याही प्रदेशात जाण्या- येण्यास सुलभता ही त्या प्रदेशातील लोकसंखेची घनता वाढवते.
② वाहतुक मार्ग एकत्र आलेल्या प्रदेशात व्यापार व उदयोग विषयक घटकांना चालना मिळते त्याच बरोबर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत असते.
③ सागरी वाहतुकीमुळे नवीन भूमीचा शोध व बंदराचा विकास होत असतो, सागरी वाहतुकीमुळे व्यापार वाढतो व रोजगार निर्मीती होते, बंदरे व गोंदीच्या समृध्दीतुन लोकवस्ती वाढत जाते.
④ रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या जाळे असणाऱ्या ठिकाणी बाजारपेंठाची निर्मीती होवुन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याने अशा ठिकाणी लोकवस्तीत वाढत जाते. उदा. मुबंई
⑤ रस्ते, रेल्वे, हवाई व जलवाहतुक ही पर्यटन व्यवसास चालना देतात व त्यातुन पर्यटन स्थळी लोकवस्ती वाढत जाते
—————————————————–
2)
उत्तर- ① मानवी लोकसंख्येवर प्राकृतीक घटकांचा प्रभाव पडत असतो. प्राकृतीक घटक मानवी लोकसंख्येवर परिणाम करतात.
② मानवी जिवनास सुखकर असलेले प्राकृतिक घटक उदा. प्राकृतिक रचना, अल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेती योग्य सुपिक मृदा व मैदाने, या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणावर वितरीत झालेले नाहीत.
③ मानवी जिवनास प्रतिकुल असलेले घनदाट अरण्ये, दललदीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अति थंड व हिमाच्छादीत प्रदेश, असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते यांचे प्राकृतिक घटकांच्या असमान वितरणामुळे लोकसंख्या वितरण असमान आहे.
—————————————————–
3)
उत्तर- ① साक्षरतेचा सबंध हा देशातील लोकांचे राहणीमाण, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासनाचे धोरणावरशी असतो.
② साक्षरतेमुळे लोकांची बौध्दीक, व्यवसायीक क्षमता वाढण्यास मदत होत असते. साक्षरतेचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे देशात विविध व्यवसायाचे व रोजगारांचे प्रमाण वाढण्याची टक्केवारी जास्त असते.
③ देशात जेवढे व्यवसाय, रोजगार जास्त वाढतील त्याप्रमाणात देशाचा आर्थिक विकास होत असतो.
④ आर्थिक विकासामुळे व शिक्षणामुळे लोकांचे राहणीमान उंचावते तसेच स्त्रियांचा समाजातील दर्जा देखील वाढत असतो म्हणजेच सामाजिक दुष्ट्रया देखिल देशाचा विकास होत असतो.
⑤ साक्षरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे त्या देशाचा आर्थिक व सामाजिक विकास होत असतो म्हणुन साक्षरता देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते
प्रश्न 3) फरक स्पष्ट करा
1) अल्पकालीन स्थलांतर आणि दिर्घ कालीन स्थलांतर
अल्पकालीन स्थलांतर | दिर्घकालीन स्थलांतर |
1) अल्पकालीन स्थलांतर हे ठराविक कालावधीसाठी किंवा हंगामी स्वरुपाचे असते. उदा. | 1) दीर्घकालीन स्थलांतरात लोक आपले राहते ठिकाण दीर्घकाळासाठी किंवा कायमस्वरुपी सोडून जातात |
2) हे स्थलांतर गुराखी चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार करतांना आढळते. | 2) हे स्थलांतर उच्च शिक्षित तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात बाहेरच्या देशात करतांना आढळते. |
3) या प्रकारचे स्थलांतर कमी अंतराचे व कमी कालावधीसाठी असते | 3) या प्रकारचे स्थलांतर जास्त अंतराचे असु शकते व जास्त कालावधी साठी देखिल असते. |
4) हे स्थलांतर ग्रामिण ते ग्रामिण, ग्रामिण ते शहरी, एका शहरी ते शहरी, शहरी ते ग्रामिण असे असते. | 4) या स्थलांतरात लोक एका देशातुन दुसऱ्या देशातही जातात. |
————————————————-
2) स्थलांतराचे आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक- March 2022
आकर्षक घटक | अपकर्षक घटक |
1) व्यक्तीकिंवा व्यक्तीसमुह एखादया क्षेत्राकडेकिंवा प्रदेशाकडे आकर्षिक होतात अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. | 1) मानवाला मूळ वास्तव्याच्या स्थानापासुन दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षक घटक म्हणतात. |
