Home More HSC Geography July 2025 Question paper

HSC Geography July 2025 Question paper

1
HSC Geography July 2025 Question paper

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

जुलै 2025

सूचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2)आवश्यक तेथे योग्य आकृत्या / आलेख काढावे.

3)रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

4) नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे.

5)उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

6)नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी.


HSC Geography July 2025 Question paper

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका


प्रश्न 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा           

20 गुण

5 गुण

अ.नं.
1)बर्फाच्छादित प्रदेश छ(क) देशाची राजधानी(य) हानिकारक शेती प्रकार
2)प्रशासकीय शहरका(ख) कृत्रिम उपग्रहश(र) विरळ लोकसंख्या
3)स्थलांतरित शेती(ग) मानवी श्रमाचा वापर(ल) संदेश वहन
4)गृह उदयोगग(घ) ध्रुवीय प्रदेश(ब) विणकर
5)जागतिक स्थान-निश्चिती प्रणाली (G.P.S.)(ड) शेतीचा आकार खूप लहान(श) टोकियो

5 गुण

1) लोकसंख्या बदलातील महत्वाचा घटक

(अ) साक्षरता

(ब) लिंग गुणोत्तर

(क) जन्मदर

(ड) वयोरचना

2) ग्रामीण भूमी उपयोजन…

(अ) औदयोगिक

(ब)  व्यापार

(क) मनोरंजन

(ड) वने

3) विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये….

(अ) एक-पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य पिके

(स) एक-पीक पद्धती, यंत्राचा वापर, समशीतोष्ण कटिबंध, अन्नधान्य पिके

(क) एक-पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्तीय प्रदेश,

ड) एक-पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध, ( डाळी उत्पादन)

4) खनिजांवर आधारित उद्धोग

(अ) लोहपोलाद उद्‌योग

(ब) कापड उदघोग

(क) साखर उद्योग

(ड) अन्नप्रक्रिया उद्‌योग

5) तृतीयक व्यवसाय…….

(अ) शेती

(ब) मालवाहतूक

(क) मधनिर्मिती

(ड) पेट्रोकेमिकल्स उदयोग


5 गुण

1)लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असेल तर आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते.

2) तृतीयक व्यवसाय हे अनुत्पादक व्यवसाय आहेत.

3)आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात ‘एस्किमो’ जमातीचे लोक आढळतात.

4) साक्षरतेची व्याख्या देशानुसार बदलते.

5)मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही.


5 गुण

1) अचूक सहसंबंध ओळखा :

A : विधान,   R: कारण

A: लोकसंख्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दर्शवितो.

R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दयोतक आहे.

(अ) केवळ A बरोबर आहे.

(ब) केवळ R बरोबर आहे.

(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे Aचे अचूक स्पष्टीकरण आहे.

(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

2) अयोग्य घटक ओळखा :

(अ) मैदाने

(ब) सरोवरे

(क) पठारे

(ड) पर्वत

3) खालील नागरी वस्तींचा लोकसंख्येनुसार चढता क्रम लावा :

(अ) महानगर

(ब) उपनगर

(क) नगर

(ड) महाकाय नगर

4) अचूक गट ओळखा :

(अ)- 1) समाजशास्त्र  2) राज्यशास्त्र  3) अर्थशास्त्र 4) लोकसंख्याशास्त्र

(ब) -1) सामाजिक भूगोल 2) राजकीय भूगोल 3) आर्थिक भूगोल 4) मृदा भूगोल

(क)- 1) हवामानशास्त्र 2) जीवशास्त्र 3) भूगर्भशास्त्र  4) सुदूर संवेदन

(ड) -1) इतिहास 2) भूरूपशास्त्र 3) मानसशास्त्र  4) लोकसंख्याशास्त्र

5) भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे प्रकार चढत्या क्रमाने लिहा :

(अ) मध्यम उद्योग

(ब) लघु उ‌द्योग

(क) मोठे उद्योग

(ड) सूक्ष्म उद्योग


HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका


प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही चार) :

12 गुण

1) हवामान या घटकाचा लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो.

2)लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे दयोतक असते.

3) भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

4) प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असती.

5) भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

6) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.

प्रश्न 3. खालील फरक स्पष्ट करा (कोणतेही तीन) :                              

9 गुण

1) विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड

2) लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा व लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा

3) जल वाहतूक व हवाई वाहतूक

4) प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश

5)निसर्गवाद व संभाव्यवाद

प्रश्न 4. (अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा):

 6 गुण

1) सर्वात कमी लोकसंख्येचा खंड

2) स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर – मुंबई

3) सर्वाधिक आयुर्मानाचा देश जपान

4) प्रशासकीय शहर – मॉस्को

5) लंडन न्यूयॉर्क हवाई मार्ग

6) सुएझ कालवा

7) दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र – पंपाज

8) दक्षिण आफ्रिकेतील एक औदयोगिक प्रदेश किंबर्ले – वीटवॉटरसँड

5 गुण

1) नकाशा काय दर्शवितो?

2) पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात?

