Home More Prathamik Arthik Kriya Mothe Prashna

Prathamik Arthik Kriya Mothe Prashna

0
Prathamik Arthik Kriya Mothe Prashna

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणातील दिर्घोत्तरी प्रश्न

Prathamik Arthik Kriya Mothe Prashna

खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) व्यापारी मासेमारीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

2) मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

3) जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशाबद्दल टीप लिहा.

4) खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा.

5) प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा


उत्तर –

    मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया मधील महत्वाची व अतिशय प्राचीन क्रिया म्हणजे ‘मासेमारी’ आहे. मासेमारी व्यवसाय प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे.  लोकसंख्या व अन्नाची गरज या मुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे.  आधुनिक यंत्र, मासेमारी कौशल्य, अनुकूल हवामान यामुळे हा व्यवसाय व्यापारी तत्त्वावर केला जातो या व्यापारी मासेमारीवर प्राकृतिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो तो पुढील प्रमाणे.

अ) प्राकृतिक घटक

अक्षवृत्तीय स्थान –  अक्षवृत्तीय स्थानाचा प्रभाव मासेमारीवर मोठ्या प्रमाणावर पडत असतो. मासेमारीचा प्रदेश कोणत्या अक्षवृत्तावर आहे. यावर तेथील हवामान, आढळून येणारे समुद्रप्रवाह ठरत असतात,  जे मासेमारीला प्रभावित करतात.

हवामान – उष्ण हवामानापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात अधिक मासेमारी क्षेत्र आढळून येतात. शीत हवामानात मासे अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते.

समुद्र प्रवाह – उष्ण व थंड समुद्रप्रवाह यांचे जेथे संगम होत असतो, त्या भागात प्लवंकाची अधिक निर्मिती होते. प्लवंक हे माशांचे आवडते खाद्य आहे. मासे या भागात आकर्षित होतात तेथेच प्रजनन ही करतात त्यामुळे या भागात माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. अशी स्थिती मासेमारीस योग्य असते.

भूखंडमंच –  समुद्राच्या सर्वसाधारणपणे 200 मीटर खोलीपर्यंतच्या उधळ भागास भूखंडमंच असे म्हणतात. या उथळ भागात सूर्याची किरणे तळापार्यन्त पोहचतात, त्यामुळे या भागात प्लवंकाची अधिक निर्मिती अधिक होते. मासे प्लवक खाण्यासाठी भूखंडमंचावर येतात, येथे प्रजनन ही करतात त्यामुळे अशा ठिकाणी माशांची संख्या जास्त असते.  भूखंडमंचावर जगातील सर्वाधिक मासेमारी होतांना दिसते.

⑤ दंतुर किनारे –  दंतुर किनाऱ्यावर अधिक चांगल्या नैसर्गिक बंधाऱ्यांची निर्मिती होते. ही बंदरे मासेमारी करणाऱ्या बोटींना सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देतात. ज्यांच्या आधाराने बोटी खोल समुद्रात मासेमारी करू करू शकतात.

⑥ किनारी भागातील वनांचे प्रमाण –  किनारी भागात वनांचे प्रमाण अधिक असल्यास मासेमारीच्या बोटींच्या निर्मितीसाठी लाकूड सहज उपलब्ध होते. त्यामुळे मासेमारीला आर्थिक चालना मिळते.

eksl

आधुनिक जाळे व यांत्रिक बोटी –  मासेमारीसाठी पारंपारिक बोटी व जाळी यापेक्षा आधुनिक बोटिंग व जाळे यामुळे या व्यवसायाचा विकास होण्यास मदत होते.

मासेमारी कौशल्य –  मासेमारीचे कौशल्य ज्या प्रदेशातील लोकांकडे अधिक चांगले विकसित झालेले असते. त्या भागात मासेमारी अधिक मोठ्या प्रमाणात होत असते.  उदा: जपान आणि चीन सारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त वाढीस लागला आहे.

साठवण किंवा शीतगृहाची सोय –  मासे हे नाशवंत आहेत, उच्च अक्षवृत्तीय प्रदेशांमध्ये शीत हवामानामुळे मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. पण उष्णकटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहाची सोय करावी लागते.