2) शिक्षण, रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा, उच्च राहणीमान या सारखे घटक आकर्षक घटक म्हणून कार्य करत असतात. | 2) रोजगार कमी होणे, युध्द, दुष्काळ, पाण्याची कमतरता, सामाजिक ताण तणाव असे घटक अपकर्षक घटक म्हणून स्थलांतर घडवून आणतात. |
3) आकर्षक घटक ज्या प्रदेशात उपलब्ध असतात अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश असेही म्हणतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत जाते व प्रदेशातील सोयीसुविधांवर ताण पडतो. | 3) अपकर्षक घटकामुळे प्रदेशातील लोक बाहेर पडतात. अशा प्रदेशास देणारा प्रदेश म्हणतात. तेथील लोकसंख्या कमी होते. अशा प्रदेशात सोयी सुविधांवर केलेला खर्च अनावश्यक ठरतो. |
4) अशा प्रदेशातील लिंग गुणोत्तरावर परिणाम होतो पुरुषांचे प्रमाण वाढते उदा. मुंबई | 4) रोजगारा साठी पुरुष बाहेर पडल्यामुळे अशा ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण जास्त होते उदा. केरळ राज्य |
————————————————-
3) लोकसंख्या वितरण : मैदानी प्रदेश आणि लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश
अक्र | लोकसंख्या वितरण: मैदानी प्रदेश | लोकसंख्या वितरण: पर्वतीय प्रदेश |
1 | 100 मीटर पेक्षा कमी उंची असलेल्या सपाट व मंद उताराच्या प्रदेशास मैदानी प्रदेश म्हणतात | 1000 मी. पेक्षा उंच, तीव्र उतार व शिखराकडे निमुळत्या होत गेलेल्या उंच प्रदेशास पर्वतीय प्रदेश म्हणतात. |
2 | मैदानी प्रदेशात जमीनीच्या सपाट भाग किंवा मंद उतारामुळे लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते. | पर्वतीय प्रदेशात तीव्र उतारामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. |
3 | या प्रदेशात सुपिक गाळाची मृदा, जलसिचंन शेती सुघमता यामुळे लोकसंख्या वाढीस पुरकस्थिती असते. | पर्वतीय प्रदेशात ओसाड किंवा नापिक जमीन, दुर्गम भाग, पाण्याचा अभाव यामुळे लोकसंख्या विरळ असते. |
4 | सपाट किंवा मंद उतारामुळे या प्रदेशात वाहतुक सुविधांचा विकास झालेला असतो. | तीव्र उतार व उंचसखलपणा यामुळे वाहतूक मार्ग फारसे विकसीत नसतात. |
—————————————–
प्रश्न 4 था) खालील पैकी एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा
उत्तर– 1)
① पौढ लोकांचे जास्त प्रमाण– या टप्प्यात जन्मदर व मृत्युदर दोन्ही कमी असल्याने लोकसंख्या कमी असली तरी नागरिकांचे आयुर्मान दीर्घ असते त्यामुळे प्रौढ लोकांचे प्रमाण या टप्प्यात जास्त असते. युरोप खंडातील अनेक देशात प्रौए लोकांचे प्रमाण 66% आहे. तर 65 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण 20% आहे.
② बालकांचे कमी प्रमाण– जन्मदर कमी झाल्याने जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी असते.
③ नैसर्गिक लोकसंख्या वाढ थांबणे– या टप्पयातील काही देशात अनेक ठिकाणी जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झाल्याने नंतर लोकसंख्या नैसर्गिक लोकसंख्या वाढ थांबलेली आहे. 1990 नंतर युरोपातील अनेक देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत देशातील वृध्दांचे प्रमाण वाढते.
④ शिक्षण क्षेत्रावरील परीणाम– जन्मदर कमी झाल्याने काही भागात बालवाडया, शिशुविहार बंद होत आहेत तर मागणीत कायमची घट झाल्याने महाविदयाये व विदयापीठेही आपले काही भाग/कोर्स कमी करीत आहेत.
④ श्रमशक्तींचा मर्यादीत वापर– या टप्प्यात शिक्षणांचा दर्जा सुधारलेल्या असल्याने युवकांचे दिर्घकाळ शिक्षण घेण्यात वेळ जास्त गेल्याने देशाच्या श्रमपुरवठयात युवक उशिरा भाग घेतात, त्यामुळे देशाच्या औदयोगिक व आर्थिक क्षेत्राला आवश्यक श्रमपुरवठा मंद गतिने होतो
⑤ अवलबिंत्वाचे प्रमाण जास्त – साधारण पणे वृध्द हे दुसऱ्यांवर अवलंबुन असतात वृध्दांचे प्रमाण जास्त असल्याने अशा देशांत दुसऱ्यांवर अवलंबुन असणाऱ्या नांगरिकांचे प्रमाण जास्त असते.