3) संयुक्त संस्थानांतील औदयोगिक प्रदेशाचे नाव लिहा.

4) कोणत्या खंडात औदयोगिक विकास कमी झालेला दिसतो?

5) ओसाका, कोबे आणि क्योटो औद‌योगिक प्रदेश कोणत्या देशात आढळतात?

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

प्रश्न 5. खालील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही तीन) :

12 गुण

1) ग्रामीण भूमी उपयोजन

2) मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक

3) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व

4) भारतातील प्रादेशिक विषमता: कारणे

5) भूगोलाचे स्वरूप

प्रश्न 6. (अ) खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा :

4 गुण

वयोरचना

लोकसंख्येच्या वयोरचनेचे तीन मूलभूत घटक आहेत. यामध्ये जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांचा समावेश होतो. क्लार्क (1972) च्या मते वय संरचनेचे हे तीन घटक परस्पर अवलंबित आहेत. यापैकी एकामध्ये कोणताही बदल इतर दोनवर परिणाम करू शकतो. या परिवर्तना‌द्वारे सामाजिक-आर्थिक परिस्थिती वयाच्या संरचनेवर प्रभाव टाकतात. जन्मदर हा वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ठरवतो. म्हणूनच लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केले आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खंडातील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्येच्या सुमारे दोन पंचमांश लोक 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील 36% लोकसंख्या 15 वर्षांपेक्षा कमी आहे. याउलट कमी जन्म दर आणि दीर्घ आयुर्मान असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या तरुण वयोगटामध्ये आहे परंतु या देशातील वृद्ध वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने मोठे आहे. वायव्य युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बहुतेक देश, सी.आय.एस देश, ऑस्ट्रेलिया आणि जपान या श्रेणीतील आहेत. प्रजननक्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो.

प्रश्न :

1)लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक कोणते?

2)कोणत्या खंडामध्ये तरुण वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे?

3)2001 च्या जनगणनेनुसार भारतातील 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटाची किती टक्के लोकसंख्या आहे?

4) वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो?

प्रश्न 6. (ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :

4 गुण

1) त्रिकोणाकृती वस्ती

2) संदेशवहन या तृतीयक आर्थिक क्रियेचे वर्गीकरण

3) प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाच्या तरतुदीचा तक्ता

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

प्रश्न 7. खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा (कोणताही एक) :

8 गुण

1) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह लिहा.

2) कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्‌योगांचे वर्गीकरण करून सविस्तर माहिती लिहा.


HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका



जुलै 2025 उत्तरपत्रिका

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

उत्तरपत्रिका

प्रश्न 1 (अ)-  ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील सहसंबंध ओळखून साखळी पूर्ण करा :  (5 गुण)

अ. नं.अ’ब’क’
1बर्फाच्छादित प्रदेश(घ) ध्रुवीय प्रदेश(र) विरळ लोकसंख्या
2प्रशासकीय शहर(क) देशाची राजधानी(श) टोकियो
3स्थलांतरित शेती(ड) शेतीचा आकार खूप लहान(य) हानिकारक शेती प्रकार
4गृह उद्योग(ग) मानवी श्रमाचा वापर(ब) विणकर
5जागतिक स्थान-निश्चिती प्रणाली (GPS)(ख) कृत्रिम उपग्रह(ल) संदेश वहन

प्रश्न 1 (ब) अचूक पर्याय निवडून योग्य विधान पुन्हा लिहा : (5

1) उत्तर : (क) जन्मदर

2) उत्तर : (ड) वने

3) उत्तर : (ब) एक-पीक पद्धती, यंत्राचा वापर, समशीतोष्ण कटिबंध, अन्नधान्य पिके

4) उत्तर : (अ) लोहपोलाद उद्योग

5) उत्तर : (ब) मालवाहतूक


प्रश्न 1 (क) बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा : (5 गुण)

  1. उत्‍तर-  दिलेले विधान बरोबर आहे
  2. उत्‍तर-  दिलेले विधान चूक आहे
  3. उत्‍तर-  दिलेले विधान चूक आहे
  4. उत्‍तर-  दिलेले विधान बरोबर आहे
  5. उत्‍तर-  दिलेले विधान चूक आहे

प्रश्न 1 (ड)  दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा : (5 गुण)

1) अचूक सहसंबंध ओळखा (Assertion–Reason)

उत्तर : (ड) A आणि R दोन्ही बरोबर पण R हे A चे स्पष्टीकरण नाही


2) अयोग्य घटक ओळखा

  उत्तर : (ब) सरोवरे


3) नागरी वस्तींचा लोकसंख्येनुसार चढता क्रम

 उत्तर : उपनगर नगर महानगर महाकाय नगर


4) अचूक गट ओळखा


 उत्तर : (ब) सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, मृदा भूगोल


5) भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे चढते क्रम

उत्तर : सूक्ष्म उद्योग लघु उद्योग मध्यम उद्योग मोठे उद्यो

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

प्रश्न 2 रा भौगोलिक कारणे दया कोणतेही चार (12 गुण)