वाहतूक व्यवस्था –  मासे हे नाशवंत असल्यामुळे त्यांना बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर पोचविण्यासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थेची गरज असते.

बाजारपेठ –  मासेमारी होण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे. ज्याद्वारे माशांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री चालेल व या व्यवसायाचा विकास होईल.

शासनाचे धोरण –  शासनाचे मासेमारी संबंधातील विविध नियम, कायदे तसेच माशांच्या आयात – निर्यात बद्दलचे धोरण याचाही परिणाम व्यवसायावर होत असतो.


प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणातील दिर्घोत्तरी प्रश्न

Prathamik Arthik Kriya Mothe Prashna


उत्तर – मंडई बागायती शेती ही शेती व्यवसायातील आधुनिक संकल्पना आहे.  शहरीकरणामुळे या प्रकारच्या शेतीची सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीनंतर शहरीकरण जसजसे वाढत गेले, तसतसे शहराच्या सोबतच्या परिसरातील शेती उत्पादनात क्रांतिकारक बदल होत गेले. शहरी भागातील दाट लोकसंख्येला रोजच्या आहारात आवश्यक असलेला भाजीपाला, फळभाज्या, फळे, फुले, दुध, अंडी, मासे, तसेच मांस यांची गरज असते. या पिकांची शहराच्या आसपासच्या प्रदेशात लागवड करतात, व ही उत्पादने ताबडतोब जलद वाहतूक साधनाच्या सहाय्याने शहरी बाजारपेठेत पाठवतात. बाजारपेठेतील मागणीनुसार पिकांचा प्रकार व प्रमाण ठरते. अशा पिकांच्या शेतीस मंडई बागायती शेती असे संबोधले जाते.

वैशिष्ट्ये

आधुनिक शेती प्रकार-  औद्योगिक क्रांतीनंतर सर्वच देशात झपाट्याने शहरे विकसित झाली. दाट लोकसंख्येतीची केंद्रे निर्माण झाली. येथील बहुसंख्य लोकसंख्या बिगर शेती व्यवसायात गुंतलेले असल्याने त्यांचे राहणीमान उच्च असते. अशा लोकांची भाजीपाला, दूध, फळे, अंडी मांस मासे इ. गरज भागविण्यासाठी या शेती प्रकार उदयास आला. उदा.  खेडशिवापुर, सासवड  येथुन पुणे शहरास पुरवठा होतो.

शेतीचा आकार लहान –

                   या शेती प्रकारात शेतीचा आकार लहान असतो. मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. 

भांडवलाचा जास्त वापर- 

या शेती प्रकारात मानवी श्रमाबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर होत असतो, त्यामुळे वेगवेगळे यंत्र, फवारणी यासारख्या क्रियासांठी जास्त भांडवल आवश्यक असते.

शहराच्या लगतच्या भागातील शेती

    मोठया शहरांच्या लोकसंख्येची भाजीपाला, दूध, फळे, अंडी मांस मासे इ. खादय वस्तुंना ताज्या स्वरूपात मागणी असते. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगत एका रात्रीच्या प्रवासाच्या अंतरा इतक्या जवळच्या प्रदेशात भाजीपाला व इतर उत्पादन घेतात व मागणी पुर्ण करतात.

सेंद्रीय व रासायनिक खंताचा वापर-

    या शेती भाजीपाला व फळांचे उत्पादन होत असल्याने पिकांवरील रोगांसाठी उपाय योजना तसचे जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी सेंद्रीय व रासायनिक खंताचा वापर केला जात असतो.

जलसिंचनाच्या सोयीची आवश्यकता-

भाजीपाला फळभाज्या या साठी मोठया प्रमाणावर पाण्याची सोय आवश्यक असते त्यासाठी या शेतीच्या प्रदेशात जलसिंचनाच्या सोयी तसेच शेततळे सारखे कृत्रिम जलसिंचन पहावयास मिळते.

ट्रक फार्मिग  –

सर्वसाधारणपणे ताज्या उत्पादनांचा पुरवठा बाजारपेठेत होण्याकरिता शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीचा प्रवास इतक्या दूर अंतरावर या प्रकारची शेती केली जाते. त्यामुळे या शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात. या शेतीतील उत्पादने नाशंवत असल्याने यासाठी जलद व कार्यक्षम वाहतुक व्यवस्थेची आवश्यकता असते.

