XII Geo Tertiary Activities Short Notes
XII Geo Tertiary Activities Short Notes
मराठी व इंग्रजी माध्यम
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
1) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व (Oct 21, March 22, Jully 23)
2) उद्योगांच्या विकासातील वाहतुकीची भूमिका (March 22)
3) व्यापारात वाहतुकीची भूमिका (March 23, March 24)
4) संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व. (Jully 24)
5) चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये.
6) तृतीयक व्यवसायांची वैशिष्ट्ये.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
1) संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व (Oct 21, March 22, Jully 23)
उत्तर-
1) संदेशांचे आदान-प्रदान मानव फार पूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यासाठी चित्रे, मुद्रा, भाषा यांचा वापर करीत मानवाने विविध स्वरूपांतील संदेशवाहकांचीही मदत घेतली.
2) वर्तमानकाळात विविध माध्यमांद्वारे तोंडी व लिखित, सांख्यिकीय, ध्वनिफीत, चित्रफीत अशा विविध स्वरूपांच्या माहितीचे-संदेशांचे आदान-प्रदान केले जाते. या सर्वबाबींसाठी उपग्रहीय माहीतीचा उपयोग होत असतो उदा. टी.व्ही., रेडिओ, इंटरनेट, मोबाईल व दूरध्वनी सेवा
4) अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम यातून पृथ्वीवरील विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल निरंतर माहिती मिळविली जात असते.
5) कृत्रिम उपग्रहांमुळे ‘अंतर’ या अडथळ्यावरच पूर्णपणे मात झाली आहे. आता लक्षावधी लोकांपर्यंत, क्षणार्धात, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकाच वेळेस माहितीची किंवा संदेशांची देवाणघेवाण शक्य होत आहे.
6) कृत्रिम उपग्रहांमुळे रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, समुद्राची स्थिती, हवामानाचा अंदाज, पाण्याचे स्त्रोत, पर्जन्य स्थिती, वादळे, साधनसंपत्ती / खनिजसंपत्तीचा शोध, याबाबतची माहिती साठी उपग्रहांचा उपयोग मोठया प्रमाणात वाढलेला आहे
7) उपग्रहीय माहीतीमुळे आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार यात मोठया प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.
8) उपग्रहांच्या साहाय्याने GPS व GIS प्रणाली कार्य करते, यामूळे वाहन, विमान, जहाजे इ. संदर्भातील अचूक स्थानाची माहीती कळते
9) अंतराळ, ग्रह, तारे आणि इतर खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह अतिशय उपयुक्त ठरतात.
10) सशोधकांना तसेच खगोल अभ्यासकांना अंतराळ, ग्रह, तारे आणि इतर खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह अतिशय उपयुक्त ठरतात
11) देशाच्या सुरक्षेसाठी देशांच्या सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुप्त माहिती मिळवण्यासाठी होतो. उपग्रहांचा वापर वाढत आहे.
12) अलिकडच्या काळात एकंदरीत हवामान अंदाज, नकाशे व भूपृष्ठ अभ्यास, संरक्षण व गुप्त माहिती, वैज्ञानिक संशोधन, नेव्हिगेशन यासारख्या अनेक बांबीसाठी उपग्रहांचा वापर वाढलेला आहे.
2) व्यापारात वाहतुकीची भूमिका. (March 23, March 24)
किंवा
3) उद्योगांच्या विकासातील वाहतुकीची भूमिका (March 22)
उत्तर-
1) वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे, ज्याव्दारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल यांचे प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर केले जाते.
2) वाहतूक एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती देशाच्या सर्वप्रकारच्या आर्थिक क्रियात पायाभूत घटक आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूकीला महत्वाचे स्थान महत्वाचे आहे.
3) देशांअतर्गत उदयोग व व्यवसायासाठी भूवाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी व अवजड मालाच्या वाहतूकीसाठी जलवाहतूक आणि वेगवान वाहतूकीसाठी हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापाऱ व उदयोगात अनन्यसाधारण आहे.