1) उत्तर:
(i) प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश, जसे की अति उष्ण किंवा अति शीत वाळवंटी प्रदेश आणि अति पर्जन्याचे प्रदेश मानवी वस्तीस अनुकूल नसल्यामुळे तेथे लोकसंख्या कमी आढळते.
(ii) उदाहरणार्थ, विषुववृत्ताजवळील ॲमझॉन आणि कांगोच्या सखल प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या खूपच विरळ आहे.
(iii) याउलट, जेथे आल्हाददायक हवामान असते किंवा ऋतूंनुसार हवामानात फारसे बदल होत नाहीत, असे प्रदेश लोकांना अधिवासासाठी आकर्षित करतात.
(iv) रशियामधील सायबेरियासारख्या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या वाढवण्यासाठी शासन नागरिकांना विशेष भत्ते आणि सुविधा पुरवते.
(v) भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशातील आल्हाददायक हवामानामुळे तिथे मानवी वस्तीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.


2) उत्तर:
(i) साक्षरतेच्या प्रमाणाचा थेट संबंध लोकांचे राहणीमान आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा यांच्याशी असतो.
(ii) साक्षरतेमुळे समाजात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचा वापर वाढतो, ज्यामुळे मानवी साधनसंपत्तीची गुणवत्ता सुधारते.
(iii) साक्षर लोक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक उत्पादकता वाढवू शकतात, जे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे.
(iv) साक्षरतेमुळे समाजातील अंधश्रद्धा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथा बंद होऊन सामाजिक परिवर्तन घडून येते.
(v) ज्या देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 100% च्या जवळ आहे (उदा. युरोप, उत्तर अमेरिका), तिथे विकासाचा स्तर उच्च असल्याचे दिसून येते.


3) उत्तर:
(i) खाणकाम व्यवसाय हा पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो आणि छोटा नागपूर पठार हे खनिजांच्या बाबतीत समृद्ध आहे.
(ii) या पठारावर लोह आणि दगडी कोळशाचे मोठे साठे उपलब्ध आहेत, जे औद्योगिक विकासासाठी पायाभूत मानले जातात.
(iii) खनिजांच्या उपलब्धतेमुळे या भागात विविध खनिज आधारित उद्योग केंद्रित झाले आहेत.
(iv) उद्योगांच्या विकासामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
(v) रोजगाराच्या संधींमुळे या परिसरात कुशल आणि अकुशल कामगारांच्या वस्त्या वाढून खाणकाम व्यवसायाला अधिक चालना मिळाली आहे.


4) उत्तर:
(i) प्रादेशिक विकासात भू-उठाव, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि सुगम्यता हे प्राकृतिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
(ii) ज्या प्रदेशात सुपीक मृदा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असते (उदा. नद्यांची खोरी किंवा सुपीक मैदाने), तिथे शेती आणि उद्योगांचा विकास जलद होतो.
(iii) याउलट, दुर्गम डोंगराळ भाग किंवा अतिउंच पर्वतीय प्रदेशांत (उदा. हिमालयीन प्रदेश) वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे कठीण असल्याने तिथे विकासाचा दर कमी असतो.
(iv) ज्या प्रदेशांना लांब समुद्रकिनारा आणि नैसर्गिक बंदरे लाभली आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विकासाचा अधिक फायदा मिळतो.
(v) प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या प्रदेशांत उपजीविकेच्या साधनांचा अभाव असल्याने विकासात अडसर निर्माण होतात.


5) उत्तर:
(i) नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भूगोलात माहिती संकलन आणि विश्लेषणाच्या कक्षा विस्तारल्या आहेत.
(ii) G.I.S. (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि G.P.S. यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आता नकाशाशास्त्र आणि उपयोजित भूगोलात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
(iii) भूगोलाचा संबंध केवळ नैसर्गिक विज्ञानाशी न राहता तो अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांसारख्या सामाजिक शास्त्रांशीही दृढ झाला आहे.
(iv) आजच्या युगात हवामान बदल, प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरीकरण यांसारख्या जागतिक समस्यांचा अभ्यास भूगोलाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने केला जात आहे.
(v) विविध आंतरशाखीय अभ्यासविषयांमुळे भूगोलाचे स्वरूप आता अधिक गतिमान आणि व्यापक बनले आहे.


6) उत्तर:
(i) विस्तृत शेतीमध्ये शेताचा आकार खूप मोठा असतो आणि मुख्यत्वे बाजारपेठेतील विक्रीसाठी उत्पादन घेतले जाते.
(ii) या शेती प्रकारात मोठ्या प्रमाणात भांडवल आणि आधुनिक कृषी यंत्रांचा वापर केला जातो.
(iii) पेरणीपासून ते कापणीपर्यंतची सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जातात, ज्यामुळे दरडोई उत्पादन जास्त मिळते.
(iv) नफा मिळवणे हा या शेतीचा मुख्य व्यापारी उद्देश असतो, म्हणून याला व्यापारी धान्य शेती असेही म्हणतात.
(v) ही शेती प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात (उदा. स्टेप्स, प्रेअरी) मोठ्या प्रमाणावर केली जाते.