मंडई बागायती हे शहरीकरणाचे अपत्य – शेतकरी परंपरागत शेती पद्धतीत हळूहळू बदल करून, मंडई बागायतीची निर्मिती झाली. त्यामुळे मंडई बागायती हे शहरीकरणाचे अपत्य आहे असे म्हटले जाते.

दर हेक्‍टरी जास्तीत  जास्त उत्पादन– या शेतीत मोठी भांडवल गुंतवणूक, खतांचा वापर व तंत्रज्ञानाचा विकास यांना प्राधान्य दिलेले असते. एकंदरीत अति सखोल पद्धतीचा अवलंब करून दर हेक्‍टरी जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे लागते.


उत्तर – पशुपालन हा मानवाचा प्राथमिक व्यवसाय आहे. पशुपालन हे मानवाकडुन प्राचीन काळापासुन होत असल्याचे लक्षात येते. गाई, शेळया मेंढया, घोडे या सारख्या प्राण्यांचे पालन-पोषन केले जात असते.

जागतिक वितरण–  

पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण हे 30 अंश ते 60 अंश उत्तर व 30 अंश ते 55 अंश दक्षिण अक्षवृत्त दरम्यान झालेले दिसते. हा व्यवसाय उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंड इ. प्रदेशात होतांना दिसतो.

हवामाना परिणामामुळे होणारे पशुपालन

या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत उत्तर गोलार्ध मध्ये पशुपालन व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो.

गवताळ कुरणांच्या प्रदेशातील पशुपालन-

 ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशूपालन अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे यांनी प्रभावित झालेले आहे. या मुळे येथे मोठया प्रमाणात या व्यवसास चालना मिळालेली आहे.

उच्च तंत्रज्ञान व यात्रिकीकरणा व्दारे होणारे पशुपालन प्रदेश

दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून येथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.  या प्रदेशात मेष पालन करुन त्यापासून लोकर निर्मीतीही होते.

विषववृत्तीय प्रदेशातील पुशपालन

 घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा हे पशुपालन व्यवसायातील प्रमुख अडसर आहेत.  विषुववृत्तीय प्रदेशात या घटकांमुळे पशुपालन व्यवसायाचा विकास फारसा झाला नाही.

शेतीस पुरक व्यवसाय म्हणुन होणारे पशुपालनाचे प्रदेश-  

शेतीखालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्र आढळून येते. त्यामुळे हे व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याचे लक्षात येते. ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये शेती व पशुपालन एकत्र होतांना दिसते.

व्यापारी पशुपालनाचे प्रदेश –  समशितोष्ण कटीबंधात व्यापारी उददेशाने पशुपालन केले जाते.

परिणाम करणारे घटक–  पुशपालनावर हवामान, भांडवल, अत्याधुनिक तंत्र, गवताळ कुरणे, वाहतूक सुविधा याचा परिणाम जाणवतो.

पशुपालन व्यवसायातील उत्पादने-

दुग्धजन्य पदार्थ, मांस, लोकर, कातडी,इ. स्वरुपाचे उत्पादने पशुपालनातुन घेता येतात.


4) खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो हे स्पष्ट करा.

उत्तर – मानवास उपयोगी असणारे सर्व खनिजे, खडक व धातुके पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात म्हणजेच भूकवच्याचा खडकात सापडतात. हे पदार्थ जेव्हा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित स्वरूपात आढळतात. तेव्हा त्यांना साठे असे म्हणतात. बहुतेक सर्व साठे हे कठीण खडकात असतात, असे साठे ज्या ठिकाणी भू कवच फोडून खडकापासून खणून काढले जातात त्यास खाणी असे म्हणतात.

   खाणकाम व्यवसाय हा खनिजांचा नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असतो

①  भूकवचात सापडणारे खनिज मानव निर्माण करू शकत नाही.

②  खनिज पूर्णतः निसर्गनिर्मित असते.

③  पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे.

④  पृथ्वीवर बहुतेक सर्व प्रदेशात खनिजांचे साठे कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात.

⑤  खाणकाम व्यवसाय हा त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान इत्यादी नैसर्गिक घटकावर अवलंबून असते.