⑥ ग्रामीण भागात समस्या प्रमाण जास्त– शहरीभागात महाविदयालये, विदयापिठे, दवाखाने, बँका आणि करमणूक केंद्रे इ. सुविधांमुळे ग्रामीण युवक शहरी भागात स्थलांतरीत होतो त्यातुन ग्रामीण रहिवासात वृध्दांचे जास्त प्रमाण वाढते. ग्रामीण शेती, इतर उदयोंगावर त्याचा परीणाम होवून ग्रामीण भागात अनेक समस्याना तोंड दयावे लागते.
⑦ शहरी भागातील समस्या– शहरी भागांचा औदयोगिकरण व इतर घटकांमुळे चांगला विकास झाला असल्याने विकासाबरोबर प्रदृषण, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, मानसिक ताणतणाव, सामाजिक व पर्यावरणीय समस्यांना या देशातील नागरिकांना तोंड दयावे लागते.
⑧ युवकांचे प्रमाण कमी– जन्मदर कमी असल्याने बालकांचे प्रमाण कमी असतेच नैसर्गिकरित्या युवकांचे प्रमाण कमीच असते त्यामुळे उत्पादीत घटक हा कमी असतो. युरोपातील अनेक देशांचा जन्मदर 0.5% पेक्षा कमी आहे. त्या तुलनेत जागतिक दर 1.4% आहे.
—————————————————-
2)
उत्तर- ① एखादया प्रदेशात जेव्हा मृत्युदरापेक्षा जन्मदर जास्त असतो, तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढत असते. ② लोकसंख्या वाढीसाठी वाढलेला जन्मदर हाच एकच मुद्दा असतो असे नाही. एखादया प्रदेशाच्या लोकसंख्या वाढीत त्यात प्रदेशात स्थलांतरित होवुन आलेली लोकसंख्या हा घटकही या महत्वाचा असतो.
③ स्थलांतरास प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व या सारखे घटक कारणीभुत असतात. स्थलांतरा आकर्षक व अपकर्षक घटक महत्वाची भूमीका बजावत असतात.
③ रोजगाराच्या संधी, उच्च राहणीमान, चांगले हवामान, नागरी सुविधा या सारख्या आकर्षक घटकांमुळे एखादया प्रदेशाची लोकसंख्या वाढते उदा. मुबंई शहर.
④ दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती, युध्दजन्य परिस्थिती, सामाजिक असुरक्षितता, राजकीय असुरक्षितता, नोकरीतील असुरक्षीतता या सारख्या अपकर्षक कारणांमुळे देखिल स्थलांतर होत असते.
⑤ शहरी भागात नोकरीच्या संधी, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा आकर्षक घटकांमुळे अनेक युवक किंवा कुटुंब शहरी भागात स्थलांतरीत होत असतात त्यामुळे शहरांतील लोकसंख्या वाढत आहे.
⑥ विकसीत देशांत देखिल अशाच कारणांमुळे विकसनशील देश किंवा अप्रगत भागातील अनेक लोकांचे स्थलांतर होत असते त्यामुळे अशा देशात परकीय लोकसंख्येची वाढ होत असल्याचे लक्षात येत आहे.
⑦ स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्येची वाढ होत असते तेथे पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, निवास अशा विविध सोयी सुविधांवर ताण पडत असतो, याचा परिणाम घेणाऱ्या प्रदेशाच्या सभोवतालच्या शेतीवर होत असतो.
⑧ स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशात पुरूषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते उदा. मुंबई चेलिंग गुणोत्तर 832 आहे. स्थलांतरामुळे वाढलेल्या लोकसंख्यामुळे प्रदेशात मोठया प्रमाणात नवनवीन कल्पनांची, विचारांची देवाणघेवाण होत असते. त्यातुन त्या प्रदेशात नवनवीन शोध, सर्जनशीलतेत वाढ, तंत्रज्ञानाचा उदय व वापर होतांना दिसतो त्यानुच मोठया प्रमाणावर या प्रदेशाचा आर्थिक विकास घडून येतो.
अधिक वाचा –
माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा
HSC 2021 Geography Question Paper and Answers
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
नोट्स- https://geographyjuniorcollege.blogspot.com/2021/06/choose-correct-option-and-complete.html
व्हिडीओ- https://youtu.be/dfCtcZRaAS8