—————————————————————————————————————————-

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

प्रश्न 3 रा फरक स्पष्ट करा  (कोणतेही 3) (9 गुण)

1)

वैशिष्ट्येविषुववृत्तीय वनातील लाकूडतोडसमशीतोष्ण (सूचीपर्णी) वनातील लाकूडतोड
लाकडाचा प्रकारयेथील वृक्षांचे लाकूड अतोनात टणक आणि जड असते.येथील वृक्षांचे लाकूड मऊ आणि वजनाने हलके असते.
वृक्षांची विविधताएका लहान क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती एकत्र आढळतात, त्यामुळे एकाच जातीचे वृक्ष शोधणे कठीण जाते.एकाच प्रकारच्या वृक्षांच्या जातींचे विस्तीर्ण पट्टे आढळतात, जे लाकूडतोडीसाठी सोयीचे असतात.
वाहतूक व सुगम्यतावने घनदाट आणि दुर्गम असल्याने वनात जाणे व वाहतूक करणे कठीण असते.वने विरळ असून यांत्रिक साधनांच्या साहाय्याने वाहतूक करणे सोपे असते.
व्यापारी महत्त्वही वने व्यापारी तत्त्वावर लाकूडतोडीसाठी फारशी किफायतशीर नाहीत.जगात सर्वाधिक व्यापारी लाकूडतोड याच वनांत केली जाते.
हवामान व उपद्रवयेथील हवामान उष्ण, दमट व रोगट असून सरपटणारे प्राणी व कीटकांचा उपद्रव असतो.येथील हवामान आल्हाददायक असून लाकूड साठवणुकीसाठी नैसर्गिक शीतकपाटासारखे कार्य करते.

2)

वैशिष्ट्येलोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पालोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा
जन्म व मृत्यू दरजन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असतात.जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो.
लोकसंख्या वाढलोकसंख्या वाढ स्थिर किंवा अत्यंत कमी असते.लोकसंख्या वाढ अत्यल्प किंवा ऋणात्मक (घटणारी) असते.
आर्थिक क्रियाअर्थव्यवस्था मुख्यत्वे शेती व प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते.अर्थव्यवस्थेत तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते.
वैद्यकीय सुविधावैद्यकीय सुविधा व स्वच्छतेचा अभाव असतो, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त असते.उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात आणि आरोग्याबाबत लोक जागरूक असतात.
उदाहरणसध्या कोणताही देश या टप्प्यात राहिलेला नाही.स्वीडन आणि फिनलंड यांसारखे विकसित देश या टप्प्यात येतात.

3)

वैशिष्ट्येजल वाहतूकहवाई वाहतूक
खर्च व वेगहा वाहतुकीचा स्वस्त परंतु संथ मार्ग आहे.हा वाहतुकीचा सर्वात महागडा परंतु वेगवान मार्ग आहे.
मालाचा प्रकारजड, अवजड आणि टिकाऊ मालाच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.हलक्या, मौल्यवान आणि नाशवंत मालाच्या जलद वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
नैसर्गिक अनुकूलतायासाठी दंतूर किनारपट्टी आणि नैसर्गिक बंदरांची आवश्यकता असते.यासाठी स्वच्छ हवामान आणि धावपट्टीसाठी सपाट मैदानी प्रदेशाची गरज असते.
मार्गमहासागर, नद्या आणि कालवे हे नैसर्गिक व मानवनिर्मित मार्ग वापरले जातात.यासाठी विमानांचे उड्डाण मार्ग निश्चित असतात परंतु विशिष्ट रस्ते बांधावे लागत नाहीत.

4)

वैशिष्ट्येप्राकृतिक प्रदेशराजकीय प्रदेश
निर्मितीचा आधारहे प्रदेश भू-रचना, हवामान, मृदा आणि वनस्पती यांसारख्या नैसर्गिक घटकांवर आधारित असतात.हे प्रदेश प्रशासकीय सीमा आणि राजकीय निर्णयांवर आधारित असतात.
सीमांचे स्वरूपप्राकृतिक प्रदेशांच्या सीमा बहुधा नैसर्गिक व अनिश्चित असतात.राजकीय प्रदेशांना निश्चित आणि अधिकृत सीमा असतात.
बदलाचे स्वरूपयात बदल होण्यास हजारो वर्षे लागतात किंवा ते स्थिर असतात.राजकीय घडामोडींमुळे यांच्या सीमा कधीही बदलू शकतात.
उदाहरणहिमालयीन प्रदेश, गंगा नदीचे मैदान किंवा थरचे वाळवंट.महाराष्ट्र राज्य, भारत देश किंवा पुणे जिल्हा.

5)

वैशिष्ट्येनिसर्गवाद (Environmental Determinism)संभाव्यवाद (Possibilism)
प्रमुख विचारनिसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ असून तो मानवावर अधिराज्य गाजवतो.मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि निसर्गात बदल करू शकतो.
मानवाची भूमिकामानव हा निसर्गाचा दास किंवा निष्क्रिय घटक मानला जातो.मानव हा निसर्गातील सक्रिय घटक असून तो उपलब्ध शक्यतांतून निवड करतो.
विकासाचे नियंत्रणमानवी क्रिया आणि विकास पूर्णपणे पर्यावरणाने नियंत्रित असतात.मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाच्या मर्यादांवर मात करता येते.
उदाहरणेअतिविषम हवामानात मानवी वस्तीला मर्यादा पडणे (उदा. अंटार्क्टिका).धरणे बांधणे, बोगदे तयार करणे किंवा हरितगृहाद्वारे शेती करणे.