4) वाहतूकीच्या विविध साधनांद्वारे एखाद्या प्रदेशात आवश्यक असणारा माल हा दुसऱ्या प्रदेशातून मागविता येतो. किंवा प्रदेशातील जास्तीचा उत्पादित माल आवयश्क त्या ठिकाणी पाठविता येतो
5) वाहतूकीमुळे एका प्रदेशाचा दुसऱ्या प्रदेशाशी व्यापार सुरु होतो व वृध्दींगत होत जातो. वाहतुकीमुळे कच्चा माल उदयोगापर्यंन्त, पक्का माल हा कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत व ग्राहकापर्यंत पोहोचविला जातो,
6) काही वेळेस उत्पादन घेणारा प्रदेश व बाजारपेठ दूर-दूर असतात. त्यावेळी त्याच्यांत समन्वय साधण्याचे कार्य वाहतूक साधनांमुळे शक्य होते.
7) उदयोग व व्यापारात बंदरे आणि गोदींसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात जलवाहतूक व हवाई वाहतूक महत्वाचे कार्य करीत असते. जलवाहतूक व हवाई वाहतूकीस समांतर कार्य भूवाहतूकीव्दारे होत असते
8) सुएझ कालवा, पनामा कालवा यांच्यामुळे आशियाखंड, आफ्रिका खंड, युरोप हे यांच्यातील उदयोग व व्यापारात मोठया प्रमाणात विकास झालेला आहे.
9) ज्या प्रदेशात भूमार्ग, जलमार्ग व हवाई मार्गाचा विकास झालेला असतो, अशा प्रदेशात व्यापाराला अधिक चालना मिळते व व्यापाराचा विकास होतो.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
4) संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व. (Jully 24)
उत्तर-
ज्ञान माहिती व संदेश यांची देवाण-घेवाण म्हणजे संदेशवहन होय संदेश वहन म्हणजेच दळणवळण किंवा संप्रेषण होय किंवा संदेशवहन म्हणजे व्यक्ती ते व्यक्ती किंवा ठिकाण ते ठिकाण माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया होय. आजच्या काळात संदेशवहनासाठी विविध साधने वापरली जातात. त्यांची दोन प्रमुख प्रकारे विभागणी करता येते
| प्रकार | उदाहरणे |
| 1 पारंपरिक साधने | संदेशवाहक, घोडस्वार, कबूतर, फलक, जाहिरातफलक, पत्र, टपाल सेवा, इ. |
| 2 आधुनिक साधने | दूरध्वनी, मोबाईल फोन, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, ई-मेल, सोशल मीडिया, वृत्तपत्रे व मासिके, उपग्रह व संचार जाळे |
ब) संदेशवहनाचे महत्त्व:-
① देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी तत्काळ संवाद साधता येतो.
② बातम्या, सूचना, जाहिराती, शासनाच्या योजना यांची माहिती लोकांपर्यंत लवकर पोहोचते.
③ व्यापारी व्यवहार, बँकिंग, ऑनलाइन सेवा या सर्वांसाठी संचार साधने अत्यंत आवश्यक आहेत.
④ ऑनलाइन वर्ग, ई-लायब्ररी, संशोधन व ज्ञानविनिमय यामध्ये संदेशवहनाचे साधने उपयोगी ठरतात.
⑤ नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी संदेशवहन प्रणालीद्वारे मदत कार्य जलदगतीने करता येते.
⑥ जगातील विविध देशांमधील लोक एकमेकांशी जोडले जातात; त्यामुळे जागतिक समज, सहकार्य आणि एकात्मता वाढते.
5) तृतीयक व्यवसायांची वैशिष्ट्ये.
उत्तर
1) तृतीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम करतात.
2) या क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काही घेतले जात नाही व व्दितीय व्यवसायाप्रमाणे उत्पादन निर्मिती केली जात नाही.
3) मात्र हे व्यवसाय प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या सेवा दिली जाते व तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो म्हणून तृतीयक व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात.
4) या क्रियात व्यापार व वाणिज्य, वाहतूक, पर्यटन, संदेशवहन, वित्तीय सेवा, अशा अनेकविध सेवा आहेत.
5) तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका खूप जास्त आहे आणि तो विविध सेवा क्षेत्रांशी संबंधित आहे.
6) तृतीयक व्यवसायांमुळे साधनसंपत्तीची, कच्च्या मालाची, उत्पादित वस्तूंची, तसेच मजुरांची वाहतूक सुलभ होते.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
6) चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये.
उत्तर
ज्या व्यवसांमध्ये चिंतन, सशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. चतुर्थक व्यवसाय हे ज्ञान, माहिती, संशोधन व कौशल्यावर आधारित असतात. नवीन तंत्रज्ञान, उत्पादने व प्रक्रिया विकसित करण्याचे कार्य या क्षेत्रात केले जाते
वैशिष्टे-
① चतुर्थक व्यवसाय हे बुद्धी व कौशल्यावर आधारित असल्याने हे व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात. उदा वित्त नियोजनकार
② या व्यवसायांचा विस्तार अनेक क्षेत्रांत होतो. उदा., वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्राणाली विकसक, संख्याशास्त्री, शाळा, महाविदयालय, विदयापिठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इ.
③ या व्यवसायातील व्यक्ती त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नामवंत असतात. या व्यवसायांसाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण व विशिष्ट कौशल्य आवश्यक असते. या क्षेत्रातील नोकऱ्या तुलनेने अधिक वेतन व सामाजिक प्रतिष्ठा देतात.
④ मानवाच्या प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांच्या आधुनिकीकरणात चतुर्थक व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे व्यवसाय सेवा व ज्ञान पुरवतात.
⑤ एकूणच मानवी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात हे व्यवसाय मोलाची भर घालतात. या क्षेत्रात संगणक, इंटरनेट, उपग्रह संचार, डेटा विश्लेषण अशा आधुनिक साधनांचा वापर होतो.
बारावी प्रात्यक्षिक जर्नल माफक व होलसेल दरात उपलब्ध
संपर्क- प्रा मनोज देशमुख 9607371951 9421680541
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
1) Importance of artificial satellite in communication (Oct 21, March 22, Jully 23)
2) Role of transport in the development of industries (March 22)
3) Role of transport in trade. (March 23, March 24)
4) Means of communication and their importance. (Jully 24)
5) Characteristics of quaternary industries.
6) Characteristics of tertiary industries.
1) Importance of Artificial Satellites in Communication
(Oct 2021, March 2022, July 2023)
Answer:
①Humans have been exchanging messages since ancient times using pictures, symbols, and languages, as well as various types of messengers.
2) In the present era, messages and information in oral, written, statistical, audio, and video forms are exchanged through various media. For all these purposes, satellite-based communication is used — for example, TV, radio, internet, mobile, and telephone services.
3) Artificial satellites launched into space continuously perform communication functions and provide constant information about various natural and human phenomena on Earth.
4) Artificial satellites have completely overcome the obstacle of “distance.” Now, information or messages can be exchanged instantly and simultaneously with millions of people anywhere in the world.
5) Satellites are extensively used to obtain information about daily weather conditions, atmospheric cycles, sea conditions, rainfall, storms, water sources, and the search for natural and mineral resources.
6) Satellite information is highly beneficial in disaster management, tourism, air transport, and international trade.
7) Systems like GPS and GIS work with the help of satellites, which provide accurate information about the location of vehicles, aircraft, and ships.
8) Artificial satellites are very useful for studying space, planets, stars, and other celestial bodies.
9) They also help researchers and astronomers in scientific study and exploration.
10) Satellites are increasingly being used for national security — to monitor border areas and collect confidential information.
11) In recent times, the use of satellites has increased for weather forecasting, mapping and surface studies, defense and intelligence, scientific research, and navigation.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
2) Role of Transport in Trade
(March 2023, March 2024)
or
3) Role of Transport in Industrial Development
(March 2022)
Answer:
1) Transport is a service or facility that helps in the physical movement of people, goods, and finished products from one place to another.
2) Transport is a tertiary economic activity and a fundamental component of all economic activities in a country. It plays an important role in national development.