⑦  ज्या प्रदेशात खनिजांचे साठे अधिक प्रमाणात आढळून येतात. त्या प्रदेशात खाणकाम व्यवसायाचा विकास होतो.


प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणातील दिर्घोत्तरी प्रश्न

Prathamik Arthik Kriya Mothe Prashna


उत्तर  

मनुष्य आपला उदरनिर्वाह करण्यासाठी निसर्गत: उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करुन जे विविध प्रकारचे व्यवसाय करतो त्यास प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणतात .

जे व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित असतात त्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदा: शिकार, फळे व कंदमुळे गोळा करणे, शेती, मासेमारी इ. प्राथमिक व्यवसाय हे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात.

प्राथमिक आर्थिक व्यवसायाची वैशिष्ट्ये

नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून –  प्राथमिक व्यवसाय हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. उदा: समुद्र किनारी प्रदेशात मासेमारी मासेमारी व्यवसाय विकसित होतो. तर वनांच्या प्रदेशात फळे, कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड या प्रकारचे वनावर आधारित प्राथमिक व्यवसाय आढळून येतात.

कच्च्या मालाची उपलब्धता-

प्राथमिक व्यवसाय मधून येणारे उत्पादने मोठया प्रमाणावर इतर उद्योगांचा कच्चा माल असतो.

सर्वाधिक लोकसंख्या गुंतलेली- 

या व्यवसायात जगातील सर्वाधिक लोकसंख्या गुतंलेली आहे. आशिया, आफ्रिका खंडात शेती हा प्राथमिक व्यवसाय मोठया प्रमाणात होतो.

उदरनिर्वाह हा प्रमुख उद्देश – प्राथमिक व्यवसाय व्यवसायाचा मुख्य उद्देश हा केवळ मानवाचा उदरनिर्वाह चालविणे एवढाच असतो. उदा: मासेमारी, सखोल उदरनिर्वाह शेती.

मानवी श्रमाचा वापर –  प्राथमिक व्यवसायात द्वितीयक, तृतीय व्यवसायाच्या तुलनेत अधिक श्रमाचा व बळाचा वापर केला जातो. उदा: शेती, मासेमारी, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड या व्यवसायात अधिक कष्ट करावे लागतात.

कमी उत्पन्न – प्राथमिक क्रियां पांरपारिक पध्दतीने केल्या जात असल्याने श्रमाच्या व बळाच्या मानाने खूपच कमी आर्थिक मोबदला मिळतो.

यांत्रिकीकरणाचा कमी वापर -प्राथमिक व्यवसायामध्ये द्वितीय, तृतीय व्यवसायाच्या तुलनेने कमी आधुनिक यंत्राचा व साधनांचा वापर केला जातो. बहुतेक कामे हि हाताने व पारंपारिक साधनानीच केली जातात.

द्वितीय व्यवसायांचा मुळ पाया– प्राथमिक व्यवसाय मधून येणारे उत्पादन हे द्वितीय, तृतीय व्यवसायांना कच्चामाल पुरवतात. उदा: शेती उत्पादने अनेक उद्योगांचा कच्चा माल आहेत. पशुपालन व्यवसायातून मिळणारे दूध हे दुग्ध प्रक्रिया उद्योगांना कच्चामाल म्हणून पुरवले जाते. शेतीती

अविकसित अविकसित व विकसनशील राष्ट्रांत अधिक प्रमाण -प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण हे अविकसित व विकसनशील राष्ट्रात अधिक आहे. अविकसित व विकसनशील राष्ट्रातील बहुतांशी लोकसंख्याही प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आहे. उदा: दक्षिण आशियाई देश व आफ्रिकी देश इ.


प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील भौगोलिक कारणे दया

प्राथमिक आर्थिक क्रिया प्रकरणावरील टिपा लिहा

वस्तूनिष्ठ प्रश्ने

मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.

मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

मानवी वस्ती व भूमी उपयोजन कारणे दया

मानवी वस्ती व भूमी उपयोजन वस्तूनिष्ठ प्रश्न objective Que.

सागरी लाटांचे कार्य

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

<p>You cannot copy content of this page</p>
Exit mobile version