—————————————————————————————-

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

———————————————————————

प्रश्न 4. (अ) तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा (कोणतेही सहा):

 6 गुण

      Sorry,  नकाशा अपलोड नाही      

प्रश्न 4. (ब) खालील नकाशाचे वाचन करुन दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

5 गुण

1) उत्तर:  हा नकाशा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दर्शवितो.


2) उत्तर:  पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडात आढळतात.


3) उत्तर: नकाशात संयुक्त संस्थानांतील (USA) ‘न्यू इंग्लंड’ किंवा ‘मध्य अटलांटिक’ हे औद्योगिक प्रदेश दाखवले आहेत.


4) उत्तर: नकाशातील औद्योगिक प्रदेशांच्या वितरणावरून आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांत औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो.


5) उत्तर: ओसाका, कोबे आणि क्योटो हे औद्योगिक प्रदेश जपान या देशात आढळतात.

—————————————————————————————————–

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

———————————————————————

प्रश्न 5. खालील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा, (कोणत्याही तीन) :

12 गुण

1) उत्तर

शेती समंधीत उपयोजन जास्त –  ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे प्रामुख्याने शेती आणि त्याशी संबंधित प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते.
② ग्रामीण भूमी उपयोजनाचे विविध गटांत वर्गीकरण केले जाते.
वन क्षेत्र : ग्रामिण भागातील वनांखालील जमिनीचा यात समावेश होतो.
बिगरशेती : वस्ती (ग्रामीण), रस्ते, रहिवास, कालवे किंवा उद्योगांसाठी वापरलेल्या जमिनीचा यात समावेश होतो.
ओसाड व नापीक भूमी : डोंगराळ किंवा वाळवंटी जमीन जी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही तंत्रज्ञानाने आणता येत नाही अशी जमीनीचा यात समावेश असतो.
कायमस्वरूपी चराऊ जमीन : ही जमीन सहसा ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते, ती सार्वजनिक असते.
पडीक जमीन: जी जमीन काही काळ कसदार बनवण्यासाठी पडीक ठेवली जाते किंवा पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लागवडीखाली आलेली नसते.
निव्वळ लागवडीखालील क्षेत्र : ज्या जमिनीवर प्रत्यक्ष लागवड करून उत्पादन घेतले जाते, असे क्षेत्र म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र होय.

या व्यक्तीरिक्तही वनराई, पिकाऊ अनुत्पादक, चालू पडजमीन, चालूपडशिवायची पड जमीन, असे देखिल भूमी उपयोजन ग्रामिण भागात आढळून येते.


2) उत्तर

भूखंड मंच: 200 मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या उथळ समुद्रात मासेमारीसाठी अनुकूल स्थिती असते. या ठिकाणी मांशाची उत्पत्ती जास्त असते, व मासेमारी करणे सोपे असते

उदा. चीन जवळील ओखात्स्क,
प्रवाहांचा संगम: उष्ण आणि थंड सागरी प्रवाहांच्या संगमामुळे माशाचे आवडते खादय प्लवकांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. ते खाण्यासाठी माशे अशा भागाकडे आकर्षित होतात, व तेथेच माशांची उत्पत्ती करतात. अशा ठिकाणी माशांचे प्रमाण जास्त असते.

उदा. क्युरोशियो उष्णप्रवाह व ओयाशियो थंड प्रवाह जपान जवळ एकत्र येतात तेथे मासेमारी चे प्रमाण जास्त आढळते
किनारपट्टी: दंतूर किनारपट्टी नैसर्गिक बंदरांच्या निर्मितीसाठी आणि जहाजे लावण्यासाठी सोयीची ठरते. मासेमारी व वाहतूकीसाठी दंतुर किनारे उपयुक्त असतात.
हवामान : उच्च अक्षवृत्तीय थंड हवामानामुळे मासे दिर्घ काळ टिकवता येतात आणि नैसर्गिक साठवणूक शक्य होते. शितगृहांची आवश्यकता लागत नाही. उष्ण कटीबंधात शीतगृहांची आवश्यकता असते.
लोकसंख्या: जपानसारख्या देशांत जमिनीची कमतरता आणि अन्नाची वाढती मागणी यामुळे लोक मासेमारी व्यवसायाकडे वळतात.

उदा. फिलीपाइन्स, जपान
तंत्रज्ञान: आधुनिक जहाजे, जाळी आणि शीतगृहांच्या उपलब्धतेमुळे या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले आहे.
वनांचे सानिध्य: किनारपट्टीजवळ वने असल्यास जहाजे बांधणीसाठी लाकूड सहज उपलब्ध होते.
कौशल्य : काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपारिक कौशल्य उच्च दर्जाचे असल्याने हा व्यवसाय प्रगत आहे.