3) Land transport is important for domestic trade and industry, water transport for international trade and heavy goods, and air transport for rapid movement.
4)Through various means of transport, goods required in one region can be brought from another region, and surplus products can be sent where they are needed.
5) Transport helps establish and expand trade between regions. It carries raw materials to industries and finished products from factories to markets and consumers.
6) Sometimes, production areas and markets are far apart — transport helps coordinate between them.
7) Coastal regions are suitable for ports and harbors, which are vital for international trade through water and air transport. Land transport complements these systems.
8) Canals like the Suez Canal and Panama Canal have significantly contributed to industrial and commercial development between Asia, Africa, and Europe.
9) Regions with well-developed roadways, waterways, and airways experience greater trade growth and economic development.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
4) Means of Communication and Their Importance
(July 2024)
Answer:
Communication is the exchange of knowledge, information, and messages — also known as correspondence or transmission. It is the process of conveying information from person to person or from one place to another. In the modern era, various means of communication are used, which are mainly divided into two types:
| Type | Examples |
| 1)Traditional Means | Messengers, horse riders, pigeons, signboards, posters, letters, postal services, etc. |
| 2) Modern Means | Telephone, mobile phone, radio, television, internet, e-mail, social media, newspapers, magazines, satellites, and communication networks. |
* Importance of Communication:
1) Enables instant contact with anyone in any corner of the country or the world.
2) Helps news, information, advertisements, and government schemes reach people quickly.
3) Essential for business transactions, banking, and online services.
4) Useful in online classes, e-libraries, research, and knowledge exchange.
5) During natural disasters, accidents, or emergencies, the communication system enables rapid relief operations.
6) Connects people across different countries, promoting global understanding, cooperation, and unity.
5) Characteristics of Tertiary Occupations
Answer:
1) Tertiary occupations mainly act as a link between primary and secondary occupations.
2) These activities neither extract anything directly from nature (like primary) nor produce goods (like secondary).
3) They provide various services supporting primary and secondary activities in exchange for remuneration — hence also called service occupations.
4) They include trade and commerce, transport, tourism, communication, and financial services.
5) The scope of tertiary occupations is vast and covers various service sectors.
6) They make the movement of resources, raw materials, finished goods, and labor easier.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
6) Characteristics of Quaternary Occupations
Answer:
Occupations involving thinking, research, and innovation are called quaternary occupations. These are based on knowledge, information, research, and skills. This sector develops new technologies, products, and processes.
Features:
1) Being knowledge- and skill-based, these occupations are often individual in nature — e.g., financial planners.
2) They cover many fields such as financial planning, tax consultancy, computer system development, statistics, teaching (schools, colleges, universities), accounting, art, and medicine.
3) Individuals in this field are experts and specialists; such jobs require higher education, professional training, and specific skills. These careers offer high salaries and social prestige.
4) Quaternary occupations play a vital role in the modernization of primary, secondary, and tertiary sectors by providing knowledge and services.
5) They make a valuable contribution to the social, economic, and cultural life of society. Modern tools like computers, the internet, satellite communication, and data analysis are widely used in this field.
XII Geo Tertiary Activities Short Notes
बारावी भूगोल तृतीय आर्थिक क्रिया प्रकरणातील टिपा लिहा
HSC 2022 Geography Question Paper and Answer
अधिक वाचा –
HSC बोर्ड जुलै 2024 भूगोल प्रश्नपत्रिका व तिची सोडविलेली उत्तरपत्रिका
मार्च 2021 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका व तिची उत्तरपत्रिका-
बारावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका- 1 गुण 80
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा प्रश्न व त्यांची उत्तरे
बारावी भूगोल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित साखळी पुर्ण करा व त्यांची उत्तरे
मानवी वस्ती व भूमी उपयोजन फरक स्पष्ट करा.
मानवी वस्ती व भूमी उपयोजन दिर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे
बारावी भूगोल प्रात्यक्षिक वही
विक्रीसाठी होलसेल भावात उपलब्ध
संपर्क्र- प्रा. मनोज देशमुख 9607371951 9421680541