उदा. जपान, चीन


3) उत्तर

संदेशांचे आदान-प्रदान मानव फार पूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यासाठी चित्रे, मुद्रा, भाषा यांचा वापर करीत मानवाने विविध स्वरूपांतील संदेशवाहकांचीही मदत घेतली.

① आधुनिक युगात माहिती संप्रेषण आणि संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रह हा एक अत्यंत प्रभावी आणि वेगवान पर्याय आहे.
② उपग्रहांमुळे ‘अंतर’ या अडथळ्यावर मात करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संदेश क्षणार्धात पोहोचवता येतात.

उदा. टी.व्ही., रेडिओ, इंटरनेट, मोबाईल व दूरध्वनी सेवा
हवामान अंदाज: दररोजच्या हवेची स्थिती, चक्रीवादळे किंवा नैसर्गिक आपत्तींची पूर्वकल्पना उपग्रहांद्वारे मिळते.
नैसर्गिक संसाधने: पृथ्वीच्या गाभ्यातील खनिज साठे शोधण्यासाठी उपग्रहांच्या माध्यमातून माहिती मिळवली जाते.
जी.पी.एस. (GPS): एखाद्या ठिकाणाचे अचूक अक्षांश-रेखांश आणि स्थान निश्चित करण्यासाठी उपग्रह अहोरात्र कार्य करतात.
थेट प्रक्षेपण: टेलिव्हिजन, रेडिओ आणि मोबाईल सेवा उपग्रहांच्या साहाय्यानेच सुरळीतपणे चालू शकतात.
इंटरनेट: इंटरनेटच्या माध्यमातून वाणी, लिखित, ध्वनी आणि चित्रफीत अशा विविध रूपांत संदेशांचे आदान-प्रदान सुलभ झाले आहे.
प्रादेशिक विकास: उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करून प्रदेशाच्या विकासाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते.


4) उत्तर

① भारतातील विविध प्रदेशांच्या विकासातील तफावतीला भौगोलिक आणि मानवी दोन्ही घटक जबाबदार आहेत.
प्राकृतिक रचना : दुर्गम डोंगराळ भूभाग किंवा घनदाट वनांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासात मर्यादा येतात, या उलट मैदानी प्रदेशात पायाभूत सेवा निर्मीती व उदयोग व्यसायात चालना मिळते

उदा. ईशान्य भारतात अडथळे आहेत तर पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार येथे सुविधा उपलब्ध आहेत.

नैसर्गिक संसाधने: ज्या प्रदेशात खनिजे आणि सुपीक मृदा मुबलक आहे, तिथे शेती व उद्योगांचा विकास वेगाने होतो.

उदा. भारतात छोटा नागपुरचे पठार खनिजांच्या उपलब्धतेमुळै विकसीत आहे तर नदयांच्या खोऱ्याचा प्रदेश सुपिक गाळाच्या जमिनीमुळे शेती विकसीत आहे.
भौगोलिक स्थान: नैसर्गिक बंदरे लाभलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अधिक फायदा मिळतो.

उदा. मुंबई
हवामान: विषम हवामान किंवा सतत नैसर्गिक आपत्तींना बळी पडणाऱ्या प्रदेशांत विकासाचा दर कमी असतो.

उदा. भारतातील उत्तराखंड राज्यात व हिमालयीन प्रदेश नेहमी नैसर्गिक आपत्तींना बळी पडतात,
पायाभूत सुविधा: रस्ते, वीज आणि बँकिंग सेवांचा विकास जिथे कमी झाला आहे, तिथे  भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण कमी राहते.
मानवी घटक: कुशल मनुष्यबळ आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव प्रादेशिक विषमतेस कारणीभूत ठरतो.
सरकारी गुंतवणूक: काही प्रदेशांत उद्योगांचे केंद्रीकरण झाल्याने तिथे अधिक विकास होतो, तर मागास प्रदेश मागे पडतात.


5) उत्तर

① भूगोल हे पृथ्वीच्या भौतिक आणि मानवी पर्यावरणातील रचना आणि आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
② भूगोलाचे स्वरूप प्रारंभी वर्णनात्मक होते, परंतु आता ते विश्लेषणात्मक आणि शास्त्रशुद्ध बनले आहे.
③ हे एक गतिशील शास्त्र असून यात भौगोलिक घटक काळानुसार कसे बदलतात, याचाही अभ्यास होतो.
④ ‘कुठे, केव्हा, काय आणि का?’ या चार प्रश्नांच्या आधारे भौगोलिक घटकांचा मागोवा घेतला जातो.
द्वैतवाद: भूगोलात निसर्गवाद आणि संभाव्यवाद असे दोन परस्परविरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन आढळतात.
आंतरशाखीय संबंध: भूगोलाचा संबंध अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि विज्ञानाच्या विविध शाखांशी निगडित आहे.
आधुनिक तंत्रज्ञान: सध्या भूगोलात जी.आय.एस. (GIS) आणि जी.पी.एस. (GPS) सारख्या प्रगत प्रणालींचा वापर वाढला आहे.
उपयोजित शास्त्र: भौगोलिक माहितीचा उपयोग प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी आणि प्रादेशिक नियोजनासाठी केला जातो.


HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

———————————————————————

प्रश्न 6 अ ) खालील उताऱ्याचे वाचन करुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया

गुण 4 

1) उत्तर: लोकसंख्येच्या वयोरचनेचे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे तीन मूलभूत घटक आहेत.


2)  उत्तर: लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडांमधील देशांमध्ये (जिथे उच्च जन्मदर आहे) तरुण वयोगटाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.


3) उत्तर: 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील 36% लोकसंख्या 15 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.


4)  उत्तर:  प्रजननक्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल हा वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो.

——————————————————————————————-

प्रश्न 6 ब) आकृती काढून नावे दया (कोणतेही दोन) :

4 गुण

1)

2)

3)


HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

———————————————————————

प्रश्न 7)  खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांचे उत्तर लिहा

8 गुण

(1) उत्तर

प्रस्तावना:
लोकसंख्येचे जागतिक वितरण हे केवळ प्राकृतिक रचनेवरच नव्हे, तर मानवी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटकांवरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. मानवाच्या विविध हालचाली आणि त्याने निर्माण केलेल्या सोयीसुविधांमुळे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता कमी किंवा जास्त होऊ शकते.

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक:

शेती (Agriculture): ज्या प्रदेशात शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे, तिथे लोकसंख्या दाट आढळते. शेतीमुळे अन्नधान्याचा पुरवठा होतो आणि त्यावर आधारित इतर प्रक्रिया उद्योगांची निर्मिती होऊन रोजगाराच्या संधी वाढतात.

उदा: भारताचे सुपीक मैदानी प्रदेश.

खाणकाम (Mining): खनिजांनी समृद्ध असलेल्या क्षेत्रात खाणकाम व्यवसायामुळे रोजगाराची निर्मिती होते. मौल्यवान खनिजे असलेल्या भागात हवामान प्रतिकूल असूनही लोकवस्ती दाट आढळते.

उदा: भारतातील छोटा नागपूर पठार आणि ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश.

वाहतूक (Transportation): रस्ते, लोहमार्ग किंवा जलमार्गांमुळे प्रदेशाची सुगम्यता वाढते. वाहतुकीच्या सोयीमुळे मालाची व प्रवाशांची ने-आण सुलभ होते, ज्यामुळे अशा भागांत लोकसंख्या एकवटते. आंतरराष्ट्रीय बंदराच्या ठिकाणी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था उपलब्ध असल्याने लोकसख्या वाढलेली आढळते. 

उदा: सुएझ कालव्याच्या बांधकामामुळे किनारी प्रदेशांत वाढलेली लोकसंख्या.

नागरीकरण (Urbanization): उद्योगांच्या विकासामुळे शहरांची निर्मिती होते. शहरांमध्ये मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेमुळे लोक ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर करतात.

उदा: बृहन्मुंबई क्षेत्र. विविध महानगरे

राजकीय घटक व शासकीय धोरणे (Political Factors & Government Policies): शासनाच्या धोरणांमुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. शासन मागास किंवा विरळ वस्तीच्या भागात लोकांना राहण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते.

उदा: रशियाने सायबेरियाच्या विषम हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी दिलेले विशेष भत्ते. जपान सरकार टोकीयो शहर सोडण्यासाठी लोकांना विविध अनुदान देत आहे.

सामाजिक घटक (Social Factors): धर्म, शिक्षण, आरोग्य आणि विवाह यांसारखे सामाजिक घटकही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. अनेकदा सामाजिक सुरक्षिततेसाठी लोक आपल्याच समूहात राहणे पसंत करतात.

सांस्कृतिक घटक (Cultural Factors): धार्मिक स्थळे किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने राहतात. अशा ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातूनही रोजगार उपलब्ध होतो.  उदा. वाराणसी, मक्का मंदीना इ.

ऊर्जा स्रोतांची उपलब्धता (Availability of Energy Resources): उद्योगांना लागणारा वीजपुरवठा किंवा कोळसा जेथे मुबलक असतो, त्या भागात उद्योगांचे केंद्रीकरण होऊन लोकवस्ती वाढते.

उदा. छोटा नागरपुरचे पठार, पंचमहासरोवरांचा प्रदेश

तंत्रज्ञान (Technology): आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव आता प्रतिकूल पर्यावरणावर मात करून वस्त्या स्थापन करू लागला आहे.

उदा: वाळवंटी प्रदेशात जलसिंचनाद्वारे केली जाणारी शेती.

आर्थिक क्रिया (Economic Activities): तृतीयक व्यवसायांची जिथे वाढ होते, तिथे आर्थिक स्थिरता असल्याने लोकसंख्या दाट आढळते.

समारोप:
अशा प्रकारे, मानवी हस्तक्षेप आणि त्यांनी निर्माण केलेल्या आर्थिक व सामाजिक संधींमुळे पृथ्वीवरील लोकसंख्येचे वितरण असमान झालेले दिसून येते.

——————————————————————-

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

———————————————————————

 (2): उत्तर

प्रस्तावना:
द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये निसर्गातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. या प्रक्रियेमुळे मालाचे मूल्य वाढते. कच्चा माल हा उद्योगांचा पाया असतो आणि त्याच्या उपलब्धतेवर व स्वरूपावर उद्योगांचे स्थान निश्चित होते. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे प्रामुख्याने पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

उद्योगांचे वर्गीकरण:

कृषी आधारित उद्योग (Agro-based Industries): या उद्योगांमध्ये शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. हे उद्योग प्रामुख्याने ग्रामीण भागात कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ आढळतात.
उदाहरणे:

खाली कृषी आधारित उद्योग व कच्चा माल यांचा तक्ता

उद्योगकच्चा माल
साखर कारखानेऊस, बीट
कापड गिरण्याकापूस, धागे
अन्नप्रक्रिया उद्योगविविध शेती उत्पादने
फळप्रक्रिया उद्योगविविध प्रकारची फळे

सागरी उत्पादनावर आधारित उद्योग (Marine-based Industries): समुद्र किंवा महासागरातून मिळणाऱ्या मत्स्य आणि इतर उत्पादनांवर या उद्योगात प्रक्रिया केली जाते.
उदाहरणे:

i) मासे डबाबंद करणे,

ii) मोती व शंख-शिंपल्यांपासून वस्तू बनवणे,

iii) मत्स्यतेल काढणे इत्यादी.

वनाधारित उद्योग (Forest-based Industries): वनांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर आधारित हे उद्योग आहेत. यामध्ये इमारती लाकूड आणि इतर गौण वनोपजांचा वापर होतो.
उदाहरणे :

i) वनउत्पादने गोळा करणे-

ii) कागद उद्योग,

iii) जहाज बांधणी,

iv) फर्निचर उद्योग,

v) तसेच लाख, डिंक, राळ, रंग आणि सुगंधी द्रव्ये तयार करणे.

खनिजांवर आधारित उद्योग (Mineral-based Industries): खाणकामातून मिळणाऱ्या धातू व अधातू खनिजांवर हे उद्योग अवलंबून असतात. हे उद्योग सहसा खाण क्षेत्राच्या जवळ असतात कारण खनिज कच्चा माल जड व अवजड असतो.
उदाहरणे:

i) लोह-पोलाद उद्योग,

ii) पेट्रोकेमिकल्स आणि

iii) ॲल्युमिनियम उद्योग.

प्राणिजन्य उद्योग (Animal-based Industries): हे उद्योग पशुपालनातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असतात. यामध्ये प्राण्यांचे मांस, दूध, कातडी व केस यांचा वापर होतो.
खाली प्राणीजन्य उद्योग व कच्चा माल यांचा उदाहरणांचा तक्ता दिला आहे —

उद्योगकच्चा माल
दुग्धजन्य पदार्थ (चीज, लोणी)दूध
मांस प्रक्रियाप्राणी
चामड्याच्या वस्तू (बूट, बॅगा)कातडी
लोकरीचे कापड उद्योगलोकर
रेशीम कापड उद्योगरेशीम कोष

.

कच्च्या मालाचे स्वरूप आणि उद्योगांचे स्थान: नाशवंत किंवा वजनात घट होणाऱ्या कच्च्या मालावर आधारित उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ असतात. याउलट, टिकाऊ व वजनात घट न होणाऱ्या मालाचे उद्योग इतरत्रही स्थापन होऊ शकतात.

उदा- साखर कारखाने उस उत्पादक प्रदेशात स्थापन केले जातात,

विकासातील भूमिका: कच्च्या मालाच्या उपलब्धतेमुळे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते, ज्यामुळे त्या प्रदेशाचा आर्थिक विकास होतो.

उदा. छोटा नागपुरच्या पठारावर मोठया प्रमाणावर उदयोग स्थापन झाले आहेत

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सध्या कच्च्या मालाची वाहतूक सुलभ झाल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योग कच्च्या मालाच्या क्षेत्रापासून दूरही स्थापन होऊ लागले आहेत.

खाली उद्योगांच्या वर्गीकरणाचा तक्ता

कच्च्या मालाचा स्रोतप्रमुख उद्योग
कृषीसाखर, सुती कापड
सागरीमासळी डबाबंद करणे, मोती
वनेकागद, डिंक, राळ
खनिजेलोह-पोलाद, सिमेंट
प्राणीदुग्धजन्य पदार्थ, चर्मोद्योग

समारोप:
अशा प्रकारे, कच्च्या मालाचा स्रोत हा उद्योगांच्या प्रकारावर आणि त्यांच्या वितरणावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उद्योगांच्या माध्यमातून इष्टतम वापर केल्यास प्रादेशिक विकासाला चालना मिळते.

HSC Geography July 2025 Question paper Answersheet

HSC बोर्ड जुलै 2025 बारावी भूगोल प्रश्नपत्रिका तिची उत्तरपत्रिका

डाऊनलोड करा

माहीतीसाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा

HSC 2021 Geography Question Paper and Answers

HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची  सोडविलेली उत्तरपत्रिका

HSC बोर्ड 2022 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे

बